असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय?
आमच्या तमिऴभाषेत लहान मुलांसाठी काही विशिष्ट काव्यप्रकारातील बालगीते रचली जातात. लहान मुले ही गीते अत्यानंदाने गाताना दिसतात. ही गीते साधारणत: शब्दभांडार समृद्ध व्हावे ह्या उद्देशाने केली गेली असली तरी विशेषतः नीतिशास्त्राची तोंडोळख करवून देणे हाही एक उद्देश त्यांत असावा. त्यापैकी आठवणींतले एक बालगीत इथे देतो आहे. असे पाहतां ह्या बालगीतात फार विशेष असा काही अर्थ नाही. तरीही एक लक्षात घेण्यायोग्य वस्तु अशी की ह्या बालगीताचा काव्यप्रकार हा खास 'तमिऴ' आहे.
मूळ तमिऴ लिपीमध्ये
देवनागरीमध्ये लिप्यंतरीत
मराठीभाषेमध्ये भावार्थ (शब्दार्थ नाही)
அம்மா இங்கு வா வா
अम्मा इङ्गु वाऽ वा
आई इकडे ये ये
ஆசை முத்தம் தா தா
आसै मुत्तम् ताऽ ता
एक मुका घे घे
இலையில் சோறு போட்டு
इलैयिल् सोऱु पोऽट्टु
केळीच्या पानावर कालवलेला भात वाढ
ஈயைத்தூர ஓட்டு
ईयैत्तूरऽ ओऽट्टु
माशीस दूर पळव
உன்னைப்போல நல்லார்
उऩ्ऩैप्पोलऽ नल्लार्
तुझ्यासारखी छान छान
ஊரில் யாருமில்லை
ऊरिल् यारुमिल्लै
सार्या गावी कोणी नाही
என்னால் உனக்குத்தொல்லை
ऎऩ्ऩाल् उऩक्कुत्तॊल्लै
तुला कमीपणा येईल असे माझ्याकडून
ஏதுமிங்கு இல்லை
एदुमिङ्गु इल्लै
कधीही काहीही होणार नाही
ஐயம் இன்றிச்சொல்வேன்
ऐयम् इऩ्ऱिच्चॊल्वेऩ्
खात्रीपूर्वक सांगतो
ஒற்றுமை என்றும் உயர்வாம்
ऒऱ्ऱुमै ऎऩ्ऱुम् उयर्वाम्
एकी हेच बळ असे म्हणतांत
ஓதும் செயலே நலமாம்
ओतुम् चॆयले नलमाम्
सत्कार्य करणे चांगले असते असे म्हणतांत
ஔவை சொன்ன மொழியாம்
औवै चॊऩ्ऩ मॊऴियाम्
जुनेजाणते लोकही तेच सांगतात
அஃதே எனக்கு வழியாம்
अक्दे ऎऩक्कु वऴियाम्
त्यांचे वचन मला नेहमी शिरोधार्य आहे
बारकाईने निरीक्षण केल्यास असे लक्षांत येईल, की ह्या काव्यातील प्रत्येक ओळीचा आरंभ हा स्वरांनी झालेला आहे. काव्यातील प्रत्येक पंक्ती ही दोन किंवा अधिकाधिक तीन शब्दांनी सिद्ध आहे. हे शब्दही अधिकाधिक चार ते पाच अक्षरांनी सिद्ध आहेत. ह्या काव्यलेखनप्रकारामुळे अशा काव्यपंक्तींस एक विशिष्ट नादानुसरणी प्राप्त होवून मुलांस स्वरे मनःपाठ होतात. त्यामुळे तमिऴभाषेवरील प्रीति अधिकच वृद्धिंगत होते, हाही एक अतिमहत्त्वाचा उद्देश आहे. खाली तमिऴ स्वरे दिली आहेत.
