गाभा:
आमच्या आफिसच्या तंत्रज्ञाने 'विण्डोस ७ बसवून देवू का' असे विचारले. त्याबद्दल मला जास्त माहिती नाही. विण्डोस ७ ही मायक्रोसाफ्ट ची नवी प्रणाली कशी आहे? आपापली मते मांडावीत. प्रणाली नवीन आहे, काही अनुभव असतील तर सांगावेत. तसेच त्यावर यूनिकोड दिसते का ते सांगावे.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
24 Oct 2009 - 9:36 am | दशानन
विस्टाचा अनुभव जर विसरला असेल तर ७ कडे वाटचाल करा ;)
माझी पण इच्छा आहे ट्रायल मागवला आहे, उद्या / परवा मिळेल मला... प्रयोग करतो व मग सांगतो उपयोगी आहे की नाही... कि नुस्ताच नाकापेक्षा नथ भारी हा प्रकार आहे ते :)
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
24 Oct 2009 - 9:51 am | सहज
टोकीयोच्या बर्गर किंग मधे काल स्पेशल किमतीला ७७७ येनला ७ वॉपर मिळत होता. साधारण २१०० कॅलरीज.
बाकी विन ७ बद्दल कल्पना नाही.
24 Oct 2009 - 11:23 am | स्वप्निल..
चांगली आहे .. मी बेटा व्हर्जन वापरतोय ..
स्वप्निल
24 Oct 2009 - 12:11 pm | Nile
बेटर दॅन विस्टा! गो फोर इट! :)
24 Oct 2009 - 12:47 pm | सुमीत
मी ट्रायल गेले १ महिना वापरत आहे, अनुभव खूपच छान आहे.
24 Oct 2009 - 4:44 pm | संजीव नाईक
काल पासुन वापरात आले आहे, बघतो मायक्रोसाफ्ट ७ चा काय अनुभव येतो ?
कलेचा पुजारी
संजीव
25 Oct 2009 - 9:34 am | घाटावरचे भट
व्हिस्टापेक्षा १०० पटीने जास्त चांगली प्रणाली. किंबहुना '7 is Vista as it should have been'. उगाच ब्ल्यू स्क्रीन येत नाही सारखा. बूट लवकर होते आणि मधे मधे लटकत नाही. व्हिस्टावर चालणारी सर्व अॅप्लिकेशन्स ७वर चालतात. ७ जरूर वापरून पहा.
25 Oct 2009 - 10:01 am | सुधीर काळे
व्हिस्टाबाबत सहमत! मीही Vista घेतला होता पण एक महिन्यात परत जुनी XP Version चढवली.
मला वाटते जरा सबूरीनं घावं, कारण साधारणपणे पहिल्या आवृत्तीतले कीटक/किडे (bugs) काढलेली V2 जास्त चांगली असते.
सुधीर
------------------------
गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|
2 Nov 2009 - 10:49 am | दशानन
आज सकाळ पासून वापरत आहे विन्डोज ७.
चांगले आहे, एक्सी पेक्षा थोडे सरस वाटत आहे, काही गोष्टी चांगल्या आहेत आता वापरतो काही दिवस व मग अनुभव लिहतो.
सर्व प्रणाली चालत आहेत हे नवल आहे ;)
*****
मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
2 Nov 2009 - 2:41 pm | पाषाणभेद
मी सिंन्टेक्स कंपनीच्या विन्डोज वापरतो. मस्त आहेत. पावसाळ्यात फुगत नाहीत. लोकल असल्याने सुतार लोक जास्त मजूरी घेत नाहीत. आपल्याला कंपनीकडून मिळणार असल्याने मजूरी व खर्च नाही. वापरा.
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)