मराठी गाणी...आवडती..मनातली!!

धमाल मुलगा's picture
धमाल मुलगा in काथ्याकूट
28 Mar 2008 - 5:51 pm
गाभा: 

अगदी खर॑ सा॑गायच॑ तर जुनी मराठी गाणी अस्सल सोन्याहूनही सु॑दर! पण गेल्या काही दिवसा॑पुर्वी दोन मराठी चित्रपटातली गाणी ऐकली आणि मलातरी खुपच आवडली. वाटल॑ चला आपल्या मिपाकरा॑ना पण सा॑गुया.

पहिल॑ गाण॑ आहे "तू निरागस च॑द्रमा" छान वाटल॑ ऐकताना...

तू निरागस च॑द्रमा, तू सखी मधुशर्वरी
चा॑दणे माझ्या मनीचे , पसरले क्षितिजावरी....

आणि दुसर॑ "हा च॑द्र तुझ्यासाठी"

हा च॑द्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी,
आरास ही तार्‍या॑ची गगनात तुझ्यासाठी..

चित्रपट बहुधा सावरखेड-एक गाव असावा.

तुमची आवडती गाणी?

प्रतिक्रिया

नंदन's picture

28 Mar 2008 - 6:28 pm | नंदन

नवीन चित्रपटांतली --

१. आलो कुठून कोठे -- तू तिथं मी
२. अगंबाई अरेच्याची बहुसंख्य गाणी

आवडतात. तू उल्लेख केलेली गाणी ऑनलाईन कुठे ऐकता येतील का?

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

वरदा's picture

29 Mar 2008 - 5:16 am | वरदा

हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार व्रूक्षापरी दिसशी तू नवतरुणी काश्मिरी......

आणि मुंबईचा जावई मधली गाणी पण मस्तच....

धमाल मुलगा's picture

31 Mar 2008 - 9:41 am | धमाल मुलगा

आईशप्पथ... वरदाताई,
सह्हीच!!!!
मलापण "हे चि॑चेचे झाड दिसे चिनारवृक्षापरी" खुप आवडत॑. त्या काळातल॑ एव्हढ्या उडत्या चालीची फारशी गाणी नसावीत बहुधा. (हा माझा अ॑दाज!).

त्याशिवाय, "त्या तिथे..पलीकडे" पण मला आवडत॑. :-))

धन्यवाद वरदाताई, बर्‍याच दिवसा॑नी "चि॑चेचे झाड" ची आठवण ताजी केल्याबद्दल :-)

- ध मा ल घाणेकर

महेंद्रकपूर .....अर्थात ,"सरकारी भोपू !" :-)

ते नवीन राधा ही बावरी गाणं छान आहे...पिक्चरायझेशन एकदम बकवास....

भाग्यश्री's picture

29 Mar 2008 - 5:35 am | भाग्यश्री

सद्ध्यातरी अगबाई अरेच्चा च आठवत आहे.. सावली मधे सुद्धा चांगली गाणी होती. देवकी पंडीतने गायलेले 'राधा ही बावरी' च्या चालीचच एक गाणं आहे.. मेलं ते पण आठवत नाहीय आत्ता..
* कालच 'एकापेक्षा एक' नावाच्या सचिन्-अशोक सराफ्-बेर्डे पटातील एक भीषण (सो कॉल्ड रोमँटीक) गाणं डोक्यात बसलय.. "२ रुपये २ रुपये दे दे मला, खर्चाला, पान्-सुप्पारीला..." :| इतकं अर्थहीन गाणं मी कधीच ऐकले नाही... त्या गाण्यानी माझी स्मरणशक्ती गेलीय बहुधा तात्पुरती! :))
असो.. फार विषयांतर होतय का.. हे विनोदी गाणं आठवलं म्हणून सांगितलं.. बाकीची आवडीची गाणी लिहीनच...

आवडाबाई's picture

31 Mar 2008 - 9:54 pm | आवडाबाई

. . . .नील रंगी रंगले

पिवळा डांबिस's picture

29 Mar 2008 - 6:34 am | पिवळा डांबिस

सॉरी, आम्ही चुकून जुनी मराठी गाणी असे वाचून प्रतिसाद द्यायला सुरवात केली पण नंतर लक्षात आलं की नव्या मराठी चित्रपटांतील गाण्याबाबत चर्चा चालू आहे...
आम्हाला नव्या गाण्यांबद्दल नावड नाही पण नवीन मराठी चित्रपट फारसे पहायला मिळत नाहीत.
प्रतिसाद पूर्णपणे कसा काढून टाकायचा ते अजून मी शिकलेलो नाही. तेंव्हा, मध्येच टपकल्याबद्द्ल क्षमस्व!
तुमचं चालू द्या...
-डांबिसकाका
(शिंच्या, डांबिसा, कळत नाही तर उगाच मधे-मधे कशाला येतोस रे, रांडिच्या!! - आमचे "गोडबोले" मास्तर)

विसोबा खेचर's picture

29 Mar 2008 - 6:57 am | विसोबा खेचर

(शिंच्या, डांबिसा, कळत नाही तर उगाच मधे-मधे कशाला येतोस रे, रांडिच्या!! - आमचे "गोडबोले" मास्तर)

हे बाकी मस्त! :)

असो,

नवीन मराठी चित्रपटातील गाण्यांबद्दल मला फारशी माहिती नाही! त्यामुळे त्यावर काही आवर्जून लिहिणं शक्य नाही. मुळात म्हणजे जी गाणी आवडतात, तीच गुणगुणली जातात, मनाचा ताबा घेतात! अलिकडच्या मराठी चित्रपटात अगदी सहज गुणगुणाविशी वाटावीत अशी गाणी निदान माझ्या तरी कानांवरून गेलेली नाहीत..

राजभाऊ-गदिमा-बाबूजीं, रामभाऊ कदम, वसंत पवार, या मंडळींनी गाजवलेला तो सुवर्णकाळ आता स्वप्नवत वाटतो आहे!

कालाय तस्मै नम:! दुसरं काय!

जुन्या गाण्यांबद्दल म्हणाल तर यादी खूपच मोठी होईल! अगदी घन:श्याम सुंदरा श्रीधराचंच उदाहरण घ्या! काय सुरेख गाणं होतं!

झालंच तर, जेथे सागरा धरणी मिळते, रुपास भाळले मी, जे वेड मजला लागले....

यादी खूप लांबत जाईल!

जुन्या मराठी चित्रपटातील गाण्यांची ही समृद्ध परंपरा आठवली की मला हल्लीच्या मराठी चित्रपट संगीताविषयी दया येते!

असो...तरीही पुन्हा मराठी चित्रपट संगीताला जरा बरे दिवस येतील अशी आशा करूया!

अर्थात, ही सर्व माझी वैयक्तिक मतं आहेत हे नमूद करतो...

तात्या.

पिवळा डांबिस's picture

29 Mar 2008 - 7:07 am | पिवळा डांबिस

घन:श्याम सुंदरा श्रीधराचंच उदाहरण घ्या! काय सुरेख गाणं होतं!
आणि त्यातली पंडितराव नगरकरांच्या "करूनि सडा संमार्जन **" च्या पाठीमागे लताबाईंनी जी तान घेतली आहे! हाय, हाय, अंगावर काटा उभा रहातो!! त्या ओळितला शेवटचा शब्द मी अजुनही नीट ऐकू शकलेलो नाही इतकी ती तान लक्ष खेचून घेते...
-संगीतवेडा पि.डा.

नीलकांत's picture

29 Mar 2008 - 10:02 am | नीलकांत

मुक्ता मधील 'तू तलम अग्नीची पात, जशी दिनरात जळावी मंद ' आणि 'जाई जुईचा गंध मातीला ' ही दोन गाणी छान आहेत.
महानोरांनी लिहीली आहेत.

नीलकांत

विसोबा खेचर's picture

29 Mar 2008 - 10:04 am | विसोबा खेचर

आणि 'जाई जुईचा गंध मातीला ' ही दोन गाणी छान आहेत.
महानोरांनी लिहीली आहेत.