அ अ
ஆ आ
இ इ
ஈ ई
உ उ
ஊ ऊ
எ ऎ
ஏ ए
ஐ ऐ
ஒ ऒ
ஓ ओ
ஔ औ
அஃ अक्
हे काव्य हे ह्या तमिऴ काव्यप्रकाराचे केवळ एक उदाहरण म्हणून दिले आहे. ह्याप्रकारची वर्णमालेची क्रमवारिता पाळली गेलेली काव्यरचना तमिऴभाषेमध्ये 'क का कि की' ते 'इन इना इनि इनी' इत्यादी सार्या व्यंजनांपासूनदेखील होते. निरनिराळ्या काव्यप्रकाराचे विषयवस्तु निरनिराळे असू शकतांत. मराठीभाषेमध्ये ह्याप्रकारचे काव्य आहे काय ते जाणून घेण्याची इच्छा आहे. पूर्वी एकदा एका मित्राने श्री. शिवाजीमहाराजांचे आध्यात्मिक गुरु श्री. रामदासन ह्यांनी रचलेले एक मराठीभाषेतील काव्य पाठविले होते. (ते काव्य पूर्णपणे स्मरत नाही, तथापि त्यात विजापूराचा सरदार निघाला असल्याने काळजी घ्यावी असा संदेश असल्याचे मात्र स्मरते.) परंतु ते एक राजकीय काव्य होते, आणि त्यात वर्णमालेची क्रमवारी पाळली गेली नव्हती.
तरी मराठीभाषेमध्ये ह्या प्रकारचे काव्यप्रकार असतील तर ते कळवावेत.
धन्यवाद.
हैयो! हैयैयो!
-
प्रतिक्रिया
20 Nov 2009 - 3:01 pm | शरदिनी
कविता खूप आवडली.
मला नादमय कविता फार आवडतात..
तुमच्या टारझन नावाच्या मदतनीसाचे सुद्धा अभिनंदन
20 Nov 2009 - 3:25 pm | टारझन
खुलाश्याबद्दल धन्यवाद ,
आपलीही आम्हाला मदत झाली आहे .. कधी आम्ही तुमची .. .तुम्ही आमची मदत करणे .. ह्यावरंच ही दुनिया चालते ...
बाकी लेख भारी झाला आहे . तमीळ गाणी कळत नाहीत ..गुणगुनताही येत नाहीत .. पण ऐकायला ( आणि पहायला) अंमळ मौज येते ;)
- टारो टारैय्यो
(वरचं क्रियेशन चतुरंगाचं ;) )
20 Nov 2009 - 3:08 pm | विसोबा खेचर
अतिशय सुंदर उपक्रम..
'केळीच्या पानावर कालवलेला भात वाढ'आणि 'माशीस दूर पळव' ही वाक्ये आवडली! :)
अजूनही येऊ द्या साहेब..
सर, मिपा इज ऑल युवर्स!
साहित्य, मग ते कुठल्याही भाषेतलं असो, त्यावर मिपावर मराठीतनं चर्चा करायला, त्यावर आस्वादात्मक, रसग्रहणात्मक काही लिहिण्याला परवानगीची गरज नाही.. उलटपक्षी, त्यामुळे मिपाच अधिकाधिक समृद्ध होते आहे..
तात्या.
22 Nov 2009 - 8:11 am | निमीत्त मात्र
मलाही ही ओळ आवडली! केळीच्या पानवर वाढलेले अंजीर..आपलं भात वाढ.. आणि चिलटास दूर पळव!
20 Nov 2009 - 3:16 pm | गणपा
हैयो! हैयैयो मस्त उपक्रम आहे,
अजुनही अश्या कविता ऐकायला / वाचयला आवडतील.
20 Nov 2009 - 3:31 pm | हैयो हैयैयो
धन्यवाद.
श्री. तात्या आणि श्री. गणपा, आपण आपल्या प्रतिसादात उपक्रम हा शब्द उपयोजिला आहे, त्यावरून: वास्तविक पाहता हा लेख उपक्रमावर डकवावा अशी इच्छा झाली होती. परंतु तेथे कविता वर्ज्य आहे असे कळले, म्हणून येथे डकवला. अधिक एक कारण म्हणजे, श्री. ३_१४, श्री. छोटा डॉन तसेच इतर काही सदस्यांनी तमिऴभाषा शिकण्यात रस दाखविला त्यामुळे लेखनास उत्साह आला. ह्या सार्यांस धन्यवाद.
हैयो हैयैयो!
20 Nov 2009 - 3:42 pm | धमाल मुलगा
ऐयम् इऩ्ऱिच्चॊल्वेऩ् ओतुम् चॆयले नलमाम् :)
भारी आहे राव..चला आता तामिळही शिकता येईल :)
-(कधी काळी "कुंजुम कुंजुम" गाणं ऐकलेला) ध.
20 Nov 2009 - 3:48 pm | नंदन
--- मोरोपंतांनी रामायण वेगवेगळ्या प्रकारांनी एकूण १०८ वेळा लिहिले. त्यातल्या एका रामायणातल्या सार्या श्लोकांचे पहिले अक्षर श्री-रा-म-ज-य-रा-म-ज-य-ज-य-रा-म असे आहे. ही माहिती स्मरणातून देत आहे (इयत्ता नववीत मराठीच्या तासात मॅडमनी दिलेली माहिती) तेव्हा चू.भू.द्या.घ्या.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
20 Nov 2009 - 4:04 pm | गणपा
आवांतर : छान माहिती दिलीत नंदनशेठ..
