साहित्य : पांढरे वाटाणे १/४ किलो , चिंच ५० ग्रॅम, गुळ २०० ग्रॅम, आले - लसुण पेस्ट ६ साधे चमचे, मिरची पेस्ट १ चमचा, बटाटे मध्यम ५ ते ६ , ब्रेड स्लाइस ४, पंजाबी गरम मसाला ४ साधे चमचे, तिखट (कांदा लसणीचे ) चवीप्रमाणे,मीठ चवीप्रमणे,ह्ळ्द, हिंग, तेल,कांदा चिरलेला - २ वाटी, शेव, कोथिंबीर
वाटाणे भिजत घालुन ते भिजल्यावर चांगले मॅश करता येतील असे शिजवुन घ्या. बटाटे उकडुन मॅश करुन घ्या. मॅश केलेल्या बटाट्यामधे मिरची पेस्ट, ३ चमचे आले लसुण पेस्ट, १ चमचा हळद,चिमटभर हिंग घाला. ४ ब्रेड स्लाइस पाण्यात भिजवुन घट्ट पिळुन घेउन मॅश केलेल्या बटाट्यामधे घालुन चवीप्रमाणे मीठ घालुन तेलाचा हात लावुन मळुन घ्या. त्याचे लहान पॅटीस बनवुन तेलावर दोन्ही बाजुनी परतुन घ्या.
आता पातेल्यात तेलावर हिंग,हळद,तिखट,आले लसुण पेस्ट, १ वाटी कांदा घालुन मॅश केलेले वाटाणे घाला. त्यात गरम मसाला घाला,गुळ घाला,चिंचेचा कोळ घाला, चवीप्रमाणे मीठ घाला. पाहिजे त्याप्रमाणे पाणी घाला. पण जास्ती पातळ नको.
डिश मधे देताना पॅटीस वर वाटाण्याचा रगडा घाला. त्यावर थोडा चिरलेला कांद, कोथिंबीर, शेव घालुन ब्रेड समवेत खायला द्या.
प्रतिक्रिया
19 Nov 2009 - 12:14 pm | पर्नल नेने मराठे
यार फोटो टाक ना ....अजुन मजा येइल.
(मिपावर येउन खादाड झालेली) चुचु
19 Nov 2009 - 8:03 pm | टारझन
:) माझी प्रतिक्रिया ?????? असो ...
(खादाड असताना मिपावर आलेला) टारझन
19 Nov 2009 - 8:30 pm | प्रभो
फोटो??? प्रतिक्रिया त्यानंतरच
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
19 Nov 2009 - 12:34 pm | श्रीयुत संतोष जोशी
रेसिपी छानच हो पण फोटो पाहिजे ना.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
19 Nov 2009 - 1:32 pm | पक्या
रेसिपी छान आहे पण सगळीकडे तो स्मॅश शब्द वाचून कसेसेच झाले.
कुस्करणे , लगदा करणे या अर्थी मॅश (mash) हा शब्द योग्य आहे. स्मॅश (smash) नव्हे. स्मॅश म्हणजे कशावरती जोरात आदळून तुकडे होऊन फुटणे.
टेनिस मध्ये स्मॅश्ड हिट हा शब्द्प्रयोग वापरतात तिथे जोरदार फटका या अर्थी तो शब्द आहे.
आणि खरेतर स्मॅश शब्द वापरायची गरजच काय ते काय कळत नाही.- उगाच नको तिथे विंग्रजी.
-जय महाराष्ट्र , जय मराठी !
19 Nov 2009 - 2:37 pm | श्रद्धा.
चुकलच बुवा आता करु पुढच्यावेळी सुधारणा....[:)]
19 Nov 2009 - 2:44 pm | पक्या
:) - धन्यवाद
जय महाराष्ट्र , जय मराठी !
19 Nov 2009 - 1:41 pm | परिकथेतील राजकुमार
फोटु नाही तर प्रतिसाद नाही.
©º°¨¨°º© श्राद्ध. ©º°¨¨°º©
आमचे राज्य
19 Nov 2009 - 2:47 pm | श्रद्धा.
राजकुमारा प्रतीसाद फ़ोटु पाहुन देणार की खाउन देणार ते सांग आधी...
19 Nov 2009 - 3:14 pm | jaypal
तात्याच्या हाटेलात आपले स्वागत
रगडा घ्या पॅटीस नंतर
"प्रतीसाद फ़ोटु पाहुन देणार की खाउन देणार ते सांग"
कधि बोलवता? रगडा हादडायला एका पायावर तयार (फोटो म्हणजे त्यातल्यात्यात रगड्याची चव फोटो वर भागवायची)
तोवर फक्त हा
हावरट जयपाल
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
19 Nov 2009 - 1:45 pm | भाग्यश्री कुलकर्णी
माझी आवडती डिश आहे ही.
19 Nov 2009 - 2:42 pm | श्रद्धा.
मंडळी नविनच आहे हो मी इथे.... समजुन घ्या ना... माहित नव्हते मला पुढच्यावेळी फ़ोटु नक्की.......
19 Nov 2009 - 3:13 pm | गणपा
चलता है हो श्रद्धातै.
मिपाकर अस्सल खवैय्ये आहेत.
त्यामुळे वाचता वाचता जर फोटु पण असेल तर क्या केहेने....
पाककृती जास्तच खुमासदार होते.
19 Nov 2009 - 3:56 pm | टारझन
एवढ्या सोज्वळ मागणीचे आम्ही स्वागत करतो आणि आमच्या सर्व मित्र-मैत्रिणींना(काका अजोबांची गरज नाही , ते करतीलच) श्रद्धा.(डॉट) ह्यांना समजुन घ्याव .. त्यांच्या ह्या खुलाश्याबद्दल आपण सर्वे जन त्यांना धन्यवाद म्हणूया :)
पाककृती आमची आवडती रेशेपी आहे, ह्यात वादंच नाही ...
- (मंडळी) बुद्धा
19 Nov 2009 - 4:04 pm | jaypal
सगळ्यांना आवडेल ह "रानमेवा"
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
19 Nov 2009 - 4:54 pm | पर्नल नेने मराठे
चुचु
20 Nov 2009 - 5:31 am | लवंगी
तुला कुठून कसे फोटो मिळतात!!
रगडा-पॅटिसची रेसीपी मस्तच
20 Nov 2009 - 11:58 am | सुबक ठेंगणी
तुला कुठून मिळतात असले फोटो चुचुडे? 8| 8>
20 Nov 2009 - 1:01 pm | टारझन
तुला कुठून मिळतात असले फोटो चुचुडे?
- मन्नाडे
19 Nov 2009 - 5:39 pm | सुप्रिया
रेसिपी आवडली. माझी आवडती डीश आहे ही.
19 Nov 2009 - 5:48 pm | सूहास (not verified)
कुल !!
फोटोज ???
सू हा स...
19 Nov 2009 - 7:19 pm | स्वाती राजेश
श्रद्धा मस्त आहे रेसिपी,
पार्टीच्या वेळी हमखास ही एक डीश करू शकतो.
अगोदर करुन ठेवता येते, कमी तिखट केली तर मुले सुद्धा आवडीने खातात.
पुढची रेसिपी कधी? :)
20 Nov 2009 - 11:32 am | श्रद्धा.
लवकरच