राम राम मिपाकरहो,
गेले काही दिवस मिपावर अवांतर प्रतिसादांची, मूळ धाग्याशी/विषयाशी काहीही संबंध नसणारे-केवळ एकमेकांशी वायफळ व फालतू गप्पा मारणार्या वैयक्तिक स्वरुपाच्या प्रतिसादांची, एखाद्या धाग्याला सार्वजनीक खरडफळ्याचे स्वरूप देऊन त्या धाग्याचा विचका करणार्या प्रतिसादांची संख्या बरीच वाढली आहे असे दिसते..
सबब,
आज दिनांक ३ डिसेंबर, २००९ - भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १-३० वाजल्यापासून असा वटहुकूम जारी करण्यात येत आहे की वरील स्वरुपाचे अवांतर प्रतिसाद लिहिणार्या सभासदाचे खाते ३ दिवसांकरता गोठवले जाईल..
तीन दिवसांनंतर संबंधित सभासदाचे खाते पुन्हा कार्यान्वित केले जाईल. संबंधित सभासदाकडून अशी आगळीक दुसर्यांना घडल्यास त्याचे खाते ७ दिवसांकरता स्थगित करण्यात येईल.. व त्याच सभासदाकडून तिसर्या वेळेस जर पुन्हा तीच चूक घडल्यास सदर सभासदाचे मिपा-सभासदत्व नाईलाजास्तव रद्द करण्यात येईल..
एकमेकांशी गप्पा मारण्याकरता खरडफळा/खरडवही व व्यक्तिगत निरोपाची सोय करण्यात आली आहे, त्या सुविधेचा वापर करावा..
मिपा हे केवळ अवांतर गप्पांचा अन् प्रतिसादाचा फड होऊ नये, तसेच मूळ धाग्याचे/लेखाचे गांभिर्य कायम रहावे याकरता हा वटहुकूम नाईलाजास्तव जारी करण्यात येत आहे.
एखादा प्रतिसाद हा "अवांतर" आहे किंवा नाही हे ठरवण्याचे संपूर्ण अधिकार आमचेकडे असतील व त्यावर कोणतीही चर्चा केली जाणार नाही/स्पष्टीकरण दिले जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी..
मिपा हे अधिकाधिक दर्जेदार संकेतस्थळ व्हावे या हेतूने हा वटहुकूम जारी करण्यात आला आहे याची सर्वानी नोंद घ्यावी ही विनंती..
सर्व सभासदांनी कृपया सहकार्य करावे ही विनंती..
-- आणिबाणीचा शासनकर्ता.
प्रतिक्रिया
3 Dec 2009 - 1:38 pm | आणिबाणीचा शासनकर्ता
ज्या सभासदांना अद्याप खरडवही आणि व्यक्तिगत निरोपाची सुविधा प्राप्त झालेली नाही त्यांनी कृपया येथे लिहावे..
शक्य झाल्यास त्या सभासदांना ही सुविधा पुरविण्यात येईल..
--आणिबाणीचा शासनकर्ता.
4 Dec 2009 - 10:03 pm | आण्णा चिंबोरी
तात्या तुझा हा निर्णय आवडला नाही.
मला खरडवही नसल्याने तू म्हंटल्यानुसार इथे लिहिले. शिवाय मूळ प्रस्तावाशी संबंधित असल्याने हा प्रतिसाद अवांतर नाही.
3 Dec 2009 - 1:44 pm | अवलिया
छान !
--अवलिया
3 Dec 2009 - 1:51 pm | प्रसन्न केसकर
आतातरी चर्चा मुद्देसुद अन शिस्तीत होतील असं वाटतय.
3 Dec 2009 - 1:54 pm | निखिल देशपांडे
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
3 Dec 2009 - 1:57 pm | श्रावण मोडक
'सहमत'. पण
आतातरी चर्चा मुद्देसुद अन शिस्तीत होतील असं वाटतय.
हे मात्र जालीय इतिहासावर नजर टाकल्यावर होपलेसली होपफुल म्हणतात तसे वाटते आहे. एकूण अशा चर्चांबाबतच्या मराठी बाण्यावर हा उतारा ठरावा अशी इच्छा जरूर आहे. मूळ मुद्याशी संबंधित असल्याने हा प्रतिसाद अवांतर ठरणार नाही अशी आशा आहे.
