मदत हवीये- project साठी

बाकरवडी's picture
बाकरवडी in काथ्याकूट
24 Nov 2009 - 7:49 pm
गाभा: 

मदत हवीये- project साठी

नमस्कार,
मी संगणकशास्त्राच्या द्वितीय वर्षाला (S.Y. BCS) शिकत आहे. आम्हाला 2nd semester ला Software engineering हा विषय आहे.आणि ह्या विषयात आम्हाला project करायचाय. :(

तरी कृपया मला कोणी मदत करेल का ?
live project करायचाय, ह्या वर्षी coding नाहीये फक्त designing आहे पण पुढच्या वर्षी त्याच विषयावर कोड लिहायचा आहे. त्यामुळे चांगला विषय घेणे गरजेचे आहे. :SS :SS :SS :SS
येथे मिपावर बरेच संगणक अभियंते व या विषयी ज्ञान असलेले लोक असतील, प्लीज मला मदत करा. projects ची नावे सांगा, एखादी वेबसाईटची लिंक दिली तरी चालेल. :)]

हे points आहेत.

Mini Project based on SE Concept
- Problem Definition
- Scope of the system
- Proposed System
-Fact finding techniques
-Feasibility study
-ERD
-DFD
-I/O Screens
-O/P Formats
-Report Layout
-Conclusion
-Bibliography

प्रतिक्रिया

Dhananjay Borgaonkar's picture

24 Nov 2009 - 8:40 pm | Dhananjay Borgaonkar

मित्रा कोणत्या लँग्वेज मधे प्रोजेक्ट करायचाय?
सी, सी++, जावा की .नेट?

बाकरवडी's picture

25 Nov 2009 - 9:10 am | बाकरवडी

मला सी लँग्वेज FY ला झालीये आणि सी++ आत्ता २nd sem ला आहे शिकतोय!!
.net आणि java पुढच्या वर्षी आहेत.
मी म्हणल्याप्रमाणे coding करायचे नाहीये आत्ता designing, पुढल्या वर्षी सी, सी++, जावा की .नेट मधे कोदिंग करता येईल त्याच प्रोजेक्ट्चे.

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

धमाल मुलगा's picture

24 Nov 2009 - 9:22 pm | धमाल मुलगा

जरा डॉटनेटस्पायडर.कॉमबघ बरं. सोर्सकोडसहीत काही प्रॉजेक्ट्स मिळु शकतील, तसेच तिथे जर प्रॉजेक्ट ट्रेनी म्हणुन रजिस्टर केलंस तर काही आणखी माहिती मिळु शकेल.

आणि समजा नाही मिळाली, तर त्यातला एखादा चांगला प्रॉजेक्ट उचल, आणि डिझाईनमध्ये कन्वर्ट कर ;) तेव्हढीच रिव्हर्स इंजिनियरिंगची प्रॅक्टीस..क्काय? :)

टारझन's picture

24 Nov 2009 - 9:40 pm | टारझन

श्री. धमाल मुलगा, आपल्याशी सहमत आहे .
आम्हाला ही उपयोग होईल ह्या धाग्याचा . उत्तम धागा आहे .

- टारझन

टुकुल's picture

24 Nov 2009 - 10:48 pm | टुकुल

>>श्री. धमाल मुलगा, आपल्याशी सहमत आहे .
ठसका लागला कि भौ.. निघुन जायचा जीव एकेदिवशी : )

बाकर्‍या: जरा जास्त लिहायच कि, कुठली लँग्वेज वापरायचा विचार आहे, तुला कशात इंटरेस्ट आहे?, प्रोजेक्ट मधुन खरोखर अनुभव घ्यायचा आहे कि फक्त गुंणासाठी करणार आहेस.

--टुकुल

टारझन's picture

24 Nov 2009 - 10:55 pm | टारझन

ठसका लागला कि भौ.. निघुन जायचा जीव एकेदिवशी : )

श्री धमाल मुलगा, आपण हे खरडवहीत बोलूयात , पण माझे सर्व प्रतिसाद सरळ आहेत. मी आता एक गुणी मुलगा आहे .. आय.डी. बदलून "संत एकनाथ? ठेवल्याशीवाय कोणाला आमची शाश्वती येणार नाही :(

- टारझन

मी-सौरभ's picture

24 Nov 2009 - 11:48 pm | मी-सौरभ

टारझन चा "संत एकनाथ"
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))

टारोबा: नुकतच लग्न झाल का तुमच????

सौरभ

टारझन's picture

24 Nov 2009 - 11:56 pm | टारझन

लग्न नाही झालं भावा ... पण खरडवहीत अक्षता मात्र पडल्या :( ते लग्न झाल्यासारखंच !
असो , बाकी चर्चा खरडवहीत .. श्रीमान बाकरवडी ह्यांच्या धाग्याचे काही प्रतिसाद अवांतर आल्याने त्यांना कोपरापासून हात जोडून माफी मागतो !

- टारझन

मला मिळाला तसा घरचा आहेर पण मिळाला का?
****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

मी-सौरभ's picture

25 Nov 2009 - 12:12 am | मी-सौरभ

मला खव अन खफ दोन्ही मध्ये नोंद करु देत नाहीत.

