सामन्‍यातील बकवास अग्रलेख

मड्डम's picture
मड्डम in काथ्याकूट
10 Nov 2009 - 11:04 am
गाभा: 

आजच्‍या सामन्‍यातील बकवास अग्रलेख पाहिला का? शिवसेना स्‍वतःच्‍या कर्तृत्‍वाचा इतिहास किती दिवस लोकांच्‍या कानीकपाळी ओरडून सांगणार आहे. आताचे काय ते बोला... कालच्‍या घटनेच्‍या वेळी कुठे गेले तुमचे मराठी प्रेम?

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

10 Nov 2009 - 11:20 am | चिरोटा

ते हबकलेले वाटतात.भाजप्/शिवसेना दोघांचीही स्थिती गोंधळल्यासारखी झाली आहे. मनसेला बराच पाठिंबा असल्याने विरोध करता येत नाही आणि धड त्यांची बाजुही घेता येत नाही.!! आपल्याला काय तेवढाच टाईम पास.!!
भेंडी
P = NP

टारझन's picture

10 Nov 2009 - 11:31 am | टारझन

सामना हल्ली संध्यानंद होत चाल्लाय .. आय मिन एंटरटेनिंग !!

विजुभाऊ's picture

10 Nov 2009 - 1:17 pm | विजुभाऊ

शिवसेना सध्या फा॑रच गोंधळलेली आहे. त्यात ती भाजपच्या सोबत आहे.
भाजप स्वतःच गोंधळलेला आहे.त्याना आपण नक्की काय करतोय तेच कळत नाहिय्ये.
हे म्हणजे उघड्या शेजारी नागडे गेल आणि थंडीन कुडकुडले अशी गत आहे.
मस्त गुलाबी थंडीत आठवणींची दुलई पांघरून घ्या .

मदनबाण's picture

10 Nov 2009 - 1:39 pm | मदनबाण

शिवसेना आता फक्त सामान्या पुरतीच राहिली आहे असे वाटायला लागले आहे !!!
मराठी चा नारा लावणारे त्यांचे सैनिक काल कुठे दिसले नाहीत ते !!!
बाळासाहेबांना हा अबू म्हणतो आपका आखरी वक्त आगया है |
हे ऐकुन सेनावाले शांत कसे बसले ???
http://www.youtube.com/watch?v=K1p4Jjuhpww
आज कृपाशंकर सिंह शपथ घेणार आहेत म्हणे...बघु कुठल्या भाषेत घेतो ते !!!

(एके काळचा सेना प्रेमी)
मदनबाण.....

आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

गणपा's picture

10 Nov 2009 - 2:14 pm | गणपा

टार्‍याशी १००% सहमत.
सामना फक्त सकाळच्या वेळी वापरायचा पेपर उरला आहे.
शिवसेनेचा मराठी टक्का घसरला आहे त्यामुळे ते भेदरलेले आहेत.
भाजपाचीतर साफ भादरली आहे. काही दिशाच उरली नाही.
बुडणार्‍या भाजपाचा हात वेळीच नाही सोडला तर शिवसेनेला रसातळाला जाण्यापासुन कुणी वाचवु शकत नाही. अगदी सेनाप्रमुखही..लेकराची तर बातच सोडा.

पाषाणभेद's picture

10 Nov 2009 - 2:44 pm | पाषाणभेद

गणपा व टार्‍याशी १०००% सहमत.

फारच विनोदी अग्रलेख येतात हल्ली. आज एक मत उद्या अगदी त्याच्या उलट असे अग्रलेख येतात. बहूतेक ट्रेनी संपादकच लिहीत असतील ते.
जय मनसे प्रवृत्ती !
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

भडकमकर मास्तर's picture

10 Nov 2009 - 3:03 pm | भडकमकर मास्तर

जर अबु असं विधानसभेत वागला असता तर त्याची सालटी काढली असती / तंदुरी केली असती >>>>>>>>>

या वाक्याने विशेष करमणूक झाली...
शिवाय अबु वाईट, काँग्रेसवाले वाईट आणि मनसेही वाईट अशा निष्कर्षाला ये ईपर्यंत किती त्या उलटसुलट उड्या... मजेदार

कशिद's picture

10 Nov 2009 - 3:28 pm | कशिद

भाजप ची मागणी होती ...निलमबनाची धक्का बसला बघुन....

सुभाष देसाई गटनेते केल्यवर काय होनर अजुन.....

प्रशु's picture

10 Nov 2009 - 3:50 pm | प्रशु

शिवसेनेची विनाशकाले विपरीत बुद्धी..

बाकी सामनाचे अग्रलेख कोण लीहितो ते बाळासाहेबांना सोडा पण संजय राऊतांना देखिल माहित नसते. (उदा. खंजीर प्रकरण)

बाकी कालच्या निलंबनात शिवसेना सामिल होती हे ए॑कुन सेनेची कीव वाटली...

चिरोटा's picture

10 Nov 2009 - 3:58 pm | चिरोटा

लोकसत्तेत शेवटी कुमार केतकरांनी ह्या विषयावर अग्रलेख लिहिलाच.! नसती आफत नको म्हणून गेले अनेक महिने ते विषयावर लिहायचे टाळत होते.अधुनमधुन ओझरता उल्लेख करायचे पण त्यांचे ते रशिया/दुसर्‍या महायुद्धाचे संदर्भ देत.
टीका केली तर वाचकसंख्या कमी होणार. स्तुती केली तर सोनिया रागावणार्.आज शेवटी बांध फुटला!! :D
भेंडी
P = NP

प्रशु's picture

10 Nov 2009 - 4:31 pm | प्रशु

सुमार केतकरांचा सुमार अग्रलेख....