जालावर कुठे वाचायला मिळेल का हो हे ?
20 Nov 2009 - 3:50 pm | भाग्यश्री कुलकर्णी
चांगली रचना आहे यातुन तामिळ शिकता आले तर उत्तमच.
20 Nov 2009 - 3:59 pm | सूहास (not verified)
असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? >>>
माहीत नाही ..
प्रतिसाद संपला...
ढन्यवाद..
सू हा स...
20 Nov 2009 - 4:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
लहान मुलांसाठी लिहीलेली मराठीमधेही अर्थातच अनेक गाणी आहेत; पण असा काही संबंध कधी शोधायचा प्रयत्नच केला नाही. त्यामुळे आत्तातरी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही.
पण असा तुलनात्मक अभ्यास केल्यास नवी भाषा शिकायला मदत होते असं भाषापंडीत म्हणतात.
तुमच्याकडून आणखीही काही माहीतीपूर्ण लेख येतीलच अशी आशा आहे, शिवाय थोडंफार काय-कसंकाय पुरतं तमिळ शिकण्याची इच्छा आहेच.
अदिती
20 Nov 2009 - 7:01 pm | हैयो हैयैयो
विनंती
हे काव्य वाचून बरीच वर्षे झाली आहेत. ते गूगल वर मिळेल असे वाटत नाही. तरी येथील मान्यवर सदस्यांस एक विनंती की येथे उल्लेखिलेले श्री. रामदासांचे काव्य येथे उद्धृत करावे.
धन्यवाद.
हैयो हैयैयो!
20 Nov 2009 - 7:08 pm | धनंजय
छान लय आहे - मुलांना खेळता-खेळता सहज तोंडपाठ होईल असे गीत आहे.
मराठीत अशी बालगीते असावीत. पटकन आठवत नाहीत. पण अ-आ-इ-... अशा क्रमाने ओळी असलेले प्रकारचे एक बालगीत मी मागे मिसळपावावर दिले आहे - http://www.misalpav.com/node/741
पण याची स्फूर्ती कुठल्यातरी वाचलेल्या (आणि विस्मृतीत गेलेल्या) कवितेतून मिळाली असणार.
"वि-जा-पु-र-चा-स-र-दा-र..." अशी ओळींची पहिली अक्षरे माळून गुप्त संदेश देणारी कविता पुष्कळांना ओळखीची असेलच. पण ती बालकविता नाही.
तमिऴ काव्याची अशीच ओळख देत राहावे, अशी आग्रहाची विनंती.
20 Nov 2009 - 8:39 pm | हैयो हैयैयो
श्री. धनंजय, नमस्कार!
वरील गीत आपण स्वतः रचले आहे काय? ह्यात मला अपेक्षित असल्याप्रमाणे स्वर हे शब्दारंभ ह्या स्वरूपात येत नाहीत, तरीही ते छान आहे ह्यात शंका नाही! धन्यवाद!
जसे शक्य होईल तसे अवश्य देईन. असो. आपण 'तमिळ' असे न लिहिता 'तमिऴ' असे लिहिल्याचे निरीक्षण केले. आवडले!
हैयो हैयैयो!
20 Nov 2009 - 8:18 pm | चतुरंग
विवेके करावे कार्य साधन । जाणार नरतनू हे जाणोन ।
पूडील भविष्यार्थी मन । रहाटेचि नये ।
चालु नये असन्मार्गी । सत्यता बाणल्या अंगी ।
रघुवीरकृपा ते प्रसंगी । दासमहात्म्य वाढवी ।
रजनीनाथ आणि दिनकर । नित्य करिती संचार ।
घालिताती येरझार । लाविले भ्रमण जगदिशे ।
आदिमाया मूळभवानी । हे सकल ब्रह्मांडाची स्वामिनी ।
येकान्ती विवेक करोनी । इष्ट योजना करावी ।
सर्व अधोरेखित शब्द एकापुढे एक आणले असता संदेश मिळतो -
विजापूरचा सरदार निघाला आहे.
हैयो तुमचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. कविता आवडली. अजून अशाच बालकविता द्याव्यात ही विनंती. माझ्या मुलाला वाचून दाखवेन आणि त्याबरोबर माझेही वेगळी भाषा शिकणे होईल कदाचित! ;)
चतुरंग
20 Nov 2009 - 8:29 pm | हैयो हैयैयो
अनेकानेक धन्यवाद!
