गाभा:
महाराष्ट्र पोलीस काँग्रेस(आय)चे प्रचारक आहेत काय?
काँग्रेस(आय)चा लोगो हाताचा 'पंजा' आहे.
महाराष्ट्र पोलीस च्या लोगोत पण 'पंजाच' आहे.
असला लोगो हातावर मिरवणारे पोलीस निवडणूक आयोगाच्या 'आदर्श ??' आचारसंहीतेत चालतात का?
अवांतरः महाराष्ट्र पोलीस चा लोगो कधी डिझाईन करण्यात आला? काँग्रेस(आय)च्या अधिपत्याच्या काळातच झाला असेल.
अतिअवांतरः हा लोगो बदलायचा झाला तर एखादा बांबू, काठी किंवा लाच मागायला लागणारा आडवा हात असला लोगो ठेवावा काय?
प्रतिक्रिया
16 Oct 2009 - 10:37 am | योगी९००
महाराष्ट्र पोलीस च्या लोगोत पण 'पंजाच' आहे.
पोलीसांच्या लोगोमधले मधले बोट जरा जास्तच ठळक आहे.
खादाडमाऊ
16 Oct 2009 - 10:44 am | धमाल मुलगा
=)) =)) =)) =))
अर्थात लोगो सगळंच समजाऊन सांगतो तर. ;)
16 Oct 2009 - 10:46 am | सखाराम_गटणे™
खल्लास
----
नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
16 Oct 2009 - 8:10 pm | पाषाणभेद
लय बारीक बघु र्हायले राव तुमी.
आन त्यो पंजाबी गब्रू पोलीसाचा दिसुं र्हायलाय जनू!
16 Oct 2009 - 11:17 am | पाषाणभेद
वरील लेखात मी पोलिसांचा लोगो हा सकाळच्या ह्या बातमीतून घेतला होता.
आता अचानक एकाएकी माझ्या कॉंम्पूटर वरून सकाळची साईटच दिसेनाशी झालीये. त्यांना राग आला म्हणून माझा आयपी ब्लॉक केला की काय? की येथे असलेल्या सकाळच्या लोकांनी ती बातमी / लोगो काढला की काय?
असो. त्यांनी काढला काय किंवा कसे आपण फाट्यावर मारतो. ईंटरनेटवर लोगो काय कमी ठिकाणी आहे का?
हा घ्या महाराष्ट्र पोलीसांचा लोगो.
16 Oct 2009 - 9:20 pm | चिरोटा
इंदिरा गांधीनी काँग्रेस फोडली तेव्हा पक्षाचे चिन्ह पंजा नव्हतें.७०च्या दशकापर्यंत पक्षाचे चिन्ह गाय होते.८०च्या दशकाच्या सुरुवातीला चिन्ह पंजा झाले.पोलिस खात्यात राजकारण्यांची हांजी हांजी करणारे अधिकारी बरेच असले तरी त्यांची चिन्ह बदलण्यापर्यंत मजल जाईल असे वाटत नाही."Largest democratic party" हे वाचुन मजा वाटली.
दोन्ही पंजांमध्ये महत्वाचा फरक आहे. काँग्रेसच्या पंजावर हस्तरेषा आहेत तर पोलिसांच्या पंजावर हस्तरेषाच नाहीत्.म्हणजे पोलिसाना भूत्/वर्तमान्/भविष्य काळ्च नाही की काय? की निरपराध लोकांवर सारखा हात पडत असल्याने त्या रेषाच गायब झाल्या?
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
16 Oct 2009 - 10:39 pm | मिसळभोक्ता
७०च्या दशकापर्यंत पक्षाचे चिन्ह गाय होते.
गाय नव्हते, "गाय वासरू" होते.
"गाय वासरू, नका विसरू" अशी घोषणा होती.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)