येस्स! हे गाणं छानच आहे...

तात्या.

'जाई जुईचा गंध मातीला' गाणे अगदी अप्रतिमच आहे
ज्या जिज्ञासूंना हे गाणे ऐकायचे वा डाऊनलोड करुन घ्यायचे असेन त्यांनी इथे भेट द्या
http://www.esnips.com/web/SundarMarathiGaani

आपल्याला तर हे शीर्षक गीत फार आवडते ... मस्तच आहे एकदम.. बहुतेक गोट्या मालिकेचे आहे
बीज अंकुरे अंकुरे ...
ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे
माळरानी खडकात...

हे ही गाणे वर दिलेल्या दुव्यावरुन उतरवून घेऊ शकता. :)

(मराठी गाणी प्रेमी ) सागर

झकासराव's picture

29 Mar 2008 - 5:58 pm | झकासराव

अगबाई अरेच्च्या, आईशपथ मधली सगळी.
पछाडलेला मधल "मला भुतान पछाडल" (त्यातल्या नाचणार्‍या हिरॉइनीसकट आवडलय :))
जत्रा मधल "कोंबडी पळाली"
"आभास हा मनाचा" ह्या चित्रपटाच नावच आठवेना :(
सावरखेड एक गाव मधल "वार्‍यावरती गंध पसरला"
शिवाय अलिकडेच ऐकलेली आहेत अशी संदिप खरे आणि सलील कुलकर्णी यांची बहुतांश गाणी आवडली आहेत.
(बहुतेक) अवधुत गुप्ते यांचा एक अल्बम आहे "पाउस" त्यातली सर्व गाणी आवडली आहेत.
संगीतकार अजय-अतुल ह्या जोडीकडुन अपेक्षा आहेत कारण त्यानी आजवर दिलेली गाणी पाहता :)

झकासराव's picture

29 Mar 2008 - 6:09 pm | झकासराव

मिलिंद इंगळे यांच गारवा राहिलच की. :)
आता आपल्या "जयावी" ची सीडी ऐकुन बघेन :)
आणि हो जुनी गाणी आहेत बरीचशी आवडणारी.

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Apr 2008 - 3:08 am | llपुण्याचे पेशवेll

आभास हा हे यंदा कर्तव्या आहे या चित्रपटातले गाणे आहे.
पुण्याचे पेशवे

विद्याधर३१'s picture

29 Mar 2008 - 9:47 pm | विद्याधर३१

आणि हे भलते अवघड असते. सन्दीप खरे यान्च्या सुन्दर रचना.

अवान्तर: सध्या अभिषेकीबुवान्चे अबीर गुलाल ऐकत आहे. अप्रतीम.....

विद्याधर

डॉ.प्रसाद दाढे's picture

29 Mar 2008 - 10:21 pm | डॉ.प्रसाद दाढे

गझलनवाझ भीमराव पा॑चाळे॑च्या काही गझला अ॑गावर काटा आणतात्..'मी किनारे सरकता॑ना, तुझा तसाच गोडवा, तू नभा॑तले तारे, आयुष्य तेच आहे'..क्या बात है॑!
बाबूजी-गदिमा॑ची गाणी तर कालातीतच आहेत पण श्रीनिवास खळे, वस॑त प्रभू, दशरथ पुजारी, विश्वनाथ मोरे, राम मराठे ह्यासारख्या स॑गीतकारा॑चे योगदानसुद्धा मोलाचे आहे. ह्रदयनाथ म॑गेशकरा॑चा बाज तर एकदम वेगळा..थोडा अनवट (मराठीतील 'सलील चौधरी') पण अस्सल अभिजात..

मीनल's picture

30 Mar 2008 - 7:14 am | मीनल

पुढच पाऊल चित्रपटातील ,
`एकाच या जन्मी जणू
फिरून अशी जन्मेन मी `
हे गाण छान आहे .आशा भोसले यांनी गायलेले आहे.

