खालील मत हे मिसळपाववर प्रस्तुत होणार्या लेखन मालिकांच्या प्रेमापोटी आणि पुढील भागांच्या प्रतिक्षेपोटी आणि उत्सुकतेपोटी... (गैरसमज नसावा.)
अहो वाट वाट म्हणजे बघायची तरी किती!!
आज येईल पुढचा भाग... नाही उद्या नक्की येईल... नाही परवा येईल बहुतेक... या आठवड्यात तरी यायला हवा... ह्या महिन्यात येईल असं वाटतंय... पण छ्या...
तात्यांचे रौशनी, सालस, धोंडोपंतांचे अच्युत गणपुले... एक ना अनेक! आम्ही मात्र ते वाचण्यासाठी इथे तिष्ठत असतो.
मान्य आहे कामाच्या रगाड्यात नाही जमत एखाद्याला किंवा नाही बैठक जमत तशी जी त्या दुनियेत पुन्हा घेउन जाईल आणि शब्द न शब्द आपोआपच स्फुरेल... ह्रदयातून... अगदी बेमालूमपणे...
अहो, पण ह्या व्यक्ती, त्यांचे पैलू तर आम्हांला नकळतपणे जगायला शिकवतात, आमच्या कामाच्या रगाड्यात आम्हांला इंद्रधनु दाखवितात, घटकाभर स्वतःचे दु:ख विसरुन हसवतात, स्वत:चा प्रवास थोडावेळ बाजूला ठेवून कोणी एक किती खडतर भुमिकेतून जाउ शकतो याचे शाश्वत दाखवतात!
काय मिसळपावकरी तुमचे काय मत आहे... तुम्ही बघताय की नाही वाट रौशनी, सालस, अच्युत गणपुले आणि अजून कितीतरी.. ज्यांची गाडी मिसळपाववर येता येता कुठेतरी अडून बसलिये...
एक शिफारस : सर्व भाग लिहून अद्ययावत पूर्ण झाले की मग ठराविक अंतराने एक एक करून मिसळपाववर चढवावेत.
प्रतिक्रिया
31 Mar 2008 - 6:16 pm | विजुभाऊ
मान्य आहे...मी सुद्धा " स्पिन अ यार्न " मधेच थबकलोय लिहायचा.
31 Mar 2008 - 6:22 pm | धमाल मुलगा
सहमत...सहमत...सहमत!!!!!
तात्या अजुन रौशनीकडे बिर्याणी खात बसले आहेत. प॑ता॑चे गणपुले लग्नात "नारायण" होऊन फिरताहेत आणि आम्हाला खुर्चीत बसुन बसुन वाळवी लागायची वेळ आली आहे.
ओ तात्या आता बास ना बिर्याणी खाण॑, अजीर्ण होईल ना ! :-)
प॑त अहो ते गणपुले आता थकले ना असतील लग्नात काम॑ करकरुन :-))
आणि हो ...........
माझ्या गरीब बिचार्या दरिद्री 'वि'स्मरणशक्तीनुसार अस॑ आठवत॑ की तात्याबा "हस्ताक्षरावरुन स्वभाव" देखील सा॑गणार होते !
(माझ्यासारख्या गिचमीड माणसाच्या वर्तनावरुन माझ॑ हस्ताक्षर कसे असेल ते सा॑गता येऊ शकते हा भाग निराळा)
आयला हे बर॑य, आम्हाला तुमच्यासारख॑ लय भारी लिहीता येत नाही म्हणून का अस॑?
तात्या, प॑त आणि सर्व सन्माननीय लेखकगण ह्या॑सी आमची णम्र इन॑ती की कृपया आता आम्हाला आणखी ताणू नका हो!
-(चातक) ध मा ल.
31 Mar 2008 - 6:42 pm | विसोबा खेचर
रौशनीच्या लेखनाला झालेल्या उशिराबद्दल मी रौशनीच्या सर्व वाचकांची त्यांना अद्याप ताटकळत ठेवल्याबद्दल जाहीर क्षमा मागत आहे. परंतु अद्याप रौशनीच्या पुढील भागाच्या लेखनाला मूड लागत नाहीये!
रौशनीची मुलगी नीलम, मी तिला खूप लहान असताना पाहिली होती, ती सुदैवाने शरीरविक्रय करत नसली तरी फोरास रोडवरील बनारसी चाळीत मुजरा करते! दीदीच्या आग्रहावरून, मी एकदा तिच्या मुजर्याला गेलो होतो परंतु त्या नीलमला तिथे नाचताना मला बघवेना व मी मुजरा अर्धवट टाकून तिथून परत आलो होतो! ही दीदी म्हणजे रौशनीच्याच गणगोतातली. तिचा उल्लेख रौशनीच्या लेखनात येईलच!
