गाभा:
नमस्कार,
हेरगिरीवरचे तुमचे आवडते पुस्तक/के कुठलं? तुम्हाला ते सर्वात जास्त का आवडलं ते सांगता येईल का? एखाद्या लेखकाचा या विषयात हातखंडा आहे का? हे पुस्तक मराठी किंवा इंग्रजीतील असावं.
मी अश्या तर्हेची पुस्तके कधीच वाचलेली नाहीत मात्र आता एक चौकशी झाली तेव्हा मी काहीच बोलू शकलो नाही. मग म्हटलं मिपाकरांकडून मदत घ्यावी.
तर तुम्हाला आवडलेलं हेरगीरीवरचं सर्वात चांगलं पुस्तक कुठलं?
तसेच याच विषयावरचा उत्तम चित्रपट सुध्दा सुचवू शकता.
-- नीलकांत
प्रतिक्रिया
25 Nov 2009 - 9:03 am | प्रभो
शॅली शॅली हे सु शिं चे पुस्तक मला आवडतं मराठीत....
इंग्रजीमधे जेम्स हॅडली चेस,इयान फ्लेमिंग आणी रॉबर्ट लडलम ची सर्व पुस्तके मस्त आहेत.
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
25 Nov 2009 - 9:12 am | विकास
(जेम्स बाँड व्यतिरीक्तही) चित्रपट अनेक आहेत :) , पण एक वेगळ्यापद्धतीने घेतलेला चित्रपट एकदम आठवला: शायनिंग थ्रू. मेलानी ग्रिफिथ आणि मायकेल डग्लस.
26 Nov 2009 - 9:32 am | भडकमकर मास्तर
शायनिंग थ्रू हा माझा आवडता चित्रपट आहे...
..
त्यावर जालावर काही लिहिलेले सापडते का पहावे म्हणून गूगलून पाहिले होते तर त्या सिनेमाची खूप क्रिटिकनी उडवलेली पाहिली....
की सिनेमाही फार चालला नाही आणि एकूणच समीक्षकांनीही सुमार असे संबोधले होते.... वाचून वाईट वाटले होते... !!!
25 Nov 2009 - 9:43 am | पाषाणभेद
मला हे.र.गिरी यांचे एक पुस्तक आवडले आहे, फक्त त्याचे नाव विसरलो. नाव आठवले की मला खरड पाठवा मी उत्तर देईनच.
नीलकांत, म्हणजे आता तुम्हीही एकवाक्यी धागा मार्गावर चालू झालात तर.
चालूद्या. अन लवकर लवकर वाचा व येथे परिक्षणे येवू द्या.
------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्या बातम्या/ लेख वाचत नाही.
पासानभेद बिहारी
25 Nov 2009 - 9:55 am | अमृतांजन
बाबूराव अर्नाळकर हे माझे आवडते हेरकथा लेखक. त्यांची पुस्तके जरुर वाचा.
25 Nov 2009 - 10:15 am | विशाल कुलकर्णी
मराठीत चिंतामणी लागु, गुरुनाथ नाईक, संजय सोनवणी हे हेरगिरीवर लिहीणारे हातखंडा लेखक. त्यातही संजय सोनवणींची पुस्तके छान असायची. कारण लेखन टू द पॉईंट असे. बाकी लागू आणि नाईक पण छान लिहीत पण त्यात पाल्हाळ फार असे.
सुशिंनीही काही पुस्तके लिहीलीत हेरेगिरीवर पण ती वेगळ्या प्रकारची हेरगिरी असे. ;-) सुशिंचे लेखन मुख्यत्वे रहस्य, रोमांच आणि साहस यावर आधारलेले असे. पण या लेखकांमध्ये सुशिच जास्त आवडते लेखक होते.
इंग्रजीमध्ये.... अॅलिस्टर मॅक्लीन आवडता लेखक आहे. त्याची पुस्तके मला जास्त आवडतात. त्याची "गोल्डन गेट" आणि "एअरफोर्स वन इज डाऊन" ही खुप आवडलेली पुस्तके. अॅलिस्टर मॅक्लीनचे वैशिष्ठ्य म्हणजे त्याचा नायक एकहाती कसल्याही, कुठल्याही आधुनिक शस्त्रे किंवा तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय केवळ स्वतःची विचारक्षमता आणि बुद्धीमता याच्या जोरावर सगळे कार्य तडीस नेतो. अॅलिस्टर मॅक्लीन तुम्ही वाचाच नीलकांतजी.
