नुकताच अक्षय कुमार आणि कत्रिनाची भुमिका असलेला "दे दनादन" हा चित्रपट पाहीला. हा चित्रपट म्हणजे कानफाडू पार्श्वसंगीत, टाईमपास गोंधळ आणि डोके न वापरता पहायचा चित्रपट आहे. त्याचे परिक्षण करायचा ह्या धाग्याचा उद्देश नाही.
परंतु एक हीन आणि हिणकस घोडचुक त्यात केलेली आहे.
ह्या सिनेमाची कथा जवळपास पुर्णपणे सिंगापूरच्या पॅन पॅसिफीक हॉटेल मधे घडते. त्यातील एक पात्र ईंडीयन अॅम्बेसडर लाम्बा दाखवले आहे. हा लाम्बा हॉटेलमधे चाललेल्या गोंधळात फसून स्वतःचे हसे आणि बदनामी करून घेतो. गैरसमजुतीमुळे एका वेश्येबरोबर पकडला जातो, छातीवर लाथा खातो वगैरे आणखीनही बरेच मुर्ख प्रकार सोसतो.
कथेच्या घडामोडींसाठी हे पात्र ईंडीयन अॅम्बेसडरच असण्याची काहीच गरज नाही. असे असता, परदेशात भारताचा सर्वोच्च प्रतिनिधी असलेल्या ह्या पदाची अशी खिल्ली का उडवण्यात आली तेच कळत नाही. हे मुद्दाम केले आहे का ते कथा लेखक (असलाच तर), किंवा दिग्दर्शकच जाणे.
परंतू विक्रम गोखलेंसारख्या सुजाण कलाकाराने अशी भुमिका करायला नको होती. किंवा करण्या आधी ते पात्र एखादा बिझीनेसमॅन आहे असे दाखवा अशी अट घालायला हवी. अजूनही वेळ गेली नाही. भारतीय सेन्सॉरने ह्यात जी काही चार दोन वाक्ये ईंडीयन अॅम्बेसडर असा उल्लेख करतात, ती बद्लून घेण्याची सक्ती करावी. दृष्य चित्रात अॅम्बेसडर असल्याची जाणीव कोठेच नाही, त्यामुळे हे सहज शक्य आहे.
मिपाकरांची ह्यावरची मते काय आहेत, आणि ह्या साठी आपण काही करायला हवे कां हे जाणून घेण्यासाठी हा काथ्याकुट......
प्रतिक्रिया
4 Dec 2009 - 6:45 am | उमराणी सरकार
अहो चालायचंच. कशाला डोक्याला ताप करून घेताय. डोके न वापरता पहायचा चित्रपट आहे ना? बाकी देशांमध्ये तर त्यांच्या राष्ट्राध्यक्षांवर सुध्दा हिणकस चित्रपट काढतात.
राहता राहीली कलाकाराने भुमिका साकारण्याची गोष्ट. दिवार वाल्या अमिताभने गंगा जमुना सरस्वती, तुफान, जादूगर सारखे टूकार चित्रपट केलेच की.
उमराणी सरकार
4 Dec 2009 - 7:26 am | रेवती
मलाही ती भूमिका विक्रम गोखले यांनी करायला नको होती असे वाटले.
कधी कधी अभिनेत्यांचीही फसगत होत असावी. भूमिका ऐकवताना एक व सिनेमात वेगळीच्......स्क्रिप्ट तर कधी मिळते कधी नाही .....असं ऐकलय. या सिनेमात विक्रम गोखले जरा वयस्कर वाटतात. मराठीपेक्षा हिंदीत आकर्षक रक्कम मिळत असेल तर ही संधी सोडवली नसेल (कधी कधी मोठ्या रकमेची गरज असतेच की). आणि अँम्बॅसॅडर हा आपला नातेवाईक आहे या गोष्टीचा तो वधूपिता डंका पिटत असतो असे दाखवले आहे. तसेही उत्तर भारतीय सगळ्या गोष्टींचा 'दिखावा' करण्यात पटाईत असतात. सिनेमाचा शेवट तर अगदीच बंडल झालाय.
रेवती
4 Dec 2009 - 8:24 am | उमराणी सरकार
इथे उत्तर, पुर्व, दक्षिण आणि पश्चिम भारतीय असा भेदाभेद करणे तार्कीक वाटत नाही.
