मराठीद्वेष्ट्या अबुआझमीला सभागृहातच वाजवले हे वाचुन मला जितका आनंद झाला तो शब्दात व्यक्त करणे अवघड आहे.
आज अनेक मराठी वर्तमानपत्राचे अग्रलेख वाचले आणि मन निराश झाले.कोणतरी मराठीभाषेला आव्हान देतो, निरर्थक तर्क मांडतो आणि आपण उज्ज्वल परंपरा, सांसदिय लोकशाहीच्या नावावर गप्प बसावे इतका मूढपणा झाला नाही याचे निर्विवाद श्रेय मनसेच्या आमदारांना दिलेच पाहिजे.
जर मनसेच्या आमदारानी मौन पाळले असते, जानेदोना जानेदोना असे हताश उद्गार काढले असते इतिहासात मराठीच्या एका भेकड पिढीची नोंद झाली असती. सुदैवाने राजकारण असो अथवा त्यामागचा भावनिक आवेश असो, जे काही असेल ते असो, मनसेने लाक्षणिक का होईना, कानाखाली आवाज काढला हे बरेच झाले. शिवाजीचे वंशज म्हणून कोणाकडे तरी बोट दाखवता येईल असे सांगितले.
तुकाराम,नामदेव, एकनाथ, रामदास का मुर्ख होते म्हणून त्यांनी लोकभाषा म्हणून मराठीचा उपयोग केला? आचार्य अत्रे इत्यादींनी मराठीसाठी आपल्या आयुष्याचा त्याग केला, हु्तात्म्यांनी आपले प्राण दिले या सर्वांच्या परंपरेची कडी अथवा बुज मनसेने राखली हे मला नमूद करावेसे वाटते.
आज जर मराठीचे मुले आमदारकीच्या पत्रावळीसाठी गप्प बसले असते तर.... हा विचारही मला असह्य वाटतो.
आता आपल्यासर्वांचे एकच कर्तव्य आहे जेथे मारामारी याविरुद्ध विचार मांडला जाईल त्याला आपापल्या परीने मराठीहिताचाच विषय मांडणे. राजठाकरे यांचे समर्थन करणे हेच आपले कर्तव्य आहे.
यामागे राजकारण आहे की मिलिजुली आहे याचा विचार तरी करण्याचा मोह टाळणे.
आजदिवसभर माझ्या मनात एकच विचार येत होता की आचार्य अत्रे असते तर त्यांनी आपले मत कसे व्यक्त केले असते?
राज ठाकरे यांनी आता आपले स्वताचे एक वर्तमानपत्र निर्माण करावे असेही सुचवावेसे वाटते.
रमेशभाऊ यांचे अभिनंदन. ( अर्थातच ते आमच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करतात हा आमच्या भाग्याचा भाग आहे.).
शाब्बास मराठी मुलांनो, आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. ज्या सभासदांना मराठीबद्दल प्रेम नाही त्यात तुम्हाला न बसवता नियतीने तुमचा सन्मानच केला आहे हे मला मनापासून वाटते.
जय महाराष्ट्र.
प्रतिक्रिया
10 Nov 2009 - 10:15 pm | शैलेन्द्र
आयला, लय भारी...
11 Nov 2009 - 2:41 pm | टारझन
आजपासून माझा हृदयपरिवर्तनावर विष्वास आहे !! शेवटी कलंत्री मोहोदयांचेही हृदयपरिवर्तन झाले तर !
-- टारंत्री
TAARANTREE
फांदी क्र. १२, झाड क्र १२२०२ , नदीकाठ ,
BRANCH # 86, TREE # 25, RIVERSIDE
चिंपाझीनगर , गोरील्लापुर
CHIMPANZEE NAGAR , GORILLAPUR
बुंगाबुगांगा - ४२० ४२० अफ्रिका
BUNGABUGANGA - 411 044. AFRICA
दूरध्वनी +२५६२२१११८ / +२२५११२१७१९७
Telephone +256221118/+22511217197
11 Nov 2009 - 5:43 pm | परिकथेतील राजकुमार
टार्याशी शब्दशः सहमत !
कलंत्री काका हे तुम्ही लिहिलय ? काय 'हॅक' झाला का काय ह्यांचा आयडी ?? कुणी चेक करा रे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
10 Nov 2009 - 10:44 pm | बिपिन कार्यकर्ते
आयला!!! च्यामारी... यह मै क्या पढ रहा हूं!!!!!