3 Dec 2009 - 2:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मोडकांशी सहमत.
आणिबाणीच्या शासनकर्त्याशीही बाय डीफॉल्ट सहमत.
अदिती
3 Dec 2009 - 3:51 pm | धमाल मुलगा
विचार चांगलाच आहे. पण मोडक म्हणतात तेही दुर्दैवानं खरं. मोठे मोठे म्हणवले (केलेले) जाणारे मात्र योग्य ती काळजी घेऊन (जुने आं.जा राजकीय ठोकताळे वापरुन) नियम हवे तसे वाकवु शकले तर मात्र दुर्दैवानं ह्यात लहान जीव भरडले जातील असे एक वैयक्तिक मत आहे.
असो.
इव्हॉल्युशनला शुभेच्छा! :)
3 Dec 2009 - 4:08 pm | विसोबा खेचर
भरडले जाण्याचा अथवा जीव लहान-मोठा असण्याचा प्रश्न नाही, जो जीव अवांतर प्रतिसाद देईल त्या जिवाला मिपावर स्थान असणार नाही..
अर्थात, मी काही सगळेच प्रतिसाद तपासणार नाही.. कारण मी काही सतत मिपावर नसतो. परंतु जेव्हा जेव्हा मी मिपावर वावरत असेन तेव्हा जे अवांतर प्रतिसाद माझ्या नजरेस पडतील ते देणार्याचे खाते ब्लॉक करण्यात येईल..
तात्या.
3 Dec 2009 - 2:06 pm | बिपिन कार्यकर्ते
मोडकांशी सहमत.
बिपिन कार्यकर्ते
3 Dec 2009 - 2:09 pm | विसोबा खेचर
तोच प्रयत्न सुरू आहे.. काही संपादक मंडळींचेही अवांतर प्रतिसादांकडे दुर्लक्ष होते असे म्हणावेसे वाटते.. अर्थात, संपादक मंडळी आपापले व्यवसाय सांभाळून संपादकपद सांभाळत आहेत त्यामुळे त्यांना दोष देता येत नाही/येणार नाही..
शेवटी माझं संकेतस्थळ, त्यामुळे मलाच काही कठोर निर्णय घेऊन अवांतर प्रतिसादांची ही कीड मारावी लागेल!
बघुया..!
आपला,
(मिपाच्या भल्याकरता कुठलाही कठोर निर्णय सहज घेऊ शकणारा) तात्या.
3 Dec 2009 - 2:28 pm | सूहास (not verified)
हा हा हा ....व्हे री गु ड जो क ...
एक शेर आठवला ::
ना सुधरा है ना सुधरेगा पाकिस्तान कभी ..
मेरी जिन्दगीकी सुबह कभी तो शाम कभी ..
आता ह्या प्रतिसादाला अवांतर म्हणत असाल तर सगळ्या संपादकांसह , आणीबाणीच्या शासनकर्त्याला मी हा प्रतिसाद अवांतर नाही .हे पुराव्यासकट साबित करुन देउ शकतो..
सू हा स...
व्यवस्थापकीय निर्णयाचा आदर राहिला बाजूला, परंतु त्याची खिल्ली उडवणारा, ज्या हेतूने हा वटहुकूम काढला आहे त्याचे गांभिर्य लक्षात न घेता, चर्चेला अकारण वेगळी दिशा देऊ पाहणार्या, पर्यायाने अवांतर प्रतिसाद देणार्या सूहास यांचे खाते तीन दिवसांकरता गोठवण्यात येत आहे..
आणिबाणीचा शासनकर्ता.
हा दुसरा एक जोक..ह्या आधी चादंण्याच वाटपाच काय झाल ?
खाते रद्द!
धन्यवाद..
4 Dec 2009 - 6:56 am | उमराणी सरकार
पोटा, मोक्का, मकोका, रासुका, सायमन कमिशन वगैरेंची आठवण झाली.
यात कुठेही आवाहनवजा सूर दिसत नाहीये. जोर-जबरीचा मामला वाटतोय.
--ज्या सभासदांना अद्याप खरडवही आणि व्यक्तिगत निरोपाची सुविधा प्राप्त झालेली नाही त्यांनी कृपया येथे लिहावे..
शक्य झाल्यास त्या सभासदांना ही सुविधा पुरविण्यात येईल..--
उपकार झाले शासनकर्त्या.
