गाभा:
सनातन प्रभात मध्ये आलेली ही बातमी...
अश्या उमेदवारांना राष्ट्रवादी पार्टी तिकिटे देते, त्या पक्षाचा जाहीर निषेध !!
बाकी काय करु शकतो आपण?
सनातन प्रभात मध्ये आलेली ही बातमी...
अश्या उमेदवारांना राष्ट्रवादी पार्टी तिकिटे देते, त्या पक्षाचा जाहीर निषेध !!
बाकी काय करु शकतो आपण?
प्रतिक्रिया
13 Oct 2009 - 9:23 am | JAGOMOHANPYARE
काय करणार ? औरंग की भूमी म्हणजे औरंगाबाद असे म्हणून तो कोर्टातही सुटेल.... अगदीच काही नाही जमले तर हे पत्रक हिंदुनीच काढले आहे, असा तो गळा काढेल... टि व्ही वाले पण त्याचे ते रडणे चोवीस तास दाखवतील........ मग सरकार शे दोनशे हिन्दुंवर खटला भरून त्याना तडीपार करेल......... :)
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
19 Oct 2009 - 11:28 am | वेताळ
सदर पेपराच्या कागदाचा दर्जा कसा आहे? त्याला ईग्लिश पेपरासारखा भाव.....रद्दीचा भाव मला म्हणायचे आहे, येतो का?
वेताळ
13 Oct 2009 - 12:33 pm | आशिष सुर्वे
ह्या महाभागाला उलटा टांगून खालून मिरचीची धुरी द्यावेसे वाटतेय..
-
कोकणी फणस
13 Oct 2009 - 1:21 pm | पंकज
"बाकी काय करु शकतो आपण? "
- तुम्ही काय करणार आहात?
मी राष्ट्रवादीचा जाहीर निषेध करतो !!
13 Oct 2009 - 1:21 pm | योगी९००
आपण निषेधही करू शकतो का ते नाही माहीत नाही. कारण आपण शेळपट आहोत. आपले राज्यकर्ते यांनाच विकले गेले आहेत. आणि अशांनाच आपण निवडून देतो. त्यामुळे आपल्याला आता निषेध करायचा पण हक्क राहिलेला नाही.
बाकी कॅन्सर झाल्यावर कसे आपले शरीर पोखरले जाते, आणि आपण कसे आपले मरण पाहतो तसे करणे आपल्या हातात आहे.
बाकी हा माणूस फक्त वोटच नाही, पण ओट सुद्धा मागतोय. (शेवटचा परिच्छेद पहा).
खादाडमाऊ
13 Oct 2009 - 1:25 pm | सुधीर काळे
आपल्या मिपावर दोन-तीन तरी मुस्लिम सभासद आहेत (कमीत कमी नावावरून तरी असे वाटते)!
या सभासदांनी या पत्रकावर भाष्य करावे! नुसते गप्प बसू नये अशी विनंती.
मान्य नसेल तर जाहीर निषेध करावा व मान्य असेल तर तसे जाहीर करावे.
सुधीर काळे
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
14 Oct 2009 - 1:33 pm | विकि
मुस्लीम सभासदांनी पेटुन उठून मिपावर काहीतरी बोलावे असा हेतू दिसतो मुळात मिपावर हिंदु-मुस्लीम हे भेद टाळले पाहीजे. सनातन प्रभात हे वृत्तपत्र हिंदूत्वाचे मुखपत्र आहे तिथे अश्या प्रकारच्या भडकाऊ बातम्या असणारच.
15 Oct 2009 - 1:44 pm | हर्षद आनंदी
सत्य भडकाऊ नसते...
फक्त आणि फक्त सत्य्च छापतो सनातन... आज हिंदुंची बाजु मांडणारे एकमेव दैनिक आहे ते..
हिंदु-मुस्लीम भेद टाळा ना, नाही कोण म्हणतय.. पण प्रत्येक वेळी अतिरेकी मुसलमानच का? गुन्हेगारीमध्ये वरच्या ओळीत यांची नावे का? दहशतवादी हल्ले भारतात का? इथे ही मुस्लीम , पाकीस्तान व बांग्लादेश पेक्षा जास्त रहातात ना, मग हे हल्ले का? काश्मीरमध्ये हिंदु पंडीतावर अत्याचार का?
यांना ऊत्तर फक्त एकच ... हिंदु द्वेष \ या पवित्र भुमीवर कब्जा करण्यासाठी चालवलेले प्रयत्न जे १००० वर्षापासुन होत आहेत. आम्ही किती काळ सहन करावे? तुमच्या सारख्या सेक्युलर लोकांमुळे त्यांची चांगलीच सोय होते. तुम्हाला देशाधर्माची चाड नसेल पण आम्हाला आहे, आणि जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही लढणार...
पुण्यात असाल तर डोळे ऊघडून बघा...कोंढवा, नाना पेठ, जुना बाजार, कॅम्प इथल्या मुसलमान वस्त्यातुन फिरून बघा, ३-५ मजली मशीदी दिसतील, कोंढव्यातल्या मशीदीत शस्त्रसाठा पण सापडला होता. ही धार्मिक स्थाने नाहीत, दहशतवादी अड्डे आहेत. अजुन बरेच काही आहे, या लोकांमध्ये ५-१० वर्षे रहा.. मित्र म्हणुन नव्हे... त्यांच्या भागात वास्तव्य करा, समजेल तुम्हाला सारे काही!!
15 Oct 2009 - 4:55 pm | निखिलराव
हर्षद आनंदी आगे बढो, हम तुम्हारे साथ हे.
13 Oct 2009 - 1:26 pm | सखाराम_गटणे™
>>मान्य नसेल तर जाहीर निषेध करावा व मान्य असेल तर तसे जाहीर करावे.
