मुंबई महाराष्ट्राच्या गळ्यातील धोंड?

भोचक's picture
भोचक in काथ्याकूट
26 Oct 2009 - 2:46 pm
गाभा: 

मुंबई ही महाराष्ट्राच्या गळ्यातील धोंड? या शीर्षकाचा हा दत्तप्रसाद दाभोलकरांचा लेख आवर्जून वाचण्यासारखा आहे. सगळ्यांनाच तो पटेल असेही नाही. खरं तर मुंबईविषयी असे वाचताना ते पचवून घेणे अवघड जाते. दाभोलकरांच्या मते मुंबईसाठी उर्वरित महाराष्ट्राने इतका त्याग केला आहे आणि करत आहे की त्या तुलनेत त्यांना काहीही मिळालेले नाही. मुंबईतली वीज, पाणी उर्वरित महाराष्ट्रातूनच जाते. (मुंबईत मराठी भाषकांचा टक्का कमी असल्याने सहाजिकच या मराठी प्रांतातून अमराठी लोकांना वीज, पाणी पुरवले जाते.) शिवाय या गोष्टींचे मुंबईतले दर उर्वरित महाराष्ट्रापेक्षा कमी आहेत. मुंबईतील औद्योगिक वसाहतीत भारनियमन होत नाही. पण बाकी महाराष्ट्रातील वसाहतीत होते. त्याचा फटका मराठी उद्योगांना बसतो. दाभोलकरांनी यासह इतरही अनेक मुद्दे मांडले आहेत. काही सूचनाही केल्या आहेत.

1. एका महाराष्ट्राची विदर्भ, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असे सुटसुटीत विभाग असलेली अनेक राज्ये असावीत.
2. मुंबई महाराष्ट्राने केंद्रशासित करण्यासाठी केंद्राला द्यावी. मुंबईमुळे महाराष्ट्राला आज जो आर्थिक लाभ होतो, तो केंद्राने वाढत्या जीवनमानाप्रमाणे वाढवून महाराष्ट्राच्या या पाच विभागांत पुढील शंभर वर्षे सारखा द्यावा.

या मुद्यांविषयी तुम्हाला काय वाटते?

प्रतिक्रिया

निखिलराव's picture

26 Oct 2009 - 3:10 pm | निखिलराव

...

चेतन's picture

26 Oct 2009 - 3:54 pm | चेतन

एखाद्या खोलीत झुरळ झाली म्हणुन खोली बंद ठेवायची की ती साफ करायची :T

लेखात सुचवलेले उपाय म्हणजे नक्कीच !@#$%^&* आहे

चेतन

अक्षय पुर्णपात्रे's picture

27 Oct 2009 - 12:38 am | अक्षय पुर्णपात्रे

अवांतर : तत्पर संपादकांनी शीर्षक संपादीत केल्याबद्दल धन्यवाद.

प्रसन्न केसकर's picture

26 Oct 2009 - 3:10 pm | प्रसन्न केसकर

अन नव्यानं प्रांतरचना करावी. भाषा, धर्म, जात असे कुठलेही घटक विचारात न घेता फक्त प्रशासकीय सोयीनुसार... असा आपापसातील द्वेषाचे मुद्दे पुर्णपणे विसरलेला भारत कधीतरी दिसतो मला स्वप्नात.

प्रभो's picture

26 Oct 2009 - 3:12 pm | प्रभो

>>असा आपापसातील द्वेषाचे मुद्दे पुर्णपणे विसरलेला भारत कधीतरी दिसतो मला स्वप्नात.

स्वप्न दिवसा,रात्री की पहाटे...??? फक्त पहाटेचीच स्वप्ने पूर्ण होतात म्हणे..
--प्रभो

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Oct 2009 - 3:47 pm | llपुण्याचे पेशवेll

अंशतः सहमत. भाषावार प्रांतरचना रद्द करावी आणि राजव्यवहार भाषा 'हिंदी'ला जो तथाकथित राष्ट्रभाषा म्हणून दर्जा दिला आहे किंवा तसा खोडसाळ प्रकार दूरदर्शनवरून केला तो बंद करावा.
वाटलेच तर आंबेडकरानी सांगितलेली ४ राज्यांची संकल्पना अस्तित्वात आणावी.
आणि हे म्हणतात की यशवंतरावांनी म्हणे संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. अत्र्यांची भाषणे ऐका म्हणजे यशवंतरावांचे योगदान कळेल संयुक्त महाराष्ट्रातले.

