डोळे हे जुल्मी गडे.....रेखाटन

वर्षा's picture
वर्षा in जे न देखे रवी...
25 Mar 2008 - 5:32 am

सध्या नवीन रेखाटन एव्हढ्यात केलं नाही. तोपर्यंत पूर्वी केलेली रेखाटनं इथे चढवीन..त्यापैकी हे एक.
एका प्रसिद्ध जुन्या हिंदी सिनेमातील हिरो-हिरॉईनच्या डोळ्यांचे क्लोज्-अप्स रेखाटायचा प्रयत्न केला होता.....:)))

-वर्षा

प्रतिक्रिया

व्यंकट's picture

25 Mar 2008 - 5:42 am | व्यंकट

राजेंद्रकुमार वैजयंती माला ? संगम?

व्यंकट

प्राजु's picture

25 Mar 2008 - 6:08 am | प्राजु

रेखाटन सुंदर..

राजेंद्रकुमार वैजयंती माला ? संगम?

बहुतेक असेच वाटते..
- (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर's picture

25 Mar 2008 - 7:56 am | विसोबा खेचर

वर्षा,

अतिशय सुरेख आणि बोलकं रेखाटन! क्लासच आहे!

पहिलं - मलाही राजेन्द्रकुमार वाटतो आहे

दुसरं - वैजू नाही वाटत. आमच्या वैजूचे डोळे थोडे अधिक बोलके आणि मोठे आहेत. पण रेखाटन सुरेखच असल्यामुळे ती बाईही सुरेखच असणार! :)

असो,

वर्षा, अजूनही अशीच उत्तमोत्तम रेखाटने मिपावर येऊ देत...

तात्या.

प्रमोद देव's picture

25 Mar 2008 - 8:09 am | प्रमोद देव

राजेंद्र कुमार आणि साधना असावी(की मीनाकुमारी?)

संजीव नाईक's picture

25 Mar 2008 - 8:16 am | संजीव नाईक

क्या बात है! आपल्या हाताची कमाल आणि आमच्या तत्याची धमाल...........
संजिव

बेसनलाडू's picture

25 Mar 2008 - 11:44 am | बेसनलाडू

(डोळस)बेसनलाडू

इनोबा म्हणे's picture

25 Mar 2008 - 2:05 pm | इनोबा म्हणे

सुरेख रेखाटन...
आमचीही चित्रे इथे चढवण्याचा मोह आवरत नाही... आपण सामग्री (पेन्सील/पेपर/शेडींग पावडर वगैरे)कोणती वापरता कळेल काय?

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

चतुरंग's picture

25 Mar 2008 - 7:30 pm | चतुरंग

राजेंद्रकुमार आणि बबिता - बहुदा 'अंजाना' सिनेमातली जोडी आहे.

चतुरंग

मुक्तसुनीत's picture

25 Mar 2008 - 7:32 pm | मुक्तसुनीत

नटी नंदा असावीसे वाटते ....

सुरेख रेखाटने !

विसोबा खेचर's picture

25 Mar 2008 - 7:41 pm | विसोबा खेचर

नटी नंदा असावीसे वाटते ....

थोडासा सहमत आहे! थोडी थोडी नंदा वाटते खरी. बाकी मुक्तराव, तुमचे डोळे चांगले तयार आहेत म्हणायचे! :)

असो, अहो वर्षाताई, अहो ती नटी नक्की कोण आहे त्याच एकदा काय तो खुलासा करून टाका की प्लीज. नट तरी तो गधडा राजेंद्रकुमारच आहे ना? तेही सपष्ट करा प्लीज... :)

अवांतर-

बाकी, तरूणपणची भरलेली, रसरसलेली नंदा लै भारी चीज होती तिच्यायला! :)

च्यामारी, ती सुलक्षणा पंडित आणि मुणमुण शेण या दोघीदेखील अस्वस्थ करून टाकायच्या! :)

आपला,
(रसरसलेल्या, मुसमुसलेल्या सौंदर्याचा पागल!) तात्या.

:)

मुक्तसुनीत's picture

25 Mar 2008 - 8:21 pm | मुक्तसुनीत

:-)

चतुरंग's picture

25 Mar 2008 - 9:19 pm | चतुरंग

तात्या, आपली आवड सुध्दा चांगलीच डोळस हं!;)मानलं!!
चतुरंग

वर्षा's picture

25 Mar 2008 - 9:06 pm | वर्षा

सर्वांना धन्यवाद.

बहुतेकांनी राजेंद्रकुमारला बरोबर ओळखलंय.
हिरॉईन मात्र वैजयंतीमाला आहे...:)))
आठवा: संगम....दोस्त दोस्त ना रहा....

इनोबा: रेखाटन Derwent Charcoal medium पेन्सिल, ग्रॅफाईट पेन्सिलने काढलंय.
पावडर शेडींगचा मला अजिबात अनुभव नाही....आपण पावडर शेडींग करता काय? तुमची चित्रे बघायला आवडतील

-वर्षा

विसोबा खेचर's picture

25 Mar 2008 - 9:24 pm | विसोबा खेचर

हिरॉईन मात्र वैजयंतीमाला आहे...:)))
आठवा: संगम....दोस्त दोस्त ना रहा....

हां आत्ता आठवलं आणि पटलं देखील!

आमची वैजूच आहे ती! आधी ओळखू आलं नाही परंतु 'संगम....दोस्त दोस्त ना रहा....' हा संदर्भ दिल्यावर पटलं खरं! धन्यवाद वर्षा...

नंदाचा पत्ता कट तिच्यायला! :)

आपला,
(डोळ्यांसकट संपूर्ण वैजूचा प्रेमी!) तात्या. ;)

इनोबा म्हणे's picture

26 Mar 2008 - 9:38 pm | इनोबा म्हणे

रेखाटन Derwent Charcoal medium पेन्सिल, ग्रॅफाईट पेन्सिलने काढलंय.
पावडर शेडींगचा मला अजिबात अनुभव नाही....आपण पावडर शेडींग करता काय? तुमची चित्रे बघायला आवडतील

ग्रॅफाईट पेन्सिलमुळे डार्कनेस छान येतो,पण मी कधी तितकेसे वापरले नाही.मी शक्यतो एचबी (१ ते ६)च्या पेन्सिल आणि पावडरचाच वापर करतो.
माझी चित्रेही लवकरच चढवतो.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

उदय सप्रे's picture

26 Mar 2008 - 9:11 am | उदय सप्रे

प्रिय वर्षा,

सुरेख आहे रेखाटन !
पण चित्रासकट मिपा वर कसे अपपलोड करायचे जरा सांगाल का प्लीज्?कारण मी पण स्केचिंग करतो आणि मी मधुबालाचा फॅन (नव्हे ए.सी.च....) आहे , त्यावर कविता पण आहे.
उदय सप्रे

चतुरंग's picture

26 Mar 2008 - 9:16 am | चतुरंग

मुख्यपानावर सगळ्यात वरती सगळ्यात उजवीकडे 'वाविप्र' आहे त्यावर टिचकी मार कळेल.
चतुरंग

वर्षा's picture

26 Mar 2008 - 10:40 am | वर्षा

नमस्कार उदय,

चतुरंग यांनी म्हटल्याप्रमाणे 'वाविप्र' मध्ये फोटो कसा चढवावा याबद्दल माहिती आहे.
तुमची स्केचेस जरुर इथे चढवा.
बाकी मीसुद्धा त्या मूर्तिमंत सौंदर्याची चाहती आहे...
तिचं स्केच चढवते आहे लवकरच. :)
-वर्षा