+१
----
नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
13 Oct 2009 - 2:06 pm | Dhananjay Borgaonkar
आम्हाल खुष व्हायला कोणा एका अमित उर्फ हमीद अभ्यंकरच्या क्षमेची गरज नाही.
मिरजेचा वचपा ईचलकरंजीत काढला. नडला की तोडला.
तुमच्या त्या काँग्रेच्या जोरावर किती उड्या मारणार????
तुमच्या सार्ख्या षंडामुळेच या लोकांच फावत.
@संपादक
वैये़क्तिक टिकेबद्द्ल क्षमस्व. तुम्ही माझी प्रतिक्रिया उडवु शकता.
हिंदुंबद्दल उर्मटपणे बोललेल मला चालत नाही.
म्हणुन वैयक्तिक झालो.
13 Oct 2009 - 2:58 pm | उग्रसेन
तुमच्या त्या काँग्रेच्या जोरावर किती उड्या मारणार????
तुमच्या सार्ख्या षंडामुळेच या लोकांच फावत.
कोनामुळं कोणाचं फावतं ती गोष्ट हायेच. पर भावनेच्या दावणीला
बांधुन लोकात राडा करायला लावणार्या ''मंदिर वही बनायेंगे सिर्फ तारीख नही बतायेंगे'' असा जयघोष करणार्याचाबी इसर नका होण देऊ.
-बाबुराव
13 Oct 2009 - 3:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कोणी मिपावर मुस्लिम नावाने वावरतं म्हणून या संदर्भात प्रतिक्रिया द्यायलाच पाहिजे हे फारच *** वाटलं! मिपावरच्या सगळ्या हिंदू सभासदनामांनी थोडीच हिंदूंच्या संदर्भातल्या बातमीवर मतप्रदर्शन केलं होतं ...
मला तर अंमळ गंमत वाटते सहज, मिसळभोक्ता, अमृतांजन वगैरे नावांची!
अदिती
(हल्ली विशेषणांऐवजी चांदण्या वापरते; उगाच नोबलची गाडी चुकायला नको!)
13 Oct 2009 - 5:05 pm | सुधीर काळे
आदिती,
मिपावरच्या एका मुस्लिम सभासदाने (आणि हा सभासद नक्की मुस्लिम आहे) मला मी कांहींही वेडंवाकडं लिहिलेलं नसताना मला "तुम्ही आमच्याविरुद्ध का लिहिता?" असा प्रश्न विचारला होता. मग मी का अपेक्षा ठेवू नये?
असो! हल्ली तुझा विरोध बर्याचदा "विरोधासाठी विरोध" वाटतो मला. नसेलही, पण वाटतो खरा.
पण चालू द्या तुझं. आताशा मला आश्चर्य नाही वाटत! कधी कांहीं असं लिहिलं नाहीस तर मात्र आश्चर्य वाटेल.
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
13 Oct 2009 - 5:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =))
॥आजे॥
13 Oct 2009 - 10:16 pm | सुधीर काळे
ये आजे क्या होता है? गूढ भाषा आम्हाला अजून कळत नाहीं.
NWSSNH!
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
14 Oct 2009 - 9:37 am | दशानन
नाही कळणार तुम्हाला =))
13 Oct 2009 - 3:19 pm | निखिल देशपांडे
अरे वा छान चर्चा....
आता जाउन त्या मौलाना कबीर बापुला विचाराना तो असे का म्हणाला???
आमच्याच मतदार संघातील उमेदवारा आहे तर थोडे बोलु का???
औरंगाबाद चा ईतिहास बघितला तर ह्या प्रकारचा फतवे तेथे दर निवडणुकीत निघतात...... आणी सगळे लोक त्याचा हवा तसा वापर करुन घेतात.
मागच्या किंवा त्याचा मागच्या निवडणुकित राजेंद्र दर्डा ह्यांना मत न देता तेथल्या मुस्लिम उमेदवारालाच मत द्या असा फतवा निघाला होता... तेव्हा तिथल्या तरुण भारत व सामना ने तो फतवा मिळवुन त्याचे उर्दु चे मराठीत भाषांतर करुन पेपर मधे छापले होते. व त्यानंतर पेपर फुकट वाटले होते.
तर ह्या बातमीचा दोन्ही कडचे लोक फक्त मताच्या राजकारणा साठी फायदा करुन घेतात. शक्यतो सोडुन द्या हो.
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
15 Oct 2009 - 11:11 am | आम्हाघरीधन
औरंगाबाद मतदार संघात राजेंद्र दर्डा यांनी विकास कामे केलेली आहेत म्हणुन त्यांच्या विरोधात असे कितीही फतवे निघाले तरी काही उप्योग झाला नाही. बिचारा कमाल फारुकी नुसताच फतवा पाहत राहिला.......
आता या वेळी माजी नगरसेवक गणेश तांबे यांचे आत्महत्या प्रकरण भाजपाने उचलुन धरले आहे त्याचा किती फटका दर्डांना बसतो हे पाहणे मनोरंजक ठरेल. दर्डांनी इतर कुणाला पक्षात वरचढ होऊ दिले नाही हे मान्य परंतु जनतेची कामे त्यांनी टाळली नाहीत हीच जमेची बाजु आहे. सन १९८६ पासुन महापालिका, विधानसभेचा आमदार,लोकसभेचा खासदार शिवसेनेचा असतांनाही विविध हिंदु नागरी वस्त्यांमधे कित्येक वर्षे झाली तरी मुलभुत सुख(!)सोयी उपलब्ध झालेल्या नव्हत्या त्यांची पुर्तता राजेंद्र दर्डा यांनी केली त्यामुळे दर्डांना जनमत मिळते आहे हेच त्यांच्या यशाचे गमक आहे असे मला वाटते.
