जाता जात नाही ती 'जात'
दोन दिवसा पुर्वी बाबासाहेबांचा महानिर्वाण दिन झाला. त्या वेळी निरनिराळ्या वर्तमानपत्रात बाबासाहेब, त्यांचे विचार, कार्य, आणि सध्य स्थीती ह्यावर सालाबादप्रमाणे चर्च्या झडल्या. व्रुत्त वाहिन्यांवर वाद विवाद झाले. पण मुळ ह्यातुन संवाद व्हावा हि अपेक्षा धरणे म्हणजे मुर्ख पणा आहे. असो. हे प्रकटन लिहिण्यास कारण की अश्याच एका लेखावर ('बोधिसत्वाची बांडगुळे') आधारीत धाग्यावर मी एक प्रतिक्रिया टाकली. प्रतिक्रिया थोडी अवांतर वाटली असावी म्हणुन त्यावर एका मिपाकरानी मला शालजोडीतले दिले. त्यावर परत प्रतिक्रिया देणे म्हणजे ध्याग्याचे खव बनवणे, त्या पेक्शा नविन धागा टाकलेला बरा, म्हनुन हा धागा प्रपंच......
हिंदु धर्म आणी त्यातील जाती व्यवस्था हा म्हणजे चाऊन चोथा झालेला विषय, त्यात अजुन आणी नविन काय ते लिहिणार. कोळसा किती पण उगळला तरी पण काळाच...
कर्म व्यवस्थेतुन जन्म व्यवस्थेकडे झालेली जातींची वाटचाल.. , कालानुरुप त्याला आलेले विक्रुत स्वरुप, अधिकार वर्गाने त्याचा घेतलेला फायदा, त्या मुळे शोशितांची होणारी ससेहोलपट, ह्या सर्वांचा परिपाक म्हणजे झालेल्या धार्मिक, राजकिय क्रांत्या.... ह्या वर बरेच लिहिले, वाचले गेले आहे. आणी गंमत म्हणजे गेली पाच हजार वर्ष हि अखंड प्रक्रिया चालु असुन 'जात' मात्र जात नाहि. कारण ती आपल्या सगळ्यांच्या रक्तातच भिनली असावी. खंर तर आपण कुठल्या जातीत जन्माला यावे हे आणी कुठल्या आई वडीलांच्या पोटी जन्माला यावे हे काहि आपल्या हातात नसते. तरी देखील आपण आपल्या जाती बद्द्ल सुक्ष्म अभिमान बाळगतो. शक्य तो आपल्याच जाती बांधावांच्याशी नाते संबंध प्रस्थापित करतो. आपल्याच जाती च्या सामाजिक, ग्रुहनिर्माण संस्था स्थापन करतो. एक वर्तुळ आखतो आणी बाहेर्च्यांना त्यात प्रवेश नाकारतो. काहि अंशी ते योग्य असेलहि पण एका हद्दि प्रर्यतच. ती ह्द्द ओलांडली कि मात्र आपल्याला समाजातील अन्य जातींशी करावा लागणारा व्यवहार हा अपरिहार्य ठरतो.
सध्याच्या युगात झालेला ज्ञानाचा प्रसार आणि जागतिकिकरण ह्यामुळे जातींची बंधने गळुन पडलेली दिसत असली तरी मुळात ती तितकीच घट्ट आहेत. आपल्या कडे एका विशीष्ट जातीवाचक शब्दाच्या ऊच्चारावरुन त्या जातीत जन्मलेल्यांच्या भावना दुखावतात व त्याला कायद्याने शिक्षा पण होते. पण ह्याच जातीवाचक शब्दाने मिळ्णारे फायदे घेताना मात्र त्यांना काहिच कमीपणाचे वाटत नाहि!!! सर्वात हास्यास्पद प्रकार म्हणजे गेली पाच दशके महाराष्ट्रावर राज्य करणारी जात सुद्धा आरक्षणाची मागणी करते. ब्राम्हण, मराठा, दलित, मागासवर्गीय, इत्तर मागासवर्गीय सर्वच आपापली अधिवेशने दरवर्षी भरवतात आणी त्यांना खतपाणी देण्यासाठी उथळ राजकिय मंडळी तत्पर असत्तात. मग असे करतांना आपण पो॑राणीक, धार्मिक, ए॑तिहासिक, राजकिय थोर विभुतींना पण त्यांच्या उच्च विचारसर्णीतुन खेचुन आणुन आपल्या पातळीवर आणुन बसवतो आणी मग निर्दयी राज्यकर्त्यांना खंद्णारा परशुराम फक्त कोकण्स्थांचा होऊन रहातो, शिवछत्रपती वर ९६ कुळी आपला हक्क सांगतात आणी कर्मकांडविरहित ज्ञानाचा झरा असलेला तथागत फक्त नवबो॑धांचा होऊन रहातो. अश्या वेगळ्या चुली मांडुन खरंच एकसंध समाज निर्माण होणार आहे का? आणि त्याहि पेक्शा तो तसा निर्माण व्हावा अशी आपली सगळ्यांची प्रामाणिक ईच्छा आहे का?
