हे माझे परखड व स्पष्ट मत आहे. भारतीय पुरूष हा त्यामुळेच सुखाने जगू शकत नाही. त्याच्या डोक्यावर असते या भांडणांची टांगती तलवार. सासू हुंड्यासाठी किंवा इतर कारणासाठी सुनेला जाळते! हा भारतीय संस्कृतीचा सगळ्यात मोठा कच्चा दुवा आहे. कायद्याच्या कचाट्यातून आजही अशा प्रवृत्ती सुटतात. आजही सुशिक्षीत कुटुंबात असे घडते. अशी संस्कृती काय कामाची की ज्यात एकत्र कुटुंब पद्धतीत लहानांचे कितीही बरोबर असले तरीही त्यांना चुकीचे ठरवले जाते. मोठे म्हणतील तेच करावे लागते. ही एक शोकांतीका आहे की अशा भांडणांचा फायदा घेवून आज शेकडोंच्या संख्येने सासू-सून मालिका तयार होताहेत आणि त्या पाहिल्या जात आहेत. हे नक्कीच धोकेदायक आहे. यामुळे सामाजिक स्वास्थ्य नक्की बिघडते आहे. ते असे दिसून येत नाही. पण परिणाम नक्की होतो. एकत्र कुटुंब पद्धती केव्हाही चांगलीच पण जर घरातल्या एका विशिष्ट व्यक्तीवर इतरांच्या स्वार्थासाठी अन्याय होतो तेव्हा ... ?
भारत हा देश जोपर्यंत अशा सासू-सून-नणंद-जावा-भावजयी भांडणातून मुक्त होत नाही, तोपर्यंत भारताची प्रगती शक्य नाही. जी सासू ज्या गोष्टींसाठी सूनेला अडवते त्याच गोष्टी मुलीसाठी जावयाने कराव्यात असे मात्र तीला मनापासून वाटते.
उदाहरणार्थ : मुलगा आणि सून कधी थोडे बाहेर जेवायला गेलेत किंवा सिनेमाला गेलीत तर कहर माजतो. मात्र मुलीला जावयाने फिरायला घेवून जावे, सिनेमाला जावे असे मात्र वाटते. ह हा हा !
मग काय कामाची अशी संस्कृती आणि असा ढोंगीपणा आणि दुटप्पीपणा?
"आपण मोठमोठ्या विविधतेत एकतेच्या गोष्टी करतो. आधी आपण एकाच कुटुंबातील एकाच घरात असणाऱ्या व्यक्तींमध्ये ताळमेळ बसवू शकत नाही तर बाकी कोणत्या विविधतेतील एकतेच्या गोष्टी करून काही उपयोग नाही." हे जवळपास भारतातल्या प्रत्येक कुटुंबात घडते. (असे जर आहे तर सोडून द्या की, असा विचार न करता असे आहे म्हणूनच त्याचा गंभीरतेने विचार करायला हवा असे म्हणायला हवे)
जुनी- नवी पिढी वादावर अनेक चित्रपट/मालिका बनतात. त्यात मुले मोठी झाल्यावर आई वडिलांना त्रास देतात असेच दाखवले जाते. पण ते खरे आहे का? अवतार, बागबान, उमर यासारखे चित्रपट जे दाखवतात ते नक्की खरे असते का? नक्कीच नाही. त्यांना वयोवृद्ध् मंडळींची सहानुभूती मिळवायची असते. मुलांकडची बाजू कोण मांडेल ? त्यावर कोण चित्रपट बनवेल ? दोन्ही बाजूंनी विचार करणारा असा एकमेव चित्रपट (माझ्या माहितीतला) म्हणजे : ...मातीच्या चुली !
सासू सून वाद हा जुनी नवी पिढी वाद आहे असे क्षणभर मानले तर, मग समवयीन नणंद, भावजय, जावा यांच्यात खुप पटायला हवे! मग तसे का होत नाही? काय कारणे असतील यामागे? का बनली आहे स्त्रीच स्त्रीची दुश्मन आणि पुरुषांच्या शांततेची मारक?