त्यांच्याबद्दल जास्त माहिती इथे वाचता येइल.
हेरगिरीवरील इतरही काही गाजलेल्या पुस्तकांची माहिती विकि वर उपलब्ध आहे.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
25 Nov 2009 - 8:39 pm | केळ्या
खरच.मला the Satan bug खूप आवडले होते.
25 Nov 2009 - 11:10 am | विंजिनेर
खरे (वास्तववादी) हेर कसे वागतात हे वाचायचे असेल तर "जॉन ल कॅरे" ची स्माईली-ट्रायलॉजी वाचावी. गेला बाजार "दी स्पाय हु केम इन फ्रॉम कोल्ड"
त्यात कुठल्याही अतिरंजित प्रसंग /अतिआधुनिक शस्त्रात्रांच्या फोडणीशिवाय केवळ कथानक आणि नायकाच्या स्वभावाच्या जोरावर विणलेल्या थरारक हेरकथा वाचायला मिळतील.
अवांतरः निळूभाऊ एकदम चार ओळींचे नवशे धागे कसे काय काढू लागले बुवा?
26 Nov 2009 - 12:33 pm | दिगम्भा
सहमत.
हेरगिरीवर जॉन ल कारे ची बरोबरी करणारे लिखाण दुसर्या कोणाचेही नाही असे माझे मत आहे.
पण ते वाचायला वाचकही तेवढा प्रगल्भ असायला हवा असे वाटते.
हा लेखक मनाला खोलवर झोंबणारे लिहितो.
(हा स्वत:सुद्धा ब्रिटिश हेरखात्यात काम करीत असे. काही काळ बहुधा भारतातही होता. त्याचे नाव इतर हेरांच्या लेखनात आलेले आहे.)
25 Nov 2009 - 11:21 am | अवलिया
नीलकांतचा आयडी हॅक झाला आहे. असले धागे स पासुन सुरु होणा-या एखाद्या नवशिक्याचे असल्याचे स्मरते. आमच्या माहितीतला नीलकांत कमीत कमी १००० शब्द (गणित कच्चे आहे, कमी जास्त होवु शकतात) असलेला लेख लिहितो आणि माहिती मागण्याऐवजी माहिती देतो.
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
26 Nov 2009 - 9:30 am | विजुभाऊ
नीलकांतचा आयडी हॅक झाला आहे.
असू शकेल. तो बहुतेक एखाद्या कौलारू सभासदाने केला असण्याची शक्यता आहे ;)
25 Nov 2009 - 5:48 pm | धमाल मुलगा
फार काही भर नाही टाकता यायची, पण
दुकानात जावं, विषयांप्रमाणे मांडलेल्या आद्याक्षरांप्रमाणे ठेवलेल्या रॅकमधून 'R' किंवा 'L' शोधावं आणि रॉबर्ट लडलम्/लुडलुम(च्यायला..ह्याचा उच्चार नक्की काये राव? :? ) ह्याचं कोणतंही पुस्तक उचलावं. एकदम झक्कास.
ह्याशिवाय, फ्रेडरिक फॉर्सिथदेखील उत्तम! न चुकता 'द डे ऑफ जॅकल' वाच.
केन फॉलेटची
'द की टू रिबेका',
'आय ऑफ द निडल',
'मॅन फ्रॉम सेंट पिटर्सबर्ग',
'ऑन विंग्ज ऑफ इगल्स' देखील मला खुप आवडली.
पिटर हॉपकिर्कचं 'द ग्रेट गेम' हे वाचल्याशिवाय "मी हेरगिरीची पुस्तकं वाचली आहेत" असं म्हणणं शक्य नाही असं माझं मत आहे :)
पोलिस (आणि एफ.बी.आय.) इन्व्हेस्टिगेशन्स साठी David Baldacci वाच. मलातरी आवडली ह्याची पुस्तकं. :)
आपला,
-(जनु बांडे ००८) मिश्टर ध.
