गाभा:
वॄत्तपत्र नव्हे मित्र - कोणाचा?
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2882865.cms
ह्यावरून काय वाटते? विशेषतः शेवटचे वाक्य "इतर गावांसाठी दादर एक आदर्श उदाहरण ठरले आहे"
प्रशांत.
वॄत्तपत्र नव्हे मित्र - कोणाचा?
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2882865.cms
ह्यावरून काय वाटते? विशेषतः शेवटचे वाक्य "इतर गावांसाठी दादर एक आदर्श उदाहरण ठरले आहे"
प्रशांत.
प्रतिक्रिया
24 Mar 2008 - 9:57 pm | सुधीर कांदळकर
पत्रकार पडताळून्/पारखून घेत नाहीत. पाठपुरावा बिलकूल नसतो. बातमी दिली की त्यांचे काम संपले. आश्वासनाची पूर्ति होईल याची काय खात्री आहे? ७२ कुटुंबापैकी फक्त एक उदाहरण दिले आहे. संपूर्ण आकडेवारी नाही. उदा. जमिनीचे किती तुकडे होते. विकण्यास किती लोक तयार होते? किती जणांना १००% रक्कम मिळाली. याबाबतीत पूर्ण शांतता आहे.
मुळात रायगडसारख्या सुपीक जमिनीच्या प्रदेशात एसईझेड काढणे चुकीचेच आहे. नापीक जमिनीवर काढा की एस ई झेड.
मालवणीत एक म्हण आहे. दुभती म्हस इकून @%& रेडो कोणी आणूचो? ती येथे यथार्थ आहे.
झाडाझडती पुस्तक वाचावे. ले. विश्वास पाटील.
फक्त एका उदाहरणावरून निष्कर्ष चुकीचाच निघण्याची शक्यता. बातमीदारास कांही आमिष असू शकते. पूर्णतः संशयस्पद बातमी.
अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.
24 Mar 2008 - 10:27 pm | सृष्टीलावण्या
मटा नव्हे सोटा (सोन्याआई टाईम्स) आमच्या कडे पण येतो. हे वृत्तपत्र फक्त काही जणांच्या पैशावर चालते आणि तो मिळवण्यासाठी ते जे मार्ग चोखंदळतात त्या पेक्षा गणिकांचा पेशा बरा असे माझे इतके वर्षात झालेले मत आहे..
धनातुराणां न भयं न लज्जा...
>
>
मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...
24 Mar 2008 - 11:41 pm | सचिन
श्री. कांदळकर आणि सृलाताईंशी १०००००००% सहमत.
बातमी निश्चितच संशयास्पद !
मी सुमारे १५ वर्षे वाचत असलेला महाराष्ट्र टाइम्स ...आता बंदच केला आहे. ऍसिडिटी नकोच !
25 Mar 2008 - 1:28 pm | धमाल मुलगा
धनातुराणां न भयं न लज्जा... क्या बात है! मान गये.
25 Mar 2008 - 1:43 pm | आर्य
शेतकऱ्यांनी आपली जमीन एसईझेड प्रकल्पाला दिली आणि सत्यनारायणाची महापूजा घालून...............आपल्या विकासाचा मार्ग स्वत:च आखला आहे................बघा म्हणजे झालं.
एसईझेडबरोबर करण्यात आलेल्या जमिनीच्या व्यवहाराची बातमी तर पाहिली आता हे पॅकेज मिळाल्याचे ऐकले म्हणजे मिळवलं..................खरी बोंब ईथेच आहे.
26 Mar 2008 - 5:04 pm | प्रेमसाई
todays newpaper is tomorrows waste paper
बघा पट्त का ?