मला हवी आहे चिल्टांच्या त्रासापासून मुक्ती

सानिका पटवर्धन's picture
सानिका पटवर्धन in काथ्याकूट
21 Nov 2009 - 7:39 pm
गाभा: 

सध्या घरात फार चिल्टं झाली आहेत. काही लोकं ह्याला केम्र असे देखील म्हणतात. आकाराने एकदम छोट्या असलेल्या माश्या असे वर्णन करता येईल. फळे /भाज्या काहीही चिरले की लगेच त्यावर बसतात. कोणी सांगू शकेल का की ह्या त्रासातून कशी सुटका मिळेल. सध्या वास्तव्य अमेरिकेत आहे. त्यामुळे अमेरिकेत करता येईल असा उपाय सुचवावा.

प्रतिक्रिया

स्वाती२'s picture

21 Nov 2009 - 8:14 pm | स्वाती२

काउंटरटॉप स्वच्छ ठेवा. अन्न, फळे झाकून ठेवा. गार्बेज कॅनला झाकण हवे. बोलमधे अ‍ॅपल सायडर विनेगर ठेवा चिल्ट पकडायला.

रामदास's picture

21 Nov 2009 - 8:17 pm | रामदास

असेच म्हणतो.

सुनील's picture

21 Nov 2009 - 8:31 pm | सुनील

पेस्ट कंट्रोल करून घ्या. मागे एकदा बेड बगच्या त्रासाने बरीच जागरणे झाली होते. नको त्या आठवणी...

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

बहुगुणी's picture

21 Nov 2009 - 8:57 pm | बहुगुणी

शेराचं झाड (युफोर्बिया टिरुकाली म्हणजे इंडियन ट्री स्पर्ज) म्हणजे चिलटं आकर्षित करून घेणारं मॅग्नेट आहे. त्याची लहान फांदी लटकवून ठेवा स्वयंपाकघराच्या कोपर्‍यात. चिलटं बसलेली फांदी संध्याकाळी बाहेर नेऊन झटकून परत लावता येते, आठवडाभर एक फांदी टिकते.

अमेरिकेत ही झाडे कॅलिफोर्निया व फ्लॉरिडा या राज्यांत खूप सहज आढळतात. इतर ठिकाणी नर्सरीज मध्ये मिळण्याचीही शक्यता आहे. मला या ठिकाणी हे झाड उपलब्ध आहे असं आढळलं.

माझ्या भारतातील शेराच्या माहितीप्रमाणे ही अमेरिकेतील झाडेही वागावीत, आणि आपल्याला मदत व्हावी हि सदिच्छा!

Nile's picture

22 Nov 2009 - 3:15 am | Nile

बहुगुणींनी दिलेली माहीती फारच उपयोगी!
मला वाटतं भारतात गव्हाच्या की बाजरीच्या कणसांच्या काळात पुष्कळ चिलटे होतात (दिवाळी पुर्वी). तसेच इतर किटकही खुप प्रमाणात होतात. यावरुन माझ्या मनात एक विचार आला तो असा, कदाचीत दिवाळीत फटाके ऊडवण्याच्या उगम या कीटकांना पळविणे हा असावा.

इकडे आम्ही चिल्टे,डास ह्याच्या बरोबर सुखाने राहतो.
हिंसेवर आमचा विश्वास नाही.
वेताळ

बहुगुणी's picture

21 Nov 2009 - 9:00 pm | बहुगुणी

बाय द वे, चिलटं म्हणजे फ्रूट फ्लाईज (Drosophila melanogaster) च्या शरीरात "painless" नावाचं gene असतं, ज्याच्या कार्यामुळे isothiocyanate या रासायनिक द्रव्याची प्रतिक्रिया म्हणून चिलटं दूर पळतात, हेच द्रव्य वासाबी या जपानी खाद्य पदार्थात आढळतं, म्हणून थोडं वासाबी उघडून ठेवलं तरी चिलटं दूर पळतील. हॉर्सरॅडिश या मुळ्यापासून वासाबी करतात, तो मुळाही कापून ठेवता येईल असं वाटतं. हा farmers' market मध्ये मिळतो.