सुहास जर पुराव्यासकट साबित करतो म्हणत असेल तर त्याला संधी मिळायलाच हवी. त्याचे खाते गोठविल्याचा जाहीर निषेध.
उमराणी सरकार
4 Dec 2009 - 8:14 am | विसोबा खेचर
तपशील चुकला. त्याचे खाते गोठवले नसून रद्द केले आहे. धन्यवाद!
4 Dec 2009 - 8:30 am | उमराणी सरकार
---हा वटहुकूम काढून १५ मिनिटांच्या आतच एका सभासदाचे खाते गोठवावे लागले ही दुर्दैवाची बाब!---
हे वाक्य कोणाचे विसोबा?
खाते रद्द करण्याचा पर्याय कुठे आहे?
उमराणी सरकार
3 Dec 2009 - 2:23 pm | श्रीयुत संतोष जोशी
फार कठोरपणा दाखवू नये ही विनंती.
काही खुसखुशीत प्रतिसाद वाचायलाही मजा येते.
पूर्णपणे विषयाला सोडून असेल तर ठीक आहे.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
3 Dec 2009 - 2:31 pm | विसोबा खेचर
हो, परंतु ते मूळ धाग्याशी सुसंगत असावेत. एकमेकांना उद्देशून केवळ, गप्पांच्या स्वरुपातील नसावेत..नाहीतर त्या अनुषंगाने अवांतर प्रतिसादांची पुढील साखळी वाढत जाते व मूळ धागा बाजूला राहतो असे अनेकदा पाहण्यात आले आहे..
हा वटहुकूम काढून १५ मिनिटांच्या आतच एका सभासदाचे खाते गोठवावे लागले ही दुर्दैवाची बाब!
तात्या.
3 Dec 2009 - 2:40 pm | llपुण्याचे पेशवेll
सहमत आहे. जर कोणत्याही संस्थेचे(पर्यायाने संकेतस्थळाचे) स्वास्थ्य टिकावेसे वाटत असेल तरी कधी कधी कठोर निर्णयही मनावर दगड ठेऊन घ्यावे लागतात. तात्या योग्य निर्णय आहे.
आपला चांदण्यांचाही निर्णय योग्य होता. परंतु तो तितकासा सफल ठरलेला दिसत नाही. असो.
तुम्हाला पाठिंबा आहेच .
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
3 Dec 2009 - 2:58 pm | पर्नल नेने मराठे
श्रीयुत संतोष जोशींशी सहमत...........
काही खुसखुशीत प्रतिसाद वाचायलाही मजा येते.
चुचु
3 Dec 2009 - 3:46 pm | सुमीत भातखंडे
उत्तम
3 Dec 2009 - 3:53 pm | समंजस
ज्या नियमांमुळे मिपा चा लाभ होत असेल, बळकटी मिळत असेल त्या सर्व नियमांना पाठीबा.
3 Dec 2009 - 4:34 pm | दशानन
आणिबाणीच्या शासनकर्त्याशी बाय डीफॉल्ट सहमत.
जय हो !
प्रतिसादाचा अवांतर नसलेला परंतु अनावश्यक वाटलेला काही भाग संपादित..
--आणिबाणीचा शासनकर्ता.
धन्यु !
वरील हुकुम / नियम सर्वांनाच लागु होईल ही अपेक्षा व हा मार्ग यशस्वी व्हावा अशी शुभेच्छा.
*****
मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
3 Dec 2009 - 5:45 pm | टारझन
भारताने एकदा ऑस्ट्रेलिया दौरा केला होता. त्यात मा.श्री.स्टिव बकनर पंच होते. त्यांनी गांगुलीला बॅटला चेंडू घासल्याचे स्पष्ट दिसत असतांना लेग बिफोर दिले होते. आणि पॅडला लागलेले चेंडू कॅच ऑट दिले होते. आता काय कुणास ठाऊक बकनर साहेबांना गांगुलीला बादंच करायच होतं तर आडवणार कोण ? पुर्वी गांगुली हा बकनरांचा आवडता खेळाडू होता हे विषेश. शिवाय आयसीसी बकनरांकडे खुलासा ही मागत नाही. ना खेळाडू मागु शकतो.
गांगुलीच्या कारकिर्दीचा उतार सुरू झाला तो त्याच्याच मुळे.