27 Nov 2009 - 3:19 pm | श्रावण मोडक
द ग्रेट गेम!!! धमुशी पूर्ण सहमत!!!
25 Nov 2009 - 6:50 pm | नीलकांत
या विषयात मदत केल्याबद्दल सर्वांचे आभार. खरं तर या विषयी मला खरंच काहीच माहिती नाही. फार फार तर जेम्स बॉण्डचे एक दोन चित्रपट पाहिले आहेत. त्यात हेरगिरी सारखं काही वाटलंच नाही. डेआप्फ्टर पाहिला तो मित्राने त्यात हॅल बेरी झकास दिसते म्हणून बघ म्हटल्यावरच. आणि आताच्या डॅनिअर क्रेग ने सुरूवातीची फाईट झकास दिलीये असे होते. आता डॅनिअलचा जेम्सबॉन्ड भाग २ सुध्दा पाहिली पण काही समजलंच नाही. असो.
तर या विषयावर एका ओळीचा धागा काढण्याचा प्रमाद आदानांच्या कमतरतेमुळे झाला आहे. हे म्हणजे कसं की मासे घ्यायला बाजारात जायचं आणि मासे पाण्यात असतात आणि खायला चवदार लागतात याशिवाय काहीच माहिती नसल्यासारखं झालं.
तुम्ही सुचवलेली शक्य तेवढी पुस्तके वाचण्याचा प्रयत्न करेन. विंजिनेर आणि विशाल कुलकर्णींनी सुचवलेले दूवे पाहिले. खरं तर या विषयात धमाल मुलाजवळ भरपुर माहिती मिळेल याची खात्री होतीच, मात्र इतर मिपाकरांचे मत घ्यावे असे वाटले आणि त्याचा फायदा झालेला दिसतो आहेच.
धन्यवाद.
25 Nov 2009 - 7:27 pm | गणपा
>>जेम्सबॉन्ड भाग २ सुध्दा पाहिली पण काही समजलंच नाही
निळुभाऊ वेलकम टु क्लब...
आम्ही जनु बांडेचे चित्रपट दे-मार ढीशँऊ- ढीशुंमसाठी पाहातो.
25 Nov 2009 - 8:45 pm | संदीप चित्रे
बॉन्ड गर्ल्ससाठी पाहतो ;)
25 Nov 2009 - 6:59 pm | सूहास (not verified)
जॉन ग्रिशामच कुठलही पुस्तक उचल !! बेस्ट
सू हा स...
25 Nov 2009 - 7:17 pm | प्रसन्न केसकर
आख्खी सेरीज सुंदर आहे. सगळी अट्टल डिटेक्टीव्हगिरी. अन एकॉनॉमी एडीशनपण आहे अॅव्हेलेबल.
एक आणखी आवडलेलं पुस्तक `द एव्हिनिंग न्युज' - त्यात एका चॅनेलच्या अँकरची फॅमिली दहशतवादी किडनॅप करतात अन तो पत्रकार त्याच्या सहकार्यांच्या मदतीनं त्यांची सुटका करतो. मस्त थ्रिलींग रिड आहे.
सिनेमात मला आवडलेला म्हणजे गन्स ऑफ नॅव्हेरॉन.
25 Nov 2009 - 7:18 pm | विसोबा खेचर
दक्षता अंक नियमितपणे वाचत जा रे नीलकांता..
आपला,
(पोलिस आयुक्त) तात्या.
25 Nov 2009 - 8:40 pm | पिवळा डांबिस
दक्षता अंक नियमितपणे वाचत जा रे नीलकांता..
ते तर फोलिस लोकान्ला कंपलसरीच असणार!!!:)
आणि सोबतीला भ्रमंतीचे जुने अंक मिळवून वाच!!!
सिरियसली...
'पेलिकन ब्रीफ' वाच.
मला आवडलं होतं....
पण त्याच नांवाचा पिक्चर बघायच्या आधी वाच...
25 Nov 2009 - 8:53 pm | अनामिक
पेलिकन ब्रीफ मलाही आवडलं होतं... मिळालं तर नक्की वाच!