काय वाटते आपल्याला?
प्रतिक्रिया
31 Dec 2009 - 7:08 pm | पर्नल नेने मराठे
8| आप्ल्याला नाय बा छळायची हिम्मत कुणाची :>
चुचु
2 Jan 2010 - 6:45 am | निमीत्त मात्र
दॅट्स द स्पिरीट चुचुजी!! :)
31 Dec 2009 - 7:18 pm | घाशीराम कोतवाल १.२
१ सासू-सून-नणंद-जावा-भावजयी यांच्यातील भांडणांमूळे भारताचे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात!
२काथ्याकूट सासू ही 'आई' का होवू शकत नाही?
३विश्वातील पहिला सजीव कोण असावा आणि निर्जीव वस्तू कोणती असावी?
४ भारत: का होतोय सगळ्यात जास्त खुन्यांचा/खुनांचा व अपघातांचा देश!?
५ सासू-सून-नणंद-जावा-भावजयी यांच्यातील भांडणांमूळे भारताचे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात!
काय मालक हे काय ब्रेकिंग न्युज सारखे एकदम ५ लेख पाडलेत
तुमचा बोळा निघुन एव्हड्या दणक्यात ५ लेख प्रसवलेत कमाल आहे हो तुमची तुम्ही जालिंदरबाबांचा गंडा घालुन एव्हडे लेख पाडलेत
लगे रहो !!!
भले शाब्बास
(लेखाच्या अखेरचा सोबती ) कोतवाल
1 Jan 2010 - 4:19 pm | Dipa Patil
मातीच्या चुली हा चित्रपट ख्ररोखर अप्रतिम आहे.
घरातील प्रत्येक सदस्याने तडजोड केली पाहिजे. आपण फक्त समोरच्या कडून समजूतदारपणाची अपेक्षा करतो. पण आपली भुमिका मात्र ताठ असते. मी समोरच्या व्यक्तीच्या जागी असतो तर मी काय केले असते ? हा प्रश्ण स्वत: ला विचारला पाहिजे.
1 Jan 2010 - 5:15 pm | परिकथेतील राजकुमार
म्हणून सप्तपदी घेऊ नये !!
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
6 Jan 2010 - 9:25 am | निमिष सोनार
इंटरनेट वर "पेज कॅन नॉट बी डिस्प्लेय्ड" असा संदेश आल्याने मी पुन्हा सबमीट केले, म्हणून दोन वेळा प्रकाशीत झाले. कृपया, तेथे प्रतिक्रिआ न देता इथे प्रतिक्रिया द्याव्यात.
आता (गुरू, 12/31/2009 - 18:41) चा लेख काढून टाकायचा आहे. कसे काढू? तसे ओप्शन येत नाही. मला वाटते एक जरी प्रतिक्रिया आली तरी लेख डिलीट करता येत नसावा. तसे असेल तर, घाशीराम कोतवाल १.२- आपण जर आपली (गुरू, 12/31/2009 - 18:41) वरची प्रतिक्रीया नाहीशी केली तर (गुरू, 12/31/2009 - 18:41) चा लेख काढणे शक्य होईल का?
म्हणजे डिलीट करायचे म्हणतो मी...!!
गैरसोयीबद्दल क्षमस्व.
----
सासू सून या विषयाचे मिपा ला वावडे तर नाही ना? मला वाटते नसावे.
कारण, तो ही एक महत्त्वाचा गहन विषय आहे. त्याचे परिणाम अप्रत्यक्ष असतात पण जास्त गहिरे आनी गडद असतात....
मला वाटते, ह्या विषयाला वाचा फुटणे महत्त्वाचे आहे.
6 Jan 2010 - 6:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मान्य आहे, म्हणूनच तुमच्या या प्रयत्नांबद्दल मला अपार आदर आहे.