टारझन's picture

21 Nov 2009 - 9:04 pm | टारझन

चायनिज टेक्निक वापरा :)

ब्रिटिश's picture

22 Nov 2009 - 11:54 am | ब्रिटिश

पयल्यांदा चीलट पकरा,
मंग ०.००००१ मायक्रान सर्पईष + ०.००००२ मायक्रान सडलेल्या अंड्याचा पांडरा बलक + ०.०००१.२ मायक्रान बेगान मिक्स करुन सकाल दुपार आन संद्याकाल आस दिसातुन ३ येला ईंजेक्सन टोचा. दोन दीसात ग्यारंटीन चीलट मरुन जाईल.
मंग दुसर चीलट पकरा.

या जालीम ईलाजानं मच्छर, मुंग्या दीकील मरतान.

मिथुन काशिनाथ भोईर

भडकमकर मास्तर's picture

23 Nov 2009 - 5:35 pm | भडकमकर मास्तर

_____________________________
:))

टुकुल's picture

21 Nov 2009 - 9:10 pm | टुकुल

बर झाल तुम्ही धागा सुरु केलात..
माझ्या रुमवर पण बरीच चिल्ट झाली आहेत..

--टुकुल

jaypal's picture

21 Nov 2009 - 10:25 pm | jaypal

पॅराडाइस फ्लाय कॅचर (स्वर्गीय नर्तक) हा केवळ माश्या , चिलटं, व इतर कीडे खाउन जगतो. जमल्यास ह्याला पाळा


****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

विसोबा खेचर's picture

21 Nov 2009 - 11:39 pm | विसोबा खेचर

येऊ देत हो चिलटं! तीही बिचारी पोटाच्या मागे असतात..

त्या बापड्या चिलटांमुळे असं तुमचं काय मोठं बिघडणार आहे हो? फार फार तर ज्या पदार्थांवर ती बसतात ते पदार्थ झाकून ठेवा ना! म्हणजे प्रश्न मिटला!

तुकोबा म्हणतात,

मुंगी म्हणे माझे घर, पाल म्हणे माझे घर!

अहो तुम्ही मारे दमड्या खर्चून आलीशान घरं घेता, पण त्यावर मालकी तुमची आहे हे बापड्या त्या मुंग्याचिलटांना कुठे ठाऊक आहे? येणारच ती! :)

तात्या.

ज्ञानेश...'s picture

21 Nov 2009 - 11:48 pm | ज्ञानेश...

हेच म्हणतो.

येऊ देत हो चिलटं! तीही बिचारी पोटाच्या मागे असतात..
फक्त तुमच्या घरात आल्यावर 'माज करायचा नाही' अशी सूचना द्या त्यांना. नाहीतर लागतील लगेच् चिलटपूजा वगैरे करायला!
बरोबर ना तात्या? ;)

गणपा's picture

22 Nov 2009 - 3:14 am | गणपा

आवांतराबद्दल सॉरी ...पण मस्त प्रतिसाद होता.
दाद द्यावीशी वाटली.

निमीत्त मात्र's picture

22 Nov 2009 - 8:09 am | निमीत्त मात्र

घरात एक चप्पल ल़टकवुन ठेवा. म्हणजे माज केला तर त्यांना सांगायला बरं.. माज करायचा असेल तर सरळ चप्पल अडकवायची आणि उडायला लागायच!

सानिका पटवर्धन's picture

22 Nov 2009 - 4:36 am | सानिका पटवर्धन

माहिती आणि सल्ल्याबद्दल सगळ्यांनाच खूप खूप धन्यवाद.

अविनाशकुलकर्णी's picture

22 Nov 2009 - 1:32 pm | अविनाशकुलकर्णी

चिलट मुक्ति मंत्राचे १०८ वेळा पठण करा........ मुक्ति मिळेल

प्रशु's picture

23 Nov 2009 - 7:53 pm | प्रशु

कोणाला????

सूहास's picture

23 Nov 2009 - 7:57 pm | सूहास (not verified)

अर्धवट प्रश्न ..प्रशु..

कोणाला ?? आणी कोणापासुन ??
सू हा स...

विनायक प्रभू's picture

22 Nov 2009 - 1:39 pm | विनायक प्रभू

वापरलेल्या मोज्यांना घाबरतात चिलटे असे कळते.

विनायक प्रभू's picture

22 Nov 2009 - 1:39 pm | विनायक प्रभू

वापरलेल्या मोज्यांना घाबरतात चिलटे असे कळते.

अवलिया's picture

22 Nov 2009 - 1:43 pm | अवलिया

पायाचे ना ?

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

विनायक प्रभू's picture

22 Nov 2009 - 1:44 pm | विनायक प्रभू

आणखी कुठे मोजे घालतात बॉ?

अवलिया's picture

22 Nov 2009 - 1:58 pm | अवलिया

आम्ही कधी कधी हातमोजे पण वापरतो

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

विनायक प्रभू's picture

22 Nov 2009 - 2:02 pm | विनायक प्रभू

हाताला बुट पण घालता का?
चिलटे बुटाच्या मोज्यांना घाबरतात.

विनायक प्रभू's picture

22 Nov 2009 - 2:02 pm | विनायक प्रभू

हाताला बुट पण घालता का?
चिलटे बुटाच्या मोज्यांना घाबरतात.

अवलिया's picture

22 Nov 2009 - 2:09 pm | अवलिया

खुलाशाबद्दल धन्यवाद!

भयानक गब्रु

======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

पर्नल नेने मराठे's picture

22 Nov 2009 - 2:11 pm | पर्नल नेने मराठे

सन्ध्याकाळी घरात धुप / कापुर लावल्याने बरेच असले त्रास कमि होउन वातावरण प्रसन्न रहाते. मी रोज चामुन्डेश्वरी धुप जाळते.
भारतात १ पॅकेट रु १८ ला मिळते. दुबैत अल आदिल मधे हेच दिराम. ३.५० ला म्हणजे रु ४४ :( .त्यात २४ तुकडे असतात त्याना मी हाताने तोडुन अर्धे करते त्यामुळे ४८ दिवस पुरतात. ह्या तुकडा जळताना वर २ कापराच्या वड्या थेवते. मस्त कापराचा सुगन्ध दरवळतो.

(निगुतीने संसार करणारी ) चुचु

ज्ञानेश...'s picture

22 Nov 2009 - 2:17 pm | ज्ञानेश...

एक नंबर्स!
=D>

"Great Power Comes With Great Responsibilities"

jaypal's picture

22 Nov 2009 - 4:18 pm | jaypal

चुचु तै च्या सल्ल्या बरोबर अविनाश कुलकर्णिंच्या सल्ल्यानुसार "चिलट मुक्ती मंत्र १०८ वेळा जपावा. दोन्ही डोळे मिटुन , घरातील सर्व चिल्टं गायब झाली आहेत असा विचार(किंवा आव) मनात आणावा. चित्त कायम प्रसन्न असु द्यावं.(सल्ला पटला नाही तरी)
या नंतर केळ्याची साल घरातील सर्व कोप-यां मधुन फिरवावी आणि आग्नेय नैॠत्य दिशांच्या बरोबर मधे नेम धरुन टाकावी. खात्रीने सांगतो आपले काम होउन जाईल.
(चुचुतै अपण कोदेश्वरी मराठी तर नाही ना वापरत? कारण "ह्या तुकडा जळताना वर २ कापराच्या वड्या थेवते." ठेवते म्हणायचे आहे काय? )
****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

ऍडीजोशी's picture

23 Nov 2009 - 1:22 am | ऍडीजोशी (not verified)

चु चु ताई रॉक्स :) :) :)

प्रसन्न केसकर's picture

22 Nov 2009 - 2:21 pm | प्रसन्न केसकर

त्याला थोडं तेल फासा. अन तो कागद खोलीत टांगुन ठेवा. चिलटं त्याला चिकटुन बसतील. नंतर तो कागद फेकुन द्या अन नवीन तेलकट कागद लावा.