यावेळी शरद पवार यांनी पुढे केलेला उमेदवार मा. श्री. सुभाष झांबड हे दर्डांना सुरुन्ग लावतील अशी हवा आहे.
येत्या २२ला ते कळेलच...
15 Oct 2009 - 11:51 am | निखिल देशपांडे
विविध हिंदु नागरी वस्त्यांमधे कित्येक वर्षे झाली तरी मुलभुत सुख(!)सोयी उपलब्ध झालेल्या नव्हत्या त्यांची पुर्तता राजेंद्र दर्डा यांनी केली त्यामुळे दर्डांना जनमत मिळते आहे हेच त्यांच्या यशाचे गमक आहे असे मला वाटते.
असो तुम्हीच हिंदु वस्त्या व मुस्लिम वस्त्या असा फरक करत असल्या मुळे तुम्हाला विचारतो कोणत्या हिंदु वस्त्यात काम केले हो त्यांनी जरा कळु तरी द्या... असो तो माझा मुद्दा नाहिये... मी ज्या प्रभागा मधे राहतो.. तिकडे एकही काम आमदार दर्डा ह्यांचा निधितुन झालेले नाहिये...
अहो औरंगाबाद चे दुखणेच आहे की तिथे एकही चांगला नेता नाहिये जो शहराच्या विकासाचा विचार करणार... त्यात मागच्या वेळेस निवडुन यायचे कारण शिवसेनेतील अंतर्गत वाद. आणी मुस्लिम एक गठ्ठा मतदान. दर्डा आमदार असताना त्यांनी काय केले मराठवाड्यातच औरंगाबादला मागे टाकण्यासाठी लातुर/ नांदेड मधे ओढ चालु असताना त्यांनी काय केले???? जाउ द्या ना एवढे करुन झांबडचा जोर कमी पडला तर ते निवडुन येणारच....
बाकी १९८६ नंतरच औरंगाबाद शहरात बराचसा विकास झाला की हो.... माझ्या माहीती नुसार त्या नंतरच एक वेगाने विकासित होणारे शहर असा बहुमान औरंगाबाद ने मिळवला होता. चुकिचे बोलत असेल तर माफ करा
(दर्डा चा एक काळचा समर्थक)निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
15 Oct 2009 - 12:13 pm | आम्हाघरीधन
औरंगाबादेत राजेंद्र दर्डा यांनी हिंदु वसाहतीत केलेल्या कामाची यादी.....
शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या एन-३, एन-४ मधील रस्ते, खेळाचे मैदान, जयभवानीनगर ते मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन रोड या मुख्य( या रस्त्याचे उद्घाटन मा. श्री. चंद्रकांत खैरे यांनी ६ वेळा केलेले आहे परंतु काम कधी सुरु झालेच नाही) तथा अंतर्गत रस्ते, रस्त्या वरिल दिव्यांची सोय.
एक उदाहरण :
http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=AurangabadEdition-5...
आता त्यांनी केलेल्या विकास कामाचा आढावा तुम्हाला घ्यायचाच असेल तर एकदा त्यांच्या कार्यालयाला अवश्य भेट द्या अन तेथील विकास कामांची होर्डींग करूर बघा..
(मा. श्री. प्रदीप जैस्वाल यांचा खंदा समर्थक....) आम्हाघरीधन....
15 Oct 2009 - 12:23 pm | निखिल देशपांडे
जाउ द्या ना साहेब.... त्यांचा संपर्क कार्यालयात अनेक वेळा जाउन समाधान झालेले नाहि. ना त्यांचाशी संवाद साधुन..... अहो दर्डांकडुन जरा जास्त अपेक्षा होत्या आमच्या झाला अपेक्षाभंग.
बाकी आपण लोकमत मधल्या लिंका दर्डा च्या कामाच्या म्हणुन प्रसिद्ध करुच नका... आहो औरंगाबाद लोकमत मधे त्यांचा रोज फोटो असतातच....
बाकी तुम्ही प्रदिप जैस्वाल ह्यांचे समर्थक आहात वाचुन दु:ख झाले. काय करणार ते पण निवडुन येवुन काही काम करणार नाहित.
शेवटी काय सगळेच एका माळेचे मणी....
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
15 Oct 2009 - 1:38 pm | आम्हाघरीधन
औरंगाबाद शहराला तसा विकासाचा चेहरा देणारा आमदार झाला नाही हे आपण मान्य करतो.. परंतु जनतेच्या मुलभुत गरजा पुर्ण करुन दर्डांनी जनतेला जवळ ठेवले हे सत्यच आहे.
औरंगाबाद मराठवाड्याची राजधानी म्हणुन प्रसिध्द आहे परंतु कुठ्लेही विकास प्रकल्प तेथे येत नाहीत.. औद्योगिक क्षेत्रात, आयटीत प्रगती साठी कुणीही प्रयत्न केले नाहीत ही खंत आपल्याला निश्चितच आहे.
म्हणुन तर आपणा सर्वांना नोकरी साठी औरंगाबाद सोडुन इतरत्र भटकावे लागते आहे.
असो... विकासाची गंगा आणणारा नेता शहराला लवकरच मिळो अशी अपेक्षा ठेवुन त्या द्रूष्टीने प्रयत्न करणे आपणाला भाग आहे.
13 Oct 2009 - 3:21 pm | निखिल देशपांडे
प्रकाटाआ
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
13 Oct 2009 - 3:34 pm | प्रसन्न केसकर
निखिलशी पुर्ण सहमत.