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.

अमोल केळकर's picture

26 Oct 2009 - 3:13 pm | अमोल केळकर

लोकसत्तेतील प्रस्तुत लेख विचार करायला लावणार आहे. मात्र लेखात केलेल्या सुचना हा योग्य पर्याय आहे असे वाटत नाही. काही जालीम उपाय नवीन सरकारने ( आणि नवीन विरोधी पक्षाने ) शोधला पाहिजे.

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

विकास's picture

26 Oct 2009 - 4:16 pm | विकास

वर उल्लेखलेल्या लेखातील पर्याय हा काही गोष्टी गृहीत धरतो. त्यातील सर्वात प्रमुख गोष्ट म्हणजे केंद्राचे सर्वत्र राहणारे प्राबल्य. राज्यांची सरकारे असली तरी आपल्याकडे केंद्राचा अंकुश नको इतका राहत आला आहे. त्यामुळेच सर्व प्रश्न निर्माण झाले आहेत असे मला वाटते. थोडक्यात मुंबई ही महाराष्ट्राच्या गळ्यातील धोंड नसून, केंद्रसरकार हे सर्वच राज्यांच्या गळ्यातील धोंड बनते.

त्यामुळे अनेक गोष्टी बदलण्याची गरज आहे: (महाराष्ट्रासाठीच नाही तर सर्वच राज्यांसाथी)

  1. केंद्र सरकारचे हस्तक्षेप थांबणे गरजेचे आहे. केंद्राचे काम हे केवळ आंतर्राराज्य, आंतार्राष्ट्रीय पातळीवर तसेच मुलभूत घटना, राष्तॄय कायदे, संरक्षण वगैरे मुद्यांपर्यंतच मर्यादीत असावे.
  2. नोकरशाही कमी होणे गरजेचे आहे. त्यात राज्य आणि भारतीय प्रशासकीय सेवा पण येते.
  3. अशा अनेक गोष्टी आहेत जिथे नियंत्रणे हवीत (रेग्युलेटर्स) पण ते खाजगी क्षेत्राकडेच असायला हवे. (विचार करा सॉफ्टवेअर इंडस्ट्री जर ५०-६० च्या दशकात असती तर काय झाले असते ते!)
  4. कर रचना आणि त्याचा त्या त्या प्रदेशाला होणारा फायदा यातील विषमता दूर करणे महत्वाचे आहे.
  5. राज्यपाल वगैरे कशाला हवेत? बंद करा ती निवृत्त राजकारण्यांची पदे. त्यांच्या मुळे किती खर्च होतो ते बघा. शिवाय एकदा का जनतेने सरकार निवडून दिले की केंद्राचा अंकूश असणे चूकच आहे.
  6. ....

असे अनेक विचार येतात. पण मुंबई वेगळी करणे, प्रदेशांची राज्ये करणे वगैरे उपाय, कुठल्याही भाषिक/सांस्कृतिक भावनांच्या आहारी न जाता देखील मनात येत नाहीत. कारण जो पर्यंत केंद्रसरकार नाड्या आवळत बसणार तो पर्यंत तुमचे नशिब हे कोणीतरी बाहेरूनच ठरवत राहणार ही वस्तुस्थिती आहे.
-----

जाताजाता:
मुंबई महाराष्ट्राने केंद्रशासित करण्यासाठी केंद्राला द्यावी. मुंबईमुळे महाराष्ट्राला आज जो आर्थिक लाभ होतो, तो केंद्राने वाढत्या जीवनमानाप्रमाणे वाढवून महाराष्ट्राच्या या पाच विभागांत पुढील शंभर वर्षे सारखा द्यावा.
माझा आपल्या राजकारण्यांनी दिलेल्या आणि नोकरशाहीने दिलेल्या शब्दावर विश्वास नाही. तुर्तास इतकेच म्हणतो.

चिरोटा's picture

26 Oct 2009 - 6:05 pm | चिरोटा

माझा आपल्या राजकारण्यांनी दिलेल्या आणि नोकरशाहीने दिलेल्या शब्दावर विश्वास नाही

राज्याची/राष्ट्राची वाट लागण्यास हेच लोक जबाबदार आहेत्.राज्याचे विभाजन/मुंबई वेगळी करावी की नाही हे सगळे प्रश्न मला दुय्यम वाटतात.राज्यकर्ते/नोकरशहा प्रामाणिक असते तर चित्र वेगळे दिसले असते. २००४ साली जुलै/ऑगस्टमध्ये मनमोहनसिंगांनी 'मुंबईचे शांघाय' करण्याच्या बाता मारल्या.ते कसे करणार ह्यावर काही भाष्य नाही.बरोबर एक वर्षानी २६/७ ला मुंबईचा नर्क झाला होता.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

अक्षय पुर्णपात्रे's picture

27 Oct 2009 - 12:19 am | अक्षय पुर्णपात्रे

राज्यांची सरकारे असली तरी आपल्याकडे केंद्राचा अंकुश नको इतका राहत आला आहे. त्यामुळेच सर्व प्रश्न निर्माण झाले आहेत असे मला वाटते.