-अनामिक
26 Nov 2009 - 1:09 am | स्वप्निल..
मस्त आहे पुस्तक!!
त्याच नावाचा चित्रपट बघण्यापूर्वी वाच!!
आणि एक चांगला चित्रपट म्हणजे "स्पाय गेम" . अजुन काही मी बघीतलेले आणि सध्या आठवत असलेले -
बॉडी ऑफ लाइज
द फोर्थ प्रोटोकॉल
द गुड शेफर्ड
द रशिया हाउस
द रीक्रुट
स्वप्निल
26 Nov 2009 - 9:36 am | भडकमकर मास्तर
त्याच नावाचा चित्रपट बघण्यापूर्वी वाच!!
अगदी
अगदी...
चित्रपट पाहिला आणि जुलिआ बरी दिसते वगैरे म्हणत बाहेर आलो...
काही मन्जे काहीच कळ्ळा नव्हता... उत्सुकतेने झोप लागायची वेळ आली...
आता कादंबरी वाचूनच पुन्हा पाहीन अशी प्रतिज्ञा केली होती...
25 Nov 2009 - 8:42 pm | संदीप चित्रे
नीलकांत,
हेरगिरीबद्दल 'स्पाय गेम' हा माझा अत्यंत आवडता चित्रपट आहे.
हा सिनेमा आवर्जून बघ.
रॉबर्ट रेडफर्डने साकारलेला हेर नुसता बघत रहावा.
चित्रपटाचे ट्रेलर इथे पहा.
ट्रेलरमधे जरी खूप मारधाड दिसत असली तरी सिनेमाची खरी ष्टोरी हेरगिरीच्या कौशल्याबद्दल आहे !
25 Nov 2009 - 8:58 pm | jaypal
****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
25 Nov 2009 - 11:22 pm | विसोबा खेचर
??
26 Nov 2009 - 3:58 pm | टारझन
इथं नारदाच्या तंबोर्याची पोझिशन पहाता हे चित्र अंमळ अश्लिल वाटते :)
-(सुश्लिल) टारझन
25 Nov 2009 - 9:03 pm | धनंजय
भारतीय संदर्भातले भन्नाट आवडलेले गुप्तहेर पुस्तक - "बँडीकूट रन" (Bandicoot Run, लेखक : मनोहर माळगांवकरचे) .
बाकी निव्वळ करमणूक म्हणून जेम्स बाँडचे चित्रपट आणि पुस्तके मस्त आहेत (पैकी कुठलेही वाचा/बघा - डोक्याला त्रास नाही, तरी थरारक आणि विनोदी).
जरा गंभीर मनोवैज्ञानिक गुप्तहेर पुस्तक आहे जोसेफ कॉनराड याचे "द सीक्रेट एजंट". पण त्या दिशेला जायचे - म्हणजे गुप्तहेराच्या मनात शिरून तिथल्या घडामोडी बघायच्या - तर हल्लीच्या काळातला स्टीव्हन स्पीलबर्गचा चित्रपट "म्यूनिक" हा बघण्यालायक आहे.
26 Nov 2009 - 4:35 am | पाषाणभेद
अवांतर: भारतात गुप्तहेर असतात का? नाही, कधी ऐकिवात आले नाही, कधी त्यांनी कामे केल्याचे आठवत नाही.
------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्या बातम्या/ लेख वाचत नाही.
पासानभेद बिहारी
26 Nov 2009 - 5:01 am | Nile
तुम्हाला असे गुप्तहेर कोण हे कळाले असते तर त्यांना गुप्तहेर म्हणले असते का कुणी?
26 Nov 2009 - 7:27 am | पाषाणभेद
हा हा हा, पाईंट आहे, पाईंट आहे. त्यांचे कार्य पण कायम गुप्तच असते. अंतिम परिणाम मात्र कोठेच नाही. (उदा: मुंबईहल्या प्रकरणी कमांडोचे संचालक दत्ता यांचे वक्तव्य पहा) म्हणून आपली शेंनखा (दादा कोंडकेंचा शब्द) विचारली.
------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्या बातम्या/ लेख वाचत नाही.
