भारताचा स्वातंत्र्य संग्राम

स्वाती२'s picture
स्वाती२ in काथ्याकूट
28 Oct 2009 - 6:44 pm
गाभा: 

मंडळी, माझ्या मुलाला उन्हाळ्याच्या सुट्टीत वाचण्यासाठी मी भारतीय स्वातंत्र्य संग्रामा संबंधी पुस्तके शोधतेय. मिपाकरांनी पुस्तकांची नावे सुचवल्यास माझे पुस्तके मिळवायचे काम सोपे होईल. माझा मुलगा १४ वर्षांचा आहे. अमेरिकन इतिहास- रिवोल्युशनरी वॉर, सिविल वॉर वगैरेचा त्याचा चांगला अभ्यास आहे. भारतीय इतिहासाची माहिती अमर चित्र कथा वाचून थोडी फार आणि जी काय इथल्या शाळेत शिकला ती .म्हणजे दांडी यात्रा, अहिंसा आणि गांधी. तर १८५७-१९४७ या काळाचा आणि थोडा त्याच्या आधीचा इतिहास सांगणार्‍या पुस्तकांची नावे सुचवा. मराठी चालेल पण शक्यतो इंग्रजी कारण जोडीला 'माझी जन्मठेप' वाचणार आहे( त्याच रोज एक एक पान वाचलं गेलं तरी खूप).

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

28 Oct 2009 - 7:05 pm | धमाल मुलगा

१८५७चे स्वतंत्र्यसमर (लेखकःवि.दा.सावरकर)

ह्यापेक्षा आधीचा इतिहास हवा असल्यास मस्तपैकी 'राजा शिवछत्रपती' घेऊन टाका :)

विसोबा खेचर's picture

28 Oct 2009 - 7:09 pm | विसोबा खेचर

गंगाधर गाडगीळांचे टिळकांवरचे 'दुर्दम्य' हे पुस्तक फार सुंदर व माहितीपूर्ण आहे. आपल्या लेकाला अवश्य वाचायला द्या..

तात्या.

एक संकेतस्थळ काढलेले आहे त्यात 'सहा सोनेरी पाने' हे संपूर्ण पुस्तक उपलब्ध आहे. त्यामुळे तुमचा लेक हे ताबडतोब वाचायला सुरु करु शकतो.

आणखी पुस्तके सुचतील तशी कळवेनच.

चतुरंग

धमाल मुलगा's picture

28 Oct 2009 - 9:45 pm | धमाल मुलगा

चतुरंगराव,
दुव्याबद्दल धन्यवाद :)

स्वप्निल..'s picture

29 Oct 2009 - 12:34 am | स्वप्निल..

चतुरंग धन्यवाद!!

स्वप्निल

नाटक्या's picture

29 Oct 2009 - 3:18 am | नाटक्या

सावरकरांच्या भक्ताला फार मोलाची भेट दिलीत. मनापासून धन्यवाद...

- नाटक्या

मदनबाण's picture

29 Oct 2009 - 2:25 pm | मदनबाण

मनापासून धन्यवाद...
मदनबाण.....

अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

परिकथेतील राजकुमार's picture

29 Oct 2009 - 2:57 pm | परिकथेतील राजकुमार

रंगाशेठ खुप खुप धन्यवाद. इतरांना देखील आता ही माहिती देतोच..

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

jaypal's picture

28 Oct 2009 - 9:28 pm | jaypal


१. प्रिय इंदिरेस पत्रे लेखक = जवाहरलाल नेहरु
२. discovery of india (भारताचा शोध) लेखक = जवाहरलाल नेहरु
आठवतील तसे परत कळ्वीन
वाचन चळवळिस हर्दिक शुभेच्छा

स्वाती२'s picture

28 Oct 2009 - 11:04 pm | स्वाती२

सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

नीलकांत's picture

29 Oct 2009 - 12:49 am | नीलकांत

तुमचा मुलगा लहान म्हणजे १४ चा आहे आणि तुलनेने इग्रजी सोपं पडतं हे बघुन मी तरी NCERT ची इंग्रजी माध्यमातील क्रमीक पुस्तके वाचायला द्या असे सुचवेन. त्यात १८५७ ते १९४७ या कालखंडावर भर असलेली निवडून द्यावीत.