त्याचे अजून एक गाण मला आवडत.
फुलले रे क्षण माझे, फुलले रे
शकुनाच्या मेंदीने ---

बेसनलाडू's picture

30 Mar 2008 - 7:55 am | बेसनलाडू

मलाही फार आवडतात.
('आशा'भक्त)बेसनलाडू

मदनबाण's picture

30 Mar 2008 - 8:58 am | मदनबाण

कोंबडी पळाली हे आपल फेव्हरेट गाण आहे.

(जितेंद्र जोशी आणि कुक्कुट प्रेमी ---जत्रेत हरवलेला)
मदनबाण

प्रशांतकवळे's picture

30 Mar 2008 - 9:27 am | प्रशांतकवळे

"तुम्हावर केली मी मर्जी बहाल" हे पिंजरा मधले गाणे, गीतरामायण (संपुर्ण), भातुकलीच्या खेळामधली...

प्रशांत

विसोबा खेचर's picture

30 Mar 2008 - 10:17 am | विसोबा खेचर

"तुम्हावर केली मी मर्जी बहाल" हे पिंजरा मधले गाणे, गीतरामायण (संपुर्ण), भातुकलीच्या खेळामधली...

वा, क्या बात है! प्रशांतराव, तुमच्या पसंतीला आपण दाद देतो!

तात्या.

प्रशांतकवळे's picture

30 Mar 2008 - 6:17 pm | प्रशांतकवळे

धन्यवाद तात्या,

"तुम्हावर केली मी मर्जी बहाल" हे गाणे, विशेषतः "नका सोडुन जाऊ रंगमहाल" ह्यात "नका" वर दिलेला जोर, अप्रतीम.
गीतरामायण -धन्य ते सुधीर फडके आणि धन्य ते गदीमा. हे पुन्हा होणे नाही.... आणि कोणी कॉपी करण्याचा॑ प्रयत्नही करु नये.

प्रशांत.

मदनबाण's picture

30 Mar 2008 - 10:50 am | मदनबाण

किशोरदां च हे गाण पण मला फार आवडत,
अशोक सराफ आणि चारुशिला यांचा हातात झाडु घेउन केलेला डान्स तर एकदम जबरदस्त आहे.
( मी असेही कुठेतरी वाचले आहे की हे किशोरदां च शेवटच रेकॉड केलेल गाण आहे.)

मला हे गाण येथे देण्याचा मोह टाळता येत नाही:-----

अश्विनी ये ना !

प्रिये, जगु कसा तुझ्याविना मी राणी ग
कशी ही जिंदगीत आणिबाणी ग
ये ना प्रिये !
मी तर प्रेम दिवाणा रसिला
दे प्यार जरासा नशिला

प्रिया, उगाच संशयात मी बुडाले रे
तुला छ्ळून मी जळून गेले रे
ये साजणा !
विसर झाले गेले सख्या रे
शरण आले राया तुला रे

मंद धुंद ही गुलाबी हवा
प्रीत गंध हा शराबी नवा
हात हा तुझाच हाती हवा
झोंबतो तनुस हा गारवा
तुझी माझी प्रीती अशी फुले मधुराणी
फुलातूनी उमलती जशी गोड गाणी
तू ये ना, तू ये ना
ना ना ना !

ये अशी मिठीत ये साजणी
पावसात प्रीतीच्या न्हाऊनी
स्वप्न आज जागले लोचनी
अंग अंग मोहरे लाजूनी
जाऊ नको दूर आता मन फुलवूनी
तूच माझा राजा अन्‌ मीच तुझी राणी
तू ये ना, तू ये ना

(किशोरदां चा कानसेन भक्त)
मदनबाण

सचिन's picture

30 Mar 2008 - 8:36 pm | सचिन

काही गाणी अशी आहेत, की जी कानावर पडताच , हातातले काम सोडूनच द्यावे लागते...आणि ते आपोआपच होते..
जसे लताबाईंचे "धुंद मधुमती.."
विश्वनाथ बागुलांचे "गुणसागर गंभीर दयामय..."
कुमारांचे " मलय गिरीचा..."
वसंतरावांचे "तेजोनिधि लोहगोल..."
आशाताईंचे "मागे उभा मंगेश..."
आणि अरूण सरनाइकांचे "एक लाजरा न साजरा मुखडा..."
पुरे ! आता अधिक विचार करत बसलो तर एकदम "नॉस्टॅल्जिक" होऊन जाईन !!

डॉ.प्रसाद दाढे's picture

30 Mar 2008 - 9:25 pm | डॉ.प्रसाद दाढे

रफीसाहेबा॑नी गायलेली मराठी गाणीसुद्धा मस्त आहेत. त्या॑ना स॑गीत बहुतेक श्रीका॑त ठाकरे या॑चे आहे..उदा.'प्रभू तू दयाळू','हे मना आजकोणी बघ तुला','शोधिसी मानवा' इ.
सुरेश वाडकरने गायलेले प्रभाकर जोगा॑चे 'कोटि कोटि रूपे तुझी' हे गाणेसुद्धा सकाळी ऐकायला छान वाटते.
'सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या' (उ॑बरठा') हे गाणे लताबाई॑नी गायलेल्या सु॑दर गाण्या॑मधला मास्टरपीस आहे..गाण्याचे स॑गीत-स॑योजन (अरे॑जि॑ग) अमर हळदीपुरा॑नी अप्रतिम केले आहे.

सर्किट's picture

31 Mar 2008 - 10:48 pm | सर्किट (not verified)

रफीसाहेबा॑नी गायलेली मराठी गाणीसुद्धा मस्त आहेत.

हे दयाळू प्रभू, डॉक्टरसाहेबांना क्षमा कर !

- सर्किट

डॉ.प्रसाद दाढे's picture

31 Mar 2008 - 10:51 pm | डॉ.प्रसाद दाढे

हे दयाळू प्रभू, डॉक्टरसाहेबांना क्षमा कर !

कशासाठी ??

आनंदयात्री's picture

31 Mar 2008 - 10:51 am | आनंदयात्री
  • राधा ही बावरी
  • आभास हा ..
  • गालावर खळी डोळ्यात धुंदी
  • अलवार तुझी चाहुल
मस्त कलंदर's picture

1 Jul 2009 - 7:35 pm | मस्त कलंदर

अलवार तुझी चाहूल...!!
अतिशय सुंदर गीत... कुणाकडे या गाण्याचा दुवा मिळेल का??

यादी काढायची म्हटली तर एकापेक्षा एक गाणी निघतील.. त्यातलंच एक वेगळं.. सहसा कुठं वाजवलं जात नसणारं छानसं गाणं...

हे जीवन सुंदर आहे..
तो कमालीचा प्रॅक्टिकल..:: "इथे गाणे लोकलचं.. नि वारं डोक्यावर भिरभिरणार्‍या पंख्याचं!!!!"

नि ती.. तितकीच आशावादी...:::"इथे तिथे संगीत अनामिक एकच घुमते आहे.. हे जीवन सुंदर आहे!!!"

नि थोडंसं कोंकणी ढंगाचं "माझे राणी माझे मोगा.." अप्रतिम!!!!

छे:.. एका गाण्याबद्द्ल लिहायला लागले.. तर एक एक करत गाणी वाढायलाच लागलीत..!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मनस्वी's picture

31 Mar 2008 - 10:59 am | मनस्वी

अष्टविनायका तुझा महिमा कसा
निशाणा तुला दिसला ना
हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा
सावळाच रंज तुझा
ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
चिंब पावसानं रानं झालं आबादानी
इंद्रायणी काठी देवाची आळंदी
खेळ मांडियेला वाळवंटी घाई
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं
माझे माहेर पंढरी
म्यानातून उसळे तलवारीची पात
ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था
फुलले रे क्षण माझे फुलले रे
डौल मोराच्या मानंचा रं डौल मानंचा
ऋतू हिरवा, ऋतू बरवा
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं
विठ्ठला तू वेडा कुंभार
झिनी झिनी वाजे बीन

सध्यातरी येवढीच आठवली.