श्री विकास, विकेंद्रीकरणाचा विचार रोचक आहे. याविषयी अधिक युक्तिवाद ऐकण्यास उत्सुक आहे. विकेंद्रीकरणाने नेमके काय बदलणार आहे तसेच विकेंद्रीकरण असलेल्या क्षेत्रात (उदा. पोलिसदल, राज्य सरकारांनी नेमलेले प्रशासकीय अधिकारी, शैक्षणिक धोरण) विकेंद्रीकरणाने झालेले फायदे याविषयी कृपया माहिती द्यावी. धन्यवाद.

विकास's picture

27 Oct 2009 - 1:02 am | विकास

त्यासाठी वेगळा लेख टाकावा लागेल आणि सध्या त्याला वेळ नाही. जमल्यास आठवड्यांती... धन्यवाद.

अक्षय पुर्णपात्रे's picture

27 Oct 2009 - 1:04 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री विकास, काय ते समजले. धन्यवाद.

निमीत्त मात्र's picture

27 Oct 2009 - 11:15 pm | निमीत्त मात्र

श्री. पुर्णपात्रे तुम्हाला हे आता समजत आहे. आम्ही खूप पुर्वीच समजलो आहोत. नुकताच आम्ही एक संदर्भ मागितला होता. मा.विकासजींनी तिकडेही दुर्लक्ष केले.

सातारकर's picture

26 Oct 2009 - 5:16 pm | सातारकर

लेख फार थंड डोक्यान लिहिलेला आहे.

याबाबतीत बाबासाहेबांचा एक राज्य एक भाषा हा पर्याय, आपण स्वीकारलेल्या एक भाषा एक राज्य, या पर्यायापेक्षा अधिक व्यवहार्य वाटतो. पण जर तो सगळ्या भारताला लागू होणार असेल तर.

कदाचित बि, मा, रु, राज्यांचे केलेले दोन दोन तुकडे ह्याच योजनेचा भाग असू शकतील (हे फारच झाल, तरीही).

बाकी १०५ लोकांना हौतात्म्य पत्करायला लावणार्‍या काँग्रेसनेच संयुक्त महाराष्ट्राचा कलश आणला म्हणणार्‍यांच्या विषयी काय बोलणार?

विशाल,

मुंबई महाराष्ट्रात सामील केली म्हणून आपण गुजरातला काही काळ, त्या महसूली तूटीइतकी रक्कम दिली होती.

कोणत्याही अवघड सामाजिक समस्येविषयी उघड न बोलता त्यासंबंधी न बोलण्याकडे आपल्या समाजाचा असलेला कल, या विचारसरणीवर भाष्य जागर या पुस्तकाविषयी लिहायच आहे पण जरा सवडीन.

-----------------------------------------------------------------------------------------
I have seen GOD. He bats at no. 4 for India
Matthew Hayden

पर्नल नेने मराठे's picture

26 Oct 2009 - 5:19 pm | पर्नल नेने मराठे

मुंबई महाराष्ट्राच्या गळ्यातील धोंड?

म्हणजे आम्ही मुम्बैकर सुध्दा धोंड ~X( X( >:P :S
चुचु

निमीत्त मात्र's picture

26 Oct 2009 - 7:50 pm | निमीत्त मात्र

चुचुताई तुम्ही कुठल्या मुंबैकर? तुम्ही तर दुबैकर ना?

JAGOMOHANPYARE's picture

26 Oct 2009 - 5:49 pm | JAGOMOHANPYARE

उरलेला महाराश्ट्र मागे याला मुंबई जबादार.
महाराष्ट्राबाहेर मराठी नाहीत याला मुंबईकर जबाबदार.
महाराष्ट्राबाहेर मराठी बदनाम याला इंजिनवाले जबाबदार.

