नवी नावे जुनी नावे

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
17 Nov 2009 - 1:11 am
गाभा: 

माझे मराठी लोकांबाबतचे निरीक्षण. आपण आपल्या वडिलांच्या, आईच्या, आजोबांच्या वा आज्यांच्या नावांकडे बघितले तर लक्षात येईल की त्यांची नावे हौसेने कुणी ठेवत नाही. अलीकडच्या ३०-४० वर्षात नव्यानव्या नावांची फॅशन येत आहे. मिलिंद, पराग, अतुल, प्रमोद, संदीप, राजेश, राहुल, वैशाली ही नावे एकेकाळी नवी समजली जात असतील. आज अथर्व, ऋग्वेद, शुभम (हे काय विचित्र नाव बुवा?), मिताली, गंधाली, शेफाली (की शेफारली), अंकिता, अनिका, करीना असली काहीतरी नावे ऐकू येतात. अजूनही काही असतील.

केशव, नारायण, शंकर, गंगाधर, पुरुषोत्तम, नीळकंठ, श्रीकृष्ण, प्रल्हाद, रामचंद्र वा बायकात लक्ष्मी, पार्वती, यशोदा, यमुना, गोदावरी, गंगा, नर्मदा ही नाव आज कुणी आपल्या मुला वा मुलींना ठेवली तर काय बावळट आहे अशा प्रकारची शेरेबाजी होण्याची शक्यता आहे.

उलट अमेरिकेत बघा. तिथल्या गोर्‍या लोकांची नावे जी आजही वापरात आहेत, अक्षरशः हजारो वर्षे जुनी आहेत. जेम्स, जॉर्ज, विलियम, चार्ल्स, रॉबर्ट, क्रिस्तोफर, ब्रुस, सुझन, व्हिक्टोरिया, जेनिफर, अ‍ॅगथा ही नावे इतकी जुनी असून आजही वापरात आहेत आणि राहतील.
अर्थात काही नवी नावे पश्चिमेच्या समाजात वापरात येऊ लागली आहेत. पण तरी जुन्याचे अस्तित्व आहेच.
असे का? दोन समाजात ह्या बाबतीत इतका फरक का? आपल्या लोकांना आपल्या जुन्या नावांविषयी काही न्यूनगंड आहे का? का नव्याची आवड? मला वाटते बहुधा न्यूनगंड हेच कारण असावे.
तुम्हाला काय वाटते?

प्रतिक्रिया

प्रभो's picture

17 Nov 2009 - 1:21 am | प्रभो

बारश्याच्या वेळेस नाव ठेवायचं काम आत्या लोकांकडे असतं..
आत्याला आणी बहिणींना विचारून सांगतो.. :)

--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

अश्विनीका's picture

17 Nov 2009 - 2:07 am | अश्विनीका

हल्ली जुनी नावे परत ठेवली जाऊ लागली आहेत. कदाचित प्रमाण कमी असावे पण जुनीही नावे ठेवतात. माझ्या ओळखीत राधा, दुर्गा, उमा, तारा, लक्ष्मी, मीरा, किशन, श्रीराम , हरी अशा नावांची छोट्या वयोगटातील बच्चेमंडळी आहेत.
आधुनिक नावांबरोबर अवघड संस्कृत नावे ही ठेवतात . बहुतेक आपल्या मुलाचे नाव युनिक असावे अशी भावना त्यामागे असावी.
- अश्विनी

रेवती's picture

17 Nov 2009 - 6:31 am | रेवती

सहमत! मीही आजकाल विष्णू, विनायक, मीरा, आकाश वगैरे बच्चेकंपनीला भेटलीये. जसं आजोबांचं नाव पुन्हा नातवाला ठेवायची पद्धत असते (निदान अनेक नावांपैकी एक तरी) तशी आज्जीचं नावं नातीला ठेवावं असं माझे बाबा म्हणत होते पण भावाने आणि वहिनीने व्हेटो वापरला.
तसंही 'रुक्मिणी' जरा जुनंच वाटतं.

रेवती

हुप्प्या's picture

17 Nov 2009 - 7:43 am | हुप्प्या

काही लोक जुन्या नावाचे पुनरुज्जीवन करत असले तर मूळ प्रश्न उरतोच की इतका काळ जुनी नावे आपण का हद्दपार केली होती?
नव्या पिढीच्या नावात जुनी नावे औषधालाही का सापडत नाहीत?
ह्यात चांगले किंवा वाईट म्हणण्याचा उद्देश नसून त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न आहे.
उदा. अमेरिकेतील काळे लोक हल्ली अफ्रिकन/मुस्लिम पद्धतीची नावे ठेवू लागली आहेत जसे मोएशा, जमिला, हसानी. ते एक गोर्‍यांच्या गुलामीविरुद्धचे प्रतिकात्मक बंड म्हणता येईल.
तसे काही सोशोलॉजिकल कारण मराठी लोकांबाबत आहे का?

या बदलत असतात. श्वेतवर्णीयांसाठीसुद्धा.

(मुलींसाठी) अ‍ॅशली, मॅडिसन वगैरे नावांची हल्ली सद्दी आहे.

(मुलांसाठी) ब्रेंडन, रायन वगैरे नावे मागच्या एकदोन दशकांत लोकप्रिय होती.

कधी बायबलच्या जुन्या करारातील नावांशी फॅशन येते. कधी एखाद्या देशातील नावांची फॅशन येते (-म्हणजे आयर्लंड, स्कॉटलंड वगैरे).

लोकप्रिय नावांबद्दल हा सोशल सेक्यूरिटी विभागाचे तक्ते येथे बघायला मिळतील.