बिपिन कार्यकर्ते
10 Nov 2009 - 11:06 pm | धमाल मुलगा
घेऊ का तुझ्यापुढचं माईकचं डबडं काढून? :D
असो!
कलंत्रीसाहेब, छान लिहिलंत! अभिनंदन! :)
11 Nov 2009 - 1:59 pm | विजुभाऊ
घेऊ का तुझ्यापुढचं माईकचं डबडं काढून?
धम्या .....वांजळे ना त्यांच्या तब्येतीमुळे ते सहज जमले तसे करायला.
10 Nov 2009 - 10:59 pm | मिसळभोक्ता
आजदिवसभर माझ्या मनात एकच विचार येत होता की आचार्य अत्रे असते तर त्यांनी आपले मत कसे व्यक्त केले असते?
???
आजदिवसभर माझ्या मनात एकच विचार येत होता की महात्मा गांधी असते तर त्यांनी आपले मत कसे व्यक्त केले असते?
(कलंत्रींचा तोतया मिसळपावावर आला आहे की काय ? शनवारवाड्यावर बोलावून खात्री पटवून घ्यायला हवी.)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
11 Nov 2009 - 12:45 am | आनंदयात्री
>>मराठीद्वेष्ट्या अबुआझमीला सभागृहातच वाजवले हे वाचुन मला जितका आनंद झाला तो शब्दात व्यक्त करणे अवघड आहे.
हे वाक्य वाचुन जरा गोंधळलोच !!
लेखक महोदय आपण नक्की द्वारकानाथ कलंत्रीच का ?
गांधींपेक्षा मराठीवर जास्त प्रेम आहे हे पाहुन "हे आमचे कलंत्री यांचा मराठीवर फार जीव.." असे शब्द मनात उमटले आणी त्यांनी सत्य लिहिण्याचा आग्रह केला ..
-
आपलाच
आंद्यानाथ कळंठ्री
11 Nov 2009 - 8:45 am | llपुण्याचे पेशवेll
माझा हृदयपरिवर्तनावर पूर्ण विश्वास आहे. आणि कलंत्रीसाहेबांकडे बघून आता त्याची खात्री पटली.
अवांतर: मिलीजुली हा शब्द मराठी आहे का? कलंत्री साहेबाना कदाचित संगनमत म्हणायचे असेल. असो. हळू हळू हृदयपरिवर्तन होत आहेच तर थोडे थांबून बघूया, कसे?
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
11 Nov 2009 - 1:59 pm | कलंत्री
गांधींनीसुद्धा मरा अथवा करा असाच संदेश दिला असता. मराठी माणूस विखुरलेला, माध्यमांच्या नाड्या इतरांच्या हातात अश्या वेळेस काय करायला हवे?
अबुने आव्हान देऊन हिंदीत शपथ घेतली असती तर किती लोकांनी निषेध केला असता? हिंदीमुजोर लोकांनी मराठीभाषकांच्या नाकावर टिच्चून काय गमजा केल्या असत्या याचा विचार केला तर जे झाले ते बरेच झाले असे म्हणावे लागेल.
10 Nov 2009 - 11:09 pm | देवदत्त
जय महाराष्ट्र :)
11 Nov 2009 - 12:53 am | टुकुल
काल तुम्हाला जो आनंद झाला त्यापेक्षा जास्त मला तुमचा हा लेख वाचुन झाला !!
उगाच मनात एक शंका येत आहे, तुमचा आयडी हॅक तर नाही ना झाला?
--टुकुल
11 Nov 2009 - 7:59 am | विकास
जे काही विधानसभेत झाले ते मला अजिबात मान्य नाही हे इतरत्र सांगितले आहेच. पण तरी देखील अबू, शिक रे... अ आ ई! बातमी वाचून "खेटराची पूजा पावली" असेच म्हणावेसे वाटले. ती थोडक्यातः
विस्तृत बातमी वरील दुव्यावर वाचता येईल. :-)
बाकी आता राज ठाकर्यांनी दम दिला तर "अबू"जीं ना मराठी येऊ लागल्यास समजणे सोपे जाईल मग शब्दांचा मारच पुरेसा होईल...त्यामुळे कलंत्री साहेबांच्या शब्दांशी(च) सहमत होत म्हणतो की, एकाला शहाणे केलेत म्हणून शाब्बास मराठीच्या मुलांनो! :)
11 Nov 2009 - 10:11 am | वेताळ
चक्क गांधीवादी कलंत्री साहेब आज मारामारीचे कौतुक करता आहेत, हे जरा विचित्र वाटते.बाकी कलंत्री साहेबानी आपले मौन योग्यवेळी सोडले ह्याबद्दल त्याचे अभिनंदन.