मनस्वी

अभिज्ञ's picture

31 Mar 2008 - 11:11 pm | अभिज्ञ

मला तर हिन्दि पेक्षा मराठि गाणिच जास्त आवडतात.
मा़झि आवड हि आशि..
१.मोगरा फुलला......
२.केव्हा तरि पहाटे.....
३.मलयगिरिचा......
४.ने मजसि ने परत.....
५.आणिक बरिच गाणि आहेत........\

अबब

गोर्‍या देहावरची कांती नागीणीची कात
येडे झाले आम्ही सारे एक दिस त्यात
असे येखदे पाखरु येल्हाळ ज्याचा भांगात बिंदीचा गुल्लाल.
हे जैत रे जैत रे चे गाणे
राया माझ्या आंबोड्याला.माळावा गजरा....या लावणीवर आधारीत आहे.
दोन्ही झकास आहेत.

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Apr 2008 - 3:14 am | llपुण्याचे पेशवेll

जैत रे जैत मधली सर्वच गाणी मला आवडतात.
पुण्याचे पेशवे

पिवळा डांबिस's picture

3 Apr 2008 - 7:57 am | पिवळा डांबिस

विजुभाऊ, हे आमचं ही अगदी आवडतं गाणं बरं का!
अहो हेच गाणं म्हणून आम्ही एका सीकेपीणी ला पटवलं!!!!!:))))
पण एक सांगतो विजुभाऊ,
वीस वर्षं झाली, पण
असं एखादं पाखरू वेल्हाळ, ज्याच्या भांगात बिंदीचा गुल्लाल!!!!
सालं आमचं पाखरू अजुनही येड लावतंय हो!!!!!
-पाखराच्या नकळत लिहिणारा
पिवळा डाबिस

तुम्ही म्हणताय ते बरोबर असणार, अहो 'डाबिस' लिहिलं आहेत ना सही करताना. खयालो में खो गये दुसरं काय?
भाग्यवान आहात, सगळ्यांच्या नशीबी नसतं असं येडं होणं!

चतुरंग

सृष्टीलावण्या's picture

31 Mar 2008 - 11:36 pm | सृष्टीलावण्या

उदयोन्मुख कवि आणि संगीतकार श्री. रघुनंदन बर्वे यांची एकापेक्षा एक सुंदर गाणी इथे डाऊनलोड करून घेता येतील. त्यातील मन बेधुंद ऐकून तर क्षणभर काळीज थबकते. वाटते की शब्द आणि सूर ह्या खरोखरच ईश्वरीय देणग्या आहेत.

जाता जाता : जमले तर "मन बेधुंद" ही सीडीच विकत घ्या. निखळ आनंद.

>
>
वरि जोडे ब्रह्मसुख पवित्र, ते मर्‍हाटी बोलैन...

बाबूच्या वनात अहा अहा
धुंदित गंधित होवुनि सजणा
नाते जुळले मनाशी मनाचे
हि काहि गीत

www.dhingana.com वर एका. आवाजाची प्रत उत्तम आहे.

माझ्या आवडत्या गाण्यात पहीले स्थान आहे 'बगळ्यांची माळ फुले' या गाण्याला. का काय माहीत पण या गाण्याने गारूड केले आहे माझ्यावर.... तसेच 'ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे राहीले' हे पण असेच वेड लावणारे गाणे आहे.
'जे वेड मजला लागले', 'निशाणा तुला दिसला ना', 'चिंब पावसाने रान झाले' इ. गाणी पण फार आवडतात.
कुमार गंधर्व यानी गायलेले 'कोणा कशी कळावी वेडात काय गोडी' पण फार आवडते गाणे आहे. 'डोळे तुझे शराबी' हे पण गाणे मस्त आहे.
पुण्याचे पेशवे

सूहास's picture

1 Jul 2009 - 7:50 pm | सूहास (not verified)

१) डौल मोराच्या मानचा, र डौल मानचा...
२) साजणे ग,मैत्रीणे ग, ऊन्हात चा॑दण पडल॑ र
२) प्रथम तुझ पाहता, जीव हा वेडावला....
४) या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे..
५)सजने ग भुललो काय जादु झाली,बघुन तुला जीव माझा होई वरखाली
६) पहाटे-पहाटे मला जाग आली,तुझी रेशमाची मिठी सैल झाली..
७)यमुनाजळी खेळु खेळ ..कन्हैय्या का लाजता....
८) जगमग च॑देरी तार्‍या॑ची सारी दुनीया...

