गाभा:
थंडीचे दिवस आले की, शाळांमधे स्नेहसंमेलन होतात. त्यावरुन असा प्रस्ताव मांडावासा वाटला की, आपणही एक स्नेहसंमेलन घ्यावे पण ते ऑनलाईन असणे ही त्याची प्रमुख अट. असा प्रकार मराठी संस्थळाच्या इतिहासात प्रथमच होणार असल्यामुळे त्यास एक वेगळेच महत्व प्राप्त होईल. हे संमेलन मिपावरच व्हायला हवे असे नाही- एखादा नवा ब्लॉगस्पॉट करुनही शक्य आहे- जर येथे परवानगी नसेल तर.
अशा ऑनलाईन स्नेहसंमेलनाचे स्वरुप कसे असावे ह्याबद्दल आपले काय मत आहे?
प्रतिक्रिया
11 Dec 2009 - 4:15 pm | अमृतांजन
11 Dec 2009 - 4:19 pm | अविनाशकुलकर्णी
अश्या ऑनलाईन गप्पा आम्हि काव्याम्जलीचे सभासद मारत असु..त्या साठी स्कायपी डाउन लोड करायाचे व वेळ ठरवुन ऑनलाईन गपा कविता वाचायच्या मजा येते...
करायला हरकत नाहि............
11 Dec 2009 - 4:25 pm | अवलिया
छान ! कल्पना आहे.
मात्र अशा स्नेहसंमेलनामधे अवांतर गप्पा फार होतात आणि मुद्याला धरुन चर्चा होत नाही असा आमचा अनुभव आहे.
त्यामुळे अशा स्नेहसंमेलनांचा मुळ उद्देश की सदस्यांचे वैचारिक ज्ञानप्रबोधन व्हावे हा हेतु पार गुंडाळला जातो.
अशा स्नेहसंमेलनाचा वापर वृद्ध आणि कोमल मनाच्या सदस्यांची खिल्ली उडवण्यासाठी केला जातो जे अजिबात चांगले नाही.
तरी अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी आयोजकांमार्फत काय केले जाणार आहे हे कळाल्यास बरे होईल.
अन्यथा आम्ही सहभाग घेवु शकत नाही. क्षमस्व !
--अवलिया
11 Dec 2009 - 4:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान !
-दिलीप बिरुटे
11 Dec 2009 - 4:46 pm | अमृतांजन
स्नेहसंमेलनाचे कार्यक्रम आपण "पहायला" जातो. त्यावर प्रतिक्रिया देण्याची अपेक्षा नसते. त्यामुळे ज्याप्रमाणे एखादे नाटक बसवले जाते व प्रेक्षकांकडून पाहिले जाते त्या प्रमाणे संमेलनाला इतरांना येता येईल व जे सादर केले जात आहे ते वाचता येईल. थोडक्यात म्हणजे वाचन-मात्र सहभाग. असा एक पायलट प्रकल्प करुन पहाता येईल. ह्यात अवांतर प्रतिक्रिया, अघळ-पघळ चर्चा करण्याचा विषयच नाही.
मग हे कसे करता येईल?
एखाद्या कंपूने एक कार्यक्रम आखावा व प्रस्ताव मांडावा. उदा. कंपूने एक विनोदी नाटक बसवले आहे. तर त्यांनी ते सादर करायचे आहे इतरांनी त्यात प्रेक्षकाची भूमिका पार पाडायची आहे.
नाटक कसे "बघता" येईल?
आपण गुगल वेव्ह वापरु. ज्यांना नाटकातील कलाकारच फक्त ’बोलती”, इतरांनी "पाहायचे".
गुगल वेव्ह ज्यांनी वापरुन पाहिले आहे त्यांना ह्याची व्याप्ती लगेच कळेल. काय वाटते?