या नीलमला पुन्हा एकदा केव्हातरी भेटून येऊ की काय याचा विचार करतो आहे! पण तिथे जावसं वाटत नाही. पुन्हा एकदा तिथे गेलो तर रौशनीच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या होतील व पुढे काही भरभरून लिहावंसं वाटेल! परंतु अगदी कोवळ्या वयात पाहिलेल्या त्या नीलमला मुजर्यात नाचताना मला तरी बघवत नाही! बरं, माझ्यात एवढीही धम्मक नाही की त्या नीलमला तिथून बाहेर काढून एक चांगलं आयुष्य देऊ शकेन! कोरडी सहानुभूती काय कामाची? मुजर्यला गेलोच तर 'आओ सेठ, बैठो' असं म्हणून नीलमही माझं स्वागतच करेल. पण मी काय तिथे बसून दारू पिऊ आणि त्या नीलमचं गाणं ऐकत पैसे उधळू?
असो, तूर्तास इथेच थांबतो. लवकरात लवकर पुढचा भाग लिहायच प्रयत्न करीन इतकंच तूर्तास आश्वासन देतो. परंतु तो मूड लागला पाहिजे आणि ते माझ्या हातात नाही!
एक शिफारस : सर्व भाग लिहून अद्ययावत पूर्ण झाले की मग ठराविक अंतराने एक एक करून मिसळपाववर चढवावेत.
रौशनीच्या बाबतीत या पुढे असंच करणार आहे. लेखन पूर्ण करूनच रौशनीला पुन्हा मिपासमोर आणीन. म्हणजे वाचकांना उगाच ताटकळायला लागणार नाही! असो, रौशनीला झालेल्या उशिराबद्दल मायबाप वाचक माझी बाजू समजून घेतील अशी आशा करतो!
पुन्हा एकदा क्षमस्व!
आपला,
(रौशनीचा मित्र!) तात्या.
31 Mar 2008 - 6:55 pm | मनस्वी
अहो तात्या क्षमा बिमा कसली मागताय? अहो हे एक Gentle Reminder होतं! :)
पंगतीत बसल्यावर आपण मठ्ठ्याची वाट बघतो आणि शेवटी न रहावून मठ्ठेवाल्याला हात उंचावून बोलावतोना... अगदी तसं!
1 Apr 2008 - 11:29 pm | llपुण्याचे पेशवेll
किंवा कुचूकुचू वाढणार्याला "थांब , आणि चांगले २ डाव आत्ताच वाढून जा!" असे सांगण्यासारखेही....
ह.घ्या.
पुण्याचे पेशवे
31 Mar 2008 - 7:39 pm | विद्याधर३१
टान्गून ठेवतात नुस्ते.. आणी आमचा चक्का होतो....
विद्याधर
31 Mar 2008 - 8:00 pm | प्राजु
टान्गून ठेवतात नुस्ते.. आणी आमचा चक्का होतो....
हे एकदम आवडलं... आणि पटलंही.:))))
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com
1 Apr 2008 - 11:25 pm | ब्रिटिश टिंग्या
चुटकीसरशी लिहून टाका बरं.....
मला जर तुमच्याएवढी कल्पनाशक्ती असती तर साला मीच तुमची ती रोशनी का अच्युत गणपुले वगैरे लिहीले असते....अन् ते पण एकदम ४५०-५०० भाग.....
- टिंग्या
2 Apr 2008 - 1:02 am | विसोबा खेचर
मला जर तुमच्याएवढी कल्पनाशक्ती असती तर साला मीच तुमची ती रोशनी का अच्युत गणपुले वगैरे लिहीले असते....
रौशनीचे लेखन हे कल्पनाशक्तिवर आधारीत नसून वास्तवावर अधारीत आहे..
असो...
तात्या.
2 Apr 2008 - 1:22 am | ब्रिटिश टिंग्या
बघा आम्हाला वास्तव आणि कल्पनाशक्तीतला फरकसुद्धा कळत नाही.....
असो, वरील श्टेटमेंट फक्त ह घेण्याकरिता होते....फक्त ते तसे लिहीण्यास मात्र मी विसरलो ;)
असो, 'वास्तववादी' रौशनी ६ च्या प्रतिक्षेत....
- टिंग्या
2 Apr 2008 - 3:44 am | llपुण्याचे पेशवेll
पण मग ती 'रोशनी' न राहता 'क्रोशनी' झाली असती (एकता कपूर ची)
ह.घ्या.
पुण्याचे पेशवे
2 Apr 2008 - 3:01 pm | मनस्वी
शिंत्रेगुरुजी