पाषाणभेद's picture

17 Nov 2009 - 2:24 am | पाषाणभेद

आजकाल जी नविन नावे वाटतात ती जुन्या पुराण्या ग्रंथात आलेली अशीच आहे. त्या मुळे ती नविन नावे म्हणणे घाडसाचे ठरेल. फक्त ती प्रचलीत नव्हती असे म्हणता येतील.

लोक काय काय नावे ठेवतील ते सांगता येत नाही.

उदा. 'विनोद' - तो मुलगा जन्माला आला हा विनोद की त्याच्या आईवडीलांनी 'विनोद' केला?

स्लेष्मा -नाव तर लई भारी आहे पण याचा अर्थ आहे - सर्दी झाल्यानंतर आपल्या नाकातून जो पदार्थ वाहतो तो!

--------------------
काय? घरात वॉल टू वॉल कारपेट टाकायचे नाही? मग घरात स्लीपर वापरा.

पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|

हुप्प्या's picture

17 Nov 2009 - 7:37 am | हुप्प्या

अथर्व, ऋग्वेद, परब्रह्म ही नावे संस्कृत भाषेत खूप पूर्वीपासून आहेत म्हणून ती जुनी नावे म्हणणे तितकेसे पटत नाही. नाहीतर नवे नाव म्हणजे नवे शब्द असले काही सूचित व्ह्यायचे तसे नाही. ती नावे म्हणून काही प्रचलित नव्हती.

एक फ्याशन म्हणून हे शब्द मुलाचे नाव ह्या स्वरूपात वापरली जाऊ लागली असे मला वाटाते.

सुहास's picture

17 Nov 2009 - 3:56 am | सुहास

स्लेष्मा -नाव तर लई भारी आहे पण याचा अर्थ आहे - सर्दी झाल्यानंतर आपल्या नाकातून जो पदार्थ वाहतो तो!

:&

अशीच काही विचित्र वाटणारी नावे -- उष्मा (उकाडा), समिधा (यज्ञात आहुतीसाठी लागणारी कोरडी लाकडे), संभावना ( शक्यता) इत्यादी..

--सुहास

आण्णा चिंबोरी's picture

17 Nov 2009 - 7:00 am | आण्णा चिंबोरी

माझे आण्णा हे नाव बरेच जुने आहे.

हुप्प्या हे अमेरिकन नाव आहे की भारतीय? आणि नवे की जुने याबाबत सांग की.

---
आपल्या लोकांना आपल्या जुन्या नावांविषयी काही न्यूनगंड आहे का? का नव्याची आवड? मला वाटते बहुधा न्यूनगंड हेच कारण असावे.
तुम्हाला काय वाटते?
---

हो रे बाबा भारतीयांना अजिबात स्वत्व नाही, स्वाभिमान नाही, कणा नाही. जे काही आहे ते सगळे अमेरिकनांना आहे. इथले भारतीय जे अमेरिकेत जाऊन राहतात त्यांनाही अमेरिकनांचे गुण आपोआप येऊन चिकटतात व त्यांचा न्यूनगंड नाहीसा होतो.

खूष?

हुप्प्या's picture

17 Nov 2009 - 7:33 am | हुप्प्या

हुप्प्या हे नाव माणूस उत्क्रांत व्हायच्या पूर्वीचे आहे. म्हणजे भलतेच जुने.
लोक आजोबा पणजोबांचे नाव जसे हौसेने ठेवतात तसे माझे नाव माझ्या पूर्वजांची आठवण म्हणून ठेवले आहे.
खूष?

>>
हो रे बाबा भारतीयांना अजिबात स्वत्व नाही, स्वाभिमान नाही, कणा नाही. जे काही आहे ते सगळे अमेरिकनांना आहे. इथले भारतीय जे अमेरिकेत जाऊन राहतात त्यांनाही अमेरिकनांचे गुण आपोआप येऊन चिकटतात व त्यांचा न्यूनगंड नाहीसा होतो.
<<
चिंबोरीअण्णा, हे तुमचे मत समजू का? तसे असल्यास खूष. माझे मत आहे असा गैरसमज करून घेतल्यास नाखूष.

खूष?

आण्णा चिंबोरी's picture

17 Nov 2009 - 9:30 pm | आण्णा चिंबोरी

हुप्प्या, तू सोयीस्कर दुटप्पी भूमिका घेत आहेस.

तुझी वाक्ये पाहा.

पहिले वाक्यः अथर्व, ऋग्वेद, परब्रह्म ही नावे संस्कृत भाषेत खूप पूर्वीपासून आहेत म्हणून ती जुनी नावे म्हणणे तितकेसे पटत नाही. नाहीतर नवे नाव म्हणजे नवे शब्द असले काही सूचित व्ह्यायचे तसे नाही. ती नावे म्हणून काही प्रचलित नव्हती.

एक फ्याशन म्हणून हे शब्द मुलाचे नाव ह्या स्वरूपात वापरली जाऊ लागली असे मला वाटाते.

म्हणजे यावरुन असे दिसते की एखादे नाव भाषेत पूर्वीपासून असले तरी ते मुलाचे नाव म्हणून प्रचलित नसल्याने त्याच्या वापर करणारे लोक न्यूनगंडाने बाधित असतात असे तुझे मत आहे.

आता तुझे हुप्प्या हे नाव का आहे याचे तू दिलेले हास्यास्पद स्पष्टीकरण पाहाः
लोक आजोबा पणजोबांचे नाव जसे हौसेने ठेवतात तसे माझे नाव माझ्या पूर्वजांची आठवण म्हणून ठेवले आहे.

तुझ्या पहिल्या वाक्यातील संदर्भ इथे लावला तर प्रचलित नसलेले नावच तुला दिले आहे. (या नावाचा तुझ्या मर्कटचाळ्यांशी संबंध आहे असे मात्र माझे मत नाही)

या एकंदर प्रतिसादांवरुन तुला नाव देणारे लोकच न्यूनगंडाने बाधित आहेत हा एकमेव निष्कर्ष निघतो.