मान्य आहे गाणी जुनी आहेत , पण आमच्या साठी कधीच "जुनी" झाली नाहीत
क्रमशः::::
सुहास

प्रशु's picture

1 Jul 2009 - 8:50 pm | प्रशु

बरीच गाणी आहेत.. जुनी सगळीच छान आहेत. पण सध्या एकच गाण एकतोय..

"रुप सजलेले चिंब भिजलेले.........."

दे धक्का मधलं 'मनाला झाली क्रुष्णसख्याची बाधा' पण सुंदर आहे.

प्राची's picture

2 Jul 2009 - 12:15 am | प्राची

बरीच गाणी आहेत.. जुनी सगळीच छान आहेत.सध्या ऐ‍कतेय..

"चिंब भिजलेले रुप सजलेले बरसूनी आले रंग प्रितीचे.........."
"हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी,
आरास ही तार्‍यांची गगनात तुझ्यासाठी.." (हे स्वप्नील बांदोडकरच्या 'बेधूंद' अल्बममधलं आहे.)
"मंद मंद तरी धुंद धुंद
हा पवन सागरासवे खुलवी तुझे नाव तुझे नाव......"(हे स्वप्नीलच्या 'तिच्या डोळ्यातलं गाव' अल्बममधलं आहे.)
"राधा ही बावरी"
"हे भलते अवघड असते" (आयुष्यावर बोलू काही)
"नसतेस घरी तू जेव्हा..." (आयुष्यावर बोलू काही)
"का रे दुरावा,का रे अबोला...." अप्रतिम गाणं
अगं बाई अरेच्चा,मुंबईचा जावई,यंदा कर्तव्य आहे ची सर्व गाणी.
कांदेपोहे तर All time favourite.... B)
"बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला"(अवधूतच नाही,दीदींचं)(त्यातलं 'चिमणी मैना चिमणा रावा' हे कडवं तर कित्ती ग्गोड 8> )

सोनम's picture

1 Jul 2009 - 9:07 pm | सोनम

मला आवडणारी गाणी.
१. दाटून कंठ येतो ओठांत येई गाणे..
२. दर्शन दे रे, दे रे भगंवता...
३. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर...
४. देवा तुझ्या दारी आलो गुणगाण गाया...
५. लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला...
६. सुन्या सुन्या मैफलीत माझ्या...
७. चांद मातला मातला त्याला कशी आवरु...
८. विठ्ठल आवडी प्रेमभाव विठ्ठल नामाचा...
९. अगंबाई अरेच्यातील गाणी

स्वातीदेव's picture

1 Jul 2009 - 11:35 pm | स्वातीदेव

उत्तरायण मधील
१. रान हे उठले
२. धुंद होती शब्द सारे.
ही नवीन चित्रपट कॅटेगरीतली गाणी मला खूप आवडतात.

लवंगी's picture

2 Jul 2009 - 7:06 am | लवंगी

मराठीत वेड लावणारी असंख्य गाणी आहेत. नविन गाण्यांपैकी खूप खूप खूपच आवडलेल गाणं 'आनंदाच झाड माझ्या अंगणात आहे'.

मयुरा गुप्ते's picture

1 Jul 2009 - 11:58 pm | मयुरा गुप्ते

१)जैत रे जैत मधली सर्वच गाणी
२)पिंजरा मधली सर्व गाणी
३)उंबरठा मधली सर्व गाणी
४)आणि असंख्य सुंदर मराठी गाणी...

धन्यवाद मंडळी, बरीच आवडीची गाणी पुन्हा एकदा स्मरणात आणल्याबद्दल.

माझीही थोडीशी भरः

, , .

