गणपत पाटील, विनम्र आदरांजली...

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
24 Mar 2008 - 1:27 pm

मराठी रजतपटावरील गणपत पाटील या ज्येष्ठ कलाकाराला मिसळपाव परिवाराची विनम्र आदरांजली....

लावणीप्रधान मराठी चित्रपटातील त्यांनी रंगवलेला 'नाच्या', हा मराठी चित्रप्रेमींच्या नेहमीच लक्षात राहील!

तात्या.

प्रतिक्रिया

मी त्यांचे चित्रपट पाहिले तेव्हा खूप लहान होते,अभिनयाबाबत कळत नव्हते. म्हणजे सगळे लक्ष्य अभिनेता / अभिनेत्री यांच्यावरच केंद्रित असायचे. आता कळतय त्यांचा अभिनय केवढा आव्हानात्मक होता, कदाचित हा 'नाच्या' रंगवताना त्यांना रंगभूमीवरही आणि प्रत्यक्ष समाजातही बरीच आव्हाने पेलावी लागली असतील.

राजमुद्रा :)

नंदन's picture

24 Mar 2008 - 3:17 pm | नंदन

आहे.

>>>कदाचित हा 'नाच्या' रंगवताना त्यांना रंगभूमीवरही आणि प्रत्यक्ष समाजातही बरीच आव्हाने पेलावी लागली असतील.
-- दुर्दैवाने हे खरे आहे. त्यांच्या प्रतिमेमुळे त्यांच्या मुलीचे लग्न जमणे अवघड झाले होते. दूरदर्शनवरील मुलाखतीत या प्रश्नाला उत्तर देताना त्यांचा बांध फुटला होता.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विवेकवि's picture

24 Mar 2008 - 2:30 pm | विवेकवि

आज सकाळी वाचले वाचुन वाईट वाटले..
वयाच्या १४ व्या वर्षीपासून र॑ग म॑च्यावर वावरत असलेल्या र॑गकम्याला माझी आदरा॑जली..

विवेक वि.

प्रमोद देव's picture

24 Mar 2008 - 2:36 pm | प्रमोद देव

"आत्ता गं बया!" हे इतकेच शब्द गणपत पाटलांची थोरवी सांगण्यास पुरेसे आहेत.
तमाशाप्रधान चित्रपट मराठीत अमाप आले. त्यात नाच्याचे काम करणारी बरीच कलाकार मंडळी होऊन गेली. पण "गणपत पाटील" ह्या नावाशी कुणाचीही तुलना होऊच शकत नाही, इतका तो नाच्या त्यांनी आपल्या अभिनयाने जीवंत केला होता.
बोलणं,दिसणं आणि नाचणं अशा तिहेरी अंगांनी त्यांचा सहजसुंदर अभिनय नटलेला होता..
म्हणून म्हणतो, "झाले बहू, होतिलही बहू,परंतू या सम हा!" फक्त एकच ! गणपत पाटील.
माझीही ह्या नटश्रेष्टाला विनम्र आदरांजली.

प्राजु's picture

24 Mar 2008 - 7:10 pm | प्राजु

श्रद्धांजली..
एकदा त्यांची मुलाखत प्रत्यक्ष पहिलि होती. त्यांच्या मुलीचे तर लग्न ठरत नव्हतेच पण स्वतः त्यांनाही कोणी मुलगी द्यायला तयार नसायचे. लोक शंका घ्यायचे त्यांच्याबद्दल..
एका उत्तम अभिनेत्याला त्याच्या अभिनयाची दादच म्हणावी लागेल... पण याला करूणेची किनार नको होती अशी.
माझी भावपूर्ण श्रद्धांजली..
- (सर्वव्यापी)प्राजु

