सर्व मिपाकरांना आणि त्यांच्या प्रियजनांना Happy New Year!
खास बच्चे कंपनीसाठी नव्या वर्षाची सुरुवात यम्मी ब्रेकफास्टने!
चॉकलेट वाफल्स
साहित्य
३/४ कप ऑल परपज फ्लोर
१/४ कप कोको पावडर (गोड नाही)
१ टी स्पून बेकिंग पावडर
चिमटीभर मीठ
२ टे. स्पून साखर
१ अंडे, बलक अणि पांढरे वेगळे करुन(अंड्याचे पांढरे कोरड्या भांड्यात)
१/२ कप +१/३ कप दूध
१/२ टी स्पून वॅनिला
१ १/२ टे.स्पून बटर, वितळलेले(पण गरम नको)
तेल किवा बटर वाफल मेकरला लावण्यासाठी
कृती
वाफल मेकर ला बटर किंवा तेल लावून तापत ठेवा. एका मोठ्या भांड्यात पीठ, साखर, कोको, मीठ , बेकिंग पावडर चाळून घ्या.( मी सर्व मोठ्या बोल मध्ये घेऊन वायर विस्क ने मिक्स करुन घेते.) मधोमध खळगा करुन त्यात अंड्याचा बलक, १/२ कप दूध, वॅनिला,वितळलेले बटर घालून वायर विस्कने जरा एकत्र करुन घ्या. उरलेले १/३ कप दूध घालून विस्कने नीट ढवळून घ्या. एकजीव बॅटर हवे. अंड्याचे पांढरे स्टीफ पिक्स होई पर्यंत बीटर ने घुसळून घ्या. (मी सॉफ्ट आणि स्टीफ च्या मद्ध्यावर इतपतच बीट केले.)
हे अंड्याचे पांढरे हलक्या हाताने चमच्याने बॅटर मधे फोल्ड करा. ओवरमिक्स करु नका. बॅटर हलके हवे.
तापवलेल्या वाफल मेकर मधे बॅटर घालून वाफल बनवा. नेहमीच्या वाफल पेक्षा कमी वेळ ठेवा नाहितर करपतात.
वाफलवर आवडीप्रमाणे मेपल सिरप, क्रिम, बेरिज घाला.
हे वाफल आधी करुन फ्रीझ करता येतात. आयत्या वेळी फक्त टोस्टर मधे गरम करायचे.
प्रतिक्रिया
31 Dec 2009 - 8:10 pm | मदनबाण
आयला लय भारी प्रकार दिसतोय !!! :)
हे वाफल बिफल प्रकार काय असतो तो जरा समजवाल का ताई..नाय म्या गरिबाला काय बी कळलं नाय व्हो त्यातलं.
(चॉकलेट प्रेमी )
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
1 Jan 2010 - 1:31 pm | भडकमकर मास्तर
हेच मन्तो..
अजून काही फोटो असते तर बनणार्या वाफलच्या दर्शनानेअजून मजा आली असती...
1 Jan 2010 - 5:33 pm | स्वाती२
धन्यवाद. वाफलची चव आणि texture काहिसे आपण जो आईसक्रिम कोन खातो तसे असते. घरी वाफल मेकर असेल आणि संग्रहात चांगली पाकृ असेल तर करायला खूप सोपा प्रकार. इथे हा प्रकार लहान मुलांना फार आवडतो. एगो ब्रॅन्डचे फ्रोजन वाफल खूप लोकप्रिय आहेत. मध्यंतरी त्यांच्या कडे काही कारणाने पुरेसे उत्पादन होत नव्हते तर ग्रोसरी स्टोअर मधे चक्क रेशन टाईप परिस्थीती होती. नियमाप्रमाणे मोजकीच पाकिटे विकत घेता यायची.
http://en.wikipedia.org/wiki/Waffle या दुव्यावर वाफल बद्दल बरीच रोचक माहिती मिळेल.
वाफल बनतानाचा फोटो टाकला नाही कारण वाफल मेकरच्या एका तव्यावर मिश्रण घातले की लगेच त्या वर दुसरा तवा(झाकण) घालतात. १-२ मिनिटात झाकण उघडून बाहेर काढायचा. एवढ्या कमी वेळात फोटो काढणे अजून जमत नाही.
1 Jan 2010 - 12:57 am | प्राजु
भन्नाट!!!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
1 Jan 2010 - 1:09 am | चित्रा
सुंदरच आहे, रेसिपी. मी घरी कधीच वाफल करून पाहिला नाही आहे, आणलेली उपकरणी एक दोन वापरांनंतर पडून राहणार अशी माझी ख्याती असल्याने त्या वाटेला विशेष जात नाही. पण करून पहायला हवा.
1 Jan 2010 - 4:50 pm | पर्नल नेने मराठे
मस्तच्......नेपियन सी रोडवरच्या नॅचरल्समधल्या गरमागरम वॉफल्स मधल्या टेंडर कोकोनट आइसस्क्रिमची आठवण आली. ;)
(मिस्सिन्ग मुम्बै) चुचु
1 Jan 2010 - 5:51 pm | स्वाती२
सर्व अभिप्रायांबद्दल धन्यवाद.
चित्रा,
मी मुलाने हट्ट केला म्हणून वाफल मेकर घेतला. २-३ महिन्यांनी एकदाचे वाफल बनवायचे धाडस केले. खूपच सोपा प्रकार आहे. १०-११ वर्षांच्या मुलांना आई-बाबांबरोबर बनवायला फार मजा येते.
2 Jan 2010 - 11:05 am | बन्ड्या
ताई मस्तच....
१ महिन्यापुरवी मी ब्रसेल्स मधे होतो तेन्व्हा तिथे आमचे हे रोजचे खाने होते. ...पाक्रु खुपच छान..
बन्ड्या
2 Jan 2010 - 11:56 am | संग्राम
वाफल + मेपल सिरप, क्रिम, बेरिज ....
अहाहा .... काय मस्त लागतं
5 Jan 2010 - 2:02 am | बहुगुणी
इथे अंडे दोन भागांत (पांढरा बलक व पिवळा भाग) विभागलेले नाही, पण बाकी कृती जवळजवळ सारखीच असावी.