गाभा:
अनेकांना असे वाटते की, ’आपण बुवा एकदम रोखठोक बोलून टाकतो; आहे काय अन नाही काय!’
पण मुळात मला असे वाटते की, रोखठोकपणा म्हणजे नक्की कसा हे त्या व्यक्तिला माहिती नसते आणि त्यामुळे अनेकदा त्या तथाकथित रोखठोकपणाचा आव आणल्यामुळे समोरील माणूस दुखावला जाण्याचीच शक्यता जास्त असते.
इंग्रजीमधे ज्याला "असर्टीव्हनेस" म्हणतात तो जरा रोखठोकपणाचा सौम्य प्रकार असतो असे मला वाटते पण खात्री नाही.
माझे प्रश्न असे आहेत-
१. रोखठोकपणा म्हणजे नक्की काय?
२. रोखठोकपणा आणि असर्टीव्हनेस ह्यात फरक काय?
३. रोखठोकपणा कधी उपयोगी पडतो? व नाही?
प्रतिक्रिया
16 Nov 2009 - 11:36 am | अमोल खरे
१. रोखठोकपणा म्हणजे नक्की काय?
जे बोलुन आपला आहंकार सुखावतो व समोरच्याचा अहंकार दुखावतो ते बोलणे.
२. रोखठोकपणा आणि असर्टीव्हनेस ह्यात फरक काय ?
जास्त नाही. तुम्ही त्यातल्या त्यात सौम्य बोलता. समोरचा माणुस त्यातल्या त्यात कमी दुखावतो. थोडक्यात अॅप्रेझल च्या वेळेस जे होते ते.
३. रोखठोकपणा कधी उपयोगी पडतो? व नाही?
समोरच्याला तुमची कितपत गरज आहे त्यावर अवलंबुन आहे. समोरचा निडी असेल तर तुमचे सगळे तो ऐकुन घेतो आणि वर ते बरोबर आहे असेही म्हणतो. :)
16 Nov 2009 - 11:46 am | अमृतांजन
१. रोखठोकपणा म्हणजे नक्की काय?
जे बोलुन आपला आहंकार सुखावतो व समोरच्याचा अहंकार दुखावतो ते बोलणे.
चौकार!! मस्त
२. रोखठोकपणा आणि असर्टीव्हनेस ह्यात फरक काय ?
जास्त नाही. तुम्ही त्यातल्या त्यात सौम्य बोलता. समोरचा माणुस त्यातल्या त्यात कमी दुखावतो. थोडक्यात अॅप्रेझल च्या वेळेस जे होते ते.
भन्नाट. रापचिक!
आवडले तुमचे प्रति-साद!
16 Nov 2009 - 11:58 am | टारझन
???
मला पण तुमचे धागे आवडले !! ;)
- (रोखठोक) टोकटोक
16 Nov 2009 - 11:49 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
रोखीने ठोक (होलसेल) माल घेणे.
एक मराठी शब्द आहे दुसरा विंग्रजी!
मी अनेक लोकांना तोंडावर सांगितलं, "आपलं एकमत कधीच होणार नाही, तेव्हा तुम्ही माझ्याशी या विषयावरतरी किमान बोलू नका; तुम्ही मोठे आहात म्हणून कायमच योग्य असता आणि मी लहान आहे म्हणून मी कायमच चुका करते हे मला मान्य नाही!" बरेचसे लोकं एकूणच बोलणं टाकतात. जे उरतात ते खरे समजूतदार लोक असतात, पुढे वयाची बंधनं न रहाता चांगले मित्रही होतात. फायदाच होतो, फोलपटं उडून जातात!
अदिती
16 Nov 2009 - 12:51 pm | अमृतांजन
मी अनेक लोकांना तोंडावर सांगितलं, "आपलं एकमत कधीच होणार नाही, तेव्हा तुम्ही माझ्याशी या विषयावरतरी किमान बोलू नका; तुम्ही मोठे आहात म्हणून कायमच योग्य असता आणि मी लहान आहे म्हणून मी कायमच चुका करते हे मला मान्य नाही!" बरेचसे लोकं एकूणच बोलणं टाकतात. जे उरतात ते खरे समजूतदार लोक असतात, पुढे वयाची बंधनं न रहाता चांगले मित्रही होतात. फायदाच होतो, फोलपटं उडून जातात
ही चांगली केस स्टडी आहे!