श्री. चतुरंग, अनेकानेक धन्यवाद!
असे श्री. रामदासांना श्री. शिवाजीराजांस सुचवावयाचे असावे असे वाटले..! ही बालकविता निश्चितच नाही, परंतु मोठी रंजक आहे! धन्यवाद!
हैयो हैयैयो!
21 Nov 2009 - 9:38 pm | jaypal
आनेक रामदासी गावोगाव फिरुन बातम्या काढीत असत आणि "त्या गुप्त बातम्या"
अश्या प्रकारच्या (सिक्रेट कोड) काव्या मार्फत महारांजाना पुरविल्या जात असत.
****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
22 Nov 2009 - 6:43 am | Nile
हे रामदासांनीच शिवाजी महाराजांना लिहलेले आहे. ह्यावर एका इतिहास संशोधकाशी पुर्वी चर्चा केली(म्हणजे मी ऐकणे आणि त्यांनी बोलणे, अर्थातच) होती. त्याच वेळ शिवाजी महाराजांची जन्मतारीख नक्की कशी ठरवली गेली आणि इतर काही पुरावे त्यांनी मला दाखवले होते त्यात हा एक होता. :)
21 Nov 2009 - 10:36 am | मदनबाण
चतुरंगरावांची प्रतिक्रिया वाचुन असाच एक काव्य प्रकार इथे देत आहे.
http://www.shrivasudevanandsaraswati.org/vinayakastotra.htm
http://www.shrivasudevanandsaraswati.org/samantrakam.htm
मदनबाण.....
आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम् ।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् |
20 Nov 2009 - 8:24 pm | अक्षय पुर्णपात्रे
श्री हैयैयो, कविता आणि त्या अनुषंगाने केलेल्या विवेचनाबद्दल धन्यवाद. (वरील गाण्याचा श्राव्य दुवा उपलब्ध असल्यास तो लेखात द्यावा ही विनंती.) रामदासांच्या काव्यातील ओळी येथे दिल्याबद्दल श्री चतुरंग यांचेही आभार.
_________________
As an internet discussion grows longer, the probability of a comparison involving Nazis or Hitler approaches 1.
-Godwin's law
20 Nov 2009 - 8:29 pm | jaypal
मानलं भौ तुम्हाला. आपण चतुरस्त्रही आहात.
हैयो! हैयैयो हैयो! हैयैयो उपक्रम आवडला
**************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
20 Nov 2009 - 8:34 pm | चतुरंग
मी ग्रेट वगैरे नाही. मला फक्त पहिल्या चारच ओळी आठवत होत्या त्या गुगलून बाकीच्या मिळाल्या! ;)
(अर्धसत्य)चतुरंग
20 Nov 2009 - 8:58 pm | गणपा
मोठी माणसं असच आपल मोठेपण विनम्र पणे नाकारतात :).
रंगाशेठ, अहो ते आम्च्या साठी शोधुन काढायचे कष्ट उपसलेत हे का थोडे?
-मंडळ आभारी आहे.
20 Nov 2009 - 8:43 pm | jaypal
जी हुजुर आपला हुकुम गुगलबाबा कि जय


गुगल लोगो शोधताना गुगलीन बाई पण होत्या (टी शर्ट घालुन) पण फोटो टाकायचा मोह आवरला
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
20 Nov 2009 - 9:42 pm | अभिरत भिरभि-या
वरिल वाक्यांत चक्क मराठीशी नाळ सांगणारे दिसले. यांचा कदाचित संबंध नसेलही. पण एक गेसवर्क..
मुत्तम् -> मुका
नल्ला -> चांग्ला
उर -> पूर (गाव या अर्थी)
उन -> उणे (कमीपणा)
उयर्वाम् -> उलवता (कोकणीतले - बोलणे या अर्थी)
मॊऴि -> भाषा / बोली (मराठमोळी मधला मोळी या तमिऴ शब्दावरून आला असे वाचल्याचे स्मरते)
चॊऩ्ऩ -> जुने ???
अवांतर: आपण पोटापाण्याकरता महाराष्ट्रातून तामिळनाडूत स्थलांतर केले व म्हणून तमिळ शिकलात वा तंजावर आदी भागात राहणार्या मराठी जनांपैकी आहात??
20 Nov 2009 - 10:24 pm | हैयो हैयैयो
पुनर्स्वस्थीकरण.
