गाभा:
मिपावर यापुर्वी सिद्धहस्त लेखकांविषयी चर्चा झालेली आहे. या लेखकांपैकी काही जण आजकाल फारसे लिहित नाहीत तर काहीजण अजिबातच लिहितांना दिसत नाही. गेल्या काही महिन्यांत ज्यांचे लेखन आवडले त्या लेखकांसंदर्भात हा चर्चाविषय आहे. सध्या लिहीते असलेले तीन लेखक रामदास, श्रावण मोडक आणि संजोप राव हे या मिपावर लक्षवेधी आणि वाचनीय ललितलेखन करतांना आढळतात. तीन्हींची शैली, हाताळलेले विषय निराळे आहेत. नुकतीच राव यांनी 'माझे खाद्य-पेय जीवन' ही लेखमाला सुरू केलेली आहे. रामदासांचा धातुकोष आणि मोडकांच्या श्रावणनोंदी लेखमाला प्रसिद्धच आहेत तसेच अपुर्णही. खुद्द या लेखकांना त्यांच्या लेखनाच्या वैविध्याविषयी काय वाटते? वाचकांना त्यांच्या लेखनात काही बदल जाणवत आहेत का? थोडक्यात या लेखकांच्या लेखनात ते उत्क्रांत होत आहेत असे आपल्याला जाणवते का?
प्रतिक्रिया
27 Oct 2009 - 7:31 pm | विनायक प्रभू
मंडळी उत्क्रांतीच्या पलीकडची आहेत.
27 Oct 2009 - 7:41 pm | गणपा
मिपाच्या सेहवागला विसलात का हो पुर्णपात्रे ?
बाकी परभु मास्तरशी सहमत.
(१ माकड, १ मिनिट)
27 Oct 2009 - 7:57 pm | अक्षय पुर्णपात्रे
श्री गणपा, या लेखकांची नावे घेण्याचे कारण म्हणजे ही मंडळी मराठी संकेतस्थळांवर सातत्याने दर्जेदार आणि संवेदनशील लेखन करतांना दिसतात. विनोदी खुसखुशीत लिहिणारे, प्रवासवर्णन लिहिणारे, वैचारीक लिहिणारे तसेच वाचनीय असे अनेक लेखक येथे आहेत. या चर्चाविषयाची मर्यादा लक्षात घ्यावी. तरीही आपल्याला इतर लेखकांविषयी लिहायचे असल्यास जरूर आपले मत मांडावे.
27 Oct 2009 - 7:49 pm | प्रभो
सिद्धहस्त लेखक आणी उत्क्रांत????
अक्षय (आपल्या-माझ्या खवतील संवादाप्रमाणे श्री न लावता),
सिद्धहस्त लेखकांच्या लेखनशैलीबद्दल मी पामराने शब्द काढणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे....सिद्धहस्त आपण त्यांनाच म्हणतो ज्यांच्या भात्यात सर्व प्रकारचे बाण आहेत आणी ते सोडायचे कसे हेही ते जाणतात...
स्पष्टोक्तीबद्दल क्षमस्व...पण माझ्या मते तुमचा टारगेट लेखक वर्ग चुकलाय. सिद्धहस्त लेखकांना उत्क्रांतीची गरजच काय???
उत्क्रांतीची गरज असते सर्वसामान्य लेखाकास जो काळपरत्वे उत्क्रांत होउन सिद्धहस्त व्हावा....
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
27 Oct 2009 - 7:59 pm | अक्षय पुर्णपात्रे
प्रतिक, लेखक सिद्धहस्त आहेत याविषयी संशय नाही. उत्क्रांतचा अर्थ त्यांच्या लेखनात सुधारणा होत आहे का असा नाही. त्यांच्या लेखनातील अनुभवचित्रण, शैली यात सूक्ष्म बदल होत आहेत का याविषयी चर्चा व्हावी.
27 Oct 2009 - 8:26 pm | प्रभो
म्हणून तर म्ह्टलय ना "सिद्धहस्त आपण त्यांनाच म्हणतो ज्यांच्या भात्यात सर्व प्रकारचे बाण आहेत आणी ते सोडायचे कसे हेही ते जाणतात"
बाकी त्यावर चर्चा हा गहन विषय आहे...तेवढं समजायची ताकत असती तर लेखन ही केलं असतं. त्यावर सिद्धहस्त वाचकच लिहू शकतील असे वाटते (उदा: एका सिद्धहस्ताने दुसर्याबद्दल लिहिणे)
बाकी .....चालूद्या.....
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
27 Oct 2009 - 7:59 pm | आनंद घारे
काही जण आजकाल फारसे लिहित नाहीत तर काहीजण अजिबातच लिहितांना दिसत नाही
मिपाच्या व्यवस्थापनावर पडणारा ताण कमी करण्यासाठी लेखकांना आवर घालण्याचा प्रयत्न एकदा झाला होता. कदाचित त्याचा परिणाम असेल.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
27 Oct 2009 - 8:35 pm | Nile
लेखक होवो वा न होवो! हे काथ्याकुट वाले काही होत नाहीत ब्वॉ!
27 Oct 2009 - 8:43 pm | अक्षय पुर्णपात्रे
यावर नवीन काथ्याकुट टाकावा. विषय सोडून प्रतिसाद देणे उत्क्रांत होत आहे हे निश्चित.