बटाट्याची भाजी

बबनराव's picture
बबनराव in पाककृती
11 Nov 2009 - 3:55 pm

३-४ बटाट्याचे उभे गोल गोल काप करुन घेणे.साले काढू नयेत.
त्यात ४-५ हिरव्या मिर्च्या कापून ,(तिखट हवे असल्यास २ मिरच्या जास्त घेणे )
३-४ मोठे चमचे ओले खोबरे खवून ,
२-३ चमचे लाल तिखट ,
१/२ चमचा हळद ,
८-१० कळ्या लसूण ठेचून,
२-३ काड्या कोथिंबीर चिरून,
चवी प्रमाणे मीठ,
२ मोठ्या पळ्या तेल
वरील सर्व पदार्थ एकत्र करावेत व
भांडे गॅस वर ठेवावे . गॅस मंद ठेवावा.
२-३ मिनीटानी वाफ आली की एक वाटी पाणी घालून भाजी शिजू द्यावी .
( रस्सा हवा असल्यास पाणी थोडे जास्त घालावे )
गरम गरम चपाती बरोबर खावी.

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

11 Nov 2009 - 4:04 pm | पर्नल नेने मराठे

२ मोठ्या पळ्या तेल :o 8| भाजी कि भजी करताय
चुचु

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Nov 2009 - 4:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि ३-४ बटाट्यांसाठी ४-५ मिरच्या + २-३ चमचे तिखट ... बाप रे ...

अदिती

बबनराव's picture

11 Nov 2009 - 5:09 pm | बबनराव

साहेब , आधी भाजी खाउन बघा. आणि मगच प्रतिक्रिया द्या.
ही भाजी झणझणीतच छान लागते.पुचपुचीत काय मजा ?

टारझन's picture

12 Nov 2009 - 2:04 pm | टारझन

पुचपुचीत काय मजा ?

अरेरे !! काय हे शब्दभांडार ? :)
पचपचीत चालू शकेल काय ?

--(गडबडीत) चुंबनराव बटाटे

परिकथेतील राजकुमार's picture

12 Nov 2009 - 2:06 pm | परिकथेतील राजकुमार

=)) =))

=))

=)) =))

हिणकस सम्राटा !!!

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

पर्नल नेने मराठे's picture

11 Nov 2009 - 4:09 pm | पर्नल नेने मराठे

८-१० कळ्या लसूण ठेचून,
दुसर्यादिवशी डोळे चिकटतिल उष्णतेने #:S

चुचु

बबनराव's picture

11 Nov 2009 - 5:12 pm | बबनराव

८-१० लसण्याच्या पाकळ्या म्हणा हव्या तर.

गणपा's picture

11 Nov 2009 - 4:17 pm | गणपा

काय ग पोरींनो काय चाललय, कसल्या त्याच्या प्रमाणांच्या चुका काढताय.. :?
बबनराव तुम्ही लक्ष नका देउ हो टाका कित्ती वाटतील तितक्या मिरच्या, लसुण, तेल तिखट..
पण सोबत फटुपण टाका
;)

बाकरवडी's picture

11 Nov 2009 - 8:58 pm | बाकरवडी

भाजीच्या फोटू बरोबर भाजी खाताना तुमचा पण एक फोटू येउद्या. ;)

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

रेवती's picture

11 Nov 2009 - 5:30 pm | रेवती

फटूशिवाय पदार्थाची कल्पना येत न आही. कृती वेगळीच आहे त्यामुळे फटूची आवश्यकता वाढलीये.

रेवती

पर्नल नेने मराठे's picture

11 Nov 2009 - 5:32 pm | पर्नल नेने मराठे

=))
चुचु

अविनाशकुलकर्णी's picture

11 Nov 2009 - 9:05 pm | अविनाशकुलकर्णी

ज्यांना मुळव्याधिचा त्रास आहे त्यांनि हि कृति वाचु सुध्धा नये.....
[नुसते वाचुनच उद्या सकाळी काय होइल याचि काळजी लागली]