मुख्य जातीं मधला भेदभाव सोडून दया, पण एकाच जातींतील उपजातीं मधला भेदभावा बद्द्ल बोलताना कोणीच दिसत नाही. व्रुत्तपत्रातील वधुवर संशोधनाच्या जाहिराती पहा. सर्व मुख्यजातींच्या पोट्जातींच्या वधु/वरांना त्यांच्याच पोट जातीतील वधु/वर हवे असतात. असे का? हिंदुंचे सोडुन द्या पण बो॑ध्द, मुसलमान, ईसाई ह्या इत्तर धर्मांत सुद्धा हेच चालते. माझी मुळची ब्राम्हण पण नंतर ईसाई झालेली एक मे॑त्रीण होती. तीने लग्न करताना सुद्धा ब्राम्हण आडनावाच्या ईसाई मुलाशी लग्न केले. हा प्रकार एखाद्याचा वे॑यक्तीक प्रश्न असला तरी हास्यास्पद नाही वाटत? माझ्या जेवणाच्या डब्यातली बुर्जी आणि सागुती चवीने खाणार्या मुलीला जेव्हा मी लग्ना संबंधी विचारले तेव्हा 'माफ कर, आमच्या कडे नाहि चालणार, घरी कुकर मध्ये मटण शिजतेय अशी कल्पनाच मी करु शकत नाहि' असे म्हणुन जेव्हा माझी जात दाखवली जाते तेव्हा मात्र मी हतबुद्ध होतो. पण तिच्या या वागण्यासाठी संपुर्ण जातीलाच दोष देणे म्हणजे माझा मुर्ख पणाच ठरेल.
आजच्या आधुनिक युगात जन्माला येणार्या नविन जातींचे काय? आज वे॑द्यकिय महाविद्यालयात पदवी साठी प्रवेश मिळणे फक्त वे॑द्यकिय व्यव्सायिकांच्याच मुलांनाच शक्य होत आहे. राजकारणात सुदधा हेच चालु आहे. कारण फ्क्त पे॑सा. ह्या प्रस्थापित होत चाल्लेल्या नविन जातीव्यवस्थे बद्द्ल मात्र समाजात काहिच प्रतिक्रिया उमटत नाहि......
प्रतिक्रिया
8 Dec 2009 - 10:57 pm | अभिज्ञ
मुक्तक आवडले.
अभिज्ञ.
8 Dec 2009 - 11:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
शेवटच्या परिच्छेदाचा आणखी विस्तार करता आला असता.
चिंतन आवडलं!
अदिती
8 Dec 2009 - 11:16 pm | चन्द्रशेखर सातव
लेखकाच्या मताशी १००% सहमत.आजपर्यंत चालत आलेल्या पारंपारिक जातीव्यावास्थे पेक्षा सुद्धा हि आधुनिक जाती व्यवस्था भयानक आहे.त्यात मागास आणि प्रगत हा भेद फक्त आर्थिक परिस्थिती वर अवलंबून आहे.पारंपारिक जाती व्यवस्था प्रामुख्याने सुरक्षिततेच्या भावनेशी निगडीत असते असे मला वाटते .धर्म,प्रांत,भाषा इत्यादी पण त्याच भावनेची प्रारूपे आहेत.सामाजिक दृष्टीने पुढारलेल्या अशा पाश्च्यात्य राष्ट्रांत आणि अमेरिके मध्ये सुद्धा हि भावना कोणत्या ना कोणत्या रुपामध्ये दिसून येईल.आपल्याकडे ती जातीच्या आणि धर्माच्या रुपामध्ये दिसते
11 Dec 2009 - 3:35 am | सुधीर काळे
सातव-जी,
छान वाटले आपले विचार!