मिपावर फक्त अवांतर प्रतिसादांनाच हा मज्जाव करण्यात आलेला दिसतोय. जरी तो प्रतिसाद एखाद्या थर्ड-क्लास बिंडोक एक लायनीच्या किंवा फॉरवर्डेड धाग्यावर का केलेला असेना.
"उरलेल्या गुलाबजामाच्या पाकाचे काय करावे ?" धागा संपला. ह्या आणि असल्या पठडीतल्या धाग्यांवर आता उत्तमोत्तम वैचारिक प्रतिक्रिया वाचायला मिळतील आणि मिपा समृद्ध होईल अशी आशा करूया
असे धागेही कदाचित अप्रकाशित केले जातील वा काढून टाकले जातील. त्याचा निर्णय आम्ही घेऊ. परंतु म्हणून त्या धाग्यांना दिल्या गेलेल्या अवांतर प्रतिसादाचे समर्थन होऊ शकत नाही याची नोंद घ्यावी..
आणिबाणीचा शासनकर्ता.
असो , मालकांना शुभेच्छा आणि शक्य तितके सहकार्य .
सही विडंबणामुळे धाग्याचा खफ होत नाही, सही म्हणजे प्रतिसादही नसतो. त्यामुळे सही ही ह्या नियमत बसत नसेल अशी किमान आशा करतो.
- (विदाऊट एन्क्वायरी एकदा खाते ब्लॉक झालेला) टारझन
3 Dec 2009 - 5:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चांगला निर्णय...!
-दिलीप बिरुटे
3 Dec 2009 - 5:49 pm | विंजिनेर
'विचार' स्तुत्य आहे. मुळात हा (किंवा अशासारखे पूर्वी चांदण्या वगैरे)उपाय म्हणजे मिपावरच्या प्रतिसाद-स्वातंत्र्याचीच दुसरी बाजू आहे. तेव्हा विचारातील अंमलबजावणीतील सातत्याला जास्ती महत्व आहे. मिपावरील लेखन-प्रतिसादांचा वेग पाहता एक चांगली किंचित कठोर योजना 'आरंभ-शूरते'चा बळी ठरू नये ही इच्छा...
3 Dec 2009 - 5:50 pm | लंबूटांग
निर्णय वाचून खूप खेद वाटला. ज्या मोकळ्या ढाकळ्या वातावरणासाठी (अभिव्यक्ती स्वातंत्र्य) मिपा प्रचंड आवडते त्यावर दिवसेंदिवस अधिकाधिक गदा येत चालली आहे असे वाटते.
I understand your concern. Bandwidth हा जर issue असेल तर मग हा प्रतिसाद अवांतर आहे :). परंतु तसे वाटत नाही. धाग्याचा विचका करणार्या प्रतिसादांना आवर घालण्यासाठी हा उपाय एक extreme measure वाटतो. आणि तुम्ही तरी किती आणि कुठे कुठे लक्ष ठेवणार आहात?
तुम्हीच वर म्हटल्याप्रमाणे तुम्हाला सगळेच प्रतिसाद वाचणे शक्य होणार नाही. त्यामुळे एकाचा प्रतिसाद उडला तरी दुसर्याचा राहून जाईल. ह्यामुळेच कोणाला तरी आपल्यावर अन्याय झाला असे वाटणे साहजिक आहे.
मला असे वाटते मी या आधी एकदा म्हटल्याप्रमाणे thumbs up/ system सुरू केल्यास अवांतर प्रतिसादांना thumbs down मिळून जेव्हा thumbs down एखाद्या threshold इतके होईल तेव्हा ते आपोआप hide होतील. youtube सध्या हीच पद्धत वापरत आहे. ह्यानंतर आणिबाणीच्या शासनकर्त्याने/ संपादकांनी त्या प्रतिसादांना पाहून ठरवावे की त्यांचे काय करायचे.
ह्यामुळे आणिबाणीच्या शासनकर्त्याचे/ संपादकांचे कामही सोपे होईल असे वाटते.
फेसबूक सारखे Like वापरल्यास +१ वाले प्रतिसाद देखील आपोआप कमी होतील.
मला मान्य आहे की एखाद्याला उगाचच टारगेट म्हणून त्याच्या सर्वच प्रतिसादांना thumbs down देण्याचा प्रकार होऊ शकतो पण मग आणिबाणीचा शासनकर्ता/ संपादक आहेतच की अशांना समज द्यायला आणि ते प्रतिसाद पुनःप्रकाशित करायला.