पासानभेद बिहारी
26 Nov 2009 - 8:13 pm | धनंजय
जे गुन्हे गुप्तपणे आडवले जातात, त्यांच्याबद्दल आपल्याला कळत नाही. आणि जे गुन्हे घडून येतात, ते मात्र दिसून येतात.
उदाहरणार्थ अमेरिकेत, इंग्लंडात, इस्रायलमध्ये वगैरे सुद्धा बाँबहल्ले झाले आहेत. या सर्व देशांत सुद्धा गुप्तहेर यंत्रणा आहेत. काही गुन्हे आडवतात, काही गुन्हे आडवत नाहीत.
भारतीय गुप्तहेर संघटनेचे जर कुठले गुप्त काम मला माहीत असेल, तर मी त्याचा येथे गौप्यस्फोट करणार नाही, हे उघडच आहे :-)
परंतु काही बाबतीत भारतीय गुप्तहेर संस्थेचे कार्य उघड माहितीत आहे. २६/११/२००८च्या संदर्भात आता जाहीर आहे, की भारतीय गुप्तहेर संस्थेकडे अनेक अतिरेकी संघटनांच्या उपयोगात असलेली सिमकार्डे उपलब्ध आहेत, आणि त्यांच्यावरील संवाद टिपण्याची क्षमता आहे. या क्षमतेचा उपयोग करून जर कुठले हल्ले आजवर रोखले असतील, तर त्यांचा बोभाटा गुप्तहेर संस्था करणार नाही. पण जिथे अपयश आले ती भयंकर घटना आपल्या सर्वांच्या आठवणीत कायमची नोंदली गेली आहे.
तालिबानविरोधी गुप्तहेर संस्थांपैकी प्रबळ संस्था भारताची आहे. तिथेसुद्धा प्रत्येक वेळेला यश मिळत नाही - (जेम्स बाँडला सुद्धा कादंबरीच्या शेवटीच यश मिळते, आणि त्याशिवाय कादंबरी विकत कोण घेणार आहे?) भारताने गुप्त साहाय्य करून सुद्धा अहमद शहा मासूद याला तालिबानाने घात करून मारले. पुन्हा हे अपयश स्पष्टपणे दिसते, तरी यश मात्र गुप्त राहाते.
जनरल मॅकक्रिस्टल या अफगानिस्तानातील अमेरिकन प्रमुखाच्या अहवालात भारताच्या गुप्त/उघड कारवायांबद्दल काही थोडे उल्लेख आले आहेत. वगैरे.
तात्पर्य : भारताच्या गुप्तहेर संस्था आहेत. त्यांला कधीकधी अपयश येते, याबद्दल भारत सरकारला फैलावर धरणे आपले लोकशाही कर्तव्यही आहे. पण आपली संस्था अतिशय दुर्बल आहे, कुचकामी आहे, असे समजून घेणेही योग्य नाही. उलट आपली गुप्तहेर संस्था काय-काय करते आहे त्याची उघड माहिती तरी आपण लक्षात घेतली पाहिजे. लोकशाही नागरिक म्हणून वापरली पाहिजे.
27 Nov 2009 - 3:38 pm | धमाल मुलगा
सहमत!!
खास धनंजय शैलीत उत्तम माहिती.
हेरखात्याचा एक नियम असतो (म्हणे), की करत असलेल्या अत्यंत महत्वाच्या आणि गोपनीय कामाबद्दल जर त्या हेराकडुन (दुसरं कोण देणार? सगळं गुप्त गुप्तच असतं ना!) वाच्यता झाली/होण्याची शक्यता निर्माण झाली (कोणत्याही कारणाने:जसं पैसा/भावना/कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देऊन वगैरे काहीही..) तर हेरखातं स्वतःच त्या हेराचा काटा काढते..कारण, माहिती ज्याला हे लोक इंटेल म्हणतात ते सर्वोच्च महत्वाचे.
आता एकतर प्रचंड गुप्तता पाळण्याची पध्दत, आणि जीवाची भिती, कोण बोंबलुन सांगेल "ओ..हे पहा हे पहा..आम्ही हे हे काम केलं हो..."