मला तर एवढेच समजले बाबा........ :(

मुंबईत दरडोई मिळणारे पाणी महाराष्ट्रातइतर कोणत्याही गावात मिळणाऱ्या पाण्यापेक्षा जास्त आहे. ही क्रूर चेष्टा येथेच थांबत नाही.
हे मात्र मान्य आहे... पण यात मुंबईकरांचा काय दोष

मुंबईतील घरांच्या किमती व भाडी एवढी आहेत की बाहेरून मराठी माणसांनी जाऊन मुंबईस नोकरी करणे हे अपवादात्मक आहे
हे मात्र अगदी खोटे आहे....

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

प्रदीप's picture

26 Oct 2009 - 6:03 pm | प्रदीप

मुंबईतील उरल्यासुरल्या मराठी माणसाने मनसेला भरभरून मते देऊन निवडून आणल्यावर आलेला हा लेख आपल्याच अस्तित्वाविषयी, आपल्याच एकसंधतेविषयी चर्चा करून आपापसात फूट निर्माण करण्याची खास मराठी मानसिकता दर्शवतो.

मुंबईत आज बहुतांश बिगर मराठी माणसे रहात असतांना, व तेथीला बहुतांश उद्योगधंदे बिगर मराठी लोकांच्या ताब्यात असतांना, उर्वरित महाराष्ट्राने मुंबईस पाणी व वीज का द्यावे अशा अर्थाचे प्रश्न दाभोळकरांनी विचारलेत. त्या अनुषंगाने त्यांनी दिलेली आकडेवारी तपासून पहावी लागेल. मुंबईचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्राच्या इतर शहरांच्या तुलनेत 'चमकदार' म्हणण्यासारखे नाही हे खरे असले, तरी एकंदरीत मुंबईचे उत्पन्न महाराष्ट्राच्या उत्पन्नाचा कितपत भाग आहे, हे त्यांनी दर्शवलेले नाही.

पाणी व वीज मुंबईस महाराष्ट्राच्या इतर भागातून दिली जाते, व त्या तेथील ग्राहकांस तुलनेने स्वस्त दराने विकत मिळतात ह्यामागील नक्की कारणे काय आहेत? महाराष्ट्र सरकार मुंबईस विषेश दराने पाणी व वीज विकते का, ह्याविषयी ते काही सांगत नाहीत. मुंबईत तयार झालेल्या महागड्या औषधाच्या किंमती मुंबई व गडचिरोलीतील किंमतीचे उदाहरण मला अजिबात समजले नाही.

सबंध लेखाचा रोख सेनेवर व आता मनसेवर आहे. राज्याच्या स्थापनेपासून सर्वाधिक वर्षे राज्य करणार्‍या काँग्रेसविषयी एक चकार शब्द दाभोळकर इथे काढत नाहीत. अरे हो, नाही म्हणायला राज्याचा मंगल कलश, (दाभोळकरांच्या सातारच्या)यशवंतराव चव्हाणांनी आणला, हे ते आवर्जून नमूद करतात. हे म्हणजे खरे तर, एखाद्याने समजा नवी गाडी विकत घेतली, तर ती कुणी 'आणली'? -- तर त्या माणसाच्या ड्रायव्हरने! असे आवर्जून सांगण्यासारखे आहे. पण दाभोळकरांचे चव्हाण व महाराष्ट्र काँग्रेसप्रेम इतके आंधळे आहे, की गेल्या साठ वर्षात आपली, मराठी माणसाची मुंबईवरील पकड ढिली झाली ह्याविषयी त्यांना त्यांच्या प्रिय काँग्रेसजनांचे नावही घ्यावेसे वाटत नाही. गेल्या साठ वर्षात महाराष्ट्रावर सत्ता कुठल्या पक्षाची होती, ते इथे पहावयास मिळेल. ज्या काँग्रेसबद्दल दाभोळकर मूग गिळून बसले आहेत, त्यांनी १९६० ते १९७८ ह्या वर्षात सलग सत्ता उपभोगली. ह्या कालावधीत समुद्रात १ रू. चौरस वार ह्या दराने बिल्ड्रर्सना ९९ वर्षांच्या लीजा दिल्या गेल्या. ह्याच कालावधीत कम्युनिस्टांचे मुंबईतील गिरणगाव व उद्योगधंद्यातील वर्चस्व नेस्तनाबूत करण्यासाठी सेनेस प्रोत्साहन देण्यात आले, ते कुणाकडून? त्यापुढील काळातही, ७८-८० ही दोन वर्षे, व ९५-९९ ही सुमारे चार वर्षे सोडली तर काँग्रेसनेच सत्ता केलेली आहे, त्यांनी काय दिवे लावले आहेत, ते दाभोळकरांना दिसत नाही? त्यांचे ल़क्ष व लक्ष्य सेना (व मनसे) असल्याने कोंग्रेसच्या संपूर्ण दिवाळखोरीच्या कारभाराकडे त्यांनी दुर्लक्ष करण्याचे ठरवले असावे.