माझ्या माहितीप्रमाणे मिपा drupal based आहे आणि drupal साठी अनेक rating modules उपलब्ध आहेत.
(हवे तर मी चांगले rating module कोणते ह्याचा शोध घेऊ शकतो)
--(मिपाचा फॅन) लंबूटांग
4 Dec 2009 - 4:03 am | Nile
चांगल्या कल्पना आहेत, तुमच्या कप्लनांचा विचार होइल अशी आशा करतो.
4 Dec 2009 - 8:09 am | क्लिंटन
चर्चेच्या मूळ विषयाशी संबंध नसलेले आणि विनाकारण विषय भरकटत नेणारे प्रतिसाद म्हणजे बहुमूल्य बॅन्डविड्थ ची नासाडी तर आहेच पण असे प्रतिसाद चर्चा प्रस्तावाच्या मूळ लेखकाला अपेक्षित नसलेल्या दिशेने चर्चा घेऊन जातात.ही बॅन्डविड्थ कोणीतरी पैसा आणि वेळ खर्च करते म्हणून आपल्याला वापरायला मिळते आणि मिपासारखे आंतरजालावरील मराठी घर आपल्याला उपलब्ध झाले आहे याची जाण आपण सर्वांनीच ठेवायला पाहिजे असे मला वाटते.तेव्हा भरकटणाऱ्या प्रतिसादांना बंदी म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी असे कृपया समजू नका ही विनंती.
असो.वटहुकूमाला १०००% समर्थन
(मिपाला मराठी आंतरजालावरील आपले घर मानणारा) विल्यम जेफरसन क्लिंटन
---------
विल्यम जेफरसन क्लिंटन
वसतीगृह क्रमांक १९ खोली क्रमांक ८
भारतीय प्रबंध संस्थान
वस्त्रापूर
अहमदाबाद-३८००१५
गुजरात
---------
3 Dec 2009 - 6:38 pm | मस्तानी
मिपा चे चाहते जगभरात आहेत आणि दिवसेंदिवस वाढतच जातील ... त्यामुळे २४ तास त्यावर काही ना काही घडत असतं ... पण मग २४ तास पहारा कोण देणार ? Rating Modules हा एक फार चांगला व संपादकांना उपयोगी/मदतगार असा उपाय होऊ शकतो. शेवटी 'माझा गांगुली झाला' अशी भावना कुणालाही येण हे देखील टाळलेलंच बंर नाही का ... 'खुमासदार' प्रतिसाद वाचायला मजा येते आणि ते ही मिपा च एक वैशिष्ट्य आहे हे जाता जाता सांगावस वाटत.
3 Dec 2009 - 6:56 pm | प्रमोद देव
कोणतेही उपाय योजले तरी त्यातून पळवाटा शोधणारे असतातच. म्हणून मला असे वाटतं की आपण सर्वांनी आपणहून स्वत:वरच काही बंधनं घालून घेतली तर कदाचित तात्याला इतकी टोकाची भूमिका घ्यावी लागणार नाही.
मिपा समृद्ध करण्यात इथल्या प्रत्येकाचाच वाटा आहे..म्हणून हे संकेतस्थळ व्यवस्थित कार्यरत राहावे असे मनापासून वाटत असेल तर थोडे संयमाने वागू या.
धन्यवाद!
3 Dec 2009 - 8:52 pm | रेवती
प्रमोदकाकांशी १००% सहमत.
आपणच आपल्यावर थोडी बंधने घालून घेतल्यास अवांतर प्रतिसादांचा त्रास 'धाग्याला' , पर्यायाने मिपाला होणार नाही.
आपल्या वागण्याने अमूक एका प्रकारची गैरसोय होते आहे असे एकदा सांगितल्यावर पुन्हा तस्सेच वागत राहणे व त्यावर नाईलाजाने घेतलेल्या टोकाच्या अॅक्शनबद्दल नाराजी दाखवणे हा संस्थळ चालकांवर अन्याय आहे असे वाटते.
शासनकर्त्यांशी सहमत.
रेवती
3 Dec 2009 - 7:20 pm | sujay
ह्या निर्णयामुळे मिपावरील खेळीमेळीचे वातावरण दूषीत होवू नये ही अपेक्षा.
अवांतर प्रतिक्रीयांवर कारवाई प्रमाणेच अवांतर धागे काढणारयांवर (जसे गुलाबजामाच्या पाकच काय करू, मेस् लावू का घरी स्वयंपाक करू) देखिल कारवाई व्हावी.
