जरा मला मार्गदर्शन कराल काय?

उम्मि's picture
उम्मि in काथ्याकूट
7 Nov 2009 - 7:48 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,

आपला उम्मि घर (Flat) खरेदिचा विचार करतोय सध्या...
जरा मला मदत करा ना, पैशांची नाही हो, आपल्या अनुभवी सल्ल्याची..........

under construction असलेल्या ईमारतित बुंकिग करताना कोणती काळजी (कागदपत्रे वगैरे संदर्भात) घेतली पाहिजे?
तसेच Resale मधिल Flat खरेदी करताना कोणती काळजी (कागदपत्रे पडताळुन) घेतली पाहिजे?

तरी जाणकारांनी मार्गदर्शन करावे...

आपला

उम्मि...

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

7 Nov 2009 - 8:15 pm | पिवळा डांबिस

लेका उम्म्या,
अरे कुठे घर घ्यायचा प्लान आहे ते तरी सांग की. आधी...
मुंबई, पुणे, ब्यांगलोर (हा शब्द आम्ही असाच लिहितो!), दिल्ली, जाकार्ता, सेऊल, एले, फ्रिस्को, बॉस्टन, लंडन, सौदी, अबू धाबी!!!!
आपल्या मिपावर प्रत्येक शहरासाठी वेगळा पेशालिष्ट आहे....

चिरोटा's picture

8 Nov 2009 - 12:03 am | चिरोटा

काळजी,कागदपत्रे,पडताळणी हे शब्द लेखात दोनदा दिसता आहेत. म्हणजे भारतिय महानगरातच फ्लॅट घ्यायचा आहे!! असो.
उम्मी साहेब्, हरकत नसेल तर साधारण बजेटपण सांगा की. आम्ही इकडे दर खाली येणार,खाली येणार म्हणून वाट बघतोय पण जागांचे दर काही खाली येण्याची चिन्हे नाहीत.
भेंडी
P = NP

फ्लॅटचे व्यवहार व्यवस्थित करुन देणारा एखादा वकील बघा आणी त्याच्यामार्फतच सर्व व्यवहार पूर्ण करा. वकिलाची फी परवडते कारण कोणती कागदपत्रे लागतात त्याचा सल्ला ते देतात. आपल्या डोक्याला ताप नसतो.

चतुरंग