आणखी एक म्हणजे अमेरिकन समाजव्यवस्था आदर्शवत असल्याचे मानणारे तुझ्यासारख्या ख्रिश्चन मनोवृत्तीच्या माणसांनी आम्हा भारतीयांवर न्यूनगंड वगैरे काहीही हिणकस आरोप केले तरी आम्हाला *ट फरक पडत नाही हे तू लक्षात ठेवले तरी पुरे.

उद्या भारतीयांनी वापरातलीच नावे वापरली असती आणि अमेरिकेत नवनवी नावे वापरली असती तर आम्ही भारतीय कसे पुराणमतवादी आणि अमेरिका कशी सुधारणावादी असे दाखले देऊन तू पुन्हा आम्हाला अपमानित करण्याचा वृथा प्रयत्न केलाच असतास.

इत्यलम्

तुझा,
-- आण्णा चिंबोरी

हुप्प्या's picture

17 Nov 2009 - 11:28 pm | हुप्प्या

>>
आता तुझे हुप्प्या हे नाव का आहे याचे तू दिलेले हास्यास्पद स्पष्टीकरण पाहाः
<<
अण्णा, तुम्ही अगदीच हे असाल असे वाटले नव्हते. आपल्याला उपरोध, विनोद वगैरे कळण्याची इंद्रिये नाहीत असे दिसते. असो. नसतात कुणाकुणाला. तुमच्यासाठी ते उत्तर नाही असे समजा.

>>
उद्या भारतीयांनी वापरातलीच नावे वापरली असती आणि..........
<<
उगाच आत्याबाईला मिशा असत्या टाईपचे मुद्दे मांडू नका. त्याला काही आधार नाही. मी वस्तुस्थितीला धरून प्रश्न विचारला होता. आपल्याप्रमाणे अमके असते तर तमके झाले असते वगैरे स्वप्नरंजन अत्यंत गैरलागू आहे. आपण कितीही बुद्धीमान असलात तरी मनकवडे वगैरे आजिबात नाही तेव्हा मी अमके केले असते वा नसते ह्याविषयी निरर्थक दावे करू नका. वादविवादात त्याला काही स्थान नाही.

आपल्याला कळेल का याविषयी साशंक आहे. पण मला या विषयात गोरे श्रेष्ट असे चुकुनही म्हणायचे नाही. जुनी नावे वापरात ठेवणे ग्रेट आणि नवी नावे निर्माण करणे कनिष्ट, असे मला म्हणायचे नव्हते आणि सुचवायचे नव्हते.
तेव्हा नसते गैरसमज करून त्यावर असले हास्यास्पद इमले उभारू नका.

मला न्यूनगंड असेल असे का वाटले? मी गोपाळ हे नाव बावळट माणून ह्या अर्थी वापरलेले पाहिले आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. सखाराम, नामदेव, यमुना ह्या नावांची उदाहरणे घेऊ. जर आज कुणी आपल्या मुल वा मुलीचे नाव हे ठेवू पाहेल तर काय प्रतिक्रिया होईल? विचार करुन सांगा. आणि मग बोला.

तर मराठी लोकांचा न्यूनगंड हा जुन्या नावांविषयी आहे आणि त्यामुळे अस्सल भारतीयच पण नवी नावे (बहुतांशी) शोधून काढून ती त्यांनी रुढ केली. नवी नावे काही गोर्‍यांकडून आयात केलेली नाही. तेव्हा नव्या नावांविषयी मला फार तिरस्कार नाही. पण हे का होते ते जाणण्याची जरूर इच्छा आहे.
तेव्हा आपण आपला पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन बदलता आला तर पहा. असो.

आण्णा चिंबोरी's picture

18 Nov 2009 - 7:06 am | आण्णा चिंबोरी

--
अण्णा, तुम्ही अगदीच हे असाल असे वाटले नव्हते. आपल्याला उपरोध, विनोद वगैरे कळण्याची इंद्रिये नाहीत असे दिसते. असो. नसतात कुणाकुणाला. तुमच्यासाठी ते उत्तर नाही असे समजा.
--
असे? बरं बाबा शेपटीपासून ते ऍपेंडिक्स पर्यंत सगळी इंद्रिये तुलाच हो. एक तर लोकांनी प्रचलित नसलेली पण जुनी नावे ठेवली तर त्यांना न्यूनगंड, पण तसेच नाव तुला ठेवले तर तो टंग इन चिक विनोद. आता मला लक्षात आले की सोयीस्कर भूमिका घेणे म्हणजे काय.
--
उगाच आत्याबाईला मिशा असत्या टाईपचे मुद्दे मांडू नका. त्याला काही आधार नाही. मी वस्तुस्थितीला धरून प्रश्न विचारला होता. आपल्याप्रमाणे अमके असते तर तमके झाले असते वगैरे स्वप्नरंजन अत्यंत गैरलागू आहे. आपण कितीही बुद्धीमान असलात तरी मनकवडे वगैरे आजिबात नाही तेव्हा मी अमके केले असते वा नसते ह्याविषयी निरर्थक दावे करू नका. वादविवादात त्याला काही स्थान नाही.
--
हाहा... पण जर तसे खरेच झाले असते तर तू पुन्हा अशी न्यूनगंड वगैरे हिणकस शिवीगाळ केलीच असतीस ना.
---
आपल्याला कळेल का याविषयी साशंक आहे. पण मला या विषयात गोरे श्रेष्ट असे चुकुनही म्हणायचे नाही. जुनी नावे वापरात ठेवणे ग्रेट आणि नवी नावे निर्माण करणे कनिष्ट, असे मला म्हणायचे नव्हते आणि सुचवायचे नव्हते.
तेव्हा नसते गैरसमज करून त्यावर असले हास्यास्पद इमले उभारू नका.
---
हो का मग न्यूनगंड असूनही एखादा माणूस श्रेष्ठ असू शकतो हे तुझे तत्त्व ग्रेटच म्हणायचे.
--
मला न्यूनगंड असेल असे का वाटले? मी गोपाळ हे नाव बावळट माणून ह्या अर्थी वापरलेले पाहिले आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. सखाराम, नामदेव, यमुना ह्या नावांची उदाहरणे घेऊ. जर आज कुणी आपल्या मुल वा मुलीचे नाव हे ठेवू पाहेल तर काय प्रतिक्रिया होईल? विचार करुन सांगा. आणि मग बोला.
--
आमच्या माहितीत गोपाळ हे नाव गोपाळ कृष्ण गोखले किंवा गोपाळ गणेश आगरकर अशा बुद्धिमान लोकांसाठी वापरलेले पाहिले आहे त्याचा एक भारतीय म्हणून आम्हाला नितांत अभिमान आहे. तुला भारतीय बावळट वाटत असतील तर तो तुझा दृष्टिदोष आहे. तू भारतीयांकडे पाहण्याची तुझी नजर स्वच्छ कर.