------------------------
सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम
8 Dec 2009 - 11:45 pm | रेवती
छानच झालय प्रकटन!
तिसरा परिच्छेद जास्त आवडला.
रेवती
9 Dec 2009 - 7:06 am | तिमा
जात न जायला राजकारणी व भारत सरकारच जबाबदार आहे. लोकांनी जात विसरायचा प्रयत्न केला तरी सरकारच कुठल्याही अर्जामधे आपल्याला जात विचारते. तसेच विशिष्ठ जातींना अधोरेखित करुन सवलती देते आणि समाजातली तेढ वाढवते. कुठेही जातीचा उल्लेख न करता फक्त आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्यांनाच मदत दिली पाहिजे.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
9 Dec 2009 - 8:36 am | भाग्यश्री कुलकर्णी
चांगले लिहीले आहे.
9 Dec 2009 - 9:10 am | प्रकाश घाटपांडे
मुक्तक आवडले. कुठेही द्वेष, त्रागा वा अभिनिवेश नसलेले मुक्तक.
यामुळेच पारंपारिक जाती नष्ट होण्यास मदत होणार आहे.जन्मापेक्षा कर्मावर आधारलेल्या जाती निर्माण होणे हे सामाजिक दृष्ट्या अपरिहार्य आहे. ते योग्य का अयोग्य हा मुद्दा वेगळा.
मिपावर यापुर्वी यावर अनेक सकस चर्चा झालेल्या आहेत. भरकटलेल्या चर्चेतुन देखील सकस मुद्दे टिपता येतात. आजच्या सुधारक सारख्या चिंतनशील मासिकाला देखील मिपाची दखल (सकस चर्चांपुरती)घेण्यास आम्ही भाग पाडले आहे ही जमेची बाजु आहे
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
9 Dec 2009 - 10:05 am | विजुभाऊ
मी जात मानत नाही. ऑफीशीयल कागदपत्रातसुद्धा धर्म / जात लावत नाही. मुलांच्या शाळेच्या दाखल्यात मात्र मला नाइलाजाने धर्म व जात लिहावी लागली.
लिहायला वाईट वाटते की जात लिहीत नाही म्हणून वाट्याला काहीवेळा उपेक्षादेखील आली आहे.
थोडेसे कडवटपणाने लिहितोय पण जात न पाळण्याचा मक्ता हा केवळ उच्चवर्णीयानीच घ्यायला हवा असा सध्या आग्रह असतो. असा अनुभव येतो.
ब्राम्हणाला भटुरड्या म्हंटले तर त्याला अॅट्रोसिटी अॅक्ट लागु होत नाही.
जात मानायचीच नसेल तर मग हा दुजाभाव कशाला करायचा?
9 Dec 2009 - 10:35 am | प्रकाश घाटपांडे
शासकीय कार्यालयात नेमणुक बढती या बाबींसाठी तुमची जात ही लिहावीच लागते. त्याशिवाय नेमणुकच होत नाही. तुम्ही जात मानत नसला तरी तो कॉलम पुर्ण करण्यासाठी जात मानीत नाही असा शेरा लिहिण्याची सोय नाही. बिंदुनामावली सारखे प्रकरण जे बढती साठी वापरले जाते त्यात केवळ जात नव्हे तर उपजात ही लिहावी लागते.
आरक्षण ही गोष्ट जोपर्यंत आहे तो पर्यंत शासनदरबारी जात लिहिणे अनिवार्य आहे.
