स्वातीताईचे कायस्थी चिंबोरी कालवण पाहून मासे करण्याचा भलताच मूड आलेला. पण शोधूनहि चिंबोरी मिळेनात..
मग इथे मिळणारे मासे ( सामन आणी कोलंब्या ) वापरून काल फिश बिर्याणी बनवली. पहा बर मंडळी..
साहित्यः माश्याचे ५-६मोठे जाड तुकडे ( शक्यतो सुरमई, सामन असा घट्ट मासा घ्यावा ) .. पातळ तुकडे असतील तर खिमा होईल.
१०-१२ मोठ्या ताज्या कोलंब्या ( सालं आणी काळा धागा काढून टाकावा )
मासे मुरवण्यासाठी -
१ छोटा चमचा हळद
१ छोटा चमचा लाल मिरचीपूड
१ छोटा चमचा बिर्याणी मसाला
१/२ लिंबू
१ छोटा चमचा तेल
चविनुसार मीठ
मसाल्या साठी -
५-६ कढिपत्ता पाने
१ कप दही
१/२ कप बारीक चिरलेली कोथींबीर
१/४ कप बारीक चिरलेला पुदिना
३-४ हिरव्या मिरच्या
१ छोटा चमचा बिर्याणी मसाला
१ मोठा चमचा आल-लसूण पेस्ट
१ चमचा तेल
बिर्याणी भातासाठी -
२ कप बासमती तांदूळ ( ३० मिनीटे भिजववून निथळत ठेवावा)
७-८ काळीमिर्या
३-४ लवंगा
१ तमालपत्र
१" दालचिनी काडी
१ चमचा शहाजीरे
१ छोटा चमचा बिर्याणी मसाला
चविपुरता मीठ
कॄती - माश्याचे तुकडे-कोलंबी स्वच्छ धुवून घ्यावेत. त्याला १ छोटा चमचा हळद, १ छोटा चमचा लाल मिरचीपूड, १ छोटा चमचा बिर्याणी मसाला, १/२ लिंबू,
१ छोटा चमचा तेल, चविनुसार मीठ लावून ३० मिनीटे लावून ठेवावे.
मासे मुरत असताना एकिकडे भाताची तयारी चालू करावी. भाताच्या दुप्पट पाणी उकळत ठेवावे. एका जाड बुडाच्या भांड्यात थोड्या तेलात सगळा खडा गरम मसाला
( ७-८ काळीमिर्या, ३-४ लवंगा, १ तमालपत्र, १" दालचिनी काडी, १ चमचा शहाजीरे ) भाजून घ्यावा. त्यात भिजवून निथळत ठेवलेले तांदूळ १-२ मिनीटे हलक्या
आचेवर परतून घ्यावे. नंतर त्यात उकळवलेले पाणी, चविपुरता मीठ आणी १ छोटा चमचा बिर्याणी मसाला टाकून भात शिजवावा. पूर्ण शुजवू नये. १ कणी असताना काढून
ताटात मोकळा पसरून घ्यावा. ( जर मायक्रोवेव्ह असेल तर त्यातसुद्धा भात छान मोकळा होतो )
भात शिजत असताना जाड बुडाच्या भांड्यात थोड्या तेलात कोलंबी आणी मासे तळून घ्यावेत.. पूर्ण शिजवू नयेत. दोन्ही बाजूनी परतून घ्यावेत व प्लेट वर हलक्या हाताने
काढून ठेवावेत.
आता या उरलेल्या तेलात मसाल्याचे साहित्य ( ५-६ कढिपत्ता पाने, १ कप दही, १/२ कप बारीक चिरलेली कोथींबीर, १/४ कप बारीक चिरलेला
पुदिना, ३-४ हिरव्या मिरच्या मधे उभ्या चीरून, १ छोटा चमचा बिर्याणी मसाला, १ मोठा चमचा आल-लसूण पेस्ट ) घालावे आणी २-३ मिनीटे शिजवावे.
आता हे शिजवलेले अर्धे मिश्रण माश्यांच्या तळलेल्या तुकड्यांवर घालावे.
उरलेल्या मसाल्यात थोडे पाणी घालून मोकळा केलेला भात पसरून घालावा. वरून माश्याचे तुकडे पसरून टाकावे. वरून झाकण ठेवावे व मंद आचेवर ५-१० मिनीटे भात
होईपर्यंत शिजवावे..
रायत्याबरोबर गरमा गरम वाढावे. पेश आहे फिश बिर्याणी..