मी पाहिलेली एक दंगल आठवते. शुक्रवारी दुपारी प्रार्थनेनंतर कुठेशी गरमागरम चर्चा झाली कुठल्या फलाण्या देशात विटंबना झाली म्हणुन. चार पोरं उठली अन शेजारच्या देवळातली गणपतीची मुर्ती फोडली. मग पलीकडच्या आळीतल्या दुसर्या देवळात पन्नास पोरं जमली अन परत गरमागरम चर्चा झाली. तिथली पोरं बाहेर पडली अन हाणामारी सुरु झाली पाच सात गल्ल्यात. मग कोपर्यापलीकडं दुसर्या वॉर्डात प्रतिक्रिया, पेप्रात बातम्या अन अजुन प्रतिक्रिया.... होता होता तीन चार दिवस दंगल सुरु. पोलिस आले, निमलष्करी दलं आली. त्यांनी कशीतरी थांबवली गल्ल्यांतली मारामारी अन दगडफेक. शेवटी काही धर्मनिरपेक्ष मंडळींनी विचार केला शांतता फेरी काढावी. ते गेले फुल्ल बंदोबस्तात फिरायला पण दोन्ही आळ्यातनं त्यांच्याचवर दगडं पडली अन परत चार दिवस अजुन दंगल पेटली. आता धर्मनिरपेक्ष पक्षांची अन संघटनांचीच मंडळीच पेटली होती.
तेव्हा मी काढलेला निष्कर्ष (कुणाला बरोबर वाटेल किंवा चुकीचा): दिखावेपे मत जाव, अपनी अकल लगाव. धर्मांध तसंच स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवुन घेणार्या मंडळींना पण दंगल हवीशी असु शकते. अहो दंगल झाली तरच त्यांच्या अस्तित्वाला अर्थ उरतो ना!
13 Oct 2009 - 3:56 pm | Dhananjay Borgaonkar
बाबुराव
गणपतीत मिरजेत राडा कोणी केला?
अफजल खानाच अजुनही कौतुक कोणाला?
रोज उठुन बॉम्ब स्फोट करत?
काश्मीर मधुन फक्त हिन्दु पंडीतांना का हाकलल?
मुम्बई हल्य्यात असे का ओरडत होते अतिरेकी मुसलमानोंको छोड दो..बाकी सब को मार डालो?
आधी या प्रश्णाची उत्तर द्या..
मंदिर बनेलच्..पण तुर्तास तिकडे मशीदही नाहीये हे काय कमी आहे..
मिरजेचे व्हिडीओ पहा मग कळेल्..गणपतीच्या कश्या मुर्त्या भंगल्या या तुमच्या लोकंनी..आणि तुमच्या त्या *** काँग्रेसच्या सरकारने हिन्दु लोकांनाच कैदेत टाकल..का??
निवडणुक तोंडावर आहे...आपला मतदार दु़खावला जाईल..
हे असले प्रश्ण मला नका विचारु..
तुमच्या लोकन्ना विचारा की अजुन किती त्यांच्या *टया कुरवाळत बसणार ते??
13 Oct 2009 - 6:36 pm | भोचक
ही विधानं फार सरसकट होतात असं नाही वाटत? मला वाटतं गेल्या काही वर्षांत देशात दहशतवादापेक्षा जास्त लोक नक्षलवादी हल्ल्यात मारली गेली आहेत. आणि माझ्या माहितीनुसार हे सर्व नक्षलवादी हिंदू आहेत. जे आपल्याच 'हिंदू' बांधवांना मारत आहेत.
काश्मीरमधली नुकतीच एक बातमी वाचली असेल तर लक्षात येईल, रूख्साना नावाच्या एका मुलीने दहशतवाद्याची बंदुक हिसकावून घेऊन त्याला ठार मारलं. तिच्या भावानेही दुसर्या दहशतवाद्यावर हल्ला केला. त्याला पळवून लावलं. हे 'मुस्लिम' दहशतवादी याच 'मुस्लिम' कुटुंबातील कर्त्या पुरूषाला आणि त्याच्या बायकोला मारहाण करत होते. पण रूख्साना 'ते' मुसलमान आहेत की नाहीत याचा विचार न करता त्यांना ठार मारले.
आपण अनेकदा अशी सरसकट विधानं करून धर्मांधांच्या हाती कोलित देतो असं नाही वाटत काय? अशा प्रकारची पत्रकं काढणं आणि त्यातून सामाजिक एकतेला तडा देणे हेच काहींचे उद्दिष्ट होते, आपल्याही तितक्याच भडक प्रतिक्रियांनीही त्यांचेच उद्दिष्ट साध्य होते.
(भोचक)
मी पत्रकार आहे. कारण जगातील यच्चयावत ज्ञान 'फक्त' मलाच आहे, याची मला खात्री आहे.
हा आहे आमचा स्वभाव
13 Oct 2009 - 6:37 pm | भोचक
ही विधानं फार सरसकट होतात असं नाही वाटत? मला वाटतं गेल्या काही वर्षांत देशात दहशतवादापेक्षा जास्त लोक नक्षलवादी हल्ल्यात मारली गेली आहेत. आणि माझ्या माहितीनुसार हे सर्व नक्षलवादी हिंदू आहेत. जे आपल्याच 'हिंदू' बांधवांना मारत आहेत.
काश्मीरमधली नुकतीच एक बातमी वाचली असेल तर लक्षात येईल, रूख्साना नावाच्या एका मुलीने दहशतवाद्याची बंदुक हिसकावून घेऊन त्याला ठार मारलं. तिच्या भावानेही दुसर्या दहशतवाद्यावर हल्ला केला. त्याला पळवून लावलं. हे 'मुस्लिम' दहशतवादी याच 'मुस्लिम' कुटुंबातील कर्त्या पुरूषाला आणि त्याच्या बायकोला मारहाण करत होते. पण रूख्साना 'ते' मुसलमान आहेत की नाहीत याचा विचार न करता त्यांना ठार मारले.
