गाभा:
नवी पाक क्रुती:
बेसन पीठ बाटावड्या साठी बिजवतात तेवढे पातळ भिजवावे.त्यात चवीसाठी मीठ जिरे टाकावे , त्यात हवे असल्यास काजु /बदाम कापुन टाकावेत.
गोडे तेल कढईत उकळत ठेवावे.
आईस क्रीम ( वॅनीला) स्कूप ( गोळा)घेउन तो बेसन पीठात वड्याप्रमाने बुडवुन घ्यावा.व तो पटकन तळुन घ्यावा.
आईस क्रीम तेवढ्याच पटकन खावे...गरम वडा- गार आइस क्रीम झकास कॉम्बीनेशन होते
सू:..हा पदार्थ दिल्लीत "नुरूलाज" ची स्पेशालीटी आहे.लोक रांगा लाउन खाण्यासाठी उभे असतात.
उ.सु: वडे तळुन काढणे आणि खाणे यात अंतर असु नये.
प्रतिक्रिया
31 Mar 2008 - 1:16 pm | मनापासुन
बेसन पीठ बाटावड्या साठी बिजवतात तेवढे पातळ भिजवावे.
बेसन पीठ बटाटावड्या साठी भीजवतात तेवढे पातळ भिजवावे..
चूक भूल मनापासुन द्यावी घ्यावी
1 Apr 2008 - 4:56 am | प्राजु
नावावरून पदार्थ जरा विचित्रच वाटतो आहे.
एक शंका : तळण्यासाठी तेलात घातल्यावर ते आईस्क्रिम वितळेल ना. आणि तेलात पसरेल.
आणि मुख्य म्हणजे.. अगदी लगेच तळून काढले तर ते बेसन कच्चे राहिल असे वाटते. जरा सविस्तर शंका निरसन करावे.
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com
1 Apr 2008 - 7:20 am | विसोबा खेचर
विचारतो!
1 Apr 2008 - 10:11 am | प्रभाकर पेठकर
आइस्क्रिम सॉफ्ट स्कूप वर्गीय नसावे. जरा कठीण असावे.
वडे तीव्र आंचेवर तळल्यावर समस्या उद्भवू नये. तेल धूर येण्या इतपत तापलेले असावे. वडा तेलात सोडल्यावर वरील आवरण लगेच 'सेट' व्हावे आणि आंत पर्यंत उष्णता पोहोचायच्या आत आवरण शिजले पाहीजे. वडा जास्त वेळ तेलात राहता कामा नये.
1 Apr 2008 - 10:35 am | कोलबेर
थाई रेस्टॉरंट मध्ये हा प्रकार पाहिलेला आहे. काही खास नसतो असे कळल्याने कधी चाखला नाही.
1 Apr 2008 - 10:48 am | मनापासुन
पेटकर काका बरोबर आहे तुमचे. पण हे फ्राईड आईस्क्रीम नाही्आ आईस्क्रीम वडाच आहे.
बेसन पीठ पातळ ठेवायचे म्हणजे ते कच्चे रहात नाही .उलत ते पातळ असल्याने मस्त कडक कुरकुरीत होते. पदार्थ नावावरुन च नव्हे तसाही थोडा विचित्र आहे. आवडला तर आपण त्याचे ऍडीक्ट होतो.
नाही तर आयुष्यभर फजीती सांगत रहातो