---
तर मराठी लोकांचा न्यूनगंड हा जुन्या नावांविषयी आहे आणि त्यामुळे अस्सल भारतीयच पण नवी नावे (बहुतांशी) शोधून काढून ती त्यांनी रुढ केली. नवी नावे काही गोर्‍यांकडून आयात केलेली नाही. तेव्हा नव्या नावांविषयी मला फार तिरस्कार नाही. पण हे का होते ते जाणण्याची जरूर इच्छा आहे.
तेव्हा आपण आपला पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन बदलता आला तर पहा. असो.
---
पुन्हा तेच. मराठी लोक जुनी नावे वापरतात म्हणजे त्यांना न्यूनगंड आहे ही पूर्वग्रहदूषित वृत्ती तुझी आहे. तुला अमेरिकन नामकरण पद्धती आदर्श वाटते हे तुझ्या मानसिक गुलामगिरीचे प्रतीक आहे. अशा लोकांना भारतीयांच्या नामकरण पद्धतीतील नवनवोन्मेशशालिनी प्रतिभेचा द्वेष वाटून हिणकस टीका करावीशी वाटणे साहजिकच आहे.

-- आण्णा चिंबोरी.

हुप्प्या's picture

21 Nov 2009 - 7:31 am | हुप्प्या

>>
हाहा... पण जर तसे खरेच झाले असते तर तू पुन्हा अशी न्यूनगंड वगैरे हिणकस शिवीगाळ केलीच असतीस ना.
<<
पुन्हा तेच. अरे जे घडले नाही त्यावर तारे तोडणे म्हणजे मूर्खपणा आहे. मी अमक्या वेळी तमके करेन का नाही ह्यावर काहीही बोलता येत नाही. ते साफ चूक आहे. असो. पालथ्या घड्यावर पाणी.
>>
पुन्हा तेच. मराठी लोक जुनी नावे वापरतात म्हणजे त्यांना न्यूनगंड आहे ही पूर्वग्रहदूषित वृत्ती तुझी आहे. तुला अमेरिकन नामकरण पद्धती आदर्श वाटते हे तुझ्या मानसिक गुलामगिरीचे प्रतीक आहे. अशा लोकांना भारतीयांच्या नामकरण पद्धतीतील नवनवोन्मेशशालिनी प्रतिभेचा द्वेष वाटून हिणकस टीका करावीशी वाटणे साहजिकच आहे.
<<
आता हद्द् झाली. तू खरोखरच इतका बिनडोक आहेस का वेड पांघरून पेडगावला चालला आहेस? जुनी नावे वा नवी नावे वापरणे हे चांगले वाईट ठरवणे अवघड आहे. पाण्याचा पेला अर्धा भरला असेल तर तो अर्धा रिकामा असे म्हणायचे का अर्धा भरलेला आहे म्हणायचे आणि त्यातले कुठले बरोबर ह्यावर वितंडवाद करण्यासारखे मूर्खपणाचे आहे. अर्थात तुला तसे करायचे असेल तर जरूर कर. पण ते हास्यास्पद आहे. मी केवळ अमेरिकेत राहिलो आहे म्हणून माझे हे निरीक्षण मांडले. त्यातून गुलामगिरी, भारतीय संस्कृतीला हीणकस मानणारा वगैरे चिखलफेक म्हणजे एक तर कोल्ह्याला द्राक्षे आंबट हा प्रकार आहे किंवा वैयक्तिक टीका करण्याचे असुरी समाधान आहे. दोन्हीपैकी कुठलीही खाज, खवखव, मळमळ असेल तर वेगळा विषय उघड जसे "हुप्प्या भारतीय संस्कृतीचा द्वेष करतो का?" "तमाम अनिवासी भारतीय संस्कृतीला कस्पटासमान मानतात का?" इत्यादी. माझ्याशी भांडण असेल तर वैयक्तिक निरोप पाठवून चिखलफेक कर. मी त्याचा समाचार घ्यायला समर्थ आहे.
इथे असले शेण टाकून आपली लायकी दाखवून देणे आणि अन्य विचारी मंडळींना सहभागी होण्यापासून परावृत्त करणे, विषयाला सोडून बोलणे असले प्रकार बंद करा.
>>
मच्या माहितीत गोपाळ हे नाव गोपाळ कृष्ण गोखले किंवा गोपाळ गणेश आगरकर अशा बुद्धिमान लोकांसाठी वापरलेले पाहिले आहे त्याचा एक भारतीय म्हणून आम्हाला नितांत अभिमान आहे. तुला भारतीय बावळट वाटत असतील तर तो तुझा दृष्टिदोष आहे. तू भारतीयांकडे पाहण्याची तुझी नजर स्वच्छ कर.
<<
पुन्हा मूर्खासारखे. तुला मराठी वाचायला त्रास होतो का? मी काय लिहिले होते ते नीट वाच. कुणी शिकले सवरलेले नातेवाईक मित्र असतील तर त्यांच्याकडून समजावून घे.
मी रस्त्यावर मित्रांशी बोलताना हे अनुभवलेले आहे. ते मित्र परदेशवासी नाहीत अस्सल भारतवासी मराठी. तर हे बोलताना काय गोपाळ आहे म्हणजे काय बावळट आहे ह्या अर्थी वापरत होते. मी तसे वापरत नाही.

