प्रियजनांसाठी स्पेशल

गणपा's picture
गणपा in पाककृती
14 Oct 2009 - 6:07 pm

उद्या लेक आणि तिची आई (सौ) येतायत.. म्हटल त्यांच्या स्वगता साठी काही तरी खास करुया.

नेटावर भटकताना एक कृती दिसली.
So this is for your loved ones.

साहित्यः
कुंडीच्या आकाराचे कप. स्ट्रॉ.

मावा केक.

काळ्या / चॉकलेटी रंगाची बिस्कीटे. (मिक्सर मध्ये बारीक चुरा करुन)

आइसक्रिम.
गमी वर्म्स (ऑपशनल).
सजावटीसाठी फुलं

कृती:

१) मावाकेकचे गोलाकार तुकडे करुन कपच्या तळाशी ठेवावे.

२) कपच्या मधोमध, कपच्या उंचीचा स्ट्रॉ केक मध्ये उभा खोचा.

३) स्ट्रॉ च्या भोवतीने हव्या आसलेल्या चवीचे (फ्लेवरचे) आइस्क्रिम टाका.

४) गमी वर्म्स वरुन पसरा.

५) वरुन बिस्किटाच्या चुर्‍याचा थर लावा. फ्रिजर मध्ये ठेवा.

६) सर्व्ह करताना स्ट्रॉ मध्ये फुल अडकवुन द्या.

प्रतिक्रिया

प्रभो's picture

14 Oct 2009 - 6:15 pm | प्रभो

पाहिलो, वाचलो, खाल्लो आणी ढेकर दिलो....

गणप्या, लेका एक ग्लास दे ना इकडे पाठवून... =))

--प्रभो

सहज's picture

14 Oct 2009 - 6:22 pm | सहज

सही आहे!!

दिवाळीच्या शुभेच्छा!

दशानन's picture

14 Oct 2009 - 6:23 pm | दशानन

अरे कोणी आहे का....

.
.
.
.
.
.

द्या तोफेच्या तोंडी ह्या गणपाला ;)

अवलिया's picture

14 Oct 2009 - 7:24 pm | अवलिया

द्या तोफेच्या तोंडी ह्या गणपाला

दुस-याला का सांगता‍‍‍? तुमच्या तोफेत पाणी का?

गणपा ---- बेस्ट ! :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

बाकरवडी's picture

14 Oct 2009 - 6:25 pm | बाकरवडी

आहा .........
<:P <:P <:P <:P <:P <:P

मस्त आणि वेगळा प्रकार !
छान .

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

विसोबा खेचर's picture

14 Oct 2009 - 6:28 pm | विसोबा खेचर

काय बोलू??????????????

स्वाती२'s picture

14 Oct 2009 - 6:29 pm | स्वाती२

खासच!

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Oct 2009 - 6:37 pm | llपुण्याचे पेशवेll

गणप्या लेका कुठून कुठून शोधतोस इतक्या पाकृ?

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984

टारझन's picture

14 Oct 2009 - 6:42 pm | टारझन

छाण , जियो बेटा !!!

-(आईस्क्रिमप्रेमी) टारोबा फ्लेवर

प्रसन्न केसकर's picture

14 Oct 2009 - 6:51 pm | प्रसन्न केसकर

पाककृती आहे भाऊ. सदके जावा. तशीही बच्चुची दिवाळीची सुट्टी सुरु आहे, करुन घालतो एकदा. धन्स गणपा!

मदनबाण's picture

14 Oct 2009 - 7:02 pm | मदनबाण

गणा भाऊ यकदम झक्क्कास्स्स... :)

मदनबाण.....

सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो

लवंगी's picture

15 Oct 2009 - 5:48 am | लवंगी

आजच बनवुन पाहिली. बच्चेकंपनीनेच बनवली आणी खूप धमाल केली.
मी म्हातारीचे केस ( बुढ्ढीके बाल ) आईस्क्रीम घेतल होत.

वेताळ's picture

14 Oct 2009 - 7:31 pm | वेताळ

एकदम बेस्ट...आवडले .
वेताळ

अनिल हटेला's picture

14 Oct 2009 - 8:01 pm | अनिल हटेला

ह्या गनप्याचं कायतरी करा राव...
छळ लावलाये मेल्यानं......~X(
अवांतरः गणप्या,तुला आनी तुझ्या पाककॄतीज् ला साष्टांग दंडवत रे बाबा !!
:-)

(गणपा) चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!

;-)

सुमीत भातखंडे's picture

14 Oct 2009 - 9:33 pm | सुमीत भातखंडे

क्या बात है.
एकदम मस्त.

वेदनयन's picture

15 Oct 2009 - 1:48 am | वेदनयन

बायको आली - आता तरी थांबशिलना रे बाबा. च्यामारी काय वैताग होता.

पूढील एक वर्ष एकपण रेसिपी बघायला मिळायला नको तुझी. नायतर बघून घेऊ.

तळटीप - सगळ्या पाककॄतीज् छान!!!

रेवती's picture

15 Oct 2009 - 4:43 am | रेवती

सगळ्या रेशिप्या आवडल्या तशी हीसुद्धा आवडली. मला आधी वाटलं की कुंडीत फुलं लावलियेत्.......पण हे सरप्राईझ आवडलं. माझ्या मुलाचे मित्र आल्यावर मी हा प्रकार करून पाहीन.

रेवती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Oct 2009 - 10:13 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मलाही आधी फुलं, फळं, पानं असतील असं वाटलं. गणपासेठ, सुं द र सजावट!

अदिती

सुबक ठेंगणी's picture

16 Oct 2009 - 4:33 am | सुबक ठेंगणी

आंणि काय आता मातीच्या पण चविष्ट रेसिप्या शिकवतो आहेस की काय असं वाटलं :D
पण खरंच सही आयडिया आहे. मी घरी जायच्या आधी तिथल्या लोकांना शिकवून ठेवीन...माझं स्वागत करायला!

धनंजय's picture

15 Oct 2009 - 6:10 am | धनंजय

फारच कल्पक!

सुनील's picture

15 Oct 2009 - 6:37 am | सुनील

अभिनव प्रकार! पण हा नुसत्या स्ट्रॉने कसा खायचा? चमचा लागेलच.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

गणपा's picture

15 Oct 2009 - 10:25 am | गणपा

सोरी हा सुनील भौ, सांगायच रहुन गेल. हा पदार्थ चमच्यानेच खायचा