आपण अनेकदा अशी सरसकट विधानं करून धर्मांधांच्या हाती कोलित देतो असं नाही वाटत काय? अशा प्रकारची पत्रकं काढणं आणि त्यातून सामाजिक एकतेला तडा देणे हेच काहींचे उद्दिष्ट होते, आपल्याही तितक्याच भडक प्रतिक्रियांनीही त्यांचेच उद्दिष्ट साध्य होते.
(भोचक)
मी पत्रकार आहे. कारण जगातील यच्चयावत ज्ञान 'फक्त' मलाच आहे, याची मला खात्री आहे.
हा आहे आमचा स्वभाव
13 Oct 2009 - 4:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कदीर मौलाना ज्या मध्यमधून औरंगाबाद विधानसभेची निवडणूक लढवित आहेत. तिथे विजयाचा प्रबळ दावेदार असणारे शिवसेनेच्या प्रदीप जैस्वाल यांचे तिकिट शिवसेनेने कापले. आणि तिथे ते बंडखोरी करुन निवडणूक लढवित आहेत. आणि शिवसेनेने प्रदीप जैस्वाल यांच्या तालमीत वाढलेल्या विकास जैन यांना तिथून उमेदवारी दिली आहे. आणि तिथे खरी लढत आहे ती कदीर मौलाना, (राकॉ)विकास जैन, (शिवसेना) आणि बंडखोर शिवसेनेचा उमेदवार प्रदीप जैस्वाल यांची.
प्रदीप जैस्वाल यांच्यावर अन्याय झाला ही गोष्ट त्या मतदार संघातील लोकांना माहित आहे. त्यांच्याबद्दल सहानुभूती मतदारांमधे आहे. आता या मतदार संघात सर्व मतदार मिळून जवळपास अडीच लाख मतदार आहेत. त्यात नव्वद हजार मतदान हे मुस्लीम मतदान आहे. मुस्लीमांचे एकगठ्ठा मतदान आपल्याकडे राहावे यासाठीची ही दुसरी युक्ती आहे.
कारण पहिली अडचण त्यांच्यासमोर ही होती की जवळपास पंधरा अपक्ष मुस्लीम जनाधार असलेले उमेदवार तिथे उभे होते, कदीर मौलानांनी त्यांचे उमेदवारी अर्ज परत घ्यायला लावले. ही पहिली लढाई जिंकली. दुसरी त्यांची अडचण अशी आहे की, जर कदीर मौलानाला नाकारायचे असे मतदारांनी ठरवले तर ते मतदान फूटून अपक्ष उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना ते मतदान (बंडखोर उमेदवार) पडेल. तेव्हा हे आपले मत आपल्याच पारड्यात पडावे असा त्यांचा हेतू आहे. मुस्लीमेतर मतदान दलित,हिंदु, आणि इतर या पैकी दलित मतदान पडले पाहिजे ही त्यांची अपेक्षा आहे. राहिलेले हिंदु मतदानाची विभागणी (शिवसेना आणि बंडखोर उमेदवार ) ही त्यांच्या फायद्याची आहे. तेव्हा कदीर मौलाना कितीही लोकप्रिय नेते असले तरी त्यांच्या प्रचारात त्यांनी (किंवा त्यांच्या कार्यकर्त्याने )ही केलेली चूक जाणीवपूर्वक केलेली असावी, असे वाटते. अर्थात मतदारांनी अशा धार्मिक भावना पेटवणार्या या किंवा अन्य अशा कोणत्याही उमेदवाराला नाकारले पाहिजे, जाब विचारला पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे.
दुसरी गोष्ट या शहरात असे फतवे काही नवीन नाही. हिंदु आणि मुस्लीम नेते दोघेही सारखेच. ''हिंदु मुली पटवणार्यांना मुस्लीम युवकांना मुस्लीम कट्टर पंथीयाकडून दोनशे रुपयाचे बक्षीस'' अशा बातम्या सतत इथे प्रसिद्ध होतांना दिसतात. तेव्हा,मतदार आपल्याकडे कसा वळेल अशा वेगवेगळ्या क्लुप्त्या उमेदवार वापरतात तेव्हा भावनेच्या आहारी न जाता आपण काय निवडले पाहिजे, याचे शहाणपण मतदाराकांडे असले म्हणजे इतर काही प्रश्न उद्भवत नाहीत असे वाटते. ( वाद घालण्यापेक्षा, निवडणूकीसाठी जे निरिक्षक येतात त्यांना अशा गोष्टी जागृक मतदारांनी दाखवले पाहिजे, असे वाटते)
-दिलीप बिरुटे
13 Oct 2009 - 5:13 pm | सुधीर काळे
शहारुख-जी,
आपण मला गठ्ठा मतदान म्हणजे काय असे विचारले होते. मी फोनवर सांगणार होतो, पण जमले नाहीं.
वरील पोस्ट वाचल्यावर हे कळले असेल अशी आशा आहे.
<<मुस्लीमांचे एकगठ्ठा मतदान आपल्याकडे राहावे यासाठीची ही दुसरी युक्ती आहे.>>
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
14 Oct 2009 - 9:33 am | शाहरुख
धन्यवाद..
मला नेहमी प्रश्न पडतो जर अल्पसंख्यांक संख्येने अल्प आहात तर मग त्यांना सरळ दुर्लक्षित करुन आणि बहुसंख्यांकांची तुम्ही म्हणता तशी एकगठ्ठा मतं गोळा करुन निवडणूक जिंकणे का शक्य नाही ? "बहुसंख्यांकांचे रक्षण" याच विचारधारेवर स्थापन झालेले पक्ष नेहमीच का जिंकून येत नाही ? सरकारला या अल्प मतांची येवढी का काळजी की ते बहुसंख्यांकांना विनाकारण तुरुंगात टाकून बहुसंख्य मतं हातची घालवतंय?
त्या उमेदवाराच्या पत्रकाबद्दल बोलायचं झालं तर,
जाती-धर्माच्या नावावर मतं मागणारा कोणताही पक्ष/उमेदवार माझ्या अगदी डोक्यात जातो...मग तो कोणत्याही धर्माचा असो. निवडणूक आयोगाचे यावरचं धोरण जाणून घ्यायला आवडेल.मला जर कोणी उमेदवार/पक्ष म्हणाला "अरे तुझा माझा धर्म एक..दे मला मत" तर मी म्हणीन "धर्म गेला गाढवाच्या ***, या माझ्या अडचणी कशा सोडवशील सांग"
बिरुटे सर, माहितीबद्दल आभार !!
14 Oct 2009 - 1:41 pm | विकि
सुधीर काळे के बात के उपर ध्यान मत देना,वो देश के बाहर रहेता है,याने वो उधर अल्पसंख्य हो गया ना.त्यांनी मिपावर आपला धर्मांध चेहरा उघड केला आहे कारण केवळ नावावरून मुस्लीम सदस्यांची मते तो मागवतो म्हणजेच मुस्लिमांविषयी शंका व्यक्त करतो.
14 Oct 2009 - 2:48 pm | सुधीर काळे
शाहरुखराव,
समस्या अशी आहे कीं बहुसंख्य हिंदू लोक आपल्या सदसद्विवेकबुद्धीप्रमाणे मतदान करतात. शिकलेले अल्पसंख्य तसे करत असतीलही. पण इतर अल्पसंख्य काय करतात याची खात्रीलायक माहिती मला नाहीं. खरं तर हा अभ्यासाचाच विषय आहे!
या औरंगाबादच्या पत्रकात लिहिल्याप्रमाणे अल्पसंख्यांकांच्या "वेगळे उभे रहाण्या"च्या प्रवृत्तीनेच हिंदू मिलिटन्सीला जन्म दिलेला आहे असे माझे ठाम मत आहे. पूर्वी हिंदूंची कुठलीच संघटना अशी नव्हती व तिची गरजही कधी कुणाला वाटली नव्हती. पण आता गरज निर्माण झाली आहे असे दुर्दैवाने दिसते.
तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही मुस्लिम असावेत, कदाचित नसालही. पण मी ज्या व्यक्तीचा उल्लेख केला ती व्यक्ती नक्की मुस्लिम आहे. या व्यक्तीने मला "तुम्ही मुस्लिमांविरुद्ध का लिहिता" असा प्रश्न विचारला होता, मी मुस्लिमांविरुद्ध लिहीत नसूनही!
पण मुस्लिमांच्या या प्रवृत्तीबद्दल खरं तर मुस्लिमांनीच लिहायला हवे कारण त्यांनी पाकिस्तानात जाण्याचा पर्याय उपलब्ध असूनही तिकडे न जाता राजी-खुषी इथे रहाण्याचा व इथल्या मातीशी इमान राखण्याचा निर्णय घेतला आहे. आज आपल्यात अब्दुल कलामसाहेबांसारखे आदर्श मुस्लिम आहेतही (त्यांचा उद्या जन्मदिन आहे). त्यांचा आदर्श ठेवला पाहिजे. असे भारतीय मुस्लिम मी सगळीकडे पाहू इच्छितो व असे मुस्लिम जर सगळीकडे दिसू लागले तर कुणाच्याच मनात कुणाचाच धर्म येणार नाहीं जो आज दुर्दैवाने येतोच!
मी ८९ टक्के मुस्लिम असलेल्या देशात सध्या रहातो. इथे जे अल्पसंख्यांक आहेत ते इथल्या मातीत मिसळून गेले आहेत. ते स्वतःचे धर्माधिष्ठित वेगळे अस्तित्व ठेवत नाहींत. हाच आदर्श आपण ठेवला पाहिजे.
मीच नव्हे पण जो कुणी (व इथेच नव्हे पण इतरत्रही) या विषयावर कळकळीने बोलतो/लिहितो तो या प्रवृत्तीबद्दलच बोलतो/लिहितो.
मी एकदा एका मुस्लिम व्यक्तीला विचारले होते कीं मुस्लिमांना भारत सरकार 'हज' यात्रेसाठी सबसिडी देते जी इतर कुठल्याही धर्मियांना मिळत नाहीं. असे असतांना एकही मुस्लिम नेता अशी सबसिडी देण्याच्या विरुद्ध का बोलत नाहीं? "द्यायची तर सगळ्यांना द्या नाहीं तर कुणालाच नको" असं कां नाहीं म्हणत?
मी स्वतः मुलायम सिंग यांच्या समाजवादी पार्टीच्या निवडणूक प्रचाराबद्दलची चित्रफीत पाहिली आहे जिथे हे नेते मुस्लिम मुहल्ल्यात सांगत होते कीं तुम्हाला हवी तेवढी मुलं जन्माला घाला, आम्ही तुमच्या कुठल्याच सवलती काटणार नाहीं. हे कसे होते? जे सर्रास खासगी टीव्ही वाहिन्यांवर दाखविले जाते त्याची निवडणूक आयोग दखल का घेत नाहीं?
अशा वागणुकीने मुस्लिम जनता आज मुख्य प्रवाहाबाहेर पडत आहे. एक तर्हेचे संशयी वातावरण सगळीकडे आहे. जरी प्रत्येक मुस्लिम व्यक्ती अतिरेकी नसली तरी पकडले गेलेले अतिरेकी अपवादानेच इतर धर्माचे असतात. असे कां?
शाहरुखराव, तुमचे नाव जरी मुस्लिम असले तरी तुम्ही मुस्लिम आहात कीं नाहीं मला माहीत नाहीं, पण ज्या व्यक्तीबद्दल मी लिहिले होते ती व्यक्ती नक्कीच मुस्लिम आहे व ती व्यक्ती मला "काका (चाचाजान)" म्हणूनच संबोधते. एक सह-भारतीय या नात्याने त्या व्यक्तीबद्दल माझ्या मनात कुठलाही दूषित पूर्वग्रह किंवा आकस नाहीं, मी त्या व्यक्तीला नेहमीच आशिर्वाद देतो व सणासुदीला शुभेच्छाही पाठवतो. पण असे पत्रक इथे वाचल्यावर कमीत कमी "हे चूक आहे" एवढे तरी म्हणावे अशी अपेक्षा असू नये का? एवढीही हिंमत कुठलाच मुस्लिम कां नाहीं दाखवत? कीं आपल्यातलेच आततायी आपल्याला त्रास देतील व आपल्याला वाळीत टाकलील अशी भीती त्यांना वाटते?
तुम्हीच सांगा, शाहरुखराव!
सुधीर
ता.क. पाकिस्तानात व बांगलादेशात हिंदू औषधालाच उरले आहेत, पण भारतात मुस्लिम कमी तरी नक्कीच झालेले नाहींत याचे हिंदूंची सहिष्णुता याखेरीज आणखी कांहीं कारण असले तर जरूर सांगा!
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
14 Oct 2009 - 5:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ऐकावं ते नवलच!
आपला देश, माणसं, इ. इ. कंफर्ट झोन सोडून खूप लोकं परदेशात आजही जात नाहीत. फक्त धर्माखातर सोडून जावं एवढा त्रास इथल्या बाकीच्या लोकांनी त्यांना नक्कीच दिला नसावा. पर्याय होता ठीक आहे, पण त्याचा विचार करण्याची वेळ इतरांनी बव्हंशी येऊ दिली नव्हती ना?
हे दोन्ही देश धर्माच्या नावाखालीच स्थापन झाले आहेत. आपली लोकशाही आहे, हिंदू हुकुमशाही वा ठोकशाही नाही.
कोणी कोणाला कितपत किंमत द्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो ना? आता "त्या" व्यक्तीला जर हा मुल्ला फार भावदेण्यालायक वाटत नसेल तर? जर "ही" व्यक्ती सध्या कामात बरीच गुंतली असेल तर?? मला वेळ आहे चार काय चारशे ओळी लिहीण्याचा! दुसर्याला त्याचे/तिचे उद्योग धंदे नसतीलच कशावरून? त्यातून या धाग्यावर त्या व्यक्तीने क्लिक केलं असेल याची काय खात्री? अशा व्यक्तीगत (पर्सनलाईझ्ड) विनंत्या करण्यासाठीही खव/व्यनीची सोय केली असावी.
अदिती
14 Oct 2009 - 5:08 pm | सुधीर काळे
अ. मा. ब.
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
15 Oct 2009 - 12:19 pm | शाहरुख
पहिली गोष्ट की मी धर्माने मुसलमान नाही..त्यामुळे त्या पत्रकाबद्दल तुम्हाला जे मुसलमानाचे मत हवे आहे ते माझे चालणार नाही.
हे सरळ सरळ टाईपकास्ट करणारे विधान वाटते.
हा पर्याय फाळणीच्या वेळी सर्व देशभर उपलब्ध होता काय ?
मला ही हज सबसिडीची भानगड माहित नव्हती त्यामुळे जरा शोधाशोध केली.सुप्रीम कोर्टाने "सरकार मान सरोवराच्या यात्रेकरूंना मदत करते म्हणून हजला जाणार्यांनाही करावी" असे म्हटलंय..अर्थातच मी दोन्हीला विरोध करतो. लोकांना ज्या काही धार्मिक चालीरिती पाळायच्या आहेत त्या स्वतःच्या खिशाच्या जोरावर पाळाव्यात.
तसे असू शकते.
13 Oct 2009 - 5:10 pm | Dhananjay Borgaonkar
निरि़क्षक येउन पहाणी करणार्..आणि सांगणार आम्ही अहवाल बनवतो.
आहो हे सगळ मताच राजकारण आहे. मुस्लीम मतदार नाराज होउ नये आणि आपली खुर्ची जाऊ नये या साठी काहीही करणार नाही सरकार...
13 Oct 2009 - 5:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मताचे राजकारण आहेच यात शंकाच नाही.
>>निरि़क्षक येउन पहाणी करणार्..आणि सांगणार आम्ही अहवाल बनवतो.
निरिक्षकांना खूप अधिकार असतात. असो, आमच्यासाठी हा चर्चा विषय संपला. आपली चर्चा पुढे चालू द्या...! :)
-दिलीप बिरुटे
13 Oct 2009 - 8:01 pm | Dhananjay Borgaonkar
प्रिय भोचक..
एखाद दुसरा अपवाद असु शकतो. नाही म्हणत नाही..
पण यामुळे सत्य परिस्थीती तर बदलत नाही ना...
किती दिवस यांना उरावर घेउन नाचायच?
हे लोक जिहादच्या नावाखाली वाट्टेल तस वागणार, अतिरेकी कारवाया करणार्..फतवे काढणार..यांना का नाही कोणी बोलत?
तुम्ही पत्रकार आहत ना मग असे प्रष्ण का नाही राजकीय लोकांना विचारत?
अजुनही पाकिस्तानात हिंन्दुवर जिजिया कर का लादला जातो?
तुम्ही मिरजेची दंगल कव्हर केलीत??का गणपतीच्या मुर्त्या भंगल्या?
त्या मिरजेच्या महापौराचा मुलगा पोलिसांच्या गाडीवर चढुन जेव्हा हिरवा झेंडा फडकवत होता तेव्हा तुम्ही पोलिसांना का नाही जाब विचारलात?
असो..तुम्ही पत्रकार्..तुम्हाला तुमच्या ज्ञानाची खात्री आहे मग आम्ही तरी काय बोलणार्..तुम्ही तुमच काम करीत रहा मी माझ..
13 Oct 2009 - 9:59 pm | jaypal
मला वाटतं जिथे कट्टरता असते तिथे बहुधा विचारांचा अभाव असतो.
कट्टरता स्वताचा विचारच रेटत असते.
13 Oct 2009 - 10:11 pm | सुधीर काळे
जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे तेव्हा तेव्हा वयाच्या १८ वर्षा पासुन मतदान करत आलोय. माझे सध्या वास्तव्य देशाबाहेर असल्याने इच्छा असूनही मतदान करणे शक्य नाही. पण इथल्या राजदूतांकडे आम्ही विनंती केली आहे की आमचे अमेरिकन मित्र करतात तसे दूतावासात येऊन मतदानाचा अधिकार बजावण्याची तजवीज करावी म्हणजे आम्हाला मतदान करता येईल. पण अद्याप तशी तजवीज झालेली नाहीं.
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
14 Oct 2009 - 5:00 pm | टारझन
बा*** .. काय एक से एक पाण्चटपणा चालला आहे :)
चालू द्या, वाचतो आहे :)
काही प्रतिसाद वाचून अंमळ हसू आलं !!
-(हास्यप्रेमी) टारोबा लाफ्टर
15 Oct 2009 - 2:04 am | वेदनयन
प्रदीप जैस्वाल यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असेलच. नसेल केली त्यांनी तर इतर कोणीही करु शकले असते.
15 Oct 2009 - 7:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कदीर मौलानाचे (संभाव्य)पत्रक जसे मुस्लीमांच्या मतांसाठी होते असे ग्रहीत धरले तर, हिंदु मतांची विभागणी होऊ नये, यासाठी तो प्रपंच आहेच अशी शक्यता लावता येते. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ती पत्रकं शहरात वाटली अशीही चर्चा आहेच.
राजकीय पक्षांच्या पत्रकावर पत्रक कुठे छापले, कोणी प्रकाशित केले, आणि किती प्रती छापल्या यांचा स्पष्ट उल्लेख अशा प्रचारपत्रकांवर करावा लागतो. तसा उल्लेख त्या पत्रकावर दिसत नसल्यामुळे निवडणूक आयोगाकडे तक्रार करतांना जशा अनेक अडचणी आहेत, तशा पळवाटाही आहेत. असो, आपण सर्व २२ तारखेची वाट पाहू. तेव्हा समजेल कोणत्या मतदारांनी कोणाची वाट लावली आहे ती.
-दिलीप बिरुटे
-दिलीप बिरुटे
15 Oct 2009 - 9:51 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
सर, आज दोनदा नाव लिहून बॅरल डबल केलंत का काय? ;-)
तुमचा हिंदू मतांबद्दलचा तर्कही विचार करण्यासारखा आहे.
अदिती
15 Oct 2009 - 5:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>सर, आज दोनदा नाव लिहून बॅरल डबल केलंत का काय?
सकाळी धावपळीत प्रतिसाद टाकला तेव्हा गडबड झाली.
सॉरी मॅडम..!!! :)
>>तुमचा हिंदू मतांबद्दलचा तर्कही विचार करण्यासारखा आहे.
थँक्स....!
-दिलीप बिरुटे
15 Oct 2009 - 9:58 am | JAGOMOHANPYARE
मी आधीच म्हटले होते... आता हे हिन्दुनीच केले म्हणून गोंधळ होणार म्हणून..
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
16 Oct 2009 - 8:25 am | पाषाणभेद
प्रश्न कोण जिंकतो, हारतो, कूणाला फायदा होतो हा नसून असले धर्मद्वेशी फतवे हा फालतू मौलाना काढतो व त्यास एक 'राष्ट्रवादी' म्हणवणारा 'मधला' पक्ष निवडणूकीचे तिकीट देतो व बेडकासारखा कधीतरी उगवणारा 'निवडणूक आयोग' हे सर्व पाहत बसतो याचा आहे.
पक्ष कोणताही असो जोपर्यंत भारत हा देश 'कोणत्यातरी' एका धर्माचा होत नाही तोपर्यंत असले फालतू धंदे असेच चालत राहणार आहेत.
कोणत्यातरी 'एका बाजूचेच' राहिले पाहीजे. 'मधले' झाले की पंचाईत होते.
16 Oct 2009 - 9:24 am | हर्षद आनंदी
म्हणूनच या होऊ घातलेल्या इंडीयाला \ मुघलीस्तानला अखंड हिंदुराष्ट्र बनविण्यासाठी मी निवडलेला मार्ग स्वातंत्र्यवीर सावरकर स्थापित "अखिल भारत हिंदु महासभा" या राजकीय पक्षाचे पुनरूथ्थान करण्याच्या कामाला हातभार लावणे. भाजपच्या उदयानंतर ह्या पक्षाची राजकारणावरची पकड ढिली होत गेली.
आत्ता झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये, श्रीमती हिमानी सावरकर यांनी कोथरूड विभागातुन तर श्री. मिलिंद एकबोटे यांनी कसबा विभागातुन "अखिल भारत हिंदु महासभा" या पक्षाच्या झेंड्याखाली निवडणुक लढवली.
या पक्षाचे पुणे नगर कार्यालय : शनिवार पेठेत, सावरकर सदन, दक्षिण मुखी मारुती जवळ सुरू आहे.
19 Oct 2009 - 9:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सनातन संस्थेवर मडगाव बाँबस्फोटाचा आरोप केला जातोय.
वाचताय ना बातम्या ? एक दुवा.
-दिलीप बिरुटे