आण्णा चिंबोरी's picture

21 Nov 2009 - 1:29 pm | आण्णा चिंबोरी

बाळ हुप्प्या, स्वतःच्या शेपटीला आग लागल्याप्रमाणे थयथयाट करु नकोस.

आगपाखड करण्यापूर्वी तुझ्या चर्चाप्रस्तावातले शेवटचे वाक्य वाच.

असे का? दोन समाजात ह्या बाबतीत इतका फरक का? आपल्या लोकांना आपल्या जुन्या नावांविषयी काही न्यूनगंड आहे का? का नव्याची आवड? मला वाटते बहुधा न्यूनगंड हेच कारण असावे.

हे जे काही तुला वाटते आहे हा तुझा संकुचित दृष्टिकोण आहे. कोणीही यावे आणि आम्हा भारतीयांची टिंगल करावी असे तुला वाटत असेल तर तुला टोकावर मारण्यास मी समर्थ आहे.

बाकी मी भारतात राहतो म्हणून मला परदेशस्थांविषयी हेवा वाटतो वगैरे बोलून स्वतःचीच समजूत घालण्याचा प्रयत्न चालू दे. त्याने मला झ्याट फरक पडत नाही.

खालच्या पातळीवरील भाषा वापरुन तू स्वतःचे संस्कार, प्रवृत्ती आणि लायकी दाखवून दिली आहे. मला तितक्या खालच्या पातळीवर यायची गरज वाटत नाही. तुझ्या ओका-या चालू दे.

माझ्यासकट अदिती, बिका, चतुरंग वगैरे सर्वांनीच तुझ्या चर्चाप्रस्तावाचा समाचार घेतल्याने तुला नैराश्य आले असावे आणि तुझे मानसिक संतुलन बिघडले असावे असे वाटते. तू लवकर बरा होवोस अशी शुभकामना व्यक्त करुन मी आता थांबतो.

हर्षद आनंदी's picture

17 Nov 2009 - 7:32 am | हर्षद आनंदी

नावांची फॅशन बदलली म्हणायची..

तसेची नाव कुठलेही ठेवा, नंतर नावे ठेवली जातातच....

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

मी-सौरभ's picture

18 Nov 2009 - 12:17 am | मी-सौरभ

सौरभ

मदनबाण's picture

17 Nov 2009 - 7:46 am | मदनबाण

आई-वडिलांच्या नावाचे फ्युजन करुन नाव ठेवण्याचा प्रकार सुद्धा हल्ली वाढत चालला आहे.उदा... स्मिनिल ( स्मिता + अनिल)
मानव हे नाव मला फार गमतीदार वाटले...असे नाव ठेवणार्‍यांचे पुर्वज आदिमानव असावेत काय ? :?

मदनबाण.....

The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back.

आशिष सुर्वे's picture

17 Nov 2009 - 10:00 am | आशिष सुर्वे

ली नावाबद्दल काय मत आहे?? >
:>
-
कोकणी फणस

टारझन's picture

17 Nov 2009 - 10:13 am | टारझन

बाझवला तिच्यामायला !! कशावरपण उहापोह चालू आहे :) ..
चालू द्या भो !! बरं झालं माझं नाव "पोपट" न ठेवता जे आहे ते ठेवलंय !!
च्यायला नाय तर जिवनाचाच पोपट झाला असता .. =))

- (पोपट) टारझन

लवंगी's picture

17 Nov 2009 - 10:19 am | लवंगी

माझ्या माहितीतले एक विद्वान(!) आपल्या मुलीच नाव 'यंत्रणा ' ठेवण्याचा हट्ट धरून बसले होते.. शेवटी मुलीची आई अगदि रडकुंडीला आली म्हणून हट्ट सोडला पण तरीहि बिचार्‍या पिलाच नाव "वैखरी" अस भयंकरच ठेवल.. 8|

चतुरंग's picture

17 Nov 2009 - 10:45 pm | चतुरंग

'यंत्रणा' हे सर्वात जबरी आहे!! ;)
म्हणजे मुलगी पडली तर यंत्रणा कोलमडली म्हणणार का? :D

(सीएनसी)चतुरंग

सुबक ठेंगणी's picture

17 Nov 2009 - 10:48 am | सुबक ठेंगणी

माझ्या ओळखीच्या एका काकांनी आपल्या मुलीचं नाव नेहा ठेवलं तेव्हा मी त्यांना त्या नावाचा अर्थ विचारला. त्यांनी मला सांगितलं की त्यांनी अर्थाचा वगैरे काहीही विचार केलेला नव्हता. फक्त त्यांची मुलगी केंद्रीय विद्यालयात शिकायला जाणार/जाईल तर तिथल्या तिच्या अमराठी मित्रमैत्रिणींना सहजपणे उच्चारता यावं, नावाची तोडफोड होऊ नये हा त्यांचा निकष होता. आता आईवडिलांची नावे न वरून होती म्हणून नेहा ठेवलं असं म्हणाले. त्यांच्या भाचीचं का पुतणीचं नाव शर्मिष्ठा होतं तिला सगळे शर्मी किंवा मिष्ठा म्हणायचे ;) त्यावरून त्यांनी हे ठरवलं होतं. मला काही प्रमाणात पटलं ते.

बाकी शेफाली हे नाव छान आहे बरं...बंगालीमधे परिजातकाच्या फुलाला म्हणतात शेफाली :)

सुनील's picture

17 Nov 2009 - 11:45 am | सुनील

धृष्ट्धुम्नच्या आई-वडीलांनी हा विचार का केला नाही?

बाकी शेफाली हे नाव बंगाल्यांपेक्षाही गुजरातीत जास्त लोकप्रिय आहे, असे दिसते.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आण्णा चिंबोरी's picture

17 Nov 2009 - 9:40 pm | आण्णा चिंबोरी

बाकी शेफाली हे नाव बंगाल्यांपेक्षाही गुजरातीत जास्त लोकप्रिय आहे, असे दिसते.

हेच म्हंतो.

एक्झिबिट नं १. शेफाली जरीवालाः

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Nov 2009 - 11:04 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रत्येक गोष्टीत काय उठून गोर्‍यांशी तुलना करत बसायची?
त्यांची बरीचशी नावं (जेम्स, जॉर्ज, विलियम, चार्ल्स, रॉबर्ट, क्रिस्तोफर, ब्रुस, सुझन, व्हिक्टोरिया, जेनिफर, अ‍ॅगथा ही सगळी) बायबलमधून किंवा ज्यूइश नावांवरून आलेली आहेत. पुन्हा पाश्चांत्यासारखाच विचार केला तर निरीश्वरवादी माणसांच्या मुलांची काय ठेवणार मग? इंग्रज आणि काही प्रमाणात ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकनही प्रत्येक मुलाची दोन नावं ठेवतात, तसं आपणही करायचं का?

काहीतरीच नावं असतील तर नावं ठेवली ठीक आहे, पण अथर्व, ऋग्वेद, सौमिल, ऋचा, मिताली, शेफाली या नावांमधे काय वाईट आहे? उलट पूर्वीच्या काळी मुलं जगत नसत म्हणून दगडी, धोंडू वगैरे नावं ठेवायचे त्याबद्दलही बोला.

कशाचाही संदर्भ न्यूनगंडाशी काय लावायचा?

अदिती

हुप्प्या's picture

17 Nov 2009 - 11:15 pm | हुप्प्या

मी गोर्‍यांना भारतीयांप्रमाणे माणूसच मानतो. ते काही आकाशातून पडलेले नाहीत. तेव्हा त्यांच्या आणि आपल्या इन्स्टिन्क्ट्स, जुन्या नव्याची आवड इत्यादी गोष्टी सारख्याच असल्या पाहिजेत. आपण आपल्या पूर्वजांचा तिरस्कार करतो आणि गोरे मात्र करत नाहीत असे काही नाही. सर्वांना आपल्या परंपरांचा अभिमान असतो. थोडक्यात घरोघरी मातीच्याच चुली.
पण नावे ठेवण्याच्या बाबतीत मला दोन्ही संस्कृतीत फरक वाटतो. आणि त्याच्या मागे काय कारणे असावीत हे ह्या स्थळावरील विद्वानांकडून समजून घ्यावे अशी माझी इच्छा. अर्थात चर्चेत तुम्ही सहभागी व्हायचे का नाही ही तुमची इच्छा.

उमराणी सरकार's picture

18 Nov 2009 - 5:49 am | उमराणी सरकार

आपण आपल्या पूर्वजांचा तिरस्कार करतो आणि गोरे मात्र करत नाहीत असे काही नाही. सर्वांना आपल्या परंपरांचा अभिमान असतो. थोडक्यात घरोघरी मातीच्याच चुली.

मत मांडण्यात काही उलथापालथ झाली आहे का?

आपण आपल्या पूर्वजांचा तिरस्कार करत नाही आणि गोरे मात्र करतात, असे काही नाही. सर्वांना आपल्या परंपरांचा अभिमान असतो. थोडक्यात घरोघरी मातीच्याच चुली.

असे हवे होते का?
तसे नसेल तर आपण आपल्या पूर्वजांचा तिरस्कार करतो हा सोयीस्कर निष्कर्ष तुम्ही कश्याच्या आधारे काढला?

उमराणी सरकार

न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Nov 2009 - 12:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अरे बापरे, आपण आपल्या पूर्वजांचा तिरस्कार करतो हे कुठून आलं? (जगभरातील) अनेक लोकांचं काहीही वाचन नसताना "आमचीच ती संस्कृती आणि तीच, तेवढीच कशी महान!" असाही ग्रह असतो. पण पूर्वजांचा सरसकट तिरस्कार करणारा माणूस अजूनतरी मला भेटलेला नाही.

खाली बिपिन, चतुरंग यांनी लिहीलेलंच आहे, विविधता, कल्पकता आहे, म्हणून वापरली जाते. कुण्या ब्रिटीश मुलीचं नाव थेम्स नसेल पण आपल्याकडे गंगा, यमुना, नर्मदा, झेलम, सतलज अशी नावं दिसतातच ना!

माणसांची नावं सोडा, पण आपल्याकडे घरांनाही किती छान आणि कल्पक नावं असतात. विविधतेचा आनंद मानायचा का त्याला न्यूनगंडाचं लेबल द्यायचं? तुमचा विचार मान्य आहे की आपल्यात आणि पाश्चिमात्यांमधे या बाबतीत फरक आहे, पण ते न्यूनगंडाचं वाक्य वाचून फिस्सकन हसायला आलं.