तेव्हा, हे असे का झाले, त्यात सेना सोडून ('राडा करणार्‍या लोकांचा प्रांत' असे म्हटल्याने काय कुठे बिघडले हे नक्की समजत नाही. तसे असेल तर मग पंजाबचे काय, तामिळनाडूचे काय, हे प्रश्न येतात) इतर कुणाविषयीही दाभोळकर काहीही लिहीत नाहीत. कारण तसे केले तर प्रश्नाच्या मूळात जावे लागेल. तो त्या लेखाचा हेतू असावा ह्याविषयी मलातरी शंकाच आहे.

म्हणजे गंमत पहा-- 'ग्रामीण भागातून आलेले नेते' (शरदराव पवार असे म्हणालेत म्हणे-) मुंबईच्या समस्यांना गेली ६० वर्षे समजू शकलेले नाहीत. आणि आता त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या शहरी, आणि शिक्षीत आघाडीतर्फे मुंबईविषयी मराठी लोकांचा (मुख्यत्वे मुंबईबाहेरील मराठी जनतेचा) रीतसर बुद्धिभेद करण्याची मोहीम राबवण्यात येणार!! जय महाराष्ट्र.

बरोबर!
कुठल्या तरी सिनेमातले एक वाक्य माझ्या पक्के लक्षात राहिलेले आहे! "आपके जैसे दोस्त हों, तो दुष्मनकी क्या जरूरत है?" मला वाटतं की दाभोळकरांना हा प्रश्न 'फिट्ट' बसतो.
हा लेख दाभोळकरांकडून कुणी "लिहविलेला" आहे व त्यांसाठी दाभोळकरांना किती पैसा चारला आहे ते कळले तर कारणमीमांसा करण्याची गरज रहाणार नाहीं. मराठी माणूस असा विकाऊ कधीपासून झाला?
अर्थात आपल्यापैकीच कांहीं लोक "वहाव्वा, क्या बात है" म्हणणारे निघतीलच.
पण मुंबई ही महाराष्ट्राच्या गळ्यातील धोंड नसून ती एक महाराष्ट्राच्या गळ्यातला नवलाखाचा सुंदर हार आहे!
बस, सार्‍या उपर्‍यांना बाहेर काढायला हवे. आज रीतीनुसार ही जबाबदारी शिवसेनेने घेतली पाहिजे. पण ती संघटना जर "सं. भाऊबंदकी"त मश्गुल राहिली तर पर्यायाने राजाभाऊंना (राजसाहेब हे उ. हिंदुस्तानी नाव नाही बॉ रुचत. याउलट "राजाभाऊ" कसं अस्सल मराठी वाटतं!) ही जबाबदारी घ्यावीच लागेल.
"जा झणि जा रावणास सांग अंगदा, शेवटचा करि विचार फिरुनि एकदा" या माडगूळकरांच्या गीतरामायणातील गीताप्रमाणे बाळासाहेबांना व उद्धवना हे सांगायला मनोहर जोशींसारख्या एकाद्या 'अंगदा'ने हिमतीने पुढे आलेच पाहिजे!
आहे का कुणी असा अंगद? कीं राजाभाऊंना जातीनेच हा जाब विचारावा लागेल?
डोईफोडे नावाच्या गृहस्थानी (किंवा प्राध्यापकांनी?) लिहिलेला एक लेख माझ्या संग्रही आहे. डोईफोडे हे कुठल्या जातीचे आहेत ते मला माहीत नाहीं, पण तो अतीशय वाचनीय लेख इथे उधृत करण्याची नितांत गरज आहे, पण त्याचा परिणाम भलताच व्हायचा म्हणून मी तो मोह टाळतो. पण कुणी आपल्या खर्‍या नावाने मागितला तर मी तो पाठवून देईन. फारच रोख-ठोक व विचारप्रवृत्त करणारा लेख आहे, पण त्यासाठी स्वतःच्या जातीची वस्त्रे त्याजून मोकळ्या मनाने वाचायची मानसिक तयारी असली पाहिजे व तरच तो पाठविण्यात अर्थ आहे.
तसेच जखोटिया यांचाही याच अर्थाचा लेखही माझ्या संग्रही आहे. तोही पाठवून देऊ शकतो. तात्यांना पाठवितो आधी!
सुधीर
------------------------
गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|