मराठीत मागे कुमार केतकर संपादीत इतिहासाची काही पुस्तके प्रकाशित झाली होती. केतकरांनी संपादन करून सुद्धा ती पुस्तके वाचण्यालायक होती ;)

तसेच तुम्ही वाचून त्याच्याशी गप्पा माराल तर उत्तम... तुमच्यासाठी बिपीनचंद्राचे भारताचा स्वातंत्र्यलढा असं पुस्तक (इंग्रजी /मराठी ) असे उपलब्ध आहे.

काही गोष्टींच्या स्वरूपात सुध्दा पुस्तके असतात. ती तशी शोधावी लागतील.

अनामिका's picture

29 Oct 2009 - 2:20 pm | अनामिका

शहीद भगतसिंग -एक झंझावात हे प्रकाश रेड्डी लिखित एक संक्षिप्त व छोटेखानी पुस्तक देखिल वाचनिय आहे.
तसेच अपरिचितांच्या क्रांतिकथा हे गोपाळ गोडसे यांचे पुस्तक आगळेवेगळे आहे.
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

सुनील's picture

29 Oct 2009 - 2:53 pm | सुनील

एक नीलकांत सोडले तर कुणीही धाग्यावरील विनंती नीट वाचली आहे असे दिसत नाही. एका १४ वर्षाच्या, इंग्रजी माध्यमाच्या (तीही अमेरीकेत) मुलासाठी पुस्तके सुचवायची आहेत हे ध्यानात न घेता नावे सुचवली जात आहेत!

नीलकांत यांनी सुचवलेली NCERT ची इंग्रजी माध्यमातील क्रमीक पुस्तके, हाच योग्य पर्याय वाटतो.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पाहिलित का?
ती हिन्दी - इंग्रजी- मराठी - तिन्ही भाषेत उपलब्ध आहेत.
मुलांसाठी उपयुक्त आहेत.
- विटेकर
आपणांस आहे मरण! म्ह् णोन राखावें बरवेपण!!

>:D<

दीपक साळुंके's picture

29 Oct 2009 - 7:29 pm | दीपक साळुंके

बिपन चंद्रा यांचं "India's Struggle for Independence" हे पुस्तक सर्वात योग्य ठरेल त्याच्यासाठी ! त्याचबरोबर त्यांचंच "India after Independence" हे सुद्धा वाचनीय !

बाकी NCERT चं "Themes in Indian History - 3" हे पुस्तक उपयुक्त !

-- दीपक
"Be the change you wish to see in the world!"

निमीत्त मात्र's picture

29 Oct 2009 - 8:31 pm | निमीत्त मात्र

वा! इतिहासाचा अभ्यास मस्तच...

पण गोपाळ गोडसेंचे 'गांधीहत्या आणि मी', 'पंचावन कोटीचा बळी' हे काही मिपाकरांच्या आवडीचे ऐतिहासिक दस्तावेज कसे काय आले नाहीत अजून?

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Oct 2009 - 10:57 am | llपुण्याचे पेशवेll

>> गोपाळ गोडसेंचे 'गांधीहत्या आणि मी', 'पंचावन कोटीचा बळी <<
ही पुस्तके काही मिपाकरांच्या अक्षय आवडीची पुस्तके आहेत. आत्ता चालू असलेली चर्चा किशोरवयीन मुलाना भारती य इतिहासाती ल 'भारतीय स्वातंत्र्य लढा' या निमित्तमात्र विषयावर आहे.

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

jaypal's picture

29 Oct 2009 - 10:19 pm | jaypal

एन.सि.इ.आर.टी. ची पुस्तके खरोखरिच भारि आसतात. मी स्पर्धा परींक्षांसाठि वाचली होती. पुढिल दुवा आपल्या कामास येउ शकतो. काही पुस्तके डाउनलोडही करु शकता.

http://www.ncert.nic.in/index.htm

दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

नाखु's picture

31 Oct 2009 - 12:32 pm | नाखु

वडवानल..
कळा आणि ज्वाळा..
दोन्ही पुस्तके वि.श्री.जोशी यांची.

पुस्तक चळवळिस शुभेच्छा..