पहिल्या भागाच्या प्रतिसादा बद्द्ल धन्यवाद...
श्री क्षेत्र अक्कलकोट.
भक्त निवासात ब्यागा टाकुन आम्हि मंदिराकडे निघालो. दुकानांच्या गर्दितुन सरळ वाटेने मुख्य मंदिरात आलो. डोळे भरुन स्वामींचे दर्शन घेतले. दर्शन होईतो रात्रीच्या आरतीची वेळ झाली होती म्हणुन मंदिराच्या आवारात बसलो. मुख्य मंदिराच्याच बाहेर वटव्रूक्ष आहे. ती स्वामींची देहविसर्जनाची जागा. तिथे पादुकास्थापुन त्यावर एक घुमटी बांधली आहे. त्यावर डोके टेकवता येते. इथे पण स्टीलची तटबंदी आहेच. आरतीची वेळ झाल्यामुळे सेवकवर्गाची धावपळ सुरु झाली. मंदिराच्या आवारात एका बाजुला पुरुष आणी दुसर्या बाजुला स्त्रीयां. सर्वांना खाली बसण्याचा आदेश आला. सर्व दरवाजे आणी स्टील्च्या तटबंद्या बंद झाल्या. मला मात्र वटव्रूक्षाच्या बाजुलाच जागा मिळाली जेथुन मुख्य मुर्तींचे दर्शन होत होते. सगळे जण शांत होऊन आरती सुरु होऊन आरती सुरु होण्याची वाट बघु लागले. अचानक एक सेवेकरी एका भक्तावर खेकसला..... "आता दर्शन नाहि. आरती संपल्यावर घ्या. " त्या बिचार्या भक्ताला त्या पादुकांवर डोके टेकायचे होते, पण काय करणार बिचारा... गपचुप एका बाजुला जाऊन बसला.
बराच वेळ झाला तरी आरती सुरु होईना. तितक्यात एक घोळ्का मंदिरात शिरला. त्यात अग्रभागी एक सफेद कपड्यात असलेला इसम होता. बहुतेक राजकारणी किंवा मंदिर समिती पे॑कि असावा. त्यामागोमाग एक सुटाबुटातील व्यक्ती सोबत एक बाईसाहेब, एक छोटा मुलगा आणि चार पाच मंडळी. थोडक्यात कोणी बडी आसामी असावी. मग काय सांगता. सर्व दरवाजे धडाधड ऊघडले गेले. मंडळी आत गेली. दर्शन करुन बाहेर आली. बाहेरच्या त्या घुमटी भोवतीची स्टीलची तटबंदी पण ऊघडली गेली आणी त्या सर्वांनी तिथे डोके पण टेकवले. मला मात्र त्या मघाशच्या माणसाची आठवण झाली आणी स्वामी चरित्रातला प्रसंग आठवला.... एकदा अक्लकोटचे राजे स्वामींच्या दर्शना साठी आले. येताना सगळा सरंजाम घेऊन हत्तीवर बसुन आले. आल्या बरोबर स्वामींच्या चरणाशी लागले. स्वामींनी राजांचा मुकुट उडऊन टाकला राजांच्या एक थोतरीत मारली आणी म्हणाले 'राजा असशील तर आपल्या घरी माझ्या समोर नाहि'. त्या दिवसा पासुन राजा स्वामींसमोर येताना सगळा सरंजाम दुर ठेऊन यायचा..
असो.....
श्री क्षेत्र तुळ्जापुर.
अक्कलकोटहुन आमचा मुक्काम हलला तो सोलापुर मार्गे तुळ्जापुरला. दिवस होता नवरात्रीची दुसरी माळ म्हणजे अश्विन शुध्द व्दितिया. भरपुर गर्दि अपेक्षीत ठेऊनच आम्हि तिथे गेलो होतो. देऊळाची सुंदर तटबंदि आणि प्रत्येक महाद्वाराला दिलेली थोर योध्द्यांची नावे. धातुसंशोधक यंत्रातुन आत जाऊन मुख्य मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करते झालो. एक मोठा घोळ्का ऊभा होता. रांग कुठुन सुरु होते असे विचारले तर हिच रांग म्हणुन ऊत्तर मिळाले. थोड्याच वेळात धक्काबुक्की, घुसाघुशी सारखे नेहमीचे रांगेतले नियम पाळायला लोकांची सुरुवात झाली. त्या मुळे तिथे असलेला पोलिस पिसाळ्ला. त्याने सगळ्यांना बडवायला सुरुवात केली. बायका, लहान मुले, म्हातारी माणसे सग्ळ्यांना त्याचा प्रसाद मिळाला. ह्या सगळ्याला कंटाळुन आम्ही त्या गदारोळातुन बाहेर पडलो आणि एका एल सी डी वर देवीचे थेट दर्शन होते तिथेच जाऊन नमस्कार केला. तेव्हडयात बाजुला ऊभा असणारा एक पुजारी सद्रुश्य माणुस आमच्या कडे आला आणि म्हणाला ३५० रु द्या थेट आत देऊळात नेऊन दर्शन देतो. हेच होते तेथील गे॑र व्यव्स्थेचे कारण. कळसाला आणी त्या माणसाला नमस्कार करुन खिन्न मनाने पंढरपुरच्या प्रवासाला निघालो.
प्रतिक्रिया
20 Nov 2009 - 7:38 pm | चंबा मुतनाळ
उत्तम लेख. आपण असल्या स्थानांपर्यंत जायची तसदी घेतलीत ह्याबद्दल आपले कौतूक. आम्ही कुठल्याही गावात गेलो तर सगळ्यात उपेक्षीत असलेल्या देवळात जाऊन १० मिन्टे टेकतो. गॅरेंटीड समधान मिळते.