या विषयी कायदेतज्ञ अधिक सांगु शकतील. अॅट्रोसिटी अॅक्टचा उद्देश जर जातीभेद दुर करणे असेल तर कुठल्याही जातीचा अपमानदर्शक उल्लेख हा दंडनीय असला पाहिजे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
11 Dec 2009 - 2:37 am | विकास
सर्वप्रथम मूळ लेख हा संयमीत वाटल्याने आवडला. जात ही कुठल्यान लुठल्या पद्धतीने राहतेच पण धर्माने आणि जन्माने "आहेरे" आणि "नाहीरे" असे समाज आणि त्याला अनुषंगून अत्याचार/अन्याय करणारी जातीव्यवस्था मात्र मनापासून जायला हवी असे वाटते. ते कर्तव्य सर्वप्रथम तुम्हाआम्हा - वडीलोपार्जीत कुठल्याही जातीच्या "शिक्षितांचे" आहे. मगच आपण स्वतःसा "सुशिक्षित" आणि "अधुनिक" म्हणायच्या लायकीचे ठरू. त्या चष्म्यातून एकमेकांकडे पहाणे आणि त्यावरून लिहीणे, इतिहास ठरवणे बंद केले पाहीजे.
ब्राम्हणाला भटुरड्या म्हंटले तर त्याला अॅट्रोसिटी अॅक्ट लागु होत नाही.
अॅट्रॉसिटीचा कायदा हे १९८९ साली तत्कालीन पंतप्रधान व्हि.पि.सिंग यांई जम्मू-काश्मीर सोडून उर्वरीत स्वतंत्र भारतास दिलेली देणगी आहे. वास्तवीक पहाता atrocity या शब्दाची व्याख्या काहीशी, "An extremely cruel act; a horrid act of injustice" अशी आहे. अर्थात त्याचा संबंध हा "बळी तो कान पिळी" मधे असलेल्या अनिर्बंध शक्ती (पॉवर) शी आहे, जातीशी नाही. अजूनही संपूर्ण भारताचा विचार केल्यास तसे अन्याय हे The Scheduled Castes and Scheduled Tribes वर जास्त होत असावेत असेच वाटते. म्हणूनच: "This Act may be called the Scheduled Castes and the Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Act, 1989." असे म्हणले गेले आहे.
अर्थात अन्याय हा एकाच बाजूने होतो असे ठरवून सरकारने एक मोठी चूक केली आणि नंतरच्या कुठल्याच सरकारने ती राजकीय अडचण होऊ शकते म्हणून बदलण्याचा प्रयत्न केला नाही.
जात मानायचीच नसेल तर मग हा दुजाभाव कशाला करायचा?
यावरून आठवले की, इंदीरा गांधींनी आणिबाणीच्या काळात अथवा त्या आधी थोडेसे, भारत हे "सेक्युलर" राष्ट्र म्हणून घोषित केले. पण "सेक्यूलर" म्हणजे काय ह्याची व्याख्या केली गेली नाही. नंतर जनता सरकारने ती "सर्वधर्मसमभाव" म्हणून व्याख्या करायचा प्रयत्न केला पण तत्कालीन विरोधी पक्षाने (इंदिरा काँग्रेस) तो प्रयत्न हाणून पाडला...हे सांगायचे कारण असे की धार्मिक समजणार्यांचा येथे प्रश्न नाही कारण ते जाहीर धर्म मानतात, पण स्वत:स सेक्यूलर अथवा कम्युनिस्ट समजणारे मात्र निधर्मी होत नाहीत आणि खर्या अर्थाने त्या विचारांना तत्व म्हणून आमलात आणत नाहीत. अर्थात त्याचे कारण सरळ आहे : राजकारण....म्हणूनच, Politics is the art of looking for trouble, finding it everywhere, diagnosing it wrongly and applying unsuitable remedy... असे कुणाचे तरी वाक्य आहे :-)
11 Dec 2009 - 2:51 am | अक्षय पुर्णपात्रे
सर अर्नेस्ट बेन (संदर्भ)
9 Dec 2009 - 5:50 pm | राकेश वेंदे
संयमीत व संतुलित प्रकटन आवडले.
11 Dec 2009 - 1:02 am | हर्षद आनंदी
"हिंदु धर्म आणी त्यातील जाती व्यवस्था हा म्हणजे चाऊन चोथा झालेला विषय, त्यात अजुन आणी नविन काय ते लिहिणार. कोळसा किती पण उगळला तरी पण काळाच..."
असे लिहिणारे, वाचणारे, वाचन आवडणारे, चिंतन, मनन करणारे खुप झाले.. होतील. पण तो कोळसा ऊगाळताना, त्याच्या आत लपलेल्या हीर्याचा शोध घेणारे असे किती?