वेताळ
11 Nov 2009 - 1:54 pm | कलंत्री
गांधींनी सुद्धा भेकडाच्या अहिंसेपेक्षा शुराची हिंसा श्रेष्ट आहे असे लिहिले होते. मनपरिवर्तन, विचारविनिमय, आपल्या विचारांचा आग्रह आणि इतराबद्दल आदर अश्या पद्धतीने अहिंसेची वाटचाल होऊ शकते. ( क्रम चुकत असेल कदाचित).
मराठी बद्दल अबुने शपथ घेतली असती अथवा घेतली नसती तर फारसे बदल झाला नसता, पण त्याच्या वल्गना आणि मराठी माणूस लोकशाहीच्या बंधनात अडकला आहे हे पाहणे जास्त वेदनादायी झाले असते. सर्वच सदस्यांनी जर निषेध केला असता तरी वेगळाच आनंद झाला असता.
मनसेच्या सदस्यानी याबाबत कोणताही विचार केला नाही आणि अबुला असा झटका दिला त्याबद्दल कोणाही मराठीप्रेमीला आनंद वाटेल, इतकेच कश्याला इतर प्रांतियभाषाप्रेमींनाही आनंद वाटेल, कारण आज मराठी जात्यात आहे आणि इतर भाषा सूपात आहे इतकेच.
ही मारामारी कोणत्याही आरोपातून, स्वार्थातून झाली नाही, केवळ एकच निकष म्हणजे भाषा आणि तिची अस्मिता. कोणीतरी आपल्या भाषेसाठी अश्या थराला जाऊनही कोणताही मागचापूढचा विचार करत नाही आणि कृती करतो हेच मला भावले.
तसे पाहता अबुने कोणता पर्याय ठेवला होता? मार खाणे अथवा पुढच्या पाच वर्षात मराठीलोकांना डिवचत जाणे. त्यात मनसेच्या लोकांनी त्याला पहिल्या पर्यायाची निवड करण्यास भाग पाडले हाच आनंदाचा भाग आहे.
माझ्या लेखात लिहिल्याप्रमाणे मराठी वर्तमानपत्रातील अग्रलेख वाचून मला वाईट वाटले. मी एक प्रामाणिक माणूस आहे आणि अश्यावेळी या लोकांची बाजू मी नाही घेणार तर कोण घेणार? असाही विचार मनात आला आणि जसे वाटत गेले तसे लिहित गेलो.
यापूढे विधानसभेतील राहिलेल्या सदस्यांची जबाबदारी जास्त आहे, हा अबु हिंदीत बोलेल, बोलण्याचा प्रयत्न करेल, वातावरण बदलण्याचा प्रयत्न करेन, तेंव्हा राहिलेल्या मनसेच्या सदस्यांनी किंवा शिवसेनेच्या सदस्यांनी तरी त्याचा परामर्ष घ्यावा असे सुचवावेसे वाटते. भाजप आणि कॉगेसच्या सदस्यांनीही अश्या खोडसाळ प्रयत्न चालू असतांना मराठीप्रेमाचीच बाजू घ्यावी.
झाले ते पुरे झाले आता मात्र मराठीबद्दल कोणतीही आगळीक सहन करता कामा नये, अन्यथा हेही विसरु नये की या भूमीत जो कोणी मातला त्याला या मातीनेच मातीमोल केले आहे. औरंगजेब-अफझल यांचाही इतिहास हेच सांगतो आणि अबुसारख्यांच्या उन्मत्त आणि घमेंडखोर लोकांचा इतिहास हेच सांगेल.
11 Nov 2009 - 2:01 pm | अवलिया
कलंत्रींच्या शब्दांशी सहमत आहे.
अगदी बरोबर. पण यासाठी थोडाफार त्रास सर्वच मराठी भाषकांना सहन करावाच लागेल. पण आजकाल कसे आहे तुम्ही लढा .. आमच्या पोटातले पाणी जरी हलले तर याद राखा ! असल्या षंढ प्रवृत्तींचा बोलबाला आहे.. गांधीवादाचा परिणाम असेल तो ! असो.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
11 Nov 2009 - 4:21 pm | शैलेन्द्र
वा वा.. शब्दाशब्दाशी सहमत..