प्रतिक्रिया
21 Nov 2009 - 10:02 pm | प्रभो
खंडोबाचे नवरात्र चालूय......त्यामुळे मी सध्या अशा चांगल्या नॉनवेज पाकृ वर प्रतिक्रिया देत नाही...
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
21 Nov 2009 - 10:08 pm | jaypal
आहा अहाहा

नुसते फोटो पाहुनच रसना आणि नेत्र सुखावले. त्रुप्त झलो.
रेसीपी ईतकेच फोटो देखिल सुंदर आहेत.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
21 Nov 2009 - 10:10 pm | मस्तानी
आई ग ... रविवारी बनवली नाही तर काही खर नाही ...
21 Nov 2009 - 11:26 pm | चित्रा
सुंदर दिसते आहे बिर्याणी.
21 Nov 2009 - 11:33 pm | विसोबा खेचर
शब्दच संपले..!
लवंगी, तू देखील इतकी सुगरण आहेस हे ठाऊक नव्हतं. जियो... !
तात्या,
22 Nov 2009 - 12:32 am | टारझन
अहाहाहा !!!!
- (फिशबिर्याणी प्रेमी) टारोबा फिशर
22 Nov 2009 - 12:43 am | टुकुल
धन्य ती लोक जी अशी सुगरण असतात आणी त्याहुन धन्य जी याचा आस्वाद घेतात .. आम्हाला पाक्रु बरोबर (फक्त) फोटो चा आनंद (?) दिल्याबद्दल धन्यवाद.. : ))
अवांतरः वाचनखुन साठवलेली आहे, भविष्यात कधी कामी येते का बघतो.
--टुकुल
22 Nov 2009 - 2:27 am | गणपा
क्या बात है दिदी.
ए१ बिर्याणी..
कधी तुझ्या हातचं खायला मिळणार देव जाणे.
पाककृती मेंदुत फिड केली आहे. :)
-गणपा
22 Nov 2009 - 3:34 am | स्वाती२
व्वा! मस्त दिसतेय एकदम! फ्रिजर मधे कोलंबी आणि सुरमयी दोन्ही आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारचा बेत पक्का!
22 Nov 2009 - 8:25 am | सहज
बिर्यानी सुरेखच!!!!!!!!!!!!
22 Nov 2009 - 9:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिर्यानी लैच खत्रा दिसत आहे.
अजून येऊ दे.
-दिलीप बिरुटे
22 Nov 2009 - 9:24 am | विंजिनेर
मस्तच !! पण निषेध... कारण आज नो बाजार इन द फ्रिज सो केवळ दृष्टीसुख :(
22 Nov 2009 - 9:48 am | अवलिया
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
23 Nov 2009 - 7:48 am | दिपाली पाटिल
अवलीया लहानपणापासुन असेच आहात तुम्ही... :D (ह.च घ्या...)
बाकी लवंगीताई मस्त पाकृ टाकलीये...बनवून बघेन नक्की...
दिपाली :)
23 Nov 2009 - 12:59 pm | गणपा
आवांतर : काय कदरलय हो पिल्लु
=)) =)) =)) =)) =)) =))
23 Nov 2009 - 8:36 pm | लवंगी
नाना जन्मल्यापासून कपाळावर आठ्या घेऊन आलाय.. :D
22 Nov 2009 - 10:20 am | सुनील
मस्तच दिसतेय पाकृ. पण कोलंबी आणि सुरमई एकाच डिशमध्ये कसे लागेल? करूनच बघायला हवे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
22 Nov 2009 - 7:53 pm | संदीप चित्रे
फोटू आणि रेशिपी खल्लास....
रविवार सकाळ सुखात उजाडलीय :)
22 Nov 2009 - 8:46 pm | लवंगी
सर्व वाचक/प्रतिसादकर्त्यांना मनःपुर्वक धन्यवाद
23 Nov 2009 - 10:54 am | दिपक
तडफड झाली फोटु पाहुन... सुपर्ब
23 Nov 2009 - 5:07 pm | सूहास (not verified)
खतरा !!!
आता आणखीन एक सुगरण सुरु झाली !! खातय नायतर मरतय आता !!
सू हा स...
27 Nov 2009 - 9:02 am | श्रीयुत संतोष जोशी
भन्नाट फोटो आणि रेसिपी तर झकासच.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
27 Nov 2009 - 5:50 pm | बिपिन कार्यकर्ते
धन्यवाद!!!
बिपिन कार्यकर्ते