महाराश्ट्र अन्धरात .. पुण्याचे मात्र लाड

पान्डू हवालदार's picture
पान्डू हवालदार in काथ्याकूट
30 Mar 2008 - 10:00 pm
गाभा: 

अक्खा महाराश्ट्र अन्धारात बुड्लेला असतान्ना .. पुण्यात झगझगाट ....महावितर् ण मन्त्रि म्ह्ण् ण ता त .. पुणेरी जनतेला काही देणे घेणे नाही ...
प्रतिक्रिया ..???

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

31 Mar 2008 - 8:36 am | मदनबाण

शुक्रवार म्हंटल की लाईट नाही हे समीकरण मला अगदी लहानपणा पासुन पाठ आहे.
पुण्याच मला काही माहीत नाही पण आमच्या ठाण्याचे हाल तर विचार करण्या पलीकडे गेले आहेत.

(स्वदेश मधील बिजली अजुन शोधणारा)
मदनबाण

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Mar 2008 - 9:21 am | llपुण्याचे पेशवेll

पुणेरी जनता दमड्या जास्त मोजते म्हणून नाही होत पुण्यात जास्त लोडशेडींग तर तुमची का जळते? मुंबईला पण नाही होत लोडशेडींग. मुंबई उपनगराना लोडशेडींगचा त्रास होतो पण माझ्या माहीती नुसार जेथे बी.ई.एस्.टी. चा पुरवठा आहे तिथे हा त्रास नाही. असे ऐकले आहे. जाणकारानी अधिक माहीती द्यावी.

पुण्याचे पेशवे

डॉ.प्रसाद दाढे's picture

31 Mar 2008 - 10:34 am | डॉ.प्रसाद दाढे

मु॑बई व पुणे ह्या दोन्ही महानगरा॑त वीजेची उधळपट्टी होत असते हे कटू सत्य आहे. बाकी ठिकाणी परिस्थिती भीषण आहे. पर॑तु ह्या भय॑कर स्थितीस आपले निकम्मे राजकारणीसुद्धा जबाबदार आहेत.गुजराथमध्ये लोडशेडी॑ग का नाही याचा अभ्यास करून तशा योजना महाराष्ट्रात राबवणे अत्य॑त गरजेचे आहे. महाराष्ट्राइतके कर कुठल्याच राज्यात नाहीत. पण त्याबदल्यात अख॑डीत वीज पुरवठ्याची किमान अपेक्षासुद्धा सरकार पूर्ण करू शकत नाही. सामान्य नागरिक जो कष्टाच्या कमाईतून कर भरतात त्या पैशा॑वर हे नीच पुढारी फक्त गाड्या॑चे ताफे फिरवितात. अर्थात हा सर्वस्वी वेगळाच विषय आहे.
खरे म्हणजे शहरे काय वा ग्रामीण भागातील रहिवासी काय, सगळ्या॑नीच उर्जा बचत करणे आवश्यक आहे. मॉलमधील, डिस्कोथेकमधील व रात्री मोठ्या दुकाना॑चे लखलखणारे निऑन्स पाहिले की रात्री-अपरात्री शेतप॑प चालविणारा हतबल शेतकरी डोळ्यापुढे येतो. स्वतःचे अण्वस्त्र बाळगणारा महान भारत अजुन उर्जा प्रश्न सोडवू शकत नाही ही अत्य॑त शरमेची बाब आहे. पोलिटीकल वुईल असेल तर उपाय निघेल; कदाचित निवडणूका॑च्या वेळीस! पण वैयक्तीक पातळीवर वीज बचत करणे मात्र आपल्या हातात आहे, तेव्ह्ढे करत राहावे..