सुनील's picture

27 Oct 2009 - 6:51 am | सुनील

डोईफोडे नावाच्या गृहस्थानी (किंवा प्राध्यापकांनी?)
सुधाकर डोईफोडे की काय?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सुधीर काळे's picture

28 Oct 2009 - 8:34 am | सुधीर काळे

होय! तेच.
सुधीर काळे
------------------------
गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|

तिमा's picture

26 Oct 2009 - 6:05 pm | तिमा

जी नगरी सर्वाधिक पैसा सरकारी खजिन्यात भरते ती बाकीच्या राज्याच्या गळ्यातली धोंड कशी ठरते?
मुंबईतले सर्व लोक कष्ट करुन पैसे मिळवतात. आणि त्यातील मोठा हिस्सा कर म्हणून भरतात. मुंबईत काही पिकत नाही. सर्व बाहेरुन आणावे लागते. तरी मुंबई श्रीमंत का होते? याचा बाकीच्या महाराष्ट्राने विचार करावा.
दुसर्‍याचा द्वेष करुन कधी आपली प्रगती होत नाही.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

नंदन's picture

26 Oct 2009 - 6:31 pm | नंदन

विकासात प्रादेशिक असमतोल आहे ही वस्तुस्थिती असली तरी दाभोलकरांनी सुचवलेले उपाय हे रोगापेक्षा भयंकर आहेत. शिवाय सरसकट सगळ्याच रहिवाशांना 'राडा' करणार्‍या गटात टाकलेले पाहून आश्चर्य वाटले. (या सरसकट सामान्यीकरणाची आत्तापर्यंत खरं तर सवय व्हायला हवी म्हणा.)

>>> एका महाराष्ट्राची विदर्भ, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असे सुटसुटीत विभाग असलेली अनेक राज्ये असावीत.

-- वा! विदर्भाचे मुख्यमंत्री बनवारीलाल पुरोहित, मराठवाड्याचे मुख्यमंत्री प्रदीप जयस्वाल, प. महाराष्ट्राचे कलमाडी, उ. महाराष्ट्राचे मुकेश पटेल आणि मुंबईसह कोकणाचे मुख्यमंत्री कृपाशंकर सिंग यांनी मॅडमची १० जनपथच्या निवासस्थानी भेट घेतली अशी रम्य बातमी डोळ्यांसमोर तरळून गेली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Oct 2009 - 6:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>विकासात प्रादेशिक असमतोल आहे ही वस्तुस्थिती असली तरी दाभोलकरांनी सुचवलेले उपाय हे रोगापेक्षा भयंकर आहेत.

सहमत आहे. मुंबई वेगळी केली पाहिजे असे सुचते तरी कसे लोकांना. मुंबईसाठी एक स्पेशल बजेट आणि उर्वरित विभागासाठी एक असे फार तर करावे, तसेही करतेच महाराष्ट्र सरकार. प्रश्न सामाजिक सुविधांचा आहे, तो सोडविण्यासाठी उपाय शोधले पाहिजेत. राडा संस्कृतीने मुंबई देशभर बदनाम झाली हे तर कैच्या कै वाटले. त्यामुळे केंद्राकडून येणारे पॅकेजेस कमी झाले काय ? मराठी लोकांना लहान-मोठ्या उद्योगांसाठी प्रोत्साहित केले पाहिजे. बँकाचे कर्ज सहज मिळाले पाहिजे, मुंबईविभागातून शासनाला जो महसूल मिळत असेल त्यातला काहीएक अधिक भाग पाणी-वीज यासाठी वापरात आणला पाहिजे असे वाटते. समतोल विकासाचे उपाय शासनाने शोधले पाहिजेत
असो,...

>>विदर्भाचे मुख्यमंत्री बनवारीलाल पुरोहित, मराठवाड्याचे मुख्यमंत्री प्रदीप जयस्वाल, प. महाराष्ट्राचे कलमाडी, उ. महाराष्ट्राचे मुकेश पटेल आणि मुंबईसह कोकणाचे मुख्यमंत्री कृपाशंकर सिंग यांनी मॅडमची १० जनपथच्या निवासस्थानी भेट घेतली अशी रम्य बातमी डोळ्यांसमोर तरळून गेली.