अभिज्ञ's picture

24 Mar 2008 - 9:10 pm | अभिज्ञ

आपलि हि शेवटचि पिढि असावि ज्याना गणपत पाटील हे माहित होते.
मराठी सिनेमा म्हण्टले कि अजुनही डोळ्यासमोर पुर्विचे रांगडे ,ग्रामीण ,
तमाशाप्रधान सिनेमेच आठवतात.
अरुण सरनाई़क,जयश्रि गडकर,सुर्यकान्त,गणपत पाटिल अशिच नावे लक्षात आहेत.
आजकालचे सिनेमे पहाता,नविन पिढिला ह्या गुणि कलाकारांची कितपत ओळख राहिल?
ह्याबद्दल शंकाच आहे.
मराठि सिनेमा जगतातिल ह्या उपे़क्षित शिलेदाराला आमचि भावपूर्ण श्रध्दांजलि.

अबब

सुधीर कांदळकर's picture

24 Mar 2008 - 9:43 pm | सुधीर कांदळकर

श्रद्धांजली.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

बेसनलाडू's picture

25 Mar 2008 - 3:37 am | बेसनलाडू

(साश्रू)बेसनलाडू

स्वाती राजेश's picture

24 Mar 2008 - 11:28 pm | स्वाती राजेश

गणपत पाटील यांना विनम्र आदरांजली...

धनंजय's picture

25 Mar 2008 - 5:17 am | धनंजय

विनम्र आदरांजली

करुन ते पात्रच आपल्या अभिनयाने कायमस्वरुपी स्वतःच्या प्रतिमेत मिसळून टाकणार्‍या ह्या जगावेगळ्या कलावंताला विनम्र आदरांजली.

शब्दप्रभू गदिमांच्या शब्दात -

घटाघटांचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविना ते कोणा नकळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार !
विठ्ठला तू वेडा कुंभार

चतुरंग

केशवराव's picture

25 Mar 2008 - 10:31 am | केशवराव

आमचे भाव विश्व घडविण्यांत ज्या अनेक व्यक्ती विशेषांचा वाटा आहे त्यातील एक गणपतराव पाटील !
एक एक मनोरे कोसळायला लागले; दुसरे काय ? सुर्यकान्त,चन्द्रकान्त,अरुण सरनाईक आणि कितीतरी...!
नाच्याला विनम्र आभिवादन .
- - - - - - - केशवराव.

जुना अभिजित's picture

25 Mar 2008 - 11:07 am | जुना अभिजित

नाच्याशिवाय तमाशा म्हणजे कॉमेंट्रेटरशिवाय क्रिकेट...

ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

विसुनाना's picture

25 Mar 2008 - 5:19 pm | विसुनाना

गणपत पाटील यांना विनम्र आदरांजली.

सुवर्णमयी's picture

25 Mar 2008 - 7:19 pm | सुवर्णमयी

गणपत पाटील यांना विनम्र आदरांजली.
सोनाली

मुक्तसुनीत's picture

25 Mar 2008 - 7:24 pm | मुक्तसुनीत

गणपत पाटील यांच्या निधनाबद्दल वाचले आणि मनात संमिश्र भावना दाटून आल्या. अनेकानेक तमाशाप्रधान चित्रपटांमधून त्यानी रंगविलेल्या भूमिका, त्या चित्रपटांच्या स्मृती आणि त्यानिमित्ताने त्या काळाची घडून आलेली सफर....