:''( :''( :''(

मदत करा मला :W :W :W

सौरभ

शाहरुख's picture

24 Nov 2009 - 11:47 pm | शाहरुख

जेंव्हा "मी कशात प्रोजेक्ट करू" अशी विचारणा होते तेंव्हा ती फक्त गुणांसाठीच होते.

चि. बाकरवडी,

वरील वाक्य मी तुला खिजवायला लिहिले नाहीय..मी तुझ्या वयाचा असताना "project ideas in c++" वगैरे गुगलवर शोधून "प्रोजेक्ट" केले आहेत.

खरं तर अभ्यासक्रमात प्रोजेक्ट करायची वेळ येते तेंव्हा "मला काय करुन बघायचे आहे" हे माहित असले पाहिजे..मी तुला असा सल्ला देईन की तू डेव्हलपर्सचे, प्रॉडक्टसचे ब्लॉग्ज वगैरे वाचायला चालू कर.. (उदा. गुगल प्रॉडक्टसचे ब्लॉग्ज) म्हणजे लोक काय काय करु पहात आहेत याची कल्पना येईल आणि आपण त्यात काही हातभार लावू शकतो का हे पण बघता येईल..याने ह्या सेमिस्टरचा प्रश्न सुटणार नाहीय हे मला माहितीय पण निदान पुढे तरी मदत व्हावी..

तो पर्यंत गुगल वर शोधून ढिगानं प्रोजेक्ट आयडिया मिळतीलच ;-)

-शाहरुख

sujay's picture

25 Nov 2009 - 5:37 am | sujay

श्री वडी,

ह्या क्षेत्रातला नसल्यामुळे मदत करू शकत नाही, पण जाता जाता मला १का मास्तरने बी.ई त दिलेला सल्ला देतो-
"नेहमी लक्षात ठेव की प्रोजेक्ट आणी सेमिनार म्हणजे करायचं एवढस आणी दाखवायच लई मोठ "

प्रोजेक्ट करता शुभेच्छा !

सुजय

विजुभाऊ's picture

25 Nov 2009 - 9:18 am | विजुभाऊ

काही वेगळे करायचे असल्यास जुमला joomla मध्ये करण्यासारखे बरेच काही आहे. प्रत्यक्ष प्रोजेक्ट करता येईल. गुरु डॉट कॉम वर बघ प्रोजेक्ट्स आहेत.

सुनील's picture

25 Nov 2009 - 9:27 am | सुनील

हम्म.. तर ह्या वर्षी फक्त आरेखन आणि पुढील वर्षी रचना. वास्तविक संगणक प्रणाली विकासाच्या धबधबा प्रतिकृतीप्रमाणे जाऊ गेले तर, आरेखनापूर्वी पृथःकरण करावे लागते, ते कधी करणार?

असो, प्रकल्पासाठी शुभेच्छा!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सुनील's picture

25 Nov 2009 - 9:30 am | सुनील

हम्म.. तर ह्या वर्षी फक्त आरेखन आणि पुढील वर्षी रचना. वास्तविक संगणक प्रणाली विकासाच्या धबधबा प्रतिकृतीप्रमाणे जाऊ गेले तर, आरेखनापूर्वी पृथःकरण करावे लागते, ते कधी करणार?

असो, प्रकल्पासाठी शुभेच्छा!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

निखिल देशपांडे's picture

25 Nov 2009 - 9:42 am | निखिल देशपांडे

वास्तविक संगणक प्रणाली विकासाच्या धबधबा प्रतिकृतीप्रमाणे जाऊ गेले तर, आरेखनापूर्वी पृथःकरण करावे लागते,

बापरे.... सुनीलराव आता सॉफ्टवेअर ईंजिनिअरिंग सुद्धा मराठीतच असा काहिसा अट्टहास सुरु झाला का काय????
धबधबा प्रतिकृती
=)) =)) =))

@ बाकरवडी:- तुझा कश्यात ईंटरेस्ट आहे रे??? कॉलेजने काही लिस्ट दिली आहे का??? हे प्रॉजेक्ट करायचे नाही वैगेरे??? बघ अशी संकल्पना शोध की त्याचा वापर तुला पुढे पण करता यायला पाहिजे.

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

वाहीदा's picture

25 Nov 2009 - 1:08 pm | वाहीदा

मराठीत सगळे टंकणे कठीण आहे ... गुस्ताखी माफ !
पण काही suggestions (मराठी ?? ) साधारणतः keep step by step and Ground-up approach

  1. Make an initial feature list.
  2. Get time estimates on each feature.
  3. Prioritise the list.
  4. Time box the effort.
  5. Build and test as much as possible in that time.
  6. Launch.
  7. Get user feedback.

This works great for a tightly defined set of deliverables and a client who has done software before.

In this scenario, a waterfall approach combined with constant communication and flexibility is the right approach.

Namely, the focus could be to:

  1. Understand the client's vision.
  2. Write a detailed, final specification through many iterations.
  3. Brainstorm with the client and within the Team.
  4. Build according to the specification.
  5. Check internally with Team and with Client for functionality and scope affirmation.
  6. Integrate comments and changes.
  7. testing and scalability.
  8. Bug fix and test.
  9. Launch Finally

educating the client on different facets of development, software, user experience and running a software based business. have numerous discussions and creative brainstorming sessions. Delivering the exact product they want and providing the service level they've requested. The specification and the process itself become the foundation for the conversations and the subject, as it were, around which our conversations, services and deliverables will revolve.

Both agile and waterfall can be powerful approaches.
It all depends on the context of the engagement.
You have to pick the right methodology for the right engagement and the right client.
it's about finding the right fit.

~ वाहीदा

शाहरुख's picture

25 Nov 2009 - 10:01 am | शाहरुख

धबधबा प्रतिकृतीप्रमाणे ..

=)) =)) =))

डोक्यात जाळ झाला प्रतिसाद वाचून...( पण दगड पडण्यापेक्षा बरे ;-) )

अमृतांजन's picture

25 Nov 2009 - 10:04 am | अमृतांजन

बाळ बाकर,

मी आत्ताच बी. सी. ए. व्दितीय वर्षाचा अभ्यासक्रम तपासला. त्यात सॉफ्टवेअर इंजि हा विषय दिसला पण त्यात तुम्हाला डिझाइन हा प्रोजेक्ट दिसला नाही. त्यामुळे तुझ्या ह्या प्रश्नाबद्दलच मला शंका आहे. जर नीट अभ्यासक्रम तपासून घे पाहू.

पण तुझा जर प्रश्न खरा असेल आणि माझीच काही नजर्चूक झाली असेल तर मात्र धमुकाकांनी सांगितल्याप्रमाणे जिटी मार.

कळावे,
अमृतांजन

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Nov 2009 - 10:08 am | llपुण्याचे पेशवेll

अमृतांजनकाका,
बाकरवडी बीसीएस (बीएस्सी. कॉम्पुटर) करीत आहे. दोन कोर्सेस मधे मूलभूत फरक आहे. कृपया आपण बीएस्सी. कॉम्पुटर चा अभ्यासक्रम तपासून सांगा बरे प्रकल्प आरेखन त्याना आहे का नाही ते.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

अमृतांजन's picture

25 Nov 2009 - 10:15 am | अमृतांजन

अरेच्चा! टंकचूक झाली. मी मुळात बी एस सी चाच अभ्यासक्रम पाहिला होता जालावर.
[असे ही म्हणले असते मी, बाकरच्या नजरेत ही चूक लक्षात येते का पाहू. तेव्हढीच त्याची एक परीक्षा घेतली असती- डिटेल ओरीयंटेशनची].

राकेश वेंदे's picture

25 Nov 2009 - 2:03 pm | राकेश वेंदे

मित्रा, प्रोजेक्ट् आरखन (डिझाइन) करण्यासाठी, सॉफ्टवेर इंजीनियरिंग नुसार, युनिफाइड मॉडेलींग लॅंग्वेजचे ज्ञान असणे महत्वा़चे आहे, तसेच डेटा प्लो डायग्राम सुद्धा काढता यायला हवेत.

ढोबळ अल्गोरिदम असा :
१. सुरुवात २. प्रोजेक्ट आयडीया निवडा. ३. पृथःकरण करा ४. विवीध यु.म.ल. डायग्राम काढून, प्रोजेक्ट विवीधांगानी स्पष्ट करा ५. डेटा फ्लो डायग्राम काढा. ६. शेवट.

बाकरवडी's picture

25 Nov 2009 - 7:43 pm | बाकरवडी

सर्वांचे आभार ___/\____
प्रोजेक्टचे काम चालू झाले आहे पण अजुनही कोणता करायचा ते कळत नाहीए.

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

राकेश वेंदे's picture

25 Nov 2009 - 8:13 pm | राकेश वेंदे

तुम्हाला ‘एप्लिकेशन प्रोग्रामिंग’ मध्ये रस असेल तर, जावा किंवा .नेट वर बऱ्याच प्रोजेक्ट आयडियाज मिळतील; मुख्यत्वे: वेब-एप्लिकेशन्स.

किंवा ‘सिस्टीम प्रोग्रामिंग’ हा तुमचा प्रांत असेल, तर सी, सी++ सबंधीत प्रोजेक्ट आयडियाज सुद्धा आतंरजालावर मिळतील.

‘सिस्टीम प्रोग्रामिंग’ मध्ये प्रोजेक्ट केला, तर भविष्यात चांगल्या संधी मिळतील यात शंका नाही :) योग्य प्रोग्रामिंग डोमेन निवडणे हेच महत्वाचे आहे.

पाषाणभेद's picture

26 Nov 2009 - 2:07 am | पाषाणभेद

मिपावरचा एक आय डी घ्यायचा. त्याचे विडंबन करायचे.
असला प्रोजेक्ट करता आला तर पहा.

------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्‍या बातम्या/ लेख वाचत नाही.

पासानभेद बिहारी