विजुभाऊ's picture

16 Dec 2009 - 9:39 am | विजुभाऊ

असाच एक उपाय आहे. चेहेर्‍याला भरपूर कोल्ड क्रीम/ ग्लीसरीन्/ गोडे तेल फासा. डोळे मिटून बसा थोड्यावेळाने डोळे उघडा . चिलटे आपोआप कमी झालेली दिसतील. त्यावेळेस चेहेरा धुवून टाका. चिलटे बेसीन मधून धूवून टाका

प्रकाश घाटपांडे's picture

22 Nov 2009 - 2:26 pm | प्रकाश घाटपांडे

एक कोळी पाळा.त्याची घरात ठिकठिकाणी जाळी होउ द्यात. त्या जाळ्यात चिलटे अडकतील व नंतर तो कोळी तो खाइल. मी असे डास अडकलेले कोळ्याने त्यांना खाद्य बनवलेले पाहिले आहे. पलंगाच्या रॉडला कोळ्याचे जाळे ही उत्तम मच्छरदाणी असते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

आशिष सुर्वे's picture

22 Nov 2009 - 2:57 pm | आशिष सुर्वे

मी ना.. तुम्हा सगळ्यांचे 'मनेका' बाईंना नाव्व सांगणार्र आहे..
:T -
कोकणी फणस

बाकरवडी's picture

22 Nov 2009 - 6:20 pm | बाकरवडी

जालिंदर बाबांचा सल्ला घ्या. ते श्पेशालीस्त आहेत याबाबतीत!!!
=))

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

मदनबाण's picture

22 Nov 2009 - 10:04 pm | मदनबाण

एकेकाचे सल्ले भारी आहेत...
तरी नशिब चिल्टं डासांसारखी चावत नाहीत ते !!!

(व्ह्यारस प्रमाणे पसरणार्‍या मनुष्य प्राण्या बद्धल इतर प्राणी काय विचार करत असावेत ? :? )
मदनबाण.....

"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo

गणपा's picture

23 Nov 2009 - 2:57 am | गणपा

आगागागागायायायायाया
कित्ती कित्ती जालीम उपाय सुचवलेत लोकांनी.
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
एक काम करा हे सगळे उपाय मोठ मोठ्याने त्या चिलटांना वाचुन दाखवा ती नक्की म्हणतील.
"घर नको पण उपाय आवरा"

आशिष सुर्वे's picture

23 Nov 2009 - 2:25 pm | आशिष सुर्वे

F.B.I.
C.I.A.
N.S.A.
ह्यांना संपर्क केलात का?
९११ ला तर्री दूरध्वनी करा हो!

अगदीच त्रास होत असेल तर्र 'हिमेश रेशमियां' ह्यांचे कोणतेही गाणे घरी लावून ठेवा.. अगदी रामबाण उपाय आहे हो!!
-
कोकणी फणस

परिकथेतील राजकुमार's picture

23 Nov 2009 - 3:38 pm | परिकथेतील राजकुमार

घर बदला.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

गणपा's picture

23 Nov 2009 - 5:04 pm | गणपा

रे पर्‍या आता भाईकाकांच्या बालपणीचा जमाना राहिला नाही रे कि जेव्हा शेजार्‍याचा पोपट आवडला नाही अश्या शुल्लक कारणावरुन घर (चाळ) बदलता येत असे.
बर तरी बर त्यांनी शेजार्‍याच्या पोपटा मुळे घर बदललं इथे तर चिलटं आहेत..
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

jaypal's picture

23 Nov 2009 - 7:08 pm | jaypal

"बर तरी बर त्यांनी शेजार्‍याच्या पोपटा मुळे घर बदललं"
कलीयुग रे गणा कलीयुग.
****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

मी-सौरभ's picture

16 Dec 2009 - 12:50 am | मी-सौरभ

असे प्रतिसाद जरा जपून टाका बरं..
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

-----
सौरभ :)

आशिष सुर्वे's picture

23 Nov 2009 - 4:51 pm | आशिष सुर्वे

घर बदला.

=))
=))
=))
=))

-
कोकणी फणस

सूहास's picture

23 Nov 2009 - 5:42 pm | सूहास (not verified)

सध्या घरात फार चिल्टं झाली आहेत.>>
चिलटे म्हणायचे होते का ?

