मेल्या, तुला रे काय कळतंय त्या माडी चुकलो नाडीग्रंथातलं?

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
16 Nov 2009 - 4:29 pm
गाभा: 

श्री हैयो व अन्य नाडी ग्रंथ प्रेमी मित्र हो,

आपणास धनंजयांचे व्यक्तिमत्व त्यांच्या माहितीपुर्ण व सखोल प्रतिसादांमुळे फारच आदरणीय व जवळचे वाटते तसेच मलाही वाटते. त्यांनी त्यांच्या स्याद्वाद लेखातील एका प्रतिसादाला उद्देशून तुमच्याशी (श्री हैयोंशी) खरडवहीतून प्रतिसाद दिल्याचे आपण कळवल्याने मला त्यातील मजकुराला थोडी दखल देणे गरजेचे वाटले म्हणून...

खरे पाहता दोहोबाजूंच्या वितर्काचे जे मूळ, त्या प्रमाणांचे ओझे दोन्हीही बाजूस अधिकाधिक तुल्यबल होणे सहजशक्य असल्यास प्रात्यक्षिक करणे हे सुचविले जाते. तसेही, नाडिग्रंथांबद्दल नाडिविरोधकांनी निर्मिलेले अनेक वाद आहेत असे नाडिग्रंथांवर विश्वास ठेवणारे म्हणतांत. नाडिविरोधकांच्या ह्या संशयच्छेदसिद्धीसाठी शाब्दिक वादापेक्षा प्रात्यक्षिक सोपे ठरू शकेल, हेच मला सुचवायचे होते. एकास-एक प्रमाण नसले तर "सर्वथैव" अयोग्य असा माझा वादच नाही. आपला वितर्क कोठे अर्धवट होतो आहे, ते दाखवून देणे हाच माझा केवळ उद्देश आहे. असो.
आपल्या लेखनावरून काहीसा असा समज होतो की आपणाजवळील प्रमाण तेच आणि तेवढेच सत्य मानून वितर्क करणे योग्य असल्याचे आपणास सुचवायचे आहे. त्याहीउपर, आपला प्रात्यक्षिकास सर्वेथैव विरोध असल्याने, आपला वितर्क हा अर्धवट होतो आहे हे कदाचित आपण मान्य करणार नाही.

नाडीग्रंथांबाबत प्रात्यक्षिकाच्या प्रमाणाला विरोध करून सर्व नाडी विरोधक आपण वितर्क करत आहोत हे त्यांना पक्के माहित असूनही त्यांना तो करावा लागतो कारण त्यांचे सर्व तर्क शब्दप्रामाण्यावर आधारित आहेत. डॉ.नारळीकर काय, डॉ. दाभोलकर काय, फार काय येथे हिरीरीने लेखन करणारे श्री. प्रकाश घाटपांडेकाका काय किंवा मैत्रिणीच्या गप्पांतून नाडीला विनोदी म्हणणारी अदिती काय, बाकीचे सोडा या सर्वांचे तात्विक गुरू डॉ. अब्राहम कोऊर काय, सर्व एक जात असे घडत असावे असे जे म्हणतात, त्यांनी आपापले नाडी ग्रंथ पहावेत - कदाचित स्व. किंवा कै. डॉ.कोऊरांना सोडून अन्यांनी त्याची वही व कॅसेट व पट्टीचे पुरावे श्री. हैयोंच्या तमिळ लिपीज्ञानाचा लाभ घेण्यासाठी सादर करावेत त्यातून प्रत्यक्ष प्रमाणाची शहानिशी होईल.
त्यानंतर मग कोणीही आपणांस शीर्षकातील उल्लेखाने हिणवणार नाही. पहा पटतय का ते.

प्रतिक्रिया

टारझन's picture

16 Nov 2009 - 5:07 pm | टारझन

आयला .. .शशीकांत साहेब .. ब्याक इन फॉर्म ... लैच्च चिकाटी बॉ !!
लगे रहो :)

- पेप्सीकांत कोक

अवलिया's picture

16 Nov 2009 - 7:16 pm | अवलिया

लैच्च चिकाटी बॉ !!
लगे रहो :)

--विचार्वंत ठोक

======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

प्रभो's picture

16 Nov 2009 - 9:12 pm | प्रभो

लैच्च चिकाटी बॉ !!
लगे रहो

--ओलकांत फोक
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

विसोबा खेचर's picture

16 Nov 2009 - 5:20 pm | विसोबा खेचर

नाडीग्रंथातलं आमच्या धन्याला आणि मराठी साहित्यातलं आमच्या नंदनशेठला काहीही कळत नाही यावर मी अजूनही ठाम आहे..:)

बाकी चालू द्या! :)

फार काय येथे हिरीरीने लेखन करणारे श्री. प्रकाश घाटपांडेकाका काय

अहो हा घाटपांडे तर लै डेंजर माणूस. त्यातून पोलिसातला! केव्हा पब्लिकच्या नाड्या आवळेल ते सांगता यायचं नाही! :)

किंवा मैत्रिणीच्या गप्पांतून नाडीला विनोदी म्हणणारी अदिती काय,

हा हा हा! होय गं अदिती? हे मी काय ऐकतोय?! तुला नाडीत विनोदी काय वाटलं सांग पाहू! :)

ओकसाहेब, तुम्ही पब्लिककडे लक्ष न देता काय बिनधास्त हवं ते लिवा हो नाडीवर. आपला साला तुम्माला फुल्ल सपोर्ट आहे! :)

आपला,
(नाडी, सॉरी ताडीमाडीग्रंथ पेशालिश्ट तात्विक गुरू) डॉ तात्या कोऊर!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Nov 2009 - 5:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नाय हो तात्या, नाडीत कसलं आलंय विनोदी? मी काय दादा कोंडके आहे का शक्ती कपूर का त्यांच्या नाडीवरच्या आचरट जोक्सना हसणार्‍यातली?

नाही पण एकदा जावंच म्हणतेय या नाडी केंद्रात! ओ ओकसाहेब, एकदा नाडीकेंद्राची नाडी उघडून पहा आणि सांगा ना, मी तिकडे जाणं कधी होणार ते? काय होतं, सवय लागली आहे. दुसराच कोणीतरी सांगतो, की बये, अमक्या अमक्या दिवशी जी.एम.आर.टी.ला जा, तुझी ऑब्झर्व्हेशन्स तेव्हा होतील. स्वतःचं शेड्यूल स्वतः ठरवायची सवय नाही ना राहिली!

पण काहीही म्हणा हा, उगा प्रसिद्धी मिळाली हे पाहून अंमळ गुदगुल्या झाल्या, हे मान्य!

अदिती

महेश हतोळकर's picture

16 Nov 2009 - 5:40 pm | महेश हतोळकर

त्रिवार निषेध!
मी पण नाडी ग्रंथाची टवाळी केली आहे. मग माझे नाव का नाही आले?
कंपूबाजी केल्याबद्दल ओकसाहेबांचा निषेध.
आम्हाला पण प्रसिद्धी पाहिजे.

विजुभाऊ's picture

16 Nov 2009 - 6:48 pm | विजुभाऊ

बाकी काही म्हणा. ओक साहेब तुमच्या चिकाटीला मानलं बुवा


जय महाराष्ट्र.....

प्रकाश घाटपांडे's picture

16 Nov 2009 - 9:35 pm | प्रकाश घाटपांडे

नाडीची नीरगाठ चुकुन सुटली नाई तर भानगड नको म्हनुन आम्ही विल्याष्टिक बी वापरुन पघितल.तरी बी वांदे झालेच ना आमचे?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.