नटरंग तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात ?

माझी दुनिया's picture
माझी दुनिया in काथ्याकूट
4 Jan 2010 - 10:00 am
गाभा: 

नटरंग हा मराठी चित्रपट पहायची इच्छा आहे. आपल्या जवळच्या चित्रपटगृहात अशी त्याची जाहिरात केली जाते, माझ्या जवळच्या चित्रपटगृहात ( कुलराज ब्रॉडवे ) ३.१५ चा खेळ आहे अशी वर्तमानपत्रात जाहिरात वाचली पण पोस्टरवर मात्र या प्रसिद्ध चित्रपटाचा काहीच मागमूस नाही. पुरावा म्हणून हा चित्रपटगृहाच्या पोस्टर्सचा फोटो चिकटवत आहे.

आम्ही दुसरीकडे जात असल्यामुळे थांबून प्रत्यक्ष चौकशी केली नाही. पण माझा मुद्दा वेगळाच आहे. महाराष्ट्रात मराठी चित्रपट मॉल मध्ये सक्तीचे केले असल्याने एखादा आठवडा एखादया गैरसोयीच्या वेळाचा खेळ लावला जात असतो आणि मग प्रेक्षक येत नाहीत या सबबीखाली मराठी चित्रपट दाखवणे टाळले जाऊ शकते. महाराष्ट्रातच मराठीची ही उपेक्षा थांबवण्याकरता शासन काय करणार आहे ?

कधी नव्हे ते या इंग्रजी नविन वर्षात पहिल्याच महिन्यात दर आठवडयाला एक याप्रमाणे अनुक्रमे नटरंग, झेंडा, शिक्षणाच्या आयचा घो आणि हरिश्चंद्राची फॅक्टरी याप्रमाणे वेगवेगळुया विषयाला वाहिलेले बहुचर्चित चित्रपट येत आहेत. त्या सगळ्यांवर असाच अन्याय होणार की काय ?

प्रतिक्रिया

प्राजु's picture

4 Jan 2010 - 7:51 pm | प्राजु

शासनाने सक्ती केली ना.. ! मग आता ती पाळली जाते आहे की नाही याच्याशी शासनाला देणे-घेणे नाही. तेव्हा विसरा!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

टारझन's picture

4 Jan 2010 - 10:04 pm | टारझन

मल्टिप्लेक्स वाल्यांच्या आयचा घो !
मल्टीप्लेक्ष क्षेत्रात मराठी माणुस उतरायला हवा :)

मला आधी वाटलं की "नटरंग" हे काय कोण्या मिपाकरांचं विडंबण की काय :)

असो !

प्रभात ला आपण नेमाने मराठी सिनेमे पहातो हा ही पाहू :)