अदिती

jaypal's picture

17 Nov 2009 - 11:37 am | jaypal

मझ्या मुलाचे नाव हौसेने कृष्णकांत ठेवले आहे.
पण त्याचे मीत्र त्याला के.के. म्हणतात. आणि तेच त्याला ही आवडते.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

ब्रिटिश टिंग्या's picture

17 Nov 2009 - 11:54 am | ब्रिटिश टिंग्या

काहीही म्हणा....धनंजय हे नाव बाकी खासच आहे हो! :)

पर्नल नेने मराठे's picture

17 Nov 2009 - 1:43 pm | पर्नल नेने मराठे

:D
चुचु

चिरोटा's picture

17 Nov 2009 - 3:11 pm | चिरोटा

आपल्या लोकांना आपल्या जुन्या नावांविषयी काही न्यूनगंड आहे का? का नव्याची आवड?

फॅशन्,स्टाईल.७०च्या दशकात नविन नावे ठेवायची लाट आली.महाराष्ट्रात दर दहा मुलांमागे एक अभिजीत्,एक अमित् आणि एक समीर असायचाच्.९०च्या दशकात अनिवासी भारतियांत जुनी नावे ठेवायची फॅशन आली. व्योम्,ओम्,ओंकार्,वेद.. जागतिकीकरणाच्या नादात जुन्याचा विसर पडू नये हा कदाचीत विचार असावा.मग भारतातही जुनी नावे ठेवायची लाट आली. हिंदी चित्रपटातही ते दिसते. 'विजय' जावून अर्जुन्,करण,राम,गंगा ही नावे आली.
दक्षिण भारतात चित्र वेगळे दिसते.चित्रा,महालक्ष्मी जावून दिव्या,सौम्या आल्या.मुलांची नावे फार बदललेली नसावीत.
भेंडी
P = NP

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Nov 2009 - 11:27 pm | बिपिन कार्यकर्ते

मी तर म्हणतो, न्यूनगंड वगैरे कसला? कैच्याकै!!!! अजिबात वाटत नाही तसे. उलट मला तर या पाश्चात्यांच्या कल्पना दारिद्र्याची कीव वाटते. तीच तीच नावे, युगानुयुगे. जी गोष्ट माणसांच्या नावांची तीच भाज्यांच्या / फळांच्या / नात्यांच्या नावाची. आपल्याकडे या सगळ्या नावात इतके वैविध्य / वैचित्र्य / नाविन्य असते की विचारता सोय नाही. कसला न्यूनगंड घेऊन बसलात राव?

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

17 Nov 2009 - 11:36 pm | चतुरंग

अरे नावांची इतकी विविधता कुठेच नसेल जगात!
न्यूनगंड वगैरे अजिबातच नाही!! छ्या..छ्या..छ्या!!! झटकून टाका तो विचार!!!

(बाबा-काका-मामा-दादा-भावोजी-आत्तोबा-मावसोबा)चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Nov 2009 - 11:56 pm | बिपिन कार्यकर्ते

कंसात चुकून मामंजी पण वाचलं. बहुतेक तेवढंच बाकी राहिलंय म्हणून असावं. ;)

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

18 Nov 2009 - 12:31 pm | टारझन

आरारारारारारा !!!!! :)
बिपीन भौ ... खल्लास !!!!

- (पावनं) टारझन

पक्या's picture

18 Nov 2009 - 12:59 am | पक्या

पाश्चात्यांमध्ये जुनी नावे बहुतकरून ठेवतात पण आता वेगळी ,जास्त प्रचलित नसलेली नावेही ठेवली जाऊ लागली आहेत.
स्टार, मेलडी , व्हिक्टरी, डेस्टीनी, फियोना, रिदम, अ‍ॅपल, सिनॅमन, समर , ऑटम , शुगर, सॅफ्रन .....(यादी वाढत जाईल.) अशी बरीच नावे वाचण्यात आणि ऐकण्यात आली आहेत. यातील काही लोक माहितीतले पण आहेत.
हॉलीवूड मधील नट नट्या तर आपल्या मुलांची नावे शोधून शोधून युनिक ठेवण्याचा प्रयत्न करतात.
आपल्याकडे जसे संस्कृतातील नावे शोधून काढून ठेवतात तसे हे पाश्चात्य लॅटिन , ग्रीक , रशियन वगैरे भाषातील नावे वापरतात.

जुन्याचा कंटाळा आला की नाविन्याचा शोध सगळीकडेच घेतला जातो.

-जय महाराष्ट्र , जय मराठी !

उमराणी सरकार's picture

18 Nov 2009 - 5:56 am | उमराणी सरकार

नायजेरीयात मी संडे, मंडे, कम्फर्ट, मर्सी, पॅशन, फेथ, पेशन्स, ज्युईलेट (ज्युलीयेट नव्हे) अशी नावे असलेली लोकं पाहीली आहेत.
उमराणी सरकार

न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे

गणपा's picture

18 Nov 2009 - 1:31 pm | गणपा

नायजेरीयातली अजुन काही मुलींची नावे पीस, गुडनेस,हॅप्पी, लव्हली.
तर मुलांमध्ये रविवार ते शनीवार पर्यंत सगळ्या वारांची नाव असलेले लोक पाहिलेत. बाकी ती ख्रिस्ती संताची नाव होतीच.
पण मुलींच्या नावात जी विविधता पाहिली तेव्हढी मुलांच्या नावात दिसली नाही.

आण्णा चिंबोरी's picture

21 Nov 2009 - 1:35 pm | आण्णा चिंबोरी

पाश्चात्यांच्या कल्पना दारिद्र्याची कीव वाटते.

जियो बिका जियो.!!!

केवळ पाश्चात्यच नव्हे तर पाश्चात्यांसारखेच भारतीयांनीही वागावे असे सुचवणारे हुप्प्यासारखे कल्पनादरिद्री लोक!!!! त्यांचीही कीव करा नाहीतर भारतीयांना कीव करता येत नाही म्हणून न्यूनगंड आहे असा चर्चाप्रस्ताव टाकतील.

