गाभा:
सदर निवेदनामागे कुणाच्याही ज्ञानाचा अवमान/अपमान करण्याचा हेतू नाही. केवळ अन् केवळ करमणूक, मौजमजा आणि विरंगुळा हाच एकमेव उद्देश आहे..
सर्व मिपाकर रथी-अथिरथी-महारथी विडंबकांना एक नम्र विनंतीवजा आवाहन..
'नाडीग्रंथा'च्या ऐवजी 'माडीग्रंथ' हा शब्द वापरून,
प्रात्यक्षिकासाठी भूमी तयार करणे
या अभ्यासपूर्ण परंतु अगम्य प्रतिसादांचे विडंबन करावे व माझ्यासारख्या काही बिलो-अॅव्हरेज समज/बुद्धीमत्ता असलेल्या लोकांची चारघटका करमणूक करावी ही विनंती! :)
( हम्म! आता कोणती माडी ते विचारू नका. आपण पितो ती देखील चालेल किंवा काही लोक चढतात ती 'माडी'देखील चालेल!;) )
ज्याचे विडंबन मला आवडेल त्याला मी या वर्षीचा 'मिपा ताडीमाडी पुरस्कार' हातोहात देऊन टाकेन! :)
आपला,
(मुंबै-लखनौतल्या माड्या चढलेला) तात्या.
प्रतिक्रिया
7 Nov 2009 - 2:01 pm | अवलिया
तात्या,
असले पुरस्कार आणि धागे काढण्यापेक्षा रोशनी तरी पूर्ण कर.
नाही तर एखादे व्यक्तिचित्र चितार...
अगदीच वेळ जात नसेल तर एखाद्या आवडत्या स्त्रीला घेवुन जा समुद्र किनारी.. फुगे फोड. भेळ खा !
नाही तर बिचारा मास्तर वाट पहातोय त्याला भेटुन ये... :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
7 Nov 2009 - 2:03 pm | विसोबा खेचर
हो, आम्ही जाणारोत आज संध्याकाळी जुहू चौपाटीवर! :)
तुम्हा सगळ्यांना टुकटुक! :)
आपला,
(माडीग्रंथाचा अभ्यासक) तात्या.
7 Nov 2009 - 2:09 pm | अवलिया
क्यामेरे लावुन ठेवलेत... कालच आले आहेत स्यानहोजेच्या काकाने दिलेले.
पेश्शल क्यामेरे आहेत. एडिटिंग करुन तुझ्या जागी वेगळा माणुस टाकुन त्याच प्रसारण करावं म्हणतो एका ज्ञानेश्वरीवरच्या सुलभ प्रवचनात.
काय म्हणतोस?
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
7 Nov 2009 - 2:03 pm | सुप्रिया
वा. मस्त धागा. प्रतिसाद वाचायला मजा येईल.
प्रतिसादांच्या प्रतिक्षेत.
7 Nov 2009 - 2:04 pm | विसोबा खेचर
धन्यवाद सुप्रियाजी! :)
7 Nov 2009 - 2:26 pm | विनायक प्रभू
ह्यां आपला काम नाय.
'माडी' नाय मिळाली तरी चालेल.
आणखीन एक अज्ञ
विप्र
7 Nov 2009 - 3:48 pm | पर्नल नेने मराठे
तात्या लखनौतल्या पण :O 8|
चुचु
7 Nov 2009 - 4:40 pm | सन्दीप
एखाद्या आवडत्या स्त्रीला घेवुन जा समुद्र किनारी.. फुगे फोड.
अरेरे फुगे फुट्ले तर............. लइ त्रासाच काम हाय ते.
सन्दीप
7 Nov 2009 - 6:32 pm | jaypal
"एखाद्या आवडत्या स्त्रीला घेवुन जा समुद्र किनारी.. फुगे फोड.
अरेरे फुगे फुट्ले तर............. लइ त्रासाच काम हाय ते."
ताडी माडी नंतर तर खरोखरीच त्रासाच असेल.
बाकी अवलियाशी सहमत
========================================
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
7 Nov 2009 - 8:31 pm | शशिकांत ओक
Wink
आता कस बोललात - घ्या
साडी प्रेमी संगीतरत्न तात्या यांना -
आचार्य नाडीनंदाचा
नाडीबोध -
चला माडी चढाया नाडीची ।
येऊ द्या नशा धुंद माडीची ।।
नको शुद्ध नाडी सुटल्याची ।
नको तमा मंद दुर्बुद्धींची ।।
टंच टंच येती हाताला ।
'नंतर' दाविती अंगठ्याला ।।
फिटेल शंका कोण त्या आयटमची ।
मिळेल उब कोणकोणत्या देखणींची ।।
चट्यापट्याची वा इलास्टिकची ।
तट्ट वा घट्ट, तंग वा रुंद ।।
कशीही चालेल पण काढाल हुकाचा ताण।
मग घडेल दिव्यदर्शन माडी ग्रंथ प्रमाण ।।
चला पटापट उरका फराळ मिपाचा ।
जाता काळ कराल विलाप ज्वानीचा ।।
संपर्कासाठी - मिपाचे ज्ञानपीठ
8 Nov 2009 - 9:23 am | सुनील
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
8 Nov 2009 - 9:28 am | विसोबा खेचर
जबराच! :)
7 Nov 2009 - 9:54 pm | संजीव नाईक
(मुंबै-लखनौतल्या माड्या चढलेला) तात्या.
वरच्या "सा" ऐवजी खालचा "सा" लावायचा आणि म्हणायचे क्या बात है!
मुंबै पेक्षा लखनौतल्या माड्या चांगल्या.
सं तज्ञ
संजीव