11 Nov 2009 - 5:40 pm | समंजस
कलंत्रींनी साहेबांनी व्यक्त केलेल्या विचारांशी पुर्णपणे सहमत!!
मात्र हे प्रकरण फक्त मराठी विरुध्द हिंदी असे नाही. इथे अबु आझमीला त्याचा माजोरडेपणा दाखवायचा होता, तसेच हिंदी भाषी मतदारांना त्याच्या कडे ओढायचे होते त्याकरताच तो काही दिवसांपासून या बद्दल बोलत होता. तसेच आता शिवसेना पुर्वीप्रमाणे आक्रमक राहीली नाही हे त्याला दाखवायचे होते. त्यात तो यशस्वी झाला. मात्र मनसे बद्दलचा त्याचा अंदाज चुकला. मनसे ने फक्त बोलून न दाखवता, क्रुती सुद्धा करून दाखवली. आता तरी तो असे धाडस करून बघणार नाही असे वाटते. जेव्हा राज्यांची निर्मीती हि प्रांत-भाषा या वर आधारीत आहे, जेव्हा मराठी हि, या राज्याची राजभाषा (सरकारी कामकाजाची भाषा) असताना, अबु आजमी ला खोड काढायची काहीच गरज नव्हती. त्यानी चुकीची क्रिया केली, त्यावर तशीच प्रतिक्रिया आली. अशी प्रतिक्रिया जर आली नसती तर पुढे भविष्यात असे प्रकार वारंवार घडले असते. कोणी सांगावं, पुढे सर्व हिंदी भाषी आमदारांनी, हिंदी सुद्धा सरकारी भाषा मान्य करून घेण्याचा प्रयत्न केला असता (दिल्ली दरबारी जी-हुजरी करण्यार्या नेत्यांना बघून हे अशक्य वाटत नाही). एकंदरीत विधानसभेत मारहाणीचं हे प्रकरण जरी अयोग्य असलं तरी आवश्यक होतं(कदाचीत जागा चुकली असेल).
बर्याच मराठी मंडळीना हे आवडले नाही. त्यांचं मत, त्यांची कारणे.
संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेस सुद्धा सर्वच मराठी लोकांचं समर्थन नव्हतं. कित्येक मरांठीना ती नसती उठाठेव वाटत होती. त्यांना असलेली परिस्थीती मान्य होती. त्यांच्या करीता मुंबई गुजरात मधे असली काय आणि महाराष्ट्रात असली काय एकच होते. अश्यांना हा मराठी चा आग्रह कळणार नाही. भाषेची अस्मिता ही फक्त स्वत: पुरती बोलून/लिहून च सांभाळायची नसते तर दुसरं कोणी जाणतेपणी भाषेची अवहेलना करत असेल तर त्याला त्याची चुक दाखवून द्यायची असते. कोण कश्याप्रकारे समजून घेतो हे त्या त्या व्यक्तींवर अवलंबून असते.
16 Nov 2009 - 3:49 pm | रम्या
कलंत्री साहेबांच्या लेखात हे काय वाचतोय मी!!
पण प्रत्येक शब्दाशी प्रचंड सहमत!!
(राज ठाकरेंचा पंखा) रम्या
आम्ही येथे पडीक असतो!
16 Nov 2009 - 4:17 pm | jaypal
त्या दिवशी इतरही काही आमदारांनी इंग्रजी आणि हिंदी मधे शपथा घेतल्या होत्या. मग एकट्या आबुचीच का मारली. "त्या" इतरांना घुमवला असता तर मी पण मराठी कल्याणकारी मनसे च्या प्रेमात पडलो असतो. मनसेचा मराठी आवेश असाच कायम राहो हीच इश्वर चरणी प्रार्थना.
(शिवसेनेच गुजराथी आणि मग दक्षिणात्य) दुध पोळल्याने ताक ही फुंकुन पिणारा
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
24 Sep 2011 - 6:25 pm | कलंत्री
हा लेख लिहिण्यापासून ते आजपर्यंत बराच पल्ला एका व्यक्तिच्या ( दृष्टीने ) पार पडलेला आहे.
रमेशभाऊचे निधन - निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी होणार्या पोटनिवडाणुकीत पत्नीने राष्ट्रवादीच्या उमेदवारी स्विकारणे - मनसेचे अपयश आणि कदाचित विधानसभेत मराठीच्या मुद्द्यावर संभाव्य मौन.
काळाची गती गहन असते हेच खरे.