पक्या's picture

11 Nov 2009 - 10:22 pm | पक्या

रेसिपी छान आहे. बटाटा रस्सा भाजी झणझणीतच हवी.
३-४ बटाट्यांचा साईज मोठा असेल तर रेसिपी मधिल जिन्नसांचे प्रमाण फार काही चुकले नाहिये.
शिवाय मिरच्या तुकडे करून घालायच्या आहेत्...मिक्सर मध्ये वाटून नाही. त्यामुळे जेवताना त्या बा़जूलाच काढल्या जातील. तिखट २-३ चमचे मात्र खूप होईल. पण इतर दुसरा मसाला (पावडर स्वरूपातला) वापरला नाहिये...जसे काळा , गोडा किंवा गरम मसाला. त्यामुळे एक ते २ टे. स्पू. तिखट ठीक होईल. (भाजीत कांदा , आले नाहिये त्यामुळे त्या पदार्थाचा तिखटपणा पण भा़जीत नाहिये.) लसूण पाकळ्या अगदीच छोट्या छोट्या असतील तर ८-१० हे प्रमाण योग्य आहे. अमेरिका मध्ये मिळते तशी भली मोठी लसूण असेल तर ४-५ पाकळ्या हे प्रमाण ठिक असावे असे वाटते.
माझ्या दृष्टीने तेलाचे प्रमाण ठी क आहे. अति जास्त नाहिये.

माझी एक कोब्रा मैत्रिण आहे . ती म्हणते "आम्ही कोकणस्थ आमटीला फोडणी देताना त्यात मिरची फक्त फिरवतो आणि परत बा़जूला काढून ठेवतो. एवढा तिखटपणा (?) आमच्यासाठी खूप होतो." आता इतपत तिखट खाणार्‍याला वरील रेसिपी म्हणजे महाजाळच वाटेल.
आमच्याकडे काही मराठवाड्यात रहाणारे नातेवाईक अशाच तिखटजाळ भाज्या जेवणात खातात.

वरील रेसिपी नक्कीच चविष्ट होणार ह्यात शंका नाही.
- जय महाराष्ट्र , जय मराठी !

चिरोटा's picture

11 Nov 2009 - 10:45 pm | चिरोटा

भाजी झणझणीत होणार ह्यात शंका नाही. बटाट्याची साले न काढण्याचे कारण कळले नाही.तिखट कमी पाहिजे असल्यास टोमॅटो टाकला तर?
भेंडी
P = NP

पक्या's picture

11 Nov 2009 - 11:09 pm | पक्या

>>बटाट्याची साले न काढण्याचे कारण कळले नाही.

बटाट्याच्या सालीत पोषण मूल्ये असतात. फायबर तर असतेच शिवाय क जीवनसत्व , थोड्या प्रमाणात लोह आणि प्रथिन पण असते.

मात्र बटाट्याच्या पिकावर जंतूनाशके (पेस्टिसाईड्स) फवारली असल्यास ती सालीमधे एकत्रित झालेली असतात. त्यामुळे अशा बटाट्याची साल खाणे आरोग्याच्या दृष्टिने चांगले नाही.

-जय महाराष्ट्र , जय मराठी !

बकुळफुले's picture

12 Nov 2009 - 2:09 pm | बकुळफुले

मात्र बटाट्याच्या पिकावर जंतूनाशके (पेस्टिसाईड्स) फवारली असल्यास ती सालीमधे एकत्रित झालेली असतात. त्यामुळे अशा बटाट्याची साल खाणे आरोग्याच्या दृष्टिने चांगले नाही.

पक्या भौ बटाटे जमिनीत येतात. जंतुनाशक फवारणी ही नेहमी पानांवर करतात.

निखिलराव's picture

12 Nov 2009 - 2:36 pm | निखिलराव

पक्या भौ बटाटे जमिनीत येतात.
१ नंबर........... :))

साईली's picture

2 Mar 2010 - 12:41 pm | साईली

जरी जंतूनाशके (पेस्टिसाईड्स) फवारणी पानांवर करतात तरी जंतूनाशके आन्तर प्रवाहि असतात्.त्यामुळे अशा बटाट्याची साल खाणे आरोग्याच्या दृष्टिने चांगले नाही.

बाप्पा's picture

12 Nov 2009 - 2:09 am | बाप्पा

पक्या भाउ बटाट्याच्या पिकावर जंतूनाशके (पेस्टिसाईड्स) फवारली असल्यास ती पानांवर राहतील ना. :P आहो बटाटे हे जमीनीखाली येनारे पिक आहे. असो बटाट्याच्या सालीला एक विशीष्ट अशी छान चव असते एवढं नक्की...

-- बाप्पा लंबोदर.

मसक्कली's picture

12 Nov 2009 - 12:09 pm | मसक्कली

मिरच्या+तिखट....

वाट आहे सगळ्ञान्चि...

=)) =))

छे छे ! बटाट्याची भाजी करुन वाया घालवणं मला पटत नाही. बटाटे ऐनवेळेस दगड सापडला नाही तर बसेस फोडायला फार उपयोगी असतात. कर न भरता वाचणा-या पैशात माझ्याकडे पोते पोते भरुन बटाटे जमा केले आहेत. निकडीच्या वेळेस हवे तेथे टेम्पोतुन पुरवतो.

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Nov 2009 - 12:20 pm | llपुण्याचे पेशवेll

आयला णाण्या तू तर मोठीच सोय केलीस. पुढच्या वेळेला आम्हाला गरज पड्ली की तूलाच ऑर्डर देईन बघ. तसेही रस्त्यावर दगड तरी किती गोळा करत बसणार ना!
कर न भरता वाचलेल्या पैशात चांगले डिल मलाही मिळेल.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

परिकथेतील राजकुमार's picture

12 Nov 2009 - 1:05 pm | परिकथेतील राजकुमार

पण दगड वापरण्यात जे सेंन्सेशन (संदर्भ :- सात च्या आत घरात (निळु फुले) ) आहे, ते बटाटे वापरण्यात आहे का ??

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

Nile's picture

12 Nov 2009 - 1:17 pm | Nile

मला एक पोतंभर बटाटे पाठवुन द्या, च्यायला इथे लै महाग आहेत.

अवलिया's picture

12 Nov 2009 - 1:21 pm | अवलिया

बस फोडायला वापरणार असशील तरच मिळतील, खायला वगैरे वापरुन नासणार असशील तर मिळणार नाहीत.

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

Nile's picture

12 Nov 2009 - 1:32 pm | Nile

हॅ हॅ, बसेस पण पाठवुन द्या मग. ;)

टारझन's picture

12 Nov 2009 - 2:09 pm | टारझन

हॅहॅहॅहॅ ...
एवढं सगळं कशाला पाठवायचं ? सरळ जेवण होऊन पचेपर्यंत थांबा :)
रेशेपीच घरपोच देऊ :) कसे ?

-(गोरिल्लाप्रेमी) बाइल

टारझन's picture

12 Nov 2009 - 2:10 pm | टारझन

हॅहॅहॅहॅ ...
एवढं सगळं कशाला पाठवायचं ? सरळ जेवण होऊन पचेपर्यंत थांबा :)
रेशेपीच घरपोच देऊ :) कसे ?

-(गोरिल्लाप्रेमी) बाइल

परिकथेतील राजकुमार's picture

12 Nov 2009 - 2:16 pm | परिकथेतील राजकुमार

मालकांनी रक्ताचे पाणी करुन आणी चार चार मजली माड्या चढण्याचे कष्ट घेउन खरडवहिची सोय करुन दिली आहे. वायफळ चर्चांसाठी तिचा वापर करावा.

अर्थात, ज्याचीत्याची जाण, समज आणि संवेदनशीलता यावरही काही गोष्टी अवलंबून असतात हा भाग वेगळा..!

या अवांतराचा तीव्र निषेध..

(संतप्त) परातात्या

आमचे राज्य

सानिका पटवर्धन's picture

12 Nov 2009 - 9:57 pm | सानिका पटवर्धन

बबनराव, कालच तुमच्या पद्धतीची बटाट्याची भाजी बनवली होती. एकदम सही झाली होती. इतक्या सोप्या आणि झटपट पाककृती बद्दल धन्यवाद. तुमच्या वतीने मी फोटू डकवते.

फोटूचा आकार लहान कसा ठेवता येईल? :?

(संपादक - हा घ्या केला फोटू लहान :))

प्रभो's picture

12 Nov 2009 - 10:00 pm | प्रभो

फोटू टाकताना height ,width हवी तशी सेट करा....

--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!