उमराणी सरकार
4 Dec 2009 - 8:14 am | शाहरुख
आपली घुसमट समजू शकतो पण हिंदी चित्रपटांतील प्रत्येक चुकीसाठी एक धागा इथे आपण काढू लागलो तर अजून एक आणी.....
बाकी हा चित्रपट न बघून मला जे करायचे होते ते मी केले आहे :-)
-बॉलिवूड किंग शाहरुख
4 Dec 2009 - 12:14 pm | स्वप्निल..
>>बाकी हा चित्रपट न बघून मला जे करायचे होते ते मी केले आहे
असेच म्हणतो!! :D
तुम्ही संपुर्ण चित्रपट बघु शकले हेच एक आश्चर्य आहे....
4 Dec 2009 - 8:30 am | अरुण मनोहर
आपल्याला घुसमटीचे मुख्य कारण कळले असेल अशी आशा करतो. हिंदी चित्रपटातील प्रत्येक चुक दाखवण्यासाठी कोणाला वेळ आहे? भारताची बदनामी व खोडी काही कारण नसता कोणी काढू नये असे वाटते. मागे त्या फिदा हुसेनने हिंदु देवांची वाह्यात चित्रे काढली होती. आता हे. हे निदान त्या लेव्हल इतके नीच तरी नाही. पण आणखी किती आपण सहन करणार?
4 Dec 2009 - 10:45 am | विसोबा खेचर
अगदी सहमत...
तात्या.
4 Dec 2009 - 11:18 am | Nile
भारताची खोडी काढणारे कोणत्या देशाचे रहिवासी आहेत?
4 Dec 2009 - 10:06 pm | आण्णा चिंबोरी
निले
असा खोडसाळ प्रश्न विचारून, विनाकारण खाजवून खरुज काढण्याचे प्रयोजन कळले नाही. भारताची खोडी काढणारे कोणत्याही देशाचे असले तरी त्यांना तिथेच चोपायला पाहिजे.
4 Dec 2009 - 10:36 pm | Nile
होय हो अण्णा, चेपुयात ना, पण कुठले आहेत हे कळले की चेपायला जरा सोपे जाइल ना, काय?
4 Dec 2009 - 11:18 am | चिंतातुर जंतू
मुळातच हिंदी चित्रपटातल्या तद्दन मूर्खपणाला कशाचीही बदनामी करण्यासाठी जबाबदार धरावं का? रस्त्यातल्या एखाद्या वेड्या माणसानं मला वाकुल्या दाखवल्या, तर मी दुर्लक्ष करतो. तसंच हे आहे.
- चिंतातुर जंतू
4 Dec 2009 - 3:53 pm | विशाल कुलकर्णी
मुळातच हिंदी चित्रपटातल्या तद्दन मूर्खपणाला कशाचीही बदनामी करण्यासाठी जबाबदार धरावं का?>>>>
हे चित्रपट जर केवळ भारतात प्रदर्शित होत असते तर गोष्ट वेगळी होती. हे चित्रपट सगळीकडे जगभर दाखवले आणि पाहीले जातात. भारताबद्दलची जगाची धारणा बनवायला हे काही अंशी का होइना कारणीभुत ठरतातही. मला तरी अरुण मनोहरांचे म्हणणे पटते आहे.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
4 Dec 2009 - 5:53 pm | चिंतातुर जंतू
जगभरात हिंदी चित्रपट आज प्रामुख्यानं मनोरंजनासाठीच पाहिले जातात. त्यांचं वर्णनही तसंच केलं जातं. उदा. विकिपीडिआतला एन्सायक्लोपीडिआ ब्रिटानिकाचा संदर्भ पाहावा. ज्यांना गांभीर्यानं चित्रपट पाहायचे असतात, त्यांच्यासाठी वेगळ्या भारतीय चित्रपटांचं आयोजन केलं जातं. त्यामुळे "दे दना दन"सारखे चित्रपट फार गांभीर्यानं घेतले जातात, असं जाणवत नाही.
- चिंतातुर जंतू
5 Dec 2009 - 12:32 am | भडकमकर मास्तर
हॉट शॉट पार्ट द्वितीय आठवला.. त्यात राष्ट्राध्यक्षाची काय प्रचंड टिंगल आहे...
6 Dec 2009 - 1:23 pm | वेताळ
लई भारी पिक्चर आहे.
वेताळ
6 Dec 2009 - 6:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दे दनादन मधले 'पैसा पैसा करती है,
हे गाणं आवडलं बॉ ! चित्रपटाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यु..!
-दिलीप बिरुटे
[चित्रपट रसिक]