"क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे"
स्वतःच्या हातानी ओढवुन घेतलेल्या गुलामीतुन बाहेर पडायला आम्हाला १५० वर्षे लागली... पण गेली हजारो वर्षे आमची मने ह्या गंजलेल्या रिती-रिवांजांचा पाठपुरवठा अगदी नेमाने करीत आहेत, त्याला कोण काय करणार?
भारतीय म्हणतात भारत गुलामगिरीतुन सूटला, पण नक्की भारत सुटला का ईंडीया, हे तपासुन पहायची वेळ आली आहे.
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
11 Dec 2009 - 3:42 pm | प्रशु
पण तो कोळसा ऊगाळताना, त्याच्या आत लपलेल्या हीर्याचा शोध घेणारे असे किती?
जाती भेदाच्या कोळ्श्याच्या आत कोणता हिरा लपला आहे?
त्याला कोण काय करणार?
आपल्या सर्वांची काहिच ने॑तिक जबाबदारी नाहि का?
11 Dec 2009 - 1:29 am | स्वानन्द
एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आहे की उद्या जातीव्यवस्था नष्ट केली की लगेच वर्णभेद, भाषाभेद, प्रांतभेद, गरीब श्रीमंत भेद असे भेदभाव उभेच आहेत ...नंबर लावून
थोडक्यात काय माणूस कुठल्या ना कुठल्या प्रकार समुदाय करतो आणि मग दुसर्या समुदायाच्या विरोधात कुरघोडी चालू. कुठलं ना कुठलं लेबल लागलं की... एका गटाचा भाग झाल्याचं समाधान.
आपण आपल्या परीने जे करता येईल ते करायचं दुसरं काय!
विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो
प्राणीजात.
स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!
11 Dec 2009 - 2:19 am | अक्षय पुर्णपात्रे
श्री प्रशु, आजकाल वडील डॉक्टर असल्याच्या सर्टिफिकेटची प्रत वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश अर्जासोबत जोडावी लागते का?
11 Dec 2009 - 2:53 am | सुधीर काळे
लेख खूप आवडला. अशा लिखाणाला उत्तेजन दिले पाहिजे.
जात 'पासपोर्ट'मधून नाहींशी झाली, पण इतरत्र बोकाळली आहे.
------------------------
सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम
11 Dec 2009 - 6:46 am | अगोचर
पवित्र तॆ कुळ पावन तॊ दॆश । जॆथॆ हरिचॆ दास घॆती जन्म ॥१॥
कर्मधर्म त्याचॆ जाला नारायण । त्याचॆनी पावन तिन्ही लॊक ॥धॄ॥
वर्ण़अभिमानॆ कॊण जालॆ पावन । ऐसॆ द्या सांगुन मजपाशी ॥२॥
अंत्यजादि यॊनि तरल्या हरिभजनॆ । तयाची पुराणॆ भाट जाली ॥३॥
वैश्य तुळाधार गॊरा तॊ कुंभार । धागा हा चांभार रॊहिदास ॥४॥
कबीर मॊमीन लतिब मुसलमान । सॆना न्हावी जाण विष्णुदास ॥५॥
काणॊपात्र खॊदु पिंजारी तॊ दादु । भजनी अभॆदू हरिचॆ पायी ॥६॥
चॊखामॆळा बंका जातीचा माहार । त्यासी सर्वॆश्वर ऐक्य करी ॥७॥
नामयाची जनी कॊण तिचा भाव । जॆवी पंढरीराव तियॆसवॆ ॥८॥
मैराळा जनक कॊण कुळ त्याचॆ । महिमान तयाचॆ काय सांगॊ ॥९॥
यातायातीधर्म नाही विष्णुदासा । निर्णय हा ऐसा वॆदशास्त्री ॥१०॥
तुका म्हणॆ तुम्ही विचारावॆ ग्रंथ । तारिलॆ पतित नॆणॊ किती ॥११॥
आणि
महारासि सिवॆ । कॊपॆ ब्राह्मण तॊ नव्हॆ ॥१॥
तया प्रायश्चित्त काही । दॆहत्याग करिता नाही ॥धॄ॥
नातळॆ चांडाळ । त्याचा अंतरी विटाळ ॥२॥
ज्याचा संग चित्ती । तुका म्हणॆ तॊ त्या याती ॥३॥
---
मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान