डॉलर, रुपया आणि मी

कौटील्य's picture
कौटील्य in काथ्याकूट
12 Oct 2007 - 1:09 pm
गाभा: 

खरे तर खुप लोकांना रुपयाच्या अवमुल्यनाचा, विनीमय दराचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतो हे समजत नाही. कित्येक जण ते जाणुन पण घेवु इच्छित नाहीत. अर्थव्यवस्था, व्यापार, चलन वगैरे शब्द ऐकल्यावर ते घाबरतात किंवा आपली शिक्षणव्यवस्थाच इतकी भुक्कड आहे कि या गोष्टींचा कुणी विचारच करु नये अशी तजवीज करण्यात आलेली दिसते.

थोडेसे गणिताचा आधार घेवुन आपण बघुया आपल्याला काही समजते का‍?

समजा आपण गृहीत धरुया की, १ डोलर म्हणजे ५०० रुपये

या परिस्थितीत जवळ जवळ सर्वच गोष्टी निर्यात केल्या जातील. कारण निर्यात अतिशय फायदेशीर राहील. सर्वसामान्य माणसांना काहिच उपलब्ध होणार नाही. अगदी भाजीपाल्या पासुन चैनीच्या वस्तु अतिशय महाग होतील. अशा परिस्थितीत १ लिटर पेट्रोल ५००-७०० रुपयांच्यापेक्षा अधिक किमतीला पोहोचेल तर एक ग्राम सोने घेणे म्हणजे जीवावर बेतेल.

आपल्या जवळिल सर्व साधनसामुग्री आपण निर्यात करु तसेच आपले सर्व मनुष्यबळ हे अमेरिकेची (किंवा तत्सम इतर कोणत्याही देशाची) सेवा करीत असेल. त्यांच्या सुखसोयींसाठी आपण झटत असतांना ते आपल्याला डोलर्स देतील. कमी पडल्यास छापुन देतील. थोडक्यात जुन्या काळातील गुलामगिरीच कारण आपण काही त्यांच्याप्रमाणे समृद्ध ( लक्षात घ्या मी समृद्ध म्हणतोय पैसेवाले नाही) होवुच शकत नाही कारण आलेला सर्व पैसा खर्च होवुन जातो.

याचे आपण जर नीट विचार केला तर पुणे व बंगलोर या शहरांनी काय कमावले व काय गमावले याचा लेखाजोखा मांडला तर सुज्ञ माणसाच्या सहज लक्षात येइल. पैसे येतात पण समृद्धी, श्रीमंती दुर जाते. नुसताच पैशाचा नंगानाच. मी नैतिक अधःपतन (विवाहबाह्य, व्यावसायिक, सामाजिक, कौटुंबिक, वैयक्तिक इत्यादी) यांच्याबद्दल सवडीने लिहील, पण याबद्दल तुम्हाला माहिती नाही असे मला वाटत नाही. ब-याच आयटी मधील तथाकथित कंपन्या कमी माणसे प्रोजेक्ट वर दाखवुन प्रत्यक्षात जास्त माणसे राबवुन वेळेवर कामे केल्याचा आव आणतात तर काही कमी माणसे ठेवुन जास्त माणसांचा मेहनताना घेतात. हे सुद्धा एक प्रकारचे अधःपतनच होय. असो.

आता आपण दुसरी बाजु तपासुया.

आपण असे समजु की, १ डोलर म्हणजे १ रुपया !

आता आपण निर्यात करण्यापेक्षा आयातच करणार.
कारण साहजिकच आहे १ लिटर पेट्रोल १ रुपयापेक्षा स्वस्त
१ तोळे सोने १०० रुपयापेक्षा कमी पैशात
२५० रुपयात संगणक तर २००० रुपयापेक्षा कमी खर्चात अमेरिका जावुन येवुन खावुन पिवुन! वा!