वीज वाचविण्याचे उपायम्हणुन सरकार जनतेला रोज एक तास वीज वाचवण्याचा सल्ला देत आहे.
पण तेच सरकार मुंबैत जहिरात बोर्डाना अखंड वीज पुरवते....आख्खा महारष्ट्र अंधरात असताना मुम्बैत जहिरात बोर्ड दिमाखात झळकत असतात. ग्रामिण भागात तर गावाला पाणी पुरविणार्‍या टकीत पाणी चढवण्यासाठी ही वीज मिळत नाही
वीज एक तास वाचवायची आहे सोपा उपाय आहे...........त्या "क " पासुन सुरु होणार्‍या सिरीयल काही दिवस बंद ठेवा.......
डे-नाईट क्रिकेट बंद ठेवा........मूर्खा सारख्या "तेज खबर" देणारे चॅनेल अर्धा दिवस बंद ठेवा..........
पुर्ण देशात वीज बचत भरपुर होइल...........

मनस्वी's picture

31 Mar 2008 - 11:51 am | मनस्वी

रस्त्यावरचे दिवे सकाळी ६ ते रात्री ८ बंद ठेवा.
अनेकदा दिवसाही ते चालूच असतात.

सीएफएल बल्बने पण बरीच वीजबचत होते.

नीलकांत's picture

31 Mar 2008 - 1:08 pm | नीलकांत

पुण्याच्या विजेबाबत म्हणाल तर महावितरणच्या पुरवठ्यानुसार पुण्यात इतर मोठ्या शहरांप्रमाणे विजकपात आहेच. येथे फरक हा आहे की त्या कपातवेळात पुण्यातील जवळपास सर्व मोठ्या उद्योगांकडून पुण्याला वीज पुरवल्या जाते.

त्यासाठी इंधन अधीभार पुण्यातील जनता उचलते. त्यामुळे महावितरण पुण्याचे लाड करतेय असं बोलणं तितकसं वास्तव नाही. आता मात्र गेले काही दिवस हा विजपुरवठा सुध्दा अपुरा पडतोय तर त्यावर काही उपाय करावा यासाठी महावितरण पुढाकार घेते आहे असं वाचून आहे. हे ऐकून खरं तर आश्चर्य वाटलं. ; )

पुण्याला खरंच किती विज मिळते ते दिनांक ३०/३/२००८ च्या सकाळ मधे दिलेलं आहे. हा अंक सकाळच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तेथील एक तक्ता येथे देत आहे. बाकी बातमी ईसकाळवर वाचता येईल.

pune load shadding

नीलकांत

प्रभाकर पेठकर's picture

31 Mar 2008 - 1:16 pm | प्रभाकर पेठकर

वीज-बचतीसाठी थिएटर्स मधील शोज् ३ ऐवजी १च ठेवा. A.C. चे युनिट वीज सर्वात जास्त वापरते. ज्या थिएटर्सची असहमती असेल त्यांनी जनरेटर्स वापरावे.
सौर उर्जेच्या वापरास प्रोत्साहन द्यावे. सौर उर्जेचे वॉटर हिटर्स कंपल्सरी करून सरकाने ना नफा - ना तोटा पद्धतीने त्यांचे वितरण करावे. घरातील इलेक्ट्रीक हिटर्ससुद्धा जास्त वीज खातात.
शीत पेय, शीत पदार्थांवर बंदी आणावी. किंवा अशा फ्रिजर्स आणि बॉटल कुलर्स साठी जनरेटर सेट्स कंपल्सरी करावेत.
रोषणाईवर सरसकट बंदी असावी.
उद्वाहकाची (लिफ्ट) सोय चवथा मजला आणि वर अशी असावी. फक्त वृद्ध आणि पेशंट्स ह्यांच्यासाठी तळमजल्यापर्यंत सोय असावी. लिफ्ट्मन ठेवल्यास हे करणे शक्य आहे.
लग्न कार्यात वीजेची उधळपट्टी हा सामाजिक गुन्हा ठरवावा.
सर्व मॉल्स् मध्ये आवश्यक दिव्यांसाठी वीज पुरवून अतिरिक्त वीजे साठी जनरेटर्स वापरण्याची सक्ती करावी.
असो.
(एवढ्या सगळ्या जनरेटर्स साठी लागणाते डिझेल आपल्याकडे उपलब्ध आहे असे गृहीत धरलेले आहे.)