मुत्तम् -> मुका, चुंबन
नल्लार -> चांगल्या व्यक्ती (अनेकवचन)
ऊर -> पूर (गाव या अर्थी)
उन -> तुझे
उयर्वाम् -> उंच आहे असे म्हणतांत.
मॊऴि -> भाषा (बोली नव्हे)
चॊऩ्ऩ -> सांगितलेले / चॊऩ्ऩम = स्वर्ण.
हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. अधिक माहितीसाठी जवळील पुस्तकविक्रेत्याकडे तमिऴ शब्दकोश मिळेल, तो अभ्यासावा.
श्री. विश्वनाथ खैरे ह्यांनी तमिऴभाषा ही मराठीभाषेची आई आहे ह्या विषयावर अनेक विद्वत्तापूर्ण निबंध लिहिले आहेत, तेही अधिक माहितीसाठी अभ्यासावेत.
हैयो हैयैयो!
20 Nov 2009 - 11:01 pm | शशिकांत ओक
नाडी ग्रंथाच्या साहित्यमूल्याबाबत चर्चा
मित्र हो,
नाडी ग्रंथ म्हटले की काहींची नाके मुरडायला लागतात. पण...
कुटलिपी तज्ञ श्री. हैयोंच्या कूटलिपीच्या लेखानंतर मिपावर श्री. घाटपांडेंनी आमच्या मते नाडी ग्रंथ हे लोकसाहित्य आहे असे मत व्यक्त केलेले आहे. आज विसोबा खेचरांनी श्री.हैयोंना ह्या लेखावर प्रतिक्रियेत साहित्य, मग ते कुठल्याही भाषेतलं असो, त्यावर मिपावर मराठीतनं चर्चा करायला, त्यावर आस्वादात्मक, रसग्रहणात्मक काही लिहिण्याला परवानगीची गरज नाही. असे लिहिले आहे.
त्यामुळे मला नाडी ग्रंथाच्या साहित्यमूल्याबाबत चर्चा मिपावर झडावी असे वाटून प्रतिसाद देत आहे.
नाडीपट्टींमधले साहित्य हे "साहित्य" ह्या अर्थाने काव्यरुप साहित्य आहे हे माझेही मत आहे. त्यामुळे मी श्री. हैयोंना असे सुचवीन की नाडीग्रंथातील काव्याच्या अभ्यास करून नाडी ग्रंथ साहित्यातील विविध वैशिष्ठ्ये व बारकावे मिपाच्या चतुर व गुणग्राही वाचकांना सादर करावेत.
अनेकांना माहित असेल की नाडी ग्रंथातील प्राचीन तमिळ काव्य आहे. नाडी वाचक ते काव्य गाऊन सांगतात. गायनात जसे बारकावे असतात तसेच अनेक बारकावे या काव्यात असून एका बाजूला स्वर तर दुसऱ्या बाजूला शब्द माधुर्य, लय, प्रासादिकता साधून व्यक्तीला अनुलक्षून त्याचे अचुक वर्णन करणारी शब्दरचना, एका शब्दातून अनेक अर्थांची रेलचेल व अतिकमी अक्षरात सुचक वा गहन अर्थ ठासून भरून ठेवलेला आहे.
सध्याच्या काळात प्रचलित संकल्पनांना अचुक शब्दांनी काव्याच्या मालेत गुंफून, अलंकार, उपमा, रुपकामधून जातकापर्यंत पोचवताना त्यांनी दाखवलेली कमाल यथावकाश श्री हैयो उकलून दाखवतील तर काय बहार येईल?
एक छोटेसे उदाहरण देतो. 'विमान' ही संकल्पना गेल्या १०० वर्षांत प्रचलित झाली. त्याआधी सामान्यपणे ती कवी कल्पना होती असे मानतात. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हवाईदले अस्तित्वात आली. नाडी ग्रंथांत हवाईदलातील विमानांचा उल्लेख 'अवकाशात तीव्रगतीने जाऊन शत्रूवर आग ओकणाऱ्या वाहनांच्या दळ' असा केला जातो. 'ड्रायसेल बॅटरीचा' उल्लेख 'बीज निर्मिती करणा नाविन्यपुर्ण वस्तू' किंवा कॉम्प्युटरसारख्या वस्तूंचे वा नवीन रोगाचे उल्लेख विचार करायला लावतात.
या ग्रथांतील तमिलही काँटेंपररी तमिलच्यापेक्षा वेगळी आहे. त्यात संस्कृतोत्भवी शब्दांना ऐकून तमिळांना देखील चकीत व्हायला होते.