पण आता तुम्ही काहीच निर्यात करु शकत नाही. हो पण जर तुमचे उत्पादन, तुम्ही देत असलेली सेवासुविधा जर अत्युत्कृष्ट दर्जाची असेल तर मात्र तुम्ही काहीही करु शकता. लक्षात घ्या तुम्ही म्हणाल ती पुर्व होवु शकते.

अमेरीका खुप गोष्टी आयात करते. अगदी वेड्यासारखी आयात करते. त्यांच्या आयात निर्यातीतील फरक खुप मोठा आहे. सर्व जगाला export oriented economy निर्यातीभिमुख अर्थव्यवस्थेचे डोस पाजणारी अमेरीका व अमेरीकन अर्थशास्त्रज्ञ ह्याबाबतीत मुग गिळुन गप्प बसतात कारण हा सर्व त्यांनी जगाला फसविण्यासाठी केलेला एक अतिशय थंड डोक्याने केलेला कावा आहे. सर्व जगाला सांगुन की एक्स्पोर्ट मुळे तुमची इकोनोमी सुधरेल. तुमच्या लोकांची स्थिती सुधारेल वगैरे वगैरे.

पण नीट विचार केला तर असे दिसते की हे सर्व साधनसामुग्री, मनुष्यबळ स्वस्तात अमेरिकेला मिळाले त्यामुळे ते श्रीमंत झाले. असे वर्षानुवर्षे केले गेले. त्यांचे जीवनमान समृध्द झाले. आणि आपले ? विषमतेची दरी, बिघडलेली तरुण पिढी, माजलेले नवश्रीमंत आणि देखभाल करणारे कुणीही नसल्याने एकाकी आयुष्य कंठणारे वृद्ध !

स्वस्त आयातीमुळे लोकांचे जीवनमान सुधारते. निर्यातदारांना त्यांच्या कामात गुणवत्ता आणावी लागते, जे केवळ चलन फरकावर जगतात ते नामशेष होतात.

आपण केवळ कापड, खनिज, अशा पदार्थांच्या निर्यातीवर अवलंबुन न रहाता ही नैसर्गिक संपत्ती आपल्या लोकांसाठी ठेवुन संगणक आज्ञाप्रणाली विकसन इत्यादी गोष्टीच फक्त निर्यात कराव्या. रुपयाचे मुल्य काही झाले तरी संगणक आज्ञाप्रणाली विकसन क्षेत्राला कमी धक्का लागेल कारण उपलब्ध पर्याय कमी आहेत. बीपीओ, कोल सेंटर ची आपण काळजी करु नये.

रोज वडापाव खावुन भुक भागविणा-या बांधवांना एकवेळचे का होइना पोटभर मिळावे ....
समृद्ध जीवन सर्वांना मिळावे....
बिघडलेले कौटुंबिक स्वास्थ्य परत मिळावे....
सर्वसामान्यांचे आयुष्य चांगले व्हावे असे वाटत असेल तर..... १ डोलर = १ रुपयाला पर्याय नाही.

माझी वैयक्तिक इच्छा ५० डोलर = १रुपया

जय हिंद

प्रतिक्रिया

लबाड बोका's picture

12 Oct 2007 - 5:55 pm | लबाड बोका

>>>माझी वैयक्तिक इच्छा ५० डोलर = १रुपया

माझी पण....

बोका

सृष्टीलावण्या's picture

24 Mar 2008 - 10:09 pm | सृष्टीलावण्या

माझी वैयक्तिक इच्छा ५० डोलर = १रुपया

हे कदाचित् नजीकच्या भविष्यात होईल ही पण तो पर्यंत ५० युआन = १ भारतीय रुपया नाही झाला म्हणजे मिळवले. हा चीनी राक्षस लोकांना गिळायलाच टपून बसला आहे. तो त्यासाठी सगळ्या नीतीनियमांना धाब्यावर बसवायला तयार आहे.

सध्याचा युआनचा विनिमय दर :

1 US dollar = 7.5 yuan

>
>
मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

yogesh's picture

17 Oct 2007 - 4:53 pm | yogesh

हे विश्वचि माझे घर

आनंतफंदी

>>डॉलर, रुपया आणि मी
>>आपण जर नीट विचार केला तर पुणे व बंगलोर या शहरांनी काय कमावले व काय गमावले याचा लेखाजोखा मांडला
>>हा सर्व त्यांनी जगाला फसविण्यासाठी केलेला एक अतिशय थंड डोक्याने केलेला कावा आहे. (हे जरा खूपच जड जातय पचायला जवळजवळ नामशेष झालेले जपान व जर्मनी दुसर्‍या महायुद्धानंतर इतके प्रचंड श्रीमंत कसे झाले? ब्रिटन, फ्रांस, रशिया का मुकाट बसले? तसेच मग चीन ने ह्यावर कशी मात दिली अमेरिकेला?)

विषयाच्या नावावरून मला ह्या बाबत खूप इंटरेस्ट आहे व आपल्याकडून अजून माहीती आवडेल. तुम्ही हा विषय जरा लेख माला (भाग १, भाग २..) करून, अजून सोपा करून मांडलात तर लोकांना समजेल व अजून प्रतिसाद येतील.

मला आवडेल भारताची व जगाची अर्थव्यवस्था, डॉलरचे महत्व, समाजावर होणारा परिणाम, तुमचे विश्लेषण हे जरा अजून एकेक मुद्दा घेऊन लिहा. खात्री आहे की सगळ्यांना वाचायला आवडेल.

>>जे केवळ चलन फरकावर जगतात ते नामशेष होतात.
मनी चेंजर म्हणजे एक परकीय चलन खरेदी विक्री मधे चांगला पैसा आहे हो. :-)

परत एकदा विनंती ह्या महत्वाच्या विषयावर अजून लेखन करा.

>>रुपयाचे मुल्य काही झाले तरी संगणक आज्ञाप्रणाली विकसन क्षेत्राला कमी धक्का लागेल कारण उपलब्ध पर्याय कमी आहेत

हे विधान चुकिचे आहे. जर रुपयाचे मुल्य वाढ्ले आणि संगणक आज्ञाप्रणाली चा दर्जा तेवढा सुधारला नाहि तर बाकिचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. बाकिचे देश सोडा, खुद्द अमेरिकेतले प्रोग्राम्मेर्स भारतापेक्षा स्वस्त होतिल. भारतातल्या प्रोग्रामर्स बद्दल अभिमान बाळगताना जगात इतरत्र काय चालल आहे या बद्दल गाफिल राहु नका. पुर्व युरोप, फिलिपिन्स असे अनेक प्रदेश हे उत्तम पर्याय आहेत.

>>सर्व जगाला export oriented economy निर्यातीभिमुख अर्थव्यवस्थेचे डोस पाजणारी अमेरीका व अमेरीकन अर्थशास्त्रज्ञ ह्याबाबतीत मुग गिळुन गप्प बसतात कारण हा सर्व त्यांनी जगाला फसविण्यासाठी केलेला एक अतिशय थंड डोक्याने केलेला कावा आहे.

अमेरिकेतिल अर्थशास्त्रध्न्यांचि गेलि काहि वर्षे झोप उडालि आहे. अर्थव्यवस्थेतल्या त्रुटिचा बोजा उचलण्यासाठि त्याना चिन, कोरिया, जपान ह्या देशांच्या केंद्रिय वित्तसंस्थांचि मदत लागते आहे. हि मदत जर कमि झालि तर त्याचे गंभिर परिणाम होतिल. यामुळेच अम्एरिकेच्या चलनाचे अवमुल्यन होत आहे.

