मराठी कॅलेंडर

सखी's picture
सखी in काथ्याकूट
4 Jan 2010 - 8:07 pm
गाभा: 

कोणाकडे मराठी कॅलेंडर (जालावर किंवा पीडीफ) असेल तर इथे चढवता येईल का? मी गेले काही दिवस बरेच गुगलुन पाहीले पण सापडले नाही, म्हणून इथे धागा टाकत आहे. कदाचित परदेशात राहणा-या बाकी मिपाकरांनाही याचा उपयोग होईल. ०६ किंवा ०७ साली महारष्ट्र सरकारच्या वेबसाइटवर मराठी कॅलेंडर होते (बहुतेक करुन पर्यटन विभागात) पण यावर्षी अजुन तरी सापडले नाही.
मदतीसाठी धन्यवाद.

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

4 Jan 2010 - 9:05 pm | चिरोटा

इकडे हे मिळाले.
http://www.marathimati.com/dindarshika/2009/january.asp
पण हे चढवता येइल की नाही शंका आहे.
भेंडी
P = NP

सखी's picture

4 Jan 2010 - 9:11 pm | सखी

अहो पण हे २००९ चे आहे ना - आता २०१० सुरु झाले ना, मी ते शोधते आहे.

सुनील's picture

4 Jan 2010 - 10:26 pm | सुनील

भेंडीबाजार हे behind the bazar याचा अपभ्रंश आहे, हे आता पटले! :)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रमोद देव's picture

4 Jan 2010 - 9:22 pm | प्रमोद देव

कालनिर्णय

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

मराठी पंचांग.

तुमच्या शहरासाठी शोध घेऊन योग्य ते पंचांग मिळू शकेल.

अंतु बर्वा's picture

5 Jan 2010 - 12:03 am | अंतु बर्वा

माझ्याकडे पीडीएफ आहे... ऑफीसातुन चढवता येत नाहीये. घरुन गुगल डॉक्स वर चढवेन...

"नेटावरी कालनिर्णय असावे," असे वाटून मी कालनिर्णय.कॉम च्या संकेतस्थळावर गेलो तर जानेवारी महीना दिसला पण कालनिर्णय विकत घेण्याची सोय काही दिसली नाही. :-(

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

चतुरंग's picture

5 Jan 2010 - 12:11 am | चतुरंग

ऑन लाईन शॉपिंग मॉल आहे ना तिथे उजव्या बाजूला! ;)

चतुरंग

विकास's picture

5 Jan 2010 - 12:23 am | विकास

धन्यवाद! :-)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

अथांग सागर's picture

5 Jan 2010 - 6:10 am | अथांग सागर

टॉरेंट्झ वरुन डाऊनलोड करा..
--अथांग सागर

दिपक's picture

5 Jan 2010 - 8:57 am | दिपक
टुकुल's picture

5 Jan 2010 - 9:48 am | टुकुल

धन्यु दिपक.

---टुकुल

ब्रिटिश टिंग्या's picture

5 Jan 2010 - 11:43 am | ब्रिटिश टिंग्या

"मस्त कॅलेंडर" आहे!

पर्नल नेने मराठे's picture

5 Jan 2010 - 1:23 pm | पर्नल नेने मराठे

दिपक, मागची बाजु पण करा यपलोड्..बरिच उप्य्युक्ट माहिति असते
चुचु

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jan 2010 - 3:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>मागची बाजु पण करा यपलोड्..बरिच उप्य्युक्ट माहिति असते
हो ना, पानाची मागची बाजूही अपलोड केली पाहिजे. हा महिना असा जाईल. पाकृती,बरीच माहिती, असते.
कालनिर्णयाच्या जानेवारीच्या पानामागे 'ब्रह्मदेवाच्या गाठी' नावाचा सचिन मोटे यांचा लेख खुसखुशीत आहे.

-दिलीप बिरुटे

दिपक's picture

5 Jan 2010 - 4:17 pm | दिपक

चुचुतै वर दिलेले कालनिर्णय मी उपलोड केलेले नाही. स्क्रिब्ड संकेतस्थळावर कुणा शशी महाजन यांनी उपलोड केलेले आहे.

चिरोटा's picture

5 Jan 2010 - 1:16 pm | चिरोटा

कालनिर्णय संकेतस्थळावर कोठेही पंचांग डाउन्लोड करा असा पर्याय दिसला नाही. वर जे पंचांग प्रसिद्ध केले आहे ते करण्याआधी कालनिर्णयवाल्यांची परवानगी घ्यायची गरज नाही का?
(पंचांगसागर)भेंडी
P = NP

शाहरुख's picture

5 Jan 2010 - 11:04 pm | शाहरुख

पायरसी करणारा कधी मालकाची परवानगी घेतो का ?

आपण डाऊनलोड करुन घेतलंय की नाही ? ;-)