11 Dec 2009 - 4:51 pm | अमृतांजन
नंतर सादर केलेले नाटक त्यांनी मिपावर द्यावे- तेथे ज्यांना प्रतिक्रिया द्यायच्या आहेत ते देतील.
11 Dec 2009 - 5:37 pm | परिकथेतील राजकुमार
बरं हे सगळं फुकट का दमड्या मोजून?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
11 Dec 2009 - 6:07 pm | अमृतांजन
चकटफू!!!
फक्त गूगल वेव्ह अकाऊंट लागेल.
11 Dec 2009 - 9:07 pm | सन्जोप राव
असा एक ब्लॉगस्पॉट आहे, मला वाटते...
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
11 Dec 2009 - 11:55 pm | निमीत्त मात्र
तो कोणता बरे? दुवा द्याल का?
11 Dec 2009 - 9:10 pm | jaypal
बाणानी दाखवलीत म्हणुन बरं नाही तर दुसरीच उचलुन धरली असती, एवढी आवडली ही कल्पना
11 Dec 2009 - 9:31 pm | अमृतांजन
हा..हा..हा...
आज प्रथमच मी तुमचा शाब्दीक प्रतिसाद वाचला. चित्रांनी बोलणारे तुम्ही. दोन-तीन दिवसांपूर्वीचा तुमचा एक प्रतिसाद वाचून मला तुम्ही चित्ररुपी प्रतिसाद त्यामुळेतर देत नाही ना असा संशय आला होता. ;-)
11 Dec 2009 - 11:36 pm | प्रशांत उदय मनोहर
शब्दबंध
आपला,
(शब्दबंधी) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
12 Dec 2009 - 10:16 am | अमृतांजन
असाच प्रयत्न करावासा वाटला. तुम्ही ते आधीच केले असल्यामुळे तुमचे अभिनंदन. त्या अनुभवाबद्दल लिहा. अशी विनंती.
मी वेव्ह सुचवले कारण त्यात स्काइप पेक्षा जास्त सुविधा आहेत. ज्या अशा संमेमलासाठी वापरता येतात ते पाहाता येईल. शेवटी संमेलन म्हणजे काय- ऑन्लाईन कॉन्फरन्सच की- फक्त येथे मनोरंजन हा हेतू ठेवून बोलायचे/लिहाय चे आहे. (ऑफिशियल मीटींगही रुमच्या बाहेरुन ऐकल्या की भरपूर मनोरंजन होतेच की)
12 Dec 2009 - 3:33 pm | प्रशांत उदय मनोहर
अनुभव मस्त होता. "शब्दबंध"ला शब्दबद्ध करणं कठीण आहे. तुमचा मराठी ब्लॉग असल्यास पुढल्यावेळी तुम्हीही सहभागी व्हा आणि अनुभवा.
धन्यवाद.
आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
12 Dec 2009 - 12:36 am | शाहरुख
मिपाच्या धागा-प्रतिसाद मॉडेल द्वारे आपण स्वतःला संपूर्णतः अभिव्यक्त करु शकत नाही आहात काय ?
12 Dec 2009 - 10:20 am | अमृतांजन
मी ऑपरेशनल स्ट्र्क्चर सुचवले जे ऑनलाईन संमे लन घेण्यास उपयोगी पडू शकेल. मुळ उद्देष्ट्य आहे ऑन्लाईन संमेलन ते कसेही साध्य करता आले आणि ते सहभाग घेणार्क्ष्यांना आवडले तर कोणताही ऑपरेशनल स्ट्र्क्चर चांगलेच की.
31 Dec 2009 - 3:15 pm | संजीव नाईक
काही अटी घाला व संमेलन घ्या. तात्याची परवागी घेण्याचे विसरु नका?
मोबाईलवर मराठी भाषा ( मिपा ) दिसत नाही जरा संमेलना अगोदर ह्या गोष्टीचा विचार करावा. नाहीतर चौकोन पाहुन समाधान मानावे लागेल.
संजीव