याशिवाय नाडीग्रंथ कर्ते मानवी बुद्धीचा तोकडेपणा सुचवताना विनम्रपणे म्हणतात की ही त्या ईश्वराची म्हणजे 'शिवशक्तीची कृपा' - 'अरुळेडु' आहे, ज्यामुळे आम्हाला हे काव्य स्फुरले.
नाडी ग्रंथांची चेष्टा मस्करी करून ओकांना खिजवायचे या पलिकडे जाऊन आता या साहित्याकडे बघायची इच्छा जागृत व्हावी यासाठी श्री. हैयोंनी आपली लेखणी उचलावी अशी मी त्यांना कळकळीची विनंती करतो.:?
नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत
21 Nov 2009 - 12:03 am | अक्षय पुर्णपात्रे
श्री ओक यांचा वरील प्रतिसाद या धाग्यावर अस्थानी आणि अनाहूत वाटतो. श्री हैयैयो यांना विनंती करायची असल्यास त्यांना खरड अथवा व्यनिने कळवावे. तात्यांच्या प्रतिसादावर भाष्य करायचे असल्यास फार तर उपप्रतिसाद म्हणून लिहावे किंवा वेगळा धागा काढावा पण श्री हैयैयो यांनी लिहिलेल्या लेखावर एक अक्षरही भाष्य न करता आपले स्कोअर सेटल करण्यासाठी उगीचच कोठेही नाडीवरील प्रतिसाद टंकू नये.
(आपल्या प्रतिसादातील मतांविषयी आक्षेप नाही पण ते येथे नोंदवल्याबद्दल निश्चितपणे आक्षेप घेत आहे.)
-------------------
As an internet discussion grows longer, the probability of a comparison involving Nazis or Hitler approaches 1.
-Godwin's law
21 Nov 2009 - 1:31 pm | हैयो हैयैयो
नमस्कार,
श्री. अक्षय सर, नमस्कार.
आपण आपले स्कोर सेटल करण्याकरिता अशी अभद्र भाषा वापरता हे पाहून खेद झाला. मी आपणांस एक अभ्यासक म्हणून ओळखू इच्छित होतो त्या माझ्या इच्छेस आपण तडा दिला आहे. आपल्या प्रतिसादातील आपल्या वैयक्तिक मतांविषयी आक्षेप नाही; परंतु तो नोंदविताना आपण अत्यसभ्य भाषाप्रयोग केल्याबद्दल निश्चितपणे आक्षेप घेत आहे.
अलिकडेच वयाने, ज्ञानाने, अनुभवाने खूप वरीष्ठ असणार्या एका मिपाकराबद्दल मिपावर अत्यंत खालच्या पातळीवर काही लेखन केले गेले/प्रतिसाद दिले गेले याची मिपाचा सदस्य ह्या नात्याने मला अत्यंत शरम वाटते! मिपावर असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून थट्टा-मस्करीची लिमिटस् कुठे सुरू होतात, कुठे संपतात याची धुसर रेषा ओळखणार्या संपादकांची मिपाला या क्षणी अत्यंत गरज आहे.....
---
श्री. ओक सर, नमस्कार.
नाडीपट्टींमधले साहित्य हे 'काव्यरूप साहित्य' ह्या अर्थाने साहित्य असल्याचे आपले मत हे बरोबरच आहे. मीही यथाशक्ती यथामती नाडिग्रंथांमधील भाषेबाबत - काव्ययोजनेबाबत भाषाशास्त्राभ्यासास अनुसरून माझी स्वतंत्र मते मांडणार आहे. परंतु येथे मिपावर तो विषय नुसता ऐकला तरी विंचू चावल्यागत वागणारी काही मंडळी आहेत हे आपणही जाणून आहात. त्याचप्रमाणे येथे काही "मनसेप्रेमी मराठी" मंडळीही आहेत. म्हणून; तमिऴभाषेविषयी चर्चा करताना जरासे चाचपडतच बोलावे लागते!
असो. श्री. विसोबा खेचरांनी परवानगी लागणार नाही असे लिहिले आहे, त्याबद्दल त्यांस धन्यवाद नोंदवून, मी जशी वेळ होईल तशी लेखन करेन असे आश्वासन देतो.
धन्यवाद.
हैयो हैयैयो!
