आभास कविता
कि र्हास कविता
व्यत्यास कविता
वाचलेली |
हे कडकडीत
ना फडफडीत
ना जळजळीत
काव्य कसे ?
अर्थ गर्भ ओळी
मती कशी जाळी
गूढ कधी काळी
घे जाणोनी |
शब्दांचा कंटाळा
अर्थांचा घोटाळा
काव्याचा पाचोळा
फार झाला |
तो श्वास, नि: श्वास
फुलपंखी रास
सार बाजू त्यांस
आज तूही |
मागणी प्रमाणे
काव्य प्रसवावे
मूढ कवीस रे
कोणी सांगा |
चलनात नाणे
मद्य आणि खाणे
'बार' ' बार' गाणे
एक सत्य |
पाहिजेत शब्द
जे वाचता स्तब्ध
करी नाद लुब्ध
वाचकास |
आम्हा व्यथा फार
नको पुन्हा भार
हसू क्षण चार
सारे जण |
जो घेई अर्जंटं
काव्याचे पेटंटं
तो इंटेलिजंटं
होई पोएटं |
मग की बोर्डाचा
उपयोग साचा
हा प्रतिसादांचा
दावी मार्गं |
प्रतिक्रिया
29 Oct 2009 - 10:29 pm | श्रावण मोडक
शेवटच्या चार ओळी वाचल्यावर प्रतिसाद द्यावा की नको असे वाटून गेले होते...
वेगळी कल्पना, चांगली रचना. छंदशास्त्रात टाकले असले तरी हे स्वच्छंदशास्त्रातही बसेल.
29 Oct 2009 - 11:21 pm | टारझन
खुलाश्याबद्दल धन्यवाद ! :)
आपलाच ,
टार्या
30 Oct 2009 - 12:25 am | प्रभो
मनिषाताई कविता मस्तच......
ही अमची कैच्या कै दाद....
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
30 Oct 2009 - 12:26 am | शाहरुख
मस्त :-)
30 Oct 2009 - 8:59 pm | प्रशांत उदय मनोहर
"जो घेई अर्जंट" हे कडवं विशेष आवडलं. पहिली दोन कडवी नसती तर दर्जा काहीच्या काही वाढला असता असं वाटतं. पण कविता हलकी-फुलकी राहण्यामध्ये नंतरच्या कडव्यांप्रमाणेच पहिल्या दोन कडव्यांचंही योगदान आहे.
बाकी देवद्वार छंदात ही कविता मस्तच जमली आहे. छंदशास्त्र विभागातही चालली असती ही कविता.
आपला,
(छंदप्रेमी) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई