गाभा:
मी मिसळपावचा मालक झालो/झाले तर...
१) येथे बरेचसे मूलभूत फरक करीन.. (कोणते ते सांगा). आहे ते वातावरण बदलीन आणि मिपा अजून जास्त छान आणि खेळीमेळीचे करीन. (कसे ते सांगा)
२) येथे व्याकरण-शुद्धलेखनाचे कडक नियम करीन..
३) येथील खेळीमेळीचे वातावरण बदलून सभासदांचे चेहेरे सतत बाप मेल्यासारखे कसे राहतील हे पाहीन,
४) येथे सतत मरणाच्या जड आणि दुर्बोध चर्चाच फक्त कश्या होत राहतील हे पाहीन,
५) येईल त्या किंमतीला विकून खाईन..
वगैरे वगैरे वगैरे...
नोंदवा आपापली म्हणणी! :)
तात्या.
प्रतिक्रिया
15 Oct 2009 - 11:25 am | महेश हतोळकर
क्रमशः लेखांना काल मर्यादा घालेन.
15 Oct 2009 - 11:35 am | सुनील
कोणतीही कालमर्यादा नको!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
15 Oct 2009 - 11:55 am | महेश हतोळकर
साला पंचवार्षीक योजना राबवणारा तू. तुला तर सगळ्यात आधी फटके पडले पाहीजेत.
15 Oct 2009 - 11:29 am | अवलिया
मी मिसळपावचा मालक झालो तर मीच मालक आहे असे पन्नास वेळा ओरडुन सांगणार नाही.
वसकन अंगावर ओरडणार नाही.
नियम बनवेल पण त्याची अंमलबजावणी योग्य रितीने करेन.
आवश्यकता पडेल तसे नियम बदलत जाईल वगैरे वगैरे ऽऽ
जावु दे तात्या.. दिवाळीचा फराळ करतो मी मुकाट्याने.. जे आहे ते ठीक आहे.
दिवाळीच्या शुभेच्छा ! :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
15 Oct 2009 - 11:31 am | सखाराम_गटणे™
उत्तम विषय.
१. कंपुबाजी बंद करेन
२. हि & हि लेखण बंद
३. संपादकाच्या निर्मळ वातावरणात निवडणुका घेइन.
४. लोकशाही आणेन.
----
नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
15 Oct 2009 - 11:38 am | विसोबा खेचर
आणि मिपावरील मुलींना हळूच खरडी/व्य नि पाठवणार्यांना कडक शासन करेन ते नाही सांगितलंस रे सख्या! :)
तात्या.
15 Oct 2009 - 11:44 am | छोटा डॉन
व्यनीचं एक ठिक आहे पण त्या खरडी हळुच कश्या पाठवायच्या बॉ ?
आम्ही तर आत्तापर्यंत खरडी हा ओपन बाजार समजत होतो ;)
आता खरडीतही "इनविसीबल मोड ( तेच तेच, त्या आयपी ट्रॅकर सारखा ) " निघाला की काय ? ;)
असो, बाकी आमच्या "मालकपणाचा" सविस्तर प्रतिसाद देतोच जरा सवडीने ... :)
------
( छोटाडॉन.कॉमचा मालक ) छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
15 Oct 2009 - 4:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पण हळूच खवच्यावर मजकूर लावण्याबद्दल काय हो डान्राव? "आम्ही आमच्या अनुष्कात खूष आहोत आणि आमची अनुष्का मिपावर नाही!"
मिपाची मालक झाले तर, सगळ्यात पहिले मंद प्रतिसाद उडवण्यासाठी ऑटोमेटेड आल्गोरिदम टाकेन.
अदिती
15 Oct 2009 - 4:54 pm | दशानन
=))
=))
=))
न बोलून शहाणा ;)
15 Oct 2009 - 6:27 pm | टारझन
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) ठ्ठ्ठ्ठो ठ्ठो ठ्ठ्ठ्ठो ठ्ठो ठ्ठ्ठ्ठो ठ्ठो ठ्ठ्ठ्ठो ठ्ठो ठ्ठ्ठ्ठो ठ्ठो ठ्ठ्ठ्ठो ठ्ठो
मेलो .. हल्ली चे प्रतिसाद वाचून मंद की महामंद असा प्रश्न नाही पडत तुला ?
- तोताराम फुटाणे
15 Oct 2009 - 7:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
"मंद का महामंद?" टार्या, फार व्यक्तीगत होत नाही का हे?
(विपुल चांदण्यादात्री) अदिती
15 Oct 2009 - 7:45 pm | सूहास (not verified)
मंद का महामंद?" टार्या, फार व्यक्तीगत होत नाही का हे? >>>
चुकुन महम्मद वाचले ...असो .....
व्यक्तीगत नाही संपादकीय व्यक्तीगत नाही होत का असे आहे का ?
मालक असो वा संपादक वा वाचक वा लेखक वा कवी वा विडंबनकार ...फक्त कोण कोणास म्हणाले हे लक्षात ठेवावे..
सू हा स...
(http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5111067.cms) नो-बेल ओबामा
16 Oct 2009 - 12:07 am | दिपाली पाटिल
ऑटोमेटेड आल्गोरिदम =)) असे बरेच ऑटोमेटेड आल्गोरिदम्स लिहावे लागतील तुला मग....
दिपाली :)
15 Oct 2009 - 11:48 am | सखाराम_गटणे™
>>आणि मिपावरील मुलींना हळूच खरडी/व्य नि पाठवणार्यांना कडक शासन करेन ते नाही सांगितलंस रे सख्या!
हो, ते तर आहेच. आणि प्रत्येक गोष्टीची पुर्ण चौकशी करेन, उगाच. अधिकाराचा गैरवापर करणार नाही.
----
नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
15 Oct 2009 - 11:40 am | विनायक प्रभू
त्यापेक्षा मी महाराष्ट्राचा गृहमंत्री बनण्याचे प्रसंत करेन.
सोप्पे आहे ते.
15 Oct 2009 - 11:41 am | Nile
मिसळपाववरील पुस्तकी किड्यांना तात्यांच्या फोरासरोडवरील शिकवणीत धाडेन, सर्व खर्च चपला अन चांदण्याकरवी केला जाइल. ;)
15 Oct 2009 - 11:41 am | संजीव नाईक
श्रीमान
आपण आतासुध्दा मिपाचे मालक आहात, कशाला आमच्या वर बंधने घालता, आपणच भालदार आपणच चौपदार. कोणी किती उड्यामारायचे ते आपन योग्य प्रकारे ठरवतात. कशाला नविन मंत्री मंडळ निवडतात.
पुण्याच्या पेशवेची व आपली काल अड्ड्यावर भेट वैगरे झाली का? का तुम्हाला आमचा कंटाळा आला आहे? जरा दरबारी किंवा यमन गा परत मूड येईल.
संजीव
15 Oct 2009 - 11:50 am | पिवळा डांबिस
पण मालक,
तुम्हाला जर खरोखरच स्पष्ट मतं हवी असती तर तुम्ही लोकांना व्यनि पाठवले असतेत!!!!
इथे जाहीर चर्चा करण्यात तुमचा फक्त टीआरपी वाढवण्याचा किंवा भोळसट बकरे पकडण्याचा हेतू असावा असा संशय येतोय!!!!
:)
आमचं चूक ही असेल हां, आम्हाला काय कळतंय?
फक्त शाळा-विद्यापीठांमध्येच दुनियादारी शिकलेला,
पिवळा डांबिस
:)
15 Oct 2009 - 11:53 am | विसोबा खेचर
हा हा हा! :)
15 Oct 2009 - 1:28 pm | टारझन
हॅहॅहॅ डांबिसकाकांशी १००% सहमत =)) =)) =))
एकदम सहि पकडला आहे.
वर एक भोळसट बकरा सापडला पण !! तात्याने गाजर काय दाखवलं ... पब्लिकचं स्वप्नरंजन सुरू =)) =)) =))
नाना चेंगटांचा प्रतिसाद अल्टिमेट =))
बाकी आपल्याला मालक फिलक होण्यात स्वारस्य नाही... झालो तर लगेच शरदिनी ताईंच्या नावावर करून सन्यास घेऊ :)
15 Oct 2009 - 4:57 pm | सखाराम_गटणे™
असतात कोणी भोळसट लोक, कोणी दाणे दाखवले, कि जातात दाण्यापाठीमागे.
----
नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
15 Oct 2009 - 6:11 pm | ब्रिटिश टिंग्या
हॅ हॅ हॅ....
दाणे?
ते "पुणेकर" तुम्हीच का?
16 Oct 2009 - 1:41 am | अनुप कोहळे
दाण्याच्या सोबत पिणे पण येते ना राव....
15 Oct 2009 - 6:15 pm | टारझन
=)) =)) आपला बुद्ध्यांक आम्ही समजत होतो त्यापेक्षा ०.३१४% जास्त आहे की !! भोळसटांनी किमान आता तरी दाण्यापाठी पळावं , म्हणजे बोळा मोकळा होईल आणि पाणी वाहू लागे.
प्रेरणा : मिभो आणि तात्या :)
- (प्रेरणाप्रेमी) टारोबा फिक्सर
15 Oct 2009 - 11:51 am | अवलिया
तात्या, सखाराम गटणे, छोटा डॉन गप्पा मारण्यासाठी खव, व्यनीची सोय दारोदार विमे विकुन आलेल्या घामाच्या पैशातुन केलेली आहे. तिचा वापर करा.
अन्यथा कारवाई होवुन सदस्यत्व रद्द होवु शकते.
(दोन घडीचा मालक) अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
15 Oct 2009 - 12:00 pm | सखाराम_गटणे™
>>(दोन घडीचा मालक) अवलिया
मालक असल्याचा पुरावा दाखव नाहीतर फाट्यावर मारले जाईल.
----
नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
15 Oct 2009 - 12:03 pm | टुकुल
खर खर लिहतो.
१) येथे बरेचसे मूलभूत फरक करीन.. (कोणते ते सांगा). आहे ते वातावरण बदलीन आणि मिपा अजून जास्त छान आणि खेळीमेळीचे करीन. (कसे ते सांगा)
सध्याचा मालक अक्कलीने आणी अनुभवाने खुपच वढचर आहेत, आपण (अस्मादि़क) त्या समोर किस झाड कि पत्ती.
२) येथे व्याकरण-शुद्धलेखनाचे कडक नियम करीन..
फोकंलीचे नियम.. जितके कमी आणि स्पष्ट तेवढे चांगले
३) येथील खेळीमेळीचे वातावरण बदलून सभासदांचे चेहेरे सतत बाप मेल्यासारखे कसे राहतील हे पाहीन,
एक बाप एकदाच मरतो, त्यामुळे एकदाच चेहरा तसा करणे चांगले.
४) येथे सतत मरणाच्या जड आणि दुर्बोध चर्चाच फक्त कश्या होत राहतील हे पाहीन,
लोकांना अजीर्ण, बध्दकोष्ट सारखे पोटाचे आजार आहेत.. आता डोक्याचे नकोत.
५) येईल त्या किंमतीला विकून खाईन..
विकणारे काहीही विकुन खातात, आपण (मि आणी तुम्ही) त्यातले नाहीत, त्यामुळे हा प्रश्न विसरा...
एकंदरीत सर्व नीट वाटत आहे, अवलिया शी थोडाफार सहमत आहे.
मिपाप्रेमी,
टुकुल
15 Oct 2009 - 12:06 pm | पर्नल नेने मराठे
मी मिसळपावची मालकीण झाले तर...
मी आम्हा मुलींसाठी (मी गेले १० वर्शे फक्त १८) ;;) सौन्दर्य, आरोग्य, फॅशन असे धागे काढायला प्रोत्साहन देइन.
चुचु
15 Oct 2009 - 12:57 pm | विंजिनेर
आणि "चंपूवहिनीचा सल्ला" इ. अती मनोरंजक सदरे चालू करीन..
किराणा भुसार मालाच्या दुकांनाना फुकट जाहिराती लावायची परवानगी देईन इ. इ. =)) =))
15 Oct 2009 - 1:31 pm | पर्नल नेने मराठे
:D
चुचु
16 Apr 2010 - 1:44 pm | चित्रगुप्त
..आणि "चंपूवहिनीचा सल्ला" इ. अती मनोरंजक सदरे चालू करीन........
करा बुवा हे सदर चालू लवकरात लवकर.....
15 Oct 2009 - 12:10 pm | प्रशांत उदय मनोहर
कशाला? जगू द्या की आम्हाला(आम्ही म्हणजे मी) आणि मिपाकरांना. ;)
सध्या आहे हे व्यवस्थापन उत्तम आहे. चुकून झालोच मालक, तर सध्यासारखंच खेळीमेळीचं वातावरण कायम ठेवण्याचा प्रयत्न करेन. :)
आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
15 Oct 2009 - 12:14 pm | Dhananjay Borgaonkar
झाल..म्हणजे मिसळ्पावची ग्रुहशोभिका व्हायल वेळ लागणार नाही.
तात्या..मालकीण नको..मालकच बरा..
च्यायला घरचा राग निदान इथे तरी काढता येतो..
इथल्या मालकिणीचा राग कोणावर काढणार??
15 Oct 2009 - 4:21 pm | सखाराम_गटणे™
अजुन काही प्रकल्प.
१. सन्स्क्रुतमधील अपशब्द
२. मिपावरील (अनुमतीयुक्त)शिव्यांचा कोष
३. इ. इ.
----
नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
15 Oct 2009 - 4:42 pm | llपुण्याचे पेशवेll
मी मिपाचा मालक झालो तर प्रत्येक नव्या सदस्याला सदस्यत्व मिळतानाच चपलांचा जोड भेट देईन.
"तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे | तुझे गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे !""
या फूटर च्या खालती अजून
"पटत असेल तर थांबवा नाहीतर चपला घालून जाऊ दे"
ही पण ओळ अॅड करेन
पण हां शिव्या वगैरे सोडून बाकी काही संपादन करणार नाही आणि शिव्याही लिहीणार नाही. बा**ला भां*द पाहीजे कशाला लफडं. ओह सॉरी सॉरी सवय हो सवय.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
15 Oct 2009 - 4:46 pm | मदनबाण
पेशवे,,, अगदी मनातला प्रतिसाद लिहलात हो... ;)
मदनबाण.....
सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |
15 Oct 2009 - 11:50 pm | दिपाली पाटिल
>>"पटत असेल तर थांबवा नाहीतर चपला घालून जाऊ दे"
मस्त प्रतिसाद.... पण पटत असेल तर काय थांबवायचं? लिहीणं थांबवायचं की इकडे येणं थांबायचं??
दिपाली :D
18 Oct 2009 - 10:17 am | सुधीर काळे
बरोबर "शालजोडी"ही द्या!
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
18 Oct 2009 - 10:21 am | सुधीर काळे
या बाबतीत पेशव्यांशी एकमत बा**ला भां*द
सध्या फक्त "हर, हर" असं लिहितो!
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
15 Oct 2009 - 4:52 pm | संजीव नाईक
llपुण्याचे पेशवेll
Since 1984 ची उतरली नाही वाटते. थांबा स्वामी मठात जात आहे. वसई तील वसराळी येथे; त्यांची कुपा दुष्टी करण्यास सांगतो. मघ बघा कसे रागात बघतील ते
कुपाळू संज्जन आम्ही भक्त जन | घ्यावे मज ज्ञान लिव्हायाचे ||
संजीव
15 Oct 2009 - 5:48 pm | सूहास (not verified)
मी मिसळपावचा मालक झालो/झाले तर...तर..तर...
आधी तर मी आवडत्या स्त्री बरोबर दोन - पेग घेईन ,नंतर पानाचा तोबरा भरेन ,त्यानंतर जो जास्त वेडझव दिसेल त्याला चपलाघालायला लावुन विवक्षीत ठिकाणी फाट्यावर मारेन.
सू हा स...
(http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5111067.cms) नो-बेल ओबामा
15 Oct 2009 - 6:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेख आणि प्रतिसादांना अनुमतीची प्रतिक्षा करायला लावीन. :D
-दिलीप बिरुटे
(प्रशासक)
15 Oct 2009 - 6:22 pm | टारझन
थोडक्यात मिपाचं मनोगत करणार तर :)
टि.आर.पी. आटलाच म्हणून समजा !!
- प्रा.डो. टोयोटा
15 Oct 2009 - 6:15 pm | विकास
मी जर मिपा मालक झालो तर बाकी सगळे चिडवतील:"कसा तात्या झाला!", असे वाटून काळजी वाटते आणि पुढचे विचार करवत नाहीत! ;)
बाकी "चोराच्या हातात तोजोरीच्या चाव्या दिल्यास" जसे चोरावर (झक मारत) जबाबदारी येते तसेच काहीसे होईल असे वाटते. :)
15 Oct 2009 - 6:17 pm | वेताळ
आपल्याला मालक होण्यात काही एक स्वारस्थ नाही.
वेताळ
15 Oct 2009 - 7:35 pm | अजुन कच्चाच आहे
मालक म्हन्जे काय रे भाउ ?
.................
अजून कच्चाच आहे.
15 Oct 2009 - 10:58 pm | संजीव नाईक
श्रीमंत तात्या साहेब आणि श्रीमंत प्रमोद देव साहेब
आपली विचार सरणी मिपाची ब्रेअब्रु करत आहे. इतत्या निच पातळीवर मिपा परिवार जाणार असेल तर हि साईट बंद करा. आपणास असे लाजीरवाणे बोलणे कसे शोभते किंवा कसे ऐकवीते. आपण स्व:ताला एक पुण्यतील सामाजीक संस्थेत कार्यरत सभासद म्हणुन म्हणता. आणि आपल्या मिपावर अशा नालायक गोष्टीना आपण प्रोसाहन देता लाज नाही वाटत.
लावणी व तमासा करण्यार्या कलाकार सुध्दा आपली अब्रु जपतात आणि तुम्ही. आपणास काय मिपा काडुन महान राज्य कार्यकर्त समजातात का? बोला आता डॉ. प्रदिप बारुटे , llपुण्याचे पेशवेll,विकास,सूहास,मदनबाण,सखाराम_गटणे™ ,पर्नल नेने मराठे,टारझन
अशा मजकुराचा किंवा दोन अर्थाचा मजकुर आपल्य पत्नीने किंवा बहिणीने वाचला तर काय वाटेल. आपण स्पष्टीकरण करा व हि साईट सुध्दा आपल्या पत्नीला व बहिणीला दाखवा व त्याचे मत मिपावर लिहा. शुध्दालेखनातिल चुका शोधन्या पेक्षा स्वताची चुक सुधारा.
संजीव
16 Oct 2009 - 12:19 am | टारझन
१. डॉ. प्रदिप बारुटे कोण ? हे कळले नाही ... कोण आहेत रे ते ?
२. एवढी उद्विग्नता कशाला ? जरा लिंब पिळल्यालं सरबत प्या !
३. दादा कोंडकेंचे सिनेमे कधीतरी घरात पाहिलेच असतील ना ? की नाही ?
४. येथे कोदा सोडला तर सगळे प्रौढ आहेत. आणि कोणी एवढी पातळी सोडून लिहीतो ?
५. शिवाय तात्या म्हणतोच की .. पटलं नाही तर चपला घाला न चालू पडा :) आता ज्यांना माहित आहे की आपल्या घरातल्या स्त्री सदस्यांना (ज्यांनी पहायची दुर दुर शक्यता नाही) उचकून असल्या गोष्टी दाखवा? कैच्याकै !
असो .. आपले वैयक्तिक विचारांविषयी काही आक्षेप नाही , ते तुमचे विचार (जे तुम्ही तुमच्यापाशीच ठेवावेत) पण मिपा बंद करा वगैरे सांगणारे आपण कोण तुर्रम खान ?
कृपया थोडं स्पष्ट लिहीलंय स्वभावाप्रमाणे , राग मानु नये (मानला तरी हरकत नाही )
- (हिण आणि हिणकस) टारझन
आम्ही लिहीतो ते असे , ज्यांचे माणसिक वय १८ पेक्षा खाली आहे, त्यांनी आमचे लेख/प्रतिसाद वाचू नयेत , मॅटर खतम
16 Oct 2009 - 7:40 am | सखाराम_गटणे™
येथे मिसळपाव विकण्याच्या चर्चा चालु आहेत. कोणताही सदस्य स्वतःला विकत नाही. तुम्ही असे काही बोलता आहात की मिपा सदस्य स्वतःला विकत आहेत.
----
नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
16 Oct 2009 - 8:51 am | प्रमोद देव
अरे बाबा संजीवा, तुझ्यासारखाच एक सर्वसामान्य सभासद आहे मी इथला. तेव्हा इथे काय असावे आणि काय नसावे....ह्यावर मी काय बोलणार? जे काही तुला सांगायचे असेल ते तू तात्याला सांग. तोच मिपाचा मालक,चालक आणि कर्ताधर्ता आहे. तात्याच्या शब्दात सांगायचे तर.......राहायचे असेल तर राहा नाही तर चपला घालून चालू पडा....इतका ’स्पष्ट’ सल्ला त्याने दिलेला असताना अजून काही बोलण्याची जरूरी आहे काय?
आपल्याला जे आवडेल ते लिहावे-वाचावे,जमल्यास प्रतिसाद द्यावा आणि जे आवडणार नाही त्याकडे काणाडोळा करावा....हे माझे धोरण आहे. मी ह्यापेक्षा जास्त काही करू शकत नाही आणि मला तेवढा वेळही नाही.
16 Oct 2009 - 8:55 am | दशानन
+१
एकदम मनातील बोललात बघा देवा !
16 Oct 2009 - 12:05 pm | कवटी
आपण वरती नकळत भोळसट बकरा झालो या फ्रस्ट्रेशन कम चिडचिड यांचे अपत्य आहे का ही प्रतिक्रीया?
कवटी
16 Oct 2009 - 12:56 pm | विसोबा खेचर
ओ नाईकसाहेब, लाज कुणाची काढताय? काय बरळता आहात??
माहीत नाही!
बांधील नाही!
हा हुकूम सोडणारे तुम्ही कोण??
विचारले नसताना सल्ले देऊ नयेत..
ही साईट आहे ही अशी आहे. पटलं तर इथे र्हावा नायतर चालू पडा..
तात्या.
18 Oct 2009 - 12:14 am | घोडीवाले वैद्य
तात्या फारच थेट प्रतिक्रिया आहे ही.
मिपाचा केसरी होणार वाटतं.
या दैनिकाच्या व्यवस्थापनानेही असाच ताठपणा (माज) केला होता.
कधीकाळी पुण्यात एक नंबर असणारं हे दैनिक आता टिळकांचे नाव आहे म्हणून निघते आहे.
मिपाचा केसरी होऊ नये
अशी इच्छा बाळगणारा
घोडीवाले वैद्य (कोल्हापूरकर)
18 Oct 2009 - 12:20 am | घोडीवाले वैद्य
तात्या फारच थेट प्रतिक्रिया आहे ही
मिपाचा केसरी होणार वाटतं.
या दैनिकातील लोकांनी कधीकाळी असाच ताठपणा (माज) केला होता.
पुण्यात एक नंबर असणारे हे दैनिक आता
काढतात म्हणून निघते आहे
नाइक यांच्या मताशी सहमत
मिपाचा केसरी होऊ नये
- घोडीवाले वैद्य (कोल्हापूरकर)
18 Oct 2009 - 12:46 am | विसोबा खेचर
चालेल तितके दिवस चालेल, नायतर केसरी होईल. फिकीर नाही...!
काळजी वाटल्याबद्दल आभार..
तात्या टिळक.
18 Oct 2009 - 10:38 am | सुधीर काळे
अहो तात्यासाहेब, आपण विचारलेत म्हणूनच लोक सल्ला देताहेत हे विसरू नये.
आणि मला असे वाटते कीं सगळ्यांचे सगळे सल्ले येईपर्यांत आपण थांबावे व शेवटी समारोप करताना, आपला निर्णय देताना आपले विचार एकदाच प्रकट करावेत. असा मधे-मधे सज्जड दम मारल्यास लिहिणारे निरुत्साही होतात.
मिपा आहे त्यापेक्षा चांगला कसा करावा यासाठी आपणच मते/सल्ले मागविले आहेत, तर कांही फुलांचे गुच्छ, कांही जोडे (शालजोडीसह किंवा शालजोडीविना) येणारच. तरी वाईट वाटून घेऊ नये.
शेवटी एक मुद्दा एक नवा सभासद म्हणून लिहितो. असला फोरम त्याचा मालक कोण आहे यापेक्षा सभासादांची काय प्रत (profile) आहे यावर लोकप्रिय होतो किंवा त्याचा डब्बा होतो. कांहीं माननीय अपवाद वगळता मला इथे फारच उच्च दर्जाचे लोक नवे मित्र/नव्या मैत्रिणी या नात्याने खूप मोठ्या प्रमाणात भेटले. त्यातल्या कांहीं लोकाचे उमदे व्यक्तिमत्व मला इतके आवडले कीं मी इथून त्यांच्याशी फोनेवरही बोललो! यातच तुमची पुण्याई आहे.
कांहीं गोष्टी सुधारण्यासारख्या जरूर आहेत (ज्या मी इतरत्र दिल्या आहेतच व एक व्य. नि. वर पाठवेन), पण सर्वसाधारणपणे हा फोरम आपण झकास चालवला आहे.
तो आणखी सुधारावा या कळकळीने आपण हा मतप्रदर्शनाचा घाट घातला आहे, म्हणून सर्वांची मतप्रदर्शने संपेपर्यंत आपण कुणालाही झापून निरुत्साही करू नये असा (केवळ वयाचा 'गैरवापर' करत) सल्ला आहे.
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
18 Oct 2009 - 11:13 am | अवलिया
काही नाही, ट्याग बंद केला... चालु द्या ! :)
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
18 Oct 2009 - 4:18 pm | अन्वय
काळेंशी सहमत
हेच म्हणतो़, पण तात्याच ते
ऐकणार थोडेच आहेत कुणाचं...
असो चर्चा मात्र चांगलीच रंगलीय
चालू द्यात
16 Oct 2009 - 10:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अरे बाप रे, पर्नलची पत्नी!! संतापाच्या भरात बाईचा बाप्या बनवलात का सरळमार्गी वळण? ;-)
असो. माझी एक मुलगी/बाई/स्त्री इ.इ. असले तरीही मित्र-मैत्रिणींमधे आणि/किंवा आंतरजालावरच माफक थट्टा मस्करीला अजिबात ना नाही. आणि इतरांच्या नसलेल्या चुका काढण्यापेक्षा चुका (म्हणजे पालेभाजी हो) खा आणि थोडे डोळे उघडा! उघड्या डोळ्यांनी आणि स्वच्छ नजरेने सगळ्या बाजूंना पहा! सगळं स्वच्छ दिसेल, लिहून ठेवत आहे.
अदिती
18 Oct 2009 - 12:23 am | घोडीवाले वैद्य
हल्लीच्या बायका ना....
काय करावं त्यांना?
18 Oct 2009 - 9:01 am | हैयो हैयैयो
कळले नाही.
माझी एक मुलगी असू शकते. बाई किंवा स्त्री कशीकाय असेल?
क्षमा करा, मी मराठी शिकतो आहे.
हैयो हैयैयो!
18 Oct 2009 - 9:24 am | प्रमोद देव
माझी एक मुलगी/बाई/स्त्री इ.इ. असले तरीही...
माझी, (मी)एक मुलगी/बाई/स्त्री इ.इ. असले तरीही....हरकत नाही.....
अजून स्पष्ट करून...
माझी हरकत नाही.....मी स्वतः एक मुलगी/बाई/स्त्री इ.ई. असले तरीही.
असा त्याचा अर्थ आहे. :)
हैयय्यो,कळलं का आता?
19 Oct 2009 - 12:40 pm | हैयो हैयैयो
हो.
कठिण आहे म्हणायचे!
हैयो हैयैयो!
20 Oct 2009 - 2:26 am | पिवळा डांबिस
१. माझी एक मुलगी असू शकते...
२. माझी एक बाई असू शकते....
(बघा विचार करून असू शकते की नाही!!!:))
आणि
३. माझी एक (आवडती) स्त्री ही असू शकते...
(हे तर इथे मिपावरच शिकलोय की आपण!!!!:))
14 Apr 2010 - 8:32 am | II विकास II
>>३. माझी एक (आवडती) स्त्री ही असू शकते...
एकच का??/
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
18 Oct 2009 - 11:05 am | बाकरवडी
=)) =)) =))
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
16 Oct 2009 - 8:43 am | पाषाणभेद
मी 'मालक' असलेला नविन संकेताक्षर निवडेन व नेहमीसाठी वेगळा संकेताक्षर ठेवेन जेणेकरून इतरांना समजेल की मी कोण बोलतोय ते.
असलेच नावे संपादकांनापण ठेवायला सांगेन. लोकांची प्रतिक्रिया देतांना गल्लत होणार नाही.
वातावरण असेलेच राहू देईल.
16 Oct 2009 - 9:37 am | Dhananjay Borgaonkar
नाईक साहेब आहो कशाला एवढा त्रागा करुन घेताय..
ईथल्या महिला सभासदांना सुद्धा तुम्ही म्हणताय ते मान्य नाहीये.
आणी लिमिट मधे राहुन थोडा हसी मजाक झालाच पाहिजे..
तुमच्या घरी तात्या अ़क्षता घेऊन आलेले का हो मिसळ्पाव चा सभासद हो म्हणुन सांगायला??? :)
16 Oct 2009 - 9:44 am | अमोल केळकर
' संपादकीय सदर ' परत चालू करेन
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
17 Oct 2009 - 12:04 am | मी-सौरभ
मी प्रत्येक सभासदाचा फोटो टाकायची सोय करेन.
सौरभ
17 Oct 2009 - 8:55 am | हैयो हैयैयो
ह्या संकेतदळाचा तमिळभाषिक अवतार काढेन.
मी मालक झालो तर ह्या संकेतदळाचा तमिळभाषिक अवतार काढेन.
हैयो हैयैयो!
17 Oct 2009 - 4:12 pm | निमीत्त मात्र
मी मालक झालो तर आधी आहे ते संपादक मंडळ बरखास्त करुन सगळी नवीन भरती करेन. तसेच श्रीकृष्ण काकांना संकेतस्थळ मालक म्हणजे विठोबा आणि संपादक म्हणजे त्याचे बडवे असे सांगणारा लेख लिहून द्यायला लावेन.
18 Oct 2009 - 4:51 pm | एकलव्य
संपादित
14 Apr 2010 - 8:18 am | सुधीर काळे
१) खरडफळ्यावरील नोंदी (वचन दिल्याप्रमाणे) तीन दिवसात उडवेन.
२) इतरांनी लिहिलेले व 'मराठी-अमराठी'मधील दर्जेदार लेखन इथे पोस्ट करण्याची मुभा देईन
३) क्रमशः हा प्रकार बंद करेन.
४) अधिकार्यांची निवडणूक घ्यायला प्रोत्साहन देईन.
अजूनही एक सूचना लिहायची आहे, पण ती तात्यांना 'व्य.नी.'द्वारा पोचवेन.
वरील सर्व विचारले म्हणून सांगत आहे. कारण 'मिपा'वर मी अजून नवाच आहे!
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
19 Oct 2009 - 7:44 pm | प्रकाश घाटपांडे
मिपाचे मालक व्हायचे विचार बी आमच्या ध्यानी मनी नाई. कुनी पानी द्या रं ! लईच तहान लाग्ली.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
14 Apr 2010 - 6:37 am | शुचि
मी जाहीरातींकरता नक्की एक विभाग करेन जो की मिपाचा अर्थिक भार उचलू शकेल.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
14 Apr 2010 - 8:04 am | कुंदन
पैसे कोणाच्या खात्यात जमा करायचे ते देखील कळवा.
14 Apr 2010 - 11:11 am | वाहीदा
शुची ,
You can always count on Me !! ;-)
पैसे कोणाच्या खात्यात जमा करायचे ते देखील कळवा.
@ कुंदन ,
"आमच्यात पण पैसे मिळवण्यासाठी भाग्यांकाची वाट बघत नाहित." ;-)
~ वाहीदा
16 Apr 2010 - 5:43 pm | मितभाषी
नाठाळपणा करुन मिपाचे वातावरण गढुळ करणार्यांना, बायांच्या टिंगळटवाळ्या, विनाकारण त्रास देणार्या नराधमांना भुंडाडावर लाथ घालुन झिरो मिंटात हाकलुन देइल.
भावश्या