21 Nov 2009 - 8:10 pm | अक्षय पुर्णपात्रे
श्री हैयैयो, आपला आक्षेप मान्य आहे. प्रतिसादातील 'तो' शब्दप्रयोग सभ्य संवादास मारक आहे. श्री ओक यांच्याकडे दिलगीरी व्यक्त करून संपादकांनी 'नाडी सोडू नये' ऐवजी 'नाडीवरील प्रतिसाद टंकू नये' असा बदल करावा, अशी विनंती करतो. धन्यवाद.
________________________________
As an internet discussion grows longer, the probability of a comparison involving Nazis or Hitler approaches 1.
-Godwin's law
21 Nov 2009 - 9:40 pm | jaypal
१."येथे मिपावर तो विषय नुसता ऐकला तरी विंचू चावल्यागत वागणारी काही मंडळी आहेत"
व्यक्ती तितक्या प्रक्रुती. आपलं म्हणन (अर्थात म्रर्यादा राखुन)मांडण्याचा हक्क सगळ्यांना आहे.
२."येथे काही "मनसेप्रेमी मराठी" मंडळीही आहेत. म्हणून; तमिऴभाषेविषयी चर्चा करताना जरासे चाचपडतच बोलावे लागते! "
अपणासा आलेल्या एका तरी प्रतीसादात या "मनसेप्रेमी मराठी" मंडळींनी हरकतघेतली आहे का? तात्या स्वतः अस्सल मराठी प्रेमी पण त्याने खुल्या दिलाने मंजुरी दिली की नाही? आम्हा मराठी प्रेमिंचा विरोध हा आव आणना-या ढोंगी लोकांना आहे.(म्हणजे प्रव्रुतीला आहे माणसाला नाही.).उदा.तुम्हाला एवढं चांगल मराठी येत असून जर तुम्ही (महराष्ट्रात) मुद्दाम तामीळचा आग्रह धरणार असाल तर मग .....(सुज्ञास सांगणे न लगे.) तेंव्हा उगाच हा वाद काढुन आणि वाढवुन रसभंग नको.(मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सभासद नाही किंवा इतर भाषीकांचा द्वेष्टा ही नाही, पण मायबोली वर प्रचंड प्रेम असणारा आहे.)
कळावे लोभ आहेच तो उत्तरोत्तर वाढावा. उपक्रमास पुन्हा एकदा शुभेच्छा
____________________________________________________
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
21 Nov 2009 - 2:22 am | स्वाती२
छान कविता! अशी अजून माहिती वाचायला आवडेल. माझी मैत्रिण तमिळ आहे. तिला विचारले पाहिजे अशी गाणी माहिती आहेत का ते.
21 Nov 2009 - 7:21 am | सुनील
मनोरंजक.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
21 Nov 2009 - 7:56 am | विकास
हा उपक्रम फारच आवडला! अजून येउंदेत.
हे बालगीत पारंपारीक आहे का (म्हणजे कालगणनेत कधीचे त्याची कल्पना नाही), की आत्ताआत्ताचे आहे?
इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे, ही गदीमांची कवितेची सुरवात स्वरांनी आहे, अर्थात त्यात तुम्हाला अपेक्षित अ-आ--इ-ई आदी क्रमवार रचना नाही आहे.
तेच बडबडगीतांबद्दल : अडगुळ मडगुळ सोन्याचं कडबुळ...
21 Nov 2009 - 8:48 am | भाग्यश्री कुलकर्णी
मराठीत आहे कि नाही माहित नाही मलाही पण माझ्या मुलीला हिंदी वर्णमाला शिकवताना त्यांच्या बाईंनी एक गाणे शिकवले.
अ अनार का मिठा दाना.
आ आम को चुस के खाना.
इ इमली कि बनी खटाई
ई ईख से बनी मिठाई
उ उल्लु को मार भगाओ
ऊ ऊन से स्वेटर बनाओ
ऋ ऋषी करते तप
रामनाम का करते जप
ए एडी का पायल गेहना
ऐ ऐनक आँखो पर पेहना
ओ ओखली ने कुटो धान
औ औरत भारत की शान
अं अंगुर का बडा सा गुच्छा
अ: सभी को लगता अच्छा
जुन्या शाळेतही असेच गाणे होते काहिसे असेच होते फक्त काही शब्द वेगळे होते.उदा
अम्मा आई
आम लाई
असे काहिसे होते.
21 Nov 2009 - 8:52 am | पाषाणभेद
मस्त लेख. मलाही तमीळ भाषेची ओळख वाढवायला आवडेल. इतरत्र तमीळ मधली बाराखडी दिली तर बरे होईल.
--------------------
काय? घरात वॉल टू वॉल कारपेट टाकायचे नाही? मग घरात स्लीपर वापरा.