मीनल's picture

25 Mar 2008 - 1:51 am | मीनल

एखद्या वस्तूची किंमत ही मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असण्याच्या अर्थशास्त्राच्या थिअरीज सर्वसाधारणतः मान्य आहेत.
मागणी पुरवठ्या पेक्षा जास्त असेल तर वस्तूची किंमत जास्त.
मागणी आणि पुरवठा हे किंमतीवर परिणाम करणारे प्रत्यक्ष घटक.
मागणी वर परिणाम करणारे घटक उदा: जाहिराती ,आवड ,निवड ,सण वार ,हवामान्,आवक,आर्थिक वस्तूचा दर्जा ,विभागणी वगैरे.
पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक उत्पादन क्षमता ,खर्च, उत्पादकाला विक्रीची ,पैश्याची असलेली आवश्यकता वगैरे.

डॉलरची किंमत कोण ठरवते ते पहा.
मागणी आणि पुरवठा !त्यांचे बाकिचे घटक अप्रत्यक्षपणे काम करतात.

भारतात तेच लागू होते.अजूनही डॉलरची मागणी जास्त.त्यामानाने डॉलरचा पुरवठा कमी.म्हणजे तो जाणून बूजून कमी ठेवला आहे.

अमेरिकेत आयात होते पण त्यावर निर्बंध आहेत.क्वालिटी आणि क्वांटिटि!
आणि म्हणूनच ती लेची पेची का होईना ,उभी आहे.

चीन या देशात ती थिअरी लागू होत नाही.
देश ठरवतो की आम्ही ७ युआन देऊ.घेणार असाल तर घ्या नाहे तर चालते व्हा.
अमेरीका म्हणते ``ठिक ठिक्.पण मला तू निर्यात कर.माझ्याकडे काहीच नाही तू देतेस ते .आणि मी अवलंबून आही तुझ्या वर.``

चीन ``नाही देत जा `` अस कधीहीम्हणणार नाही कारण export oriented economy चे फायदे त्यांनी अनुभवले आहेत.
निर्यातीशिवाय चीन जगू शकणार नाही.
चीन काय कोणताच देश .
कारण काही न काही हे आयात करावे लागते जे आपल्या कडे नाही.

भारत हा सेल्फ सफिशिअंट होता.पण आता नाही.
निर्यातीत अग्रसर होता.आता नाही.

जर `५० डोलर = १रुपया` हवे असेल तर अर्थशास्त्राच्या थिअरीप्रमाणे पुरवठा कमी करावा.
मग तो हापूस आंबा असो की संगणक किंवा कुठल्याही सेवा.
अमेरिकेला जर ती वस्तू ,सेवा हवी असेल तर आपला भाव वधारेल आणि रूपयाची किंमत वाठेल.
ते करणे इतके सोपे नाही कारण इतरही आशियाई देश स्पर्धेत आहेत.त्यांनी ती वस्तू ,सेवा अमेरिकेला दिली की --
की मग काय ?
बसा बोंबलत!
आहे ती ही निर्यात नाही.

पण मग आपण स्पेशल हवे.उत्तम दर्जा हवा.
असा की कुणीही आजूबाजूला फिरकू शकणार नाहे.

मला वाटत की भारताकडे आहे ती स्पेशालिटी.

पण मार्केटींग नाही,
स्वार्थ आहे म्हणून लाचारी आहे,
देशांतर्गत अनेक प्रश्न ,अडचणी आहेत.

सर्वच कस कठिण वाटतय!
Unmanagable!!

जर `५० डोलर = १रुपया` हवे असेल तर अर्थशास्त्राच्या थिअरीप्रमाणे पुरवठा कमी करावा.
हे जरा पचायला अवघड आहे.
तुम्ही पुरवठा कमी केला तर् कालांतराने मागणीही कमी होते .कारण त्या वस्तुला पर्याय उपलब्ध होतात.
उदा: हापूस आंबा नाही मिळाला तर त्याला पर्याय्..........मलेशिअयन दुरीयान फणस असु शकतो.( भारतात आपण देशातच पण ईतर प्रांतात होणारे आंबे किती खातो......हापूस नाही मिळाला तर देशी रायवळ्ही चालतोच ना!)
शिवाय हलीच्या जगात तुम्ही पुरवठा कमी केला तर इतर देश तो करयला पुढे होतात.
जगात मिळत नाही असे काहीच नाही