लंबूटांगने दिलेला thumbs down चा पर्याय देखील योग्य वाटतो.
(तात्या, मला ६ महिन्यानंतरही खव आणी व्यनीची सोय प्राप्त नाही,क्रुपया सुवीधा द्यावी हि विनंती)
सुजय
3 Dec 2009 - 7:27 pm | चतुरंग
अधून मधून कठोर निर्णय घ्यावेच लागतात आणि त्याचे फायदेही दिसतात.
वरती देवकाका म्हणतात तसे सगळ्यांच्याच संयमाचीही ही कसोटी असते.
चतुरंग
3 Dec 2009 - 9:08 pm | वेताळ
पण आता निर्णय घेतलाच आहे तर सुहास चे खाते काही दिवसांसाठी गोठवावे ,ते रद्द करु नये. अशी शासन दरबारी विनंती.
वेताळ
3 Dec 2009 - 9:09 pm | हेरंब
अतिशय उत्तम निर्णय! खरडवहीची सोय असताना सुध्दा सगळे अवांतर गप्पा मारायचे.
3 Dec 2009 - 9:10 pm | अरुण मनोहर
तात्यांचा निर्णय स्वागतार्हच आहे. परंतू, दुसरी बाजू दुर्लक्षित करू नका, प्लीज.
मिपा येवढे खमंग आणि चटपटीत वाटते, कधी कधी न आवडून देखील, आणि आपल्या लेखनावर अवांतर गप्पा झाल्याने पब्लीक भटकलेली पाहून देखील केवळ त्यातील उस्फुर्त पणा (आणी कधी कधी आचरटपणा, टवाळपण देखील) पाहून पुन्हा इकडे वाचायला यावेसे वाटते.
तेव्हा एक उपाय सुचवावा वाटत आहे. पहा पटले तर-
*****
शासनकर्त्यांना अवांतर वाटलेले एका धाग्यावरील प्रतिसाद बाजुला काढून, एका नवीन धाग्यावर टाकावेत. जसे- मूळ धागा- शिर्षक- "कथा अकलेची". नवीन धागा- शिर्षक -"कथा (अवांतर) अकलेची"..... what say you?.....
3 Dec 2009 - 9:22 pm | श्रावण मोडक
आपापसात? चालू शकते.
3 Dec 2009 - 9:44 pm | अरुण मनोहर
अवांतरचा वेगळा धागा, मुळ धाग्याशी लीन्क देऊन काढला तर तो पब्लीक साठी ठेवण्यात काय हरकत आहे? मूळ धाग्याच्या लेखकावर अन्याय होणार नाही आणि अवांतर गप्पा गोष्टी, पण ख.फ. पेक्षा वेगळ्या, आणि मूळ धाग्याशी बादरायण संबंध असलेल्या केवळ मजा म्हणून स्वतंत्र धाग्यावर वाचायला मिळतील. मिपा जर अशा आउट ऑफ बॉक्स योजनांनी आणखी जास्त लोकप्रिय होत असेल तर व्हॉट्स द प्रॉब्लेम?
3 Dec 2009 - 9:43 pm | प्रभो
सगळ्यांशी सहमत....मिपावरच्या सर्व धोरणांना कायम १००% पाठिंबा आहे.
आपल्याला तर्रीदार मिसळही आवडते आणी साधी आमटीही.....
आणिबाणीच्या शासनकर्त्यांना ही योजना राबवण्यासाठी All the best..(मुद्दामच शुभेच्छा म्हणत नाहिये..कारण आय डी उडवताना आणिबाणीच्या शासनकर्त्यांना ही त्रास होत असणारच.....)
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
3 Dec 2009 - 11:14 pm | अनामिक
निर्बंध लादल्यावर ते लादू नये म्हणण्यापेक्षा तशी वेळच येऊ न देण्याची काळजी सगळ्यांनीच घ्यायला हवी. मालकाच्या निर्णयाशी सहमत!
-अनामिक
3 Dec 2009 - 11:34 pm | शाहरुख
आणीबाणीच असल्याने सहमती/असहमती दर्शवण्याचा प्रश्नच नाही.
आज्ञेचे पालन केले जाईल.
बाकी, या टायपातले लिखाण नेहमी शासनकर्त्याचेच असते का ? माझा फार गोंधळ उडतो.
