गाभा:
दोस्तहो,
माझ्या मनात सध्या एक स्वयंचलीत चार चाकी वहान घेण्याचा विचार आहे. त्या प्रमाणे मी चौकशीला सुरुवातही केलेली आहे. आणि खालील दोन पर्यायां पर्यंत माझी निवड मर्यादीत करण्यात सफल झालो आहे.
मारुती वॅगनार किंवा सँट्रो
या दोन पैकी कोणता पर्याय निवडावा यासाठी माझे तज्ञ मिपाकर मित्र मला मदत करतील काय?
योग्य सल्ला देणार्या मित्राला ५० ग्रॅम चितळ्यांचे पेढे (पैसे मीच देणार... हो त्या वरुन नंतर भांडण नको).
प्रतिक्रिया
9 Nov 2009 - 10:13 am | मनिष
ह्या दोन पर्यायांमधे नक्कीच वॅगन-आर. नाहीतर आय-१०, रीट्झ सुचवेन. व्हॉट कार मधे जास्त माहिती मिळेल किंवा ऑनलाईन फोरम पहा. थोडे थांबू शकत असाल तर वॅगन-आर नवीन चांगल्या इंजिनाबरोबर मिळेल.
9 Nov 2009 - 10:19 am | टारझन
सद्ध्यातरी धागा पाहुन विडंबणाचे वारे वाहत आहेत .. पण जाऊन द्या म्हंटलं :)
पैजार ब्वा ! गाडी कोणतीही घ्या .. एक राईट मात्र अवश्या द्या ! पेढे नकोत !
--(गाडी प्रेमी) टारोबा ड्राय्व्हर
9 Nov 2009 - 10:23 am | वेताळ
क सेरिज चे नवे इंजिन आता वॅगनाअर व अल्टो ला बसवले गेले आहे. ज्यादा ताकद व मायलेज मिळते असे वाचले आहे.
वेताळ
9 Nov 2009 - 12:31 pm | sneharani
सरळ आय १० घ्या.
9 Nov 2009 - 8:47 pm | sujay
कधिही वॅगन-आर घ्या .
10 Nov 2009 - 3:13 pm | विजुभाऊ
वॅगन आर ही चालवायला बरी आहे. पण दूरच्या पर्वासात मागे बसणार्या माणसाला कम्फर्ट अजीबात मिळत नाही. त्यापेक्षा सॅन्ट्रो बरी आहे.
GO ( हे जीओ असे वाचावे) जीओ .
10 Nov 2009 - 3:26 pm | sneharani
सँट्रोच छान वाटते..
10 Nov 2009 - 4:55 pm | शैलेन्द्र
मुळात तुम्ही निवडलेले पर्याय थोडे पटले नाही. वॅगन आर चालवायचीहि मजा देत नाही आनी बसायचीही. आय १० किंवा गेटस बघा ना.. रनिंग फार नसेल तर नवीन पालीओ हाही चांगला पर्याय आहे.
10 Nov 2009 - 5:01 pm | सुनील
तुम्ही कोणत्या निकषांवर हे दोन पर्याय निवडले ते ठाऊक नाही. तरीही ह्या दोघांमधूनच निवड करायची झाल्यास मी तरी वॅगन आरच निवडीन.
(मारुती प्रेमी) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
11 Nov 2009 - 10:18 am | सोत्रि
मी स्वत: गेली 3-4 वर्षे वॅगन आर वापरत आहे.
1. माइलेज एकदम मस्त.
2. चालवायला एकदम सोपी आहे. (माझी बायकोही अगदी आरामात चालवायची)
3. ए.सी. कुलींग व्यवस्थित
4. पुढे लेग स्पेस ऐसपैस
5. मागच्या बाजुस लेग स्पेस दूरच्या प्रवासास थोडी त्रासदायक, पण मागच्या सीट
पाडल्यावर जी जागा होते त्यात एक कुटुंब आरामात दूरचा प्रवास आरामात करू
शकते.
नवीन वॅगन आर अधिक चांगली असावी.
भारतीय रस्त्यांसाठी मारूतीच्या गाड्या एकदम बेस्ट.
माझ्या मते वॅगन आर हा चांगला पर्याय आहे.
11 Nov 2009 - 12:25 pm | आशिष सुर्वे
गेली २ वर्षे आम्ही सँट्रो चालवित आहोत..
एकदम मस्त आहे..
५ जण आरामात बसतात..
वॅगन आर मध्ये ५ जण बसायला थोडा त्रास होतो.
गो गेट इट!
-
कोकणी फणस
11 Nov 2009 - 12:33 pm | वेताळ
बद्दल काही माहिती आहे का?
कुणी ती गाडी वापरत असेल तर त्याबद्दलचे अनुभव इथे लिहा.
वेताळ
11 Nov 2009 - 12:40 pm | ज्ञानोबाचे पैजार
मी, आपल्या सगळ्यांचा मना पासुन आभारी आहे,
ही माझी पहिलीच गाडी असणार आहे, आम्ही जातिवंत कारकुन असल्या मुळे गाड्यांची तांत्रिक माहीती शुन्य. त्यामुळे रस्त्यावर सर्वाधीक दीसणार्या गाड्या हा एकमेव निकष लावुन या दोन्हीची निवड केली.
नविन गाडी आली की जरुर कळविन,
टारोबा,
व्य. नि पाठवला आहे.
पैजार बुवा,
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय
11 Nov 2009 - 1:14 pm | विसुनाना
सेंट्रोचे मायलेज/ अॅव्हरेज/ एक लिटर इंधनात अंतर काटण्याची क्षमता कमी आहे.
पेट्रोल सँट्रोला मायलेज:
भारतीय शहरात एसी लावून ८-९ किमी तर एसी न लावता १०-११ किमी.
भारतीय शहराबाहेर हमरस्त्यावर १३ किमी ते १५ किमी.
नव्या एको (गॅसवरच्या) सँट्रोची कल्पना नाही.
(ह्युंडैच्या सर्वच गाड्या इंधनबचतीत मागे आहेत असे कळते.)
वॅगन आर यापेक्षा नक्कीच जास्त मायलेज देते. शिवाय गॅसवरची वॅगन आर पूर्वीपासून उपलब्ध आहे. (फक्त तिच्यात अतिरिक्त चाक / स्टेपनी ठेवण्याबद्दल अडचण आहे.)
अन्यथा दोन्ही गाड्यात फारशी तफावत नाही.
11 Nov 2009 - 2:30 pm | बबनराव
वॅगन आर सर्वात बेस्ट्.मी स्वतः १२ वर्षे मारुती वापरतोय.
11 Nov 2009 - 2:37 pm | प्रकाश घाटपांडे
कंची बी घ्या गाडी आमाला चक्कर मारुन आना म्हजी झालं.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
11 Nov 2009 - 9:58 pm | खादाड_बोका
मी भारतात आलो होतो तीन आठवड्या करीता, तेव्हा माझ्या मित्राची ईंडीका विस्टा वापरली. "पंखा झालो" त्या गाडीचा..
वाटलेच नाही की डिझेल गाडी चालवतोय म्हणुन. पॉवर व पिक अप फार छान आहे(With AC on all the times).मारुती वॅगनार किंवा सँट्रो जवळ पास सुद्धा भटकत नाही. जेव्हाकी मी अमेरीकेत "Accura MDX" चालवतोय.
शेवटी तुमची मर्जी ...कारण दमडी तुमची लागणार आहे ना.... 8}
मला तर स्वप्नातही भुक लागते....