मुलूखावेगळी's picture

20 Jul 2011 - 11:12 am | मुलूखावेगळी

माझी पण-
१.पाहिले न मी तुला
२.धुंद होते शब्द सारे
३.स्वर्गाहुनही सुंदर घरटे
४.चंद्र आहे साक्षीला

शाहिर's picture

20 Jul 2011 - 11:26 am | शाहिर

bhay ithale sampat nahi maj tuzi atwan yete
me sandhykali gato tu mala shikawali geete

te zare chndra sajnache ti dharati bhgavi maya
zadashi nijalo apan zadat punha ugwaya

to bol mand halwasa aayush saprshuni gela
seetechy wanwasatil janu aangi raghav shela

stotrat indriye awghi gungunati dukh kunache
he sarta sampat nahi chandane tuzy samrnache

विलासराव's picture

20 Jul 2011 - 12:47 pm | विलासराव

भले बुरे जे घडुन गेले, विसरुन जाउ सारे क्षणभर
जरा विसावु या वळणावर, या वळणावर............

सखी मंद झाल्या तारका....
आणखी बरेच आहेत पण आता लगेच आठवत नाहीयेत. काही वरती आलेली आहेतच.

शब्दरचना चुकीची असु शकते.

योगप्रभू's picture

20 Jul 2011 - 1:18 pm | योगप्रभू

मराठी भाषेवर लई प्रेम आसल्यानं आपल्याला सगळीच गाणी आवडत्यात.

मंग त्ये कवी ग्रेस लिवत्यात ती समजायला आवघड गाणी बी गुनगुनतो

वार्‍यानं हलतं रान, तुझे सुनसान, ह्र्दय गहिवरले
गाईचे डोळे, करुण उभे की, सांज निळाईतले

आन आपली न्हेमीची बाळबोध, सोपी गाणी हाईतच की

अगं अगं राणी फसलीस गं
गालात खुदकन हसलीस ग
चल ये ना इकडं
जाऊ जरा तिकडं
ये ना.

इरसाल's picture

20 Jul 2011 - 4:15 pm | इरसाल

१. आरंभी वंदिन अयोध्येचा राजा
२.आदिमाया अंबाबाई
३.ऋतू हिरवा ऋतू बरवा
४.अष्टविनायका तुझा महिमा कसा
५.बारा पुण्यक्षेत्री
६.चांद मातला मातला
७.छबीदार छबी मी तोऱ्यात उभी
८.चिंब पावसानं रान झालं
९.चोरीचा मामला मामाही थांबला
१०.दया घना
११.दिसला ग बाई दिसला
१२.ज्ञानियांचा राजा गुरुमाहाराव
१३.दुर्गे durgat भारी तुजवीण संसारी
१४.गालावर खळी डोळ्यात धुंदी
१५. गंध फुलांचा गेला सांगून
१६.घन ओथंबून येती
१७. गोमू संगतीनं माझ्या तू
१८.हा सागरी किनारा
१९.वणवा..... चंद्रानं टाकलीय ठिणगी
२०.ही कशानं धुंदी आली
२१.हुरहूर असते तीच उरी.
२२.खेळ मांडला
२३.लव लव करी पात
२४.मनमोहना तू राजा स्वप्नातला
२५.मायेच्या हळव्या
२६.माझा भाव तुझे चरणी
२७.मेंदीच्या पानावर
२८.मी डोलकर डोलकर
२९.निंबोणीच्या झाडामागे
३०.निसर्ग राजा ऐक
३१.नंबर ५४
३२.ओमकार स्वरूपा
३३.पहिले न मी तुला
३४.प्रथम तुज पाहता जीव
३५.तुझ्या पंखावरुनिया
३६.राधा हि बावरी
३७.रुपेरी वाळूत माडांच्या बनात
३८.शोधू मी कुठे कशी पिया तुला
३९.मोरया मोरया
४०.या रावजी तुम्ही
४१. भेटना न मला भेटना ना
४२.ये जिवलगा ये
४३.येवू कशी प्रिया
४४.अप्सरा आली
४५. अशीबी दिसतीस तशी बी दिसतीस काय तुझ्या
४६. मेरा दादला
४७.स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला
४८.ऐका दाजीबा
४९.आता वाजलेकी बारा
५०.म्यानातून उसळे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात

क्रमश.