वेगवेगळी राज्य झाल्यावर असे चित्र दिसणारच....!

-दिलीप बिरुटे

विकास's picture

26 Oct 2009 - 7:10 pm | विकास

वेगवेगळी राज्य झाल्यावर असे चित्र दिसणारच....!

त्याला "चित्र" न म्हणता "विचित्र" म्हणावे लागेल. :-)

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Oct 2009 - 8:59 pm | llपुण्याचे पेशवेll

विदर्भाचे मुख्यमंत्री बनवारीलाल पुरोहित, मराठवाड्याचे मुख्यमंत्री प्रदीप जयस्वाल, प. महाराष्ट्राचे कलमाडी, उ. महाराष्ट्राचे मुकेश पटेल आणि मुंबईसह कोकणाचे मुख्यमंत्री कृपाशंकर सिंग यांनी मॅडमची १० जनपथच्या निवासस्थानी भेट घेतली अशी रम्य बातमी डोळ्यांसमोर तरळून गेली.
असो. आम्हाला तर काही गैर वाटत नाही त्यात. नाहीतरी महाराष्ट्रात ओरीजीनल काही नव्हतेच. मराठे राजस्थानातून आले, भट-बामण मध्यपूर्वेतून आले इतर सगळे दक्षिणेतून आले. नाहीतरी मराठी लोकांच्या रक्तात व्यवसाय करण्याची कलाही नाहीचे. मग महाराष्ट्रात मूळ होतं काय फक्त दगड. म्हणूनच कोणीतरी सार्थपणे म्हटलेच आहे ना महाराष्ट्राला "दगडांच्या देशा' आणि आम्हीही ते वारंवार सिद्ध करत आहोत. :)

जय दगड
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.

-- वा! विदर्भाचे मुख्यमंत्री बनवारीलाल पुरोहित, मराठवाड्याचे मुख्यमंत्री प्रदीप जयस्वाल, प. महाराष्ट्राचे कलमाडी, उ. महाराष्ट्राचे मुकेश पटेल आणि मुंबईसह कोकणाचे मुख्यमंत्री कृपाशंकर सिंग यांनी मॅडमची १० जनपथच्या निवासस्थानी भेट घेतली अशी रम्य बातमी डोळ्यांसमोर तरळून गेली.

हे आज जरी थोडेफार विनोदी वाटत असले, तरी काँग्रेसी नेत्यांच्या मनात काय आहे, ह्याचा हा लेख उत्तम उदाहरण आहे. म्हणून हे दुर्दैवी चित्र काही वर्षांनी खरे ठरले तर आश्चर्य वाटावयास नको.

हेच लॉजिक थोडे पुढे चालवून, काश्मिरचेही असेच काहीतरी करायचे का, असेही विचारता येईल, नाही?

प्रदीप, बहोत खूब! एकदम मस्त पोस्ट.
याच न्यायाने वार्धक्याने आता निरुपयोगी झालेल्या जन्मदात्या आईलाही "गळ्यातली धोंड" म्हणतील का दाभोळकर?
सुधीर
------------------------
गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|

मिसळभोक्ता's picture

26 Oct 2009 - 10:46 pm | मिसळभोक्ता

विदर्भाचे मुख्यमंत्री बनवारीलाल पुरोहित,

पुरोहित आता पुन्हा भाजपात आले आहेत ना ? मग मुख्यमंत्री कसे होतील ?

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

अक्षय पुर्णपात्रे's picture

26 Oct 2009 - 11:35 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री नंदन, चित्र भीतीदायक आहे. लाळघोटेपणा हे १० जनपथचे एकक आहे असे तुमचे मत दिसते. त्या मताविषयी आक्षेप नाही पण अष्टपैलु मराठी लोक अमराठी लोकांपेक्षा या बाबतीत मागे आहेत या गृहीतकास आक्षेप आहे. या गृहीतकावर पुनर्विचार व्हावा. (श्रीमती प्रतिभा पाटील यांनी या क्षेत्रात केलेली कामगिरी व संपादन केलेले यश याचा महाराष्ट्राला विसर पडू देऊ नये. मिपावरील काही सदस्यही याबाबत विशेष सरसता बाळगून आहेत.)