काही लोकं ह्याला केम्र असे देखील म्हणतात.>>
काही लोक. म्हणचे कोण ..पुरोगामी की विचारवंत...प्रतिगामी की राडेबाज ..निवासी की अनिवासी..संपादक की कंपुबाज....

आकाराने एकदम छोट्या असलेल्या माश्या असे वर्णन करता येईल. फळे /भाज्या काहीही चिरले की लगेच त्यावर बसतात.>>>

अरे वा !! म्हणजेच तुम्ही घरात स्वयंपाक बनविता बा !!! वा वा मग सानिकाताई एखादी झकास पाकृ टाका ना !! आणी आम्ही त्यावर बसलेल्या माशांवर रिसर्च करत बसु ..

कोणी सांगू शकेल का की ह्या त्रासातून कशी सुटका मिळेल.>>>
सोप्प आहे !! कापुर जाळा !!

सध्या वास्तव्य अमेरिकेत आहे.>>
वा वा !! छान छान !! अमेरिकेत कापुर मिळतो की नाही माहीत नाही..

त्यामुळे अमेरिकेत करता येईल असा उपाय सुचवावा.>>
वर सांगीतला आहेच....

हॅ हॅ हॅ असो !! जोक्स अपार्ट (आता वरती जोक्स नाहीत हा भाग अलहिदा..)

सानिका ताई ...तुम्ही आम्हाला (आय.टी.वाल्यांला)
कॉन्ट्रॅक्ट द्या ..कारण आम्ही (आय.टी.)वाले माश्याच मारतो...सर्वात पहिले आम्ही आमची एक टिम मिटींग घेऊ..त्यात आपल्या सर्व बाबी लक्षात घेऊ ..मग त्या प्रोजेक्ट लिडला देऊ ..मग सेल्स टिम तुम्हाला भेटेल..अर्थातच पैशाच ठरविण्यासाठी ...मग पुर्ण आराखडा बनवु..मग तो आम्ही क्वालिटी लिडला देऊ...त्याच्याकडुन मंजुरी घेण्यासाठी तो आराखडा आधी तुम्हाला दाखवुन देण्यात येईल्...त्यात तुमच्यापेक्षा आमच्याच अपेक्षा जास्त असतील ....मग मंजुरी आल्यानंतर आम्ही तो ट्रान्झिशिन लिडला देउ..मग ते आपल्याला भेट देतील अर्थातच पुन्हा पैशाच ठरविण्यासाठी.....मग आमच्यातील काही जण तिथे येऊन आपल्या माश्यांच्या अभ्यास करेल...त्यांना नेमके काय हवे आहे...त्या ईथेच का येतात ..चिरलेल्या भांज्यावरच का बसतात...वगैरैचा पुर्ण अभ्यास केला जाईल ..नंतर ते पाजळलेले ज्ञान घेउन आम्ही ईकडे परतु ..मग पुन्हा आपल्या माश्यांचा ईतरेजणांबरोबर अभ्यास सुरु होईल...त्याला काही सामान्य माणसे के.टी. असही म्हणतात ...ते झाल्यावर ..खरोखरच्या माश्या मारायला सुरु करु..पण त्या आधी ...आपण आपल्या माश्या कुठे आहेत कश्या आहेत हे सांगायला हवे ..त्याकरिता आम्ही एक टुल बनवु .....त्याला अतिसामान्य माणसे ..टिकेटिंग टुल म्हणतात...अर्थातच खर्च तुमचाच..मग आम्हाला जसे जसे कळेल तसे तसे आम्ही आपल्या माश्या मारायला सुरु करु ..अर्थातच आम्हाला साधारण ह्या प्रक्रियेला सहा महिने लागतील आणी सर्व खर्च तुमचा....पहा कसे ते...

त्यापेक्षा राव कापुर जाळा की !!!

सू हा स...

गणपा's picture

23 Nov 2009 - 6:13 pm | गणपा

>>सोप्प आहे !! कापुर जाळा !!
हे आम्ही कपुर जाळा असे वाचले...
क्षणभर सिनेसृष्टीतली तमाम भेदरेलेली कपुर मंडळी डोळ्या पुढुन सरहुन गेली.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))