16 Nov 2009 - 11:50 am | सुहास
१. रोखठोकपणा म्हणजे नक्की काय?
एखाद्याला "रोखीत (उधारीच्या विरूध्द)" ठोकणे म्हणजे रोखठोक असणे..! :) (ही माझी व्याख्या..!)
२. रोखठोकपणा आणि असर्टीव्हनेस ह्यात फरक काय?
असर्टीव्हनेस म्हणजे the quality or state of being forceful (as in expression) असा अर्थ मेरिअम्-वेबस्टर दाखवते... पण मला नेमका रोखठोकपणा आणि असर्टीव्हनेस ह्यातला फरक सांगता येणार नाही..
३. रोखठोकपणा कधी उपयोगी पडतो? व नाही?
तसा रोखठोकपणा कधी उपयोगी पडतो तर कधी नाही.. जेथे पॉलिटीकली माघार घेणे योग्य वाटेल तेथे ती घ्यावी..
लग्नानंतरच्या आयुष्यात घरामध्ये पुरूषाचा रोखठोकपणा उपयोगी पडत नाही असा बहुतेक पुरूषांचा अनुभव आहे.. ;)
--सुहास
16 Nov 2009 - 12:02 pm | टारझन
खुलाश्याबद्दल धन्यवाद,
16 Nov 2009 - 12:56 pm | अमृतांजन
लग्नानंतरच्या आयुष्यात घरामध्ये पुरूषाचा रोखठोकपणा उपयोगी पडत नाही असा बहुतेक पुरूषांचा अनुभव आहे.
ही केस स्टडी नं २ चांगली आहे. (वर आदितीबैनी सांगितलेली केस स्टडी नं १)
16 Nov 2009 - 1:28 pm | jaypal
१. रोखठोकपणा म्हणजे नक्की काय? = रो़ख अमराठी (भाषेतुन शपथ) ठोक आबुआजमी
२. रोखठोकपणा आणि असर्टीव्हनेस ह्यात फरक काय? = इग्रजी कच्च आहे. जाणकारांना विचारुन कळवतो (वाट बघा )
३. रोखठोकपणा कधी उपयोगी पडतो? व नाही? = उपरोक्त १ प्रमाणे "रोखठोकपणा" संसदेत उपयोगी पडतो पण वैयक्तीक आयुष्यात फार कमी वेळा उपयोगी पडतो (वैयक्तीक स्वभव व स्वानुभवा वरुन म्हणतो. कारण रोख बोलण्यावरुन अनेकदा ठोक मिळाला आहे.)
"रोखठोकसल्ला= मिपा वर येत रहा अनुभव घेत रहा." (नाका तोंडातुन पाझर फुटल्यास किंवा ठसका लागल्यास इतर कोणासही जबाबदार ठरवु नये. )
**************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
16 Nov 2009 - 1:36 pm | अमृतांजन
मिपा वर येत रहा अनुभव घेत रहा
पथ्य आणि मात्रा नाही सांगितलीत!
16 Nov 2009 - 1:49 pm | jaypal
(रोखठोक सल्ला = खुरमांडीकर वैद्यांचा सल्ला घ्यावा)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
16 Nov 2009 - 1:58 pm | ब्रिटिश टिंग्या
jaypalसाहेब,
पथ्य : आलेपाचक किंवा गेला बाजार इनो!
मात्रा : जळजळीनुसार! (अधिक माहितीकरिता डान्याला विचारणे)
17 Nov 2009 - 12:12 am | अविनाशकुलकर्णी
१. रोखठोकपणा म्हणजे नक्की काय?
रोख ठोक पणा म्हणजे रोख रक्कम दे नाहितर ठोकुन काढतो असे सांगणे म्हणजे रोख ठोक पणा....
२. रोखठोकपणा आणि असर्टीव्हनेस ह्यात फरक काय ?
मराठीचा अभिमानी असल्याने असर्टीव्हनेस च अर्थ समजत नाहि...
३. रोखठोकपणा कधी उपयोगी पडतो? व नाही?
हमखास उपयोगी पडतो..वसुली हमखास होते...बाबा रे ठोक नको रोख घे असे म्हणतात...उपयोगी पडतोच नाहि असे नाहिच...
आपला... रोख ठोक वसुलिकर मु.पो.कसबा..