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|
21 Nov 2009 - 10:21 am | प्रमोद देव
मन्नाडे ह्यांनी गायलेले एक मराठी चित्रपटगीत आहे.. "आठवणीतील गाणी" च्या सौजन्याने खाली जसेच्या तसे उद्घृत करत आहे.
अ आ आई, म म मका
मी तुझा मामा दे मला मुका
प प पतंग आभाळात उडे
ढ ढ ढगांत चांदोमामा दडे
घ घ घड्याळ, थ थ थवा
बाळ जरि खट्याळ, तरि मला हवा
ह ह हम्मा गोड दूध देते
च च चिऊ अंगणात येते
भ भ भटजी, स स ससा
मांडिवर बसा नि खुदकन हसा
क क कमळ पाण्यावर डुले
ब ब बदक तुरुतुरु चाले
ग ग गाडी झुक झुक जाई
बाळ माझे कसे गोड गाणे गाई
गीत - मधुसूदन कालेलकर
संगीत - राम कदम
स्वर - मन्ना डे
चित्रपट - एक धागा सुखाचा (१९६०)
हैयय्यो ह्यांचा हा उपक्रम खूपच छान आहे.
कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!
21 Nov 2009 - 10:36 am | वेताळ
हैयो हैयैयो...खुपच छान विषयाची ओळख करुन दिली आहे.अजुन माहिती मिळाली तर वाचायला आवडेल.
वेताळ
21 Nov 2009 - 1:50 pm | परिकथेतील राजकुमार
हैयो हैयैयो एकदम झकास उपक्रम हो. जबर्याच !!
आता तामीळ शिकायला तुमच्याकडेच हजेरी लावतो लगेच.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
22 Nov 2009 - 6:38 am | कालिन्दि मुधोळ्कर
रोम्ब नंड्री.
छान उपक्रम. स्वरावलीतून सुरू होणारी मराठी बालगीते माहीत नाहीत. अंकांपासूनची आहेत.
22 Nov 2009 - 10:03 am | सुबक ठेंगणी
मुळाक्षरांची गाणी माहित नाहीत. पण शाळेत असताना सात स्वर शिकवण्यासाठी काहीसं sound of music मधल्या "Do re me"च्या धर्तीवरचं एक गाणं शिकवलं होतं. ते असं:
सा सागर उसळे कैसा
रे रेती उडवी किनारे
ग गलबत चाले लगबग
म मनुष्य वादळी दुर्गम
प पडाव येती झपझप
ध धरणी काठी सागर
नी निळ्या सागरी पोहूनी
सात सुरांची ही कहाणी...
सा रे ग म प ध नी सा'
सा' नी ध प म ग रे सा
गाण्याच्या प्रत्येक ओळीची चाल त्या त्या स्वराने सुरु होते. मला हे गाणं विशेष आवडायचं कारण म्हणजे इथे (ध चा अपवाद वगळता) सगळ्या ओळींची सुरुवात आणि शेवट एकाच अक्षराने होते. इतकंच नव्हे तर समुद्राच्या किना-याचं एक चित्रही तयार होतं.
गाणं खूप शोधूनही जालावर सापडलं नाही. कुणाला सापडल्यास लिंक द्यावी.
22 Nov 2009 - 1:20 pm | बिपिन कार्यकर्ते
सर्वप्रथम श्री. हैयैयो यांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद. एका भाषेची दुसर्या भाषिकांना ओळख व्हावी असा हा अभिनव उपक्रम आहे. व्यक्तिशः खूप आवडेल असे अजून बरेच काही वाचायला.
या कवितेसारखी कविता मराठीत आहे की नाही याबद्दल संपूर्ण अनभिज्ञ असल्यामुळे त्याबाबत काहीही टिप्पणी करत नाही. ते काम जाणकारांनी करावेच, त्यायोगे आमचेही स्वभाषेचे ज्ञान वृध्दिंगत होईल.
या निमित्ताने श्री. हैयैयो यांना माझी विनंति आहे की त्यांनी तमिळ भाषेची / साहित्याची (फार प्राचीन परंपरा असलेले असे हे साहित्य आहे.) / संस्कृतीची ओळख करून द्यावी. माझा तमिळभाषिकांशी बराच संबंध आला असल्याने थोडीथोडी समजते पण अजून आणि नीट शिकायला आवडेल.
(भाषाप्रेमी) बिपिन कार्यकर्ते
22 Nov 2009 - 1:26 pm | अवलिया
असेच म्हणतो. :)
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.