3 Dec 2009 - 11:37 pm | विसोबा खेचर
मुद्द्याचे बोल्लात.. धन्यवाद.. :)
तात्या.
4 Dec 2009 - 12:28 am | देवदत्त
नियमाचे पालन केले जाईल :)
4 Dec 2009 - 8:43 am | टुकुल
तात्या जर तुम्हाला वाटत असेल हे मिपाच्या भल्यासाठी आहे तर नक्किच पालन केले जाइल..
मिपाकर,
टुकुल
4 Dec 2009 - 10:15 am | विजुभाऊ
संपादकाना सहकार्य करुयात.
एखाद्या प्रतिसादातील मुद्दा खोडावा असे वाटले किंवा तो प्रतिसाद धाग्याशी संदर्भीत असूनही एकदम बाष्कळ असल्यास त्या प्रतिसादाव्रील टीका अवांतर समजू नये
4 Dec 2009 - 10:54 am | प्रकाश घाटपांडे
एखादा प्रतिसाद अवांतर होतो आहे कि समांतर हे ठरवताना अनेक बाबींचा विचार होणे आवश्यक बनते. काही अवांतर प्रतिसाद हे मुळ साद पेक्षा रोचक व माहितीपुर्ण बनतात. कधी ते गांभीर्याची कोंडी फोडुन खेळीमेळीचे वातावरण तयार करतात. कधी या उलट घडते.
प्रमोदकाकांनी स्वयंशिस्तीचा मुद्दा मांडला आहे. तो सर्वांनाच मान्य होणारा असतो फक्त आचरणात आणणे अवघड बनते. मिपावर वेगवेगळ्या वयोगटाचे ( शाररिक/ मानसिक/बौद्धिक वय हा मुद्दा अवातंर तरी ही समांतर) लोक आहेत. प्रतिसाद देताना प्रतिसाद कर्त्याची त्यावेळेची मनस्थिती प्रतिबिंबीत होत असते. प्रतिसाद/लेखनकर्त्याचा पुर्वेतिहास ही बाब देखील पुर्वदुषित्/पोषित बनते.त्यावेळी प्रतिसाद काय दिला आहे त्यापेक्षा तो कोनी दिला आहे याला महत्व प्राप्त होते. प्रतिसादात मागील हिशोब चुकते करण्याची समीकरणे दडलेली असतात.ती मुळ विषयाला तारक/मारक ठरु शकतात. या समीकरणांचे विच्छेदन अवघड असते म्हणुनच शासनकर्त्याने ते अधिकार स्वतःकडे ठेवले आहेत.
स्वयंशिस्त बाळगणे हे उत्तम. म्हणुन शंका/कुशंकांचे वेळीच नीट नीरसन करणे यासाठी खव/खफ वापरणे योग्य. तरी देखील अवांतरासाठी कुठलेही कारण हे नीमित्तमात्र ठरते हे शेवटी चालायचेच. त्यातल्यात्यात तारतम्य वापरावे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
4 Dec 2009 - 11:00 am | Nile
प्रकाश काकांनी प्रश्न बरोबर मांडला आहे, उत्तर मात्र अवघड आहे. :)
4 Dec 2009 - 1:25 pm | ज्ञानेश...
सदस्यांनी मूळ धाग्याला अनुसरून आपले मत मांडून झाल्यानंतर खालच्या ओळीत-
(अवांतर:-------)
असे लिहिल्यास हरकत नाही ना?
4 Dec 2009 - 1:38 pm | आशिष सुर्वे
मिसळ कशी असावी??
(१) सर्व महत्वाच्या घटकांसहीत..
(२) वरून शेव-कोथिंबीरीच्या सजावटीसहीत..
(३) अगदी झणझणीत!!
(४) आणि पावाच्या सोबतीत..
मिसळ कशी नसावी??
एकच अट.. मिसळीने पोटाचे विकार मात्र होता कामा नयेत!
मला वाटते तात्यांना आणि संपादकांना हेच म्हणायचे आहे, हो ना??
ठीक आहे..
डन् डना डन्!
-
कोकणी फणस
5 Dec 2009 - 5:55 pm | विनायक प्रभू
सो शॅल इट बी सेड सो शॅल इत बी डन
5 Dec 2009 - 5:56 pm | विनायक प्रभू
सो शॅल इट बी सेड सो शॅल इट बी डन