लबाड लांडगा's picture

26 Oct 2009 - 8:02 pm | लबाड लांडगा

दत्तप्रसाद दाभोळ्कर ही महाराष्ट्राच्या गळ्यातील धोंड होय.
लबाड

संजय अभ्यंकर's picture

26 Oct 2009 - 10:03 pm | संजय अभ्यंकर

द.दां. नी कैच्या कै लॉजीक वापरले आहे.
अशा भारी भारी आयडीया कशाकाय सुचतात ह्यांना?

१. मुंबई केंद्रशासित केल्यास आहे तो मराठी माणूस ही मुंबईत राहू शकणार नाही. मुंबईची दिल्ली होईल.

२. केंद्र सरकार महाराष्ट्राला मुंबईतला पैसा वाटून देईल? वाट बघा!

३. महाराष्ट्रातील वीज व पाण्याची टंचाई, याला मुंबईकर कसा जबाबदार ठरतो?
शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा योग्य अभ्यास कुणी केलाय?

इस्रायल मधिल लागवडीखालील जमीन व पर्जन्यमान महाराष्ट्रा पेक्षा कमी असुन शेती उत्पादन महाराष्ट्राच्या दुप्पट कसे?
उर्जेची समस्या इस्राईलला का नाही?

इस्रायल फार लांब आहे, आमच्या राजस्थानात पर्जन्यमान कमी आहे, तरिहि तेथे शेती उत्पादन होते, ह्याचा कोणी अभ्यास केलाय?
राजस्थानात शेतकर्‍यांच्या आत्महत्या ऐकल्या आहेत?

भूकमरी व बेरोजगाराची समस्या निसर्गसंपन्न व मुबलक पाणी असलेल्या यू.पी. व बिहार मध्ये आहे, राजस्थानात ही समस्या ऐकलिय?

कुठल्याही प्रश्नाचा योग्य अभ्यास व योग्य मुल्यमापन न करता निष्कर्ष काढायची सवय आम्ही कधी सोडणार?

४. मुंबईची लोकसंख्या कमी करायचे उपाय शोधायचे सोडून भलभलते निष्कर्ष असले लोक काढतात.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

चिरोटा's picture

27 Oct 2009 - 11:13 pm | चिरोटा

मुंबईची लोकसंख्या कमी करायचे उपाय शोधायचे सोडून भलभलते निष्कर्ष असले लोक काढतात.

हा खरा मुख्य प्रॉब्लेम आहे.७०/८०च्या दशकात केंद्र/राज्य सरकारांनी जे बिनडोक नियोजन केले त्याचे हे परिणाम आहेत्.बिल्डर्/उद्योगपतींच्या फायद्यासाठी काही ठरलेला भागच विकसीत करायचा आणि बाकीचा तसाच मागासलेला ठेवायचा.एकीकडे शहरांची लोकसंख्या खूप वाढते म्हणायचे आणि दुसरीकडे मोठमोठ्या कंपन्यांना शहरात कार्यालये उघडण्यास परवानगी द्यायची.नवी मुंबई बनवली तेव्हा मुंबईची गर्दी कमी होईल असे वाटले पण झाले भलतेच्.लोक वाशीहून चर्चगेटला कामाला जावू लागले्. ह्याचे कारण सरकारने मोठ्या कंपन्यांना हलवलेच नाही.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

अविनाशकुलकर्णी's picture

27 Oct 2009 - 10:50 pm | अविनाशकुलकर्णी

विदर्भाचे हेच म्हनने आहे..महाराष्ट्रात राहुन काय प्रगति? काय फायदा?

JAGOMOHANPYARE's picture

29 Oct 2009 - 9:24 am | JAGOMOHANPYARE

http://www.saamana.com/2009/Oct/29/Link/Main2.htm

आता याचे श्रेय दाभोळकराना की काय?

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

आशिष सुर्वे's picture

29 Oct 2009 - 9:53 am | आशिष सुर्वे

मला आश्चर्य अशाचे वाटते की असे लेख लिहिणारे मराठीजन अस्तित्वात आहेत आणि असे लेख छापणारे संपादकही!

कहर म्हणजे आंबेडकरांच्या ४ राज्यांच्या संकल्पनेलाही दुजोरा मिळतो.. (त्यातही आरक्षणाची पुरवणी जोडलेली असेलच!)
आणि उद्या हेच लोकं 'काश्मीर'मध्ये मुस्लिमांची संख्या जास्त असल्याने त्याला पाकिस्तानला आंदण द्या असेही म्हणतील!

मुंबई आणि महाराष्ट्राचे नाते मायलेकाचे आहे.. कॄपा करून त्याला तसेच राहुदेत.

-
कोकणी फणस