*काही ऐकिव माहितीनुसार असं कळतं, की गेल्यावर्षी जे बंगळुर, हैदराबाद इ.इ. ठिकाणी स्फोट झाले त्यापेक्षा जास्त स्फोट करण्याची पुर्ण तयारी झालेली होती....हेरखात्याच्या देशांतर्गत गुप्तवार्ता विभागाच्या सतर्कतेमुळे ही हानी टळली/कमी प्रमाणात झाली.
असो, हेरखात्याकडची माहिती आणि तिचं योग्यप्रकारे 'इंप्लिमेंटेशन' ह्यामध्ये प्रत्येकच देशात बरेच घोळ असतात..कारणं सरळ आहेतःराजकीय लागेबांधे गुंतलेले असणं आणि लालफितीचे कारभार!
पण ह्यामुळं हेरखातं असंच आहे असं नाही म्हणता येणार ...असं माझं वैयक्तिक मत आहे. :)
-(मिश्टर डीप थ्रोट)ध.
26 Nov 2009 - 9:39 am | विजुभाऊ
डॅन ब्राऊन ची पुस्तके वाचायला भन्नाट असतात. पण त्याला हेरगिरी म्हणता येणार नाही.
शोधक डिटेक्टीव्ह गिरी वरची क्लासीक पुस्तके म्हणजे ऑर्थर कॉनन डॉईल लिखीत शेर्लोक होम्स ची पुस्तके.
गेल्या पन्नास वर्षात तरी त्यातल्या लॉजीक ला कुणी छेद देऊ शकलेला नाहिय्ये.
26 Nov 2009 - 11:16 am | दिपक
ज्यांना द बोर्न ट्रायोलॉजी आवडला असेल त्यांनी टेकन जरुर पहावा., क्लिंट ईस्टवुड आणि रिचर्ड बर्टनचा व्हेयर इगल्स डेअर सुद्धा पाहण्यासारखा आहे.
27 Nov 2009 - 2:49 pm | Nile
बोर्न ट्रीलॉजी बेस्ट आहे. बॅक टू बॅक हे तीन सिनेमे पहा वेडे व्हाल!
व्हेअर इगल्स डेअर पण चांगला आहे.
26 Nov 2009 - 12:21 pm | सुमीत भातखंडे
सर ऑर्थर कॉनन डॉईल - .
अॅड्वेंचर्स ऑफ शेर्लक होम्स
26 Nov 2009 - 2:42 pm | शक्तिमान
फास्टर फेणे आपला एकदम आवडीचा बुवा!!
26 Nov 2009 - 4:58 pm | गणपा
फुरसुंगीचा बनेश फेणे. आमचा आवडता गुप्तहेर आहे...
आठवा तो प्रतापगडावरचा प्रताप वा सिमेवरची हेरगीरी...
फाफे चा फॅन..
26 Nov 2009 - 4:50 pm | सुनील
सुचवणी करताना हेर आणि डिटेक्टिव ह्यात गल्लत केली जात आहे का?
नीलकांत यांना नक्की काय अभिप्रेत आहे?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
26 Nov 2009 - 7:11 pm | नीलकांत
मला हेरगिरीवर पुस्तक अथवा चित्रपट पाहिजे होता. अन्वेशन (डिटेक्शन) करणारे नकोय.
नीलकांत
26 Nov 2009 - 4:54 pm | उग्रसेन
सिडने शेल्डन चे 'अदर साइड ऑफ मिडनाइट' सौ.मोहनतारा यायचं
अनुवादीत पुस्तक वाचेल हाये, आता लय दीस झालं समदं आठवतं नाय.
'रेंज ऑफ एंजल्स' सिडने शेल्डनचं बूक. पर त्याचा इषय इसरलो :(
माहीती गोळा करायला स्त्री कोणत्याबी थराला जायच्या. लय आवडीनं
बूक वाचाचो.
बाबुराव :)
27 Nov 2009 - 4:53 pm | अ-मोल
एम आय - भाग पहिला.
हॅरिसन फोर्डचा पेट्रियट गेम्स
लिओ डी कॅप्रिओचा दि डिपार्टेड
दी बर्लिन कॉन्स्पिरसी
ग्रेगरी पेक-ऑड्री हेपबर्न जोडीचा - शरेड
अनटचेबल्स - हा हेरपट नसून पोलिसपट आहे.