- चंबा मुतनाळ
20 Nov 2009 - 7:52 pm | फ्रॅक्चर बंड्या
अशा प्रसिद्ध मंदिरांपेक्षा बहुतेकांना माहीत नसलेली आणि ज्या मंदिरांचे व्यापारीकरण झालेले नाही अशी मंदिरे फार छान/सुंदर्/स्वच्छ असतात..
रतनगड चे अमृतेश्वर मंदिर बघा ..मन कसे प्रसन्न होते...
20 Nov 2009 - 8:46 pm | प्रभो
अशा प्रसिद्ध मंदिरांपेक्षा बहुतेकांना माहीत नसलेली आणि ज्या मंदिरांचे व्यापारीकरण झालेले नाही अशी मंदिरे फार छान/सुंदर्/स्वच्छ असतात..
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
21 Nov 2009 - 9:54 am | सोत्रि
देव दर्शनाने मन प्रसन्न करणे आणि आत्मिक समाधान मिळवणे हा हेतु असतो.
परंतू आत्तापर्यंतचा अनुभव प्रशुंच्या अनुभवाप्रमाणेच होता.
प्रशुंनी गर्दीतली घुसाघूसी फक्त किहीलीय. अस्वच्छता ही गहन समस्या आहे असे मला वाटते.
मी अत्तापर्यंत भेट दिलेल्या एकाही तीर्थक्षेत्री मला पवित्र असे कधीही वाटले नाही, त्यामुळे प्रसन्न वाटले नाही, त्यामुळे आत्मिक समधान तर अजिबात नाही.
ह्याउलट अनुभव मला चर्च मधे येतो आणि विषेश म्हणजे चर्चमधे जाताना वहाणा काढाव्या लागत नसूनही स्व्च्छता वादातीत असते. चर्च मधल्या गहन शांततेमुळे देवशी संवाद साधता येउन आत्मिक समधान मिळते.
21 Nov 2009 - 10:29 am | स्वानन्द
वरील सर्व प्रतिसादांशी सहमत.
चर्च बद्दल तेवढं मी खूप सांगू शकणार नाही. कारण प्रत्यक्षात मी चर्च मध्ये २-३ वेळाच गेलो आहे.
आणखी एक उपाय असा आहे की... त्या त्या देवाच्या ठरलेल्या दिवशी न जाता दुसर्याच कुठल्यातरी दिवशी दर्शनाला जाणे. म्हणजे...विठ्ठलाच्या दर्शनाला जाताना एकादशी नाही ना हे पाहून जाणे. शिवाय जमल्यास रविवार सोडून इतर दिवशी जाणे.
अर्थात हे त्यांच्यासाठीच, ज्यांना देवळात आत्मीक समाधानासाठी जायचं आहे ( केवळ नियम, नवस वगैरे म्हणून नाही. )
शिवाय स्वाच्छतेचा मुद्दा हा शिल्लक राहतोच :(
--स्वानन्द
वनी आनन्द, भुवनी आनन्द, मिपा वर स्वानन्द !
21 Nov 2009 - 5:22 pm | स्वाती२
आपण जेव्हा चर्च आणि देवळातील स्वच्छता, शिस्त याची तुलना करतो तेव्हा एक गोष्ट विसरतो. चर्च एखाद्या ऑफिस सारखे चालवले जाते. चर्चच्या सभसदांना दर महिना ठरावीक रक्कम चर्चसाठी द्यावी लागते. चर्च स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घ्यावी लागते. आठवड्याची कामे नेमलेली असतात. नारळ फोडणे, हळद-कुंकू, फुले या मुळे होणारा कचरा नसतो. आपल्या इथली देवळे चालवलीच वेगळ्या पद्धतीने जातात. त्यातुन भ्रष्टाचार आपल्या पाचवीला पुजलेला. त्यामुळे भाविकांची गर्दी असणार्या देवळात तो आढळला तर नवल वाटायला नको. तरीही गावाकडची लहान देवळे छान स्वच्छ ठेवतात. दर्शनही निवांतपणे होते.
21 Nov 2009 - 5:42 pm | jaypal
हिमाचल प्रदेशातील देउळे उपरोक्त अनुभवापेक्षा खुप चांगली वाटली.
हारतु-या साठी कुणी मागे लागत नाही. भिकारी एक ही दीसला नाही. स्वछता वाखणण्या जोगी. हिमाचल प्रदेश म्हणजे देवभुमीच सगळ (देवळातलं व देवळाबाहेरचा निसर्ग) वातावरण सुंदर वाटल. मन प्रसन्न झाल. मजा आली.
बाकी देव काही भेटला नाही. माणसांची गर्दी वाढल्याने बहुदा त्याने पळ काढला असावा."मन प्रसन्न करणे आणि आत्मिक समाधान मिळवणे" हा हेतु असेल तर विपश्यना एक सुंदर उपाय ठरु शकेल.
भवतु सब्ब मंगल
___________________________________________________
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
21 Nov 2009 - 8:45 pm | हरकाम्या
माझा अक्कलकोटचा अनुभव अगदी चांगला आहे. मी परवाच म्हणजे १७/११/२००९ ला गेलो होतो . दर्शन अतिशय उत्तम रीतिने झाले.बाकी तुळजापुरचा ५ते ६ वर्शापुर्वीचा अनुभव अतिशय वाइट होता.
समर्थांची क्रुपा दुसरे काय.