मात्र जेव्हा गणपत पाटीलांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल थोडी कल्पना करायला गेलो तेव्हा जाणवले की या आयुष्याला अनेक पदर असले पाहिजेत. त्यांच्या भूमिका खुमासदार, ठसकेबाज असायच्या, त्या करण्यात त्यांचे नैपुण्य विलक्षण होते यात काहीच शंका नाही. किंबहुना, "त्या" भूमिकेमधे इतर कुणाला कल्पिणे निव्वळ अशक्य ! परंतु, हे जे "लेबल" त्याना चिकटले ते आयुष्यभर, हेदेखील खरेच. एका विशिष्ट काळात , एका विशिष्ट पठडीतल्या चित्रपट-उद्योगामधे त्यानी आपल्याकरता एक अढळ स्थान बनविले , परंतु हे ध्रुवपदच त्यांची बेडी ठरली नसेल काय ? इतर कुठल्याही प्रकारच्या भूमिका , इतर कसलेही प्रयोग याना कसलाच वाव राहिला नाही. आणि जी प्रतिमा निर्माण झाली ती स्त्रैणत्वाची. ज्या बाईने त्यांच्याशी - अगदी त्या काळात का असेना - पण लग्न लावले ; (आणि बहुदा ते एक ठरवून दिलेले लग्न असेल ज्यात मुलगी आईबापानी ठरविलेल्या बोहल्यावर चढते )त्या बाईला लग्न करताना कुठेतरी शल्य जाणवले नसेल काय ? नंतरचा संसार भले चारचौघांसारखा झाला असेल ; पण प्रत्येक मुलीचे त्या त्या कोवळ्या किमान लग्नापुरते एक स्वप्न , काही एक कल्पना असतेच. सौ. पाटलाना आपल्या स्वप्नांना तिलांजली देऊनच लग्न करावे लागले नसेल काय ?

एकूण , "गणपत पाटील" हे शेवटी मराठीभाषेत एका व्यक्तिचे विशेष-नाम न रहाता एक विशिष्टगुणवाचक संज्ञा बनली. या घटनेमागे त्या कलाकाराच्या कलेतला सच्चा निखळपणा आहे तसेच ती कला सादर करणार्‍या व्यक्तिच्या आयुष्यातले विलक्षण कारुण्यही आहे. आज या व्यक्तिबद्दल विचार करतो तेव्हा भूतकाळाशी नाते जोडले जाते , त्या माणसाच्या अस्सलपणे केलेल्या भूमिकांबद्दल आदरमिश्रित कृतज्ञता वाटते आणि त्यांच्या आयुष्यातल्या कारुण्याने विषण्णही व्हायला होते.

आनंदयात्री's picture

27 Mar 2008 - 3:25 pm | आनंदयात्री

>>त्यांच्या आयुष्यातल्या कारुण्याने विषण्णही व्हायला होते. <<

असेच वाटले. सौ पाटलांसारखे त्यांच्या मुला मुलींना पण कदाचित काही त्रास सहन करावा लागला असेल, त्यावरुन कदाचित घरात वाद विवाद झाले असतील, या गोष्टींचे पाटलांना किती क्लेश सहन करावे लागले असतील याची कल्पनाच आपण वर म्हटल्या प्रमाणे विषण्ण करते.

प्रभाकर पेठकर's picture

27 Mar 2008 - 3:17 pm | प्रभाकर पेठकर

अगदी नगण्य भूमिका अजरामर करण्याची ताकद ह्या गुणी कलाकारात होती. त्यांचा अभिनय इतका वास्तव होता की एकदा कोल्हापुरात शुटींग चालले असताना हिजड्यांचा एक ग्रुप त्यांना भेटायला आला होता. त्यांनी हार आणि काही भेटवस्तूही आणली होती. 'आपल्यातल्याच कोणीतरी इतके नांव आणि प्रतिष्ठा मिळवली ह्याचे त्यांना भयंकर कौतुक वाटत होते.'

मनस्वी's picture

27 Mar 2008 - 4:00 pm | मनस्वी

मराठि सिनेमा जगतातिल ह्या उपे़क्षित शिलेदाराला आमचि भावपूर्ण श्रध्दांजलि.

मराठी सिनेसृष्टीत अनेक उत्तमोत्तम कलाकार उपेक्षित राहिले हे खरेच.

घटाघटांचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविना ते कोणा नकळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार !
विठ्ठला तू वेडा कुंभार

चपखल

मयुर's picture

27 Mar 2008 - 4:05 pm | मयुर

गणपत पाटिल याना भावपुर्ण आदरांजली

मयुर

धोंडोपंत's picture

27 Mar 2008 - 8:50 pm | धोंडोपंत

श्री गणपत पाटलांना आमची भावपूर्ण आदरांजली. एक महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला.

आपला,
(खिन्न) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com