श्री's picture

31 Mar 2008 - 1:34 pm | श्री

मी असे ऐकुन आहे कि गूगल सर्च ने काळा बकग्रोउड ठेवला तर जास्त वीज बचत होईल . अधिक माहीति साठी गूगल सर्च मध्ये ' ~ google power save ' टाईप करा.

डॉ.प्रसाद दाढे's picture

31 Mar 2008 - 6:02 pm | डॉ.प्रसाद दाढे

त्या "क " पासुन सुरु होणार्‍या सिरीयल काही दिवस बंद ठेवा.......
डे-नाईट क्रिकेट बंद ठेवा........मूर्खा सारख्या "तेज खबर" देणारे चॅनेल अर्धा दिवस बंद ठेवा..........

एकदम पटले..

विजुभाऊ's picture

31 Mar 2008 - 6:04 pm | विजुभाऊ

दाढे सरकारांशी मनपसुन सहमत.....

स्वाती राजेश's picture

31 Mar 2008 - 6:31 pm | स्वाती राजेश

घरातील ३०% ते ४०% वीज ही उपकरणे स्टँड बाय असल्याकारणामुळे खर्च होते असे म्हणतात..
तेव्हा आपण आपल्याच घरी टी.व्ही. नको असेल तर तर फक्त रिमोट चे बटण बंद करतो. मेन स्वीच तसाच चालू राहतो त्यामुळे सुद्धा वीज खर्च होते.
मायकक्रोवेव्ह (स्टँड बाय)चालू असतो.
बॉयलर सकाळ पासून चालू असतो. जो तो आपापल्या सवडी प्रमाणेअंघोळ करतो.
पी.सी. घरातील/ऑफिसमधील सुद्धा नको असेल तर बंद करावा.

आम्ही आमच्या घरी, ज्या ठिकाणी आहे त्याच खोलीतील लाइट लावतो. इतर खोलीतील बंद असतात. अगदी देवघरात सुद्धा कारण त्याजवळ समई असतेच. काही ठिकाणी मी पाहते सगळी लोक हॉल मधे गप्पा मारत असतात तेव्हा त्यांच्या इतर बेडरुम, किचन मधे दिवे चालू असतात. त्यावेळी खूप वाइट वाटते.
वाटते कि, आपल्या पुढील पिढीला पैसे देऊन सुद्धा वीज मिळणार नाही. त्यामुळे वीजेची काटकसर आपण आत्तापासूनच केली पाहिजे.
काहींनी उपाय सुचवले आहेतच. इतरांनीही विजेची बचत कशी करता येइल? यावर प्रकाश टाकावा.

आणि स्वयंपाकघर यातील दिवे चालू असतात. छोटी सोलर पॅनल्स मिळतात त्यावर दिवसभर बॅटरी चार्जिंग करुन घेऊन दोन खोल्यातली ट्यूबलाईट्ची गरज सहज भागू शकते.
तिथले पंखे किंवा इतर जास्त ऊर्जा खाणारी उपकरणे चालणार नाहीत पण लाईट्स चालतात.
ही पॅनल्स खिडकीच्या बाहेर किंवा बाल्कनीत भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी व्यवस्थित बसविता येतात.

सोलर वॉटर हीटरला खर्च थोडा जस्ती येतो पण सदनिकांच्या संकुलावरती गच्चीवर असा प्रकल्प त्यातील रहिवाशांनीच बसवून घेतला तर वर्षातले १० महिने चोवीस तास गरम पाणी मिळू शकते. साधारण ४८ ते ५० डि.सें.चे पाणी अगदी सहज मिळू शकते. पावसाळ्यात ढगांमुळे थोडे कमी गरम मिळते त्यावेळी नेहेमीचा हीटर अगदी थोडा चालू केला तरी पुरतो.

स्वयंपाकाचा गॅस आणि ओव्हनला लागणारी वीज बचतीसाठी सोलर कूकरही उत्तम प्रकार आहे. त्यात वरण-भात, शेंगदाणे, रवा भाजणे, भाज्या उकडणे मस्त होते. शिवाय त्यात भाजलेल्या पदार्थांना एक खास चवही असते.

चतुरंग