प्रमोद देव's picture

21 Nov 2009 - 4:39 pm | प्रमोद देव

श्री हुप्प्या आणि अण्णासाहेब....आपण चर्चा जारी ठेवा...पण त्यात कृपा करून वैयक्तिक पातळीवर घसरू नका ही नम्र विनंती.
तुम्हा दोघांबरोबर इतरांनाही ही विनंती करतोय.
आशा आहे आपण ती मान्य कराल.

कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!

आण्णा चिंबोरी's picture

21 Nov 2009 - 4:47 pm | आण्णा चिंबोरी

प्रमोदकाका,

आपल्या लोकांना आपल्या जुन्या नावांविषयी काही न्यूनगंड आहे का? का नव्याची आवड? मला वाटते बहुधा न्यूनगंड हेच कारण असावे.

अशी पूर्वग्रहाने बरबटलेली वाक्ये लिहिणारे जे लोक काही ऍनेक्डोटल पुरावे घेऊन समाजशास्त्रप्रवीण असल्याच्या थाटात काहीही विधाने ठोकून देतात (म्हणे न्यूनगंड! हॅहॅहॅ !!!) त्यांना मिपा प्रशासनाने समज द्यावी असे वाटते.

या हुप्प्यानेच मागे मुसलमानांविषयी काहीच्याबाही बरळून मिपावरील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला होता. योग्यवेळी संपादकांनी हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले. आता त्याचे टारगेट मराठी लोक आहेत. असल्यांना वेळीच चाप लावला पाहीजे.

केशवराव's picture

17 Nov 2009 - 11:52 pm | केशवराव

माझ्या एका मित्राने आपल्या मुलाचे नांव घटोत्कच ठेवायचा आग्रह ध्रला होता. नांव वेगळे ठेवले तरी तो त्याला घट्या च म्हणतो.

आणि एका मुलीचे नांव ' प्रेस्पा' असे होते. कुणी अर्थ सांगेल का?

चतुरंग's picture

18 Nov 2009 - 12:10 am | चतुरंग

नवर्‍याने प्रेमाने व्हेस्पावरुन नेले असेल बायकोला दवाखान्यात त्याची आठवण म्हणून प्रेस्पा! ;)

चतुरंग

भडकमकर मास्तर's picture

18 Nov 2009 - 12:14 am | भडकमकर मास्तर

प्रेस्पा .. झुलु
झुलु प्रथेप्रमाणे प्रार्थनास्थळाला प्रेस्पा म्हणतात...

मी-सौरभ's picture

18 Nov 2009 - 12:22 am | मी-सौरभ

ही मुलगी पुढे आपल्याच बापाला कपडे देऊन म्हणेल 'प्रेस्पा' (press + paa)

:)

सौरभ

विजुभाऊ's picture

18 Nov 2009 - 9:48 am | विजुभाऊ

गुजराथी लोकांची नवी नावे परवडली जुनी नावे इतकी कैच्या कैच असतात.
माझ्या पहाण्यात ल्या व्यक्तींची नावे
१) बुकणदास
२) टबी
३) बटण भाई
४) दारकु ( मूळ नाव बहुधा द्वारीकाधीश असावे)
५) तिबु ( बहुधा त्र्यंबक)
अशी नावे होती.
जैन लोकांच्यात बरीच नावे विचित्र असतात.
विचित्र
सम्यक
अनेकान्त
प्रबल
ही नावे फार पूर्वीपासून असतात

जय महाराष्ट्र.....

सुबक ठेंगणी's picture

18 Nov 2009 - 10:04 am | सुबक ठेंगणी

गुर्जर बांधवांची नावांबाबतची टेस्ट कैच्या कैच असते. पूर्वी माझ्या एका विद्यार्थ्याचं नाव "ओले" असं होतं. कदाचित ह्या नावाचा ओले साबणाशी काहीतरी संबंध असावा. त्याचं पूर्ण नाव आजही लक्षात आहे आणि ते आठवून आत्तापण फुटले! :D

जय महाराष्ट्र!

अमृतांजन's picture

18 Nov 2009 - 12:06 pm | अमृतांजन

मला वाटत न्युनगंड वगैरे नसावा. आपल्याकडे वैविध्य खूप आहे.
ट्र्क, वडापच्या जीपा, रिक्षा, ट्रॅक्टर, वगैरेवर जी नाव दिसतात ती सर्व्दूर पोहोचली असे मानले जाते. तो पर्यंत शहरी लोकांनी नवी नावे शोधून काढली असतात.
बेलबॉटम ची फ्याशन परत जशी येउ शकते, तशीच लाट जुन्या नावांनाही येऊ शकते. सुमन, कमल, विमल, सुनीता, छाया, माया, जया, गया, ह्यातील जी आवडतील ती टिकतील जी नाही ती नाही.

मनीषा's picture

18 Nov 2009 - 8:49 pm | मनीषा

काळानुरुप आवडी निवडी बदलतात्..त्या प्रमाणे नावे सुद्धा बदलतात.
मला तर यात कुठे न्युनगंड आहे असे वाटत नाही .
नाविन्याची आवड हे एकमेव कारण असावे .

झेलम, कंगना, पायल, बिंदीया .. ही नावे जुनी समजायची की नविन ?

केळ्या's picture

21 Nov 2009 - 12:50 pm | केळ्या

माझ्या एका मित्राने,नाव अनंत,बायको अपेक्षा,मुलगी पूर्ती अशी समर्पक ठेवली आहेत.
दुसरे म्हणजे पूर्वी चांदोबामध्ये इतकी छान छान नावे असायची सूर्यकेतू,चंद्रभान,विरोचन असली!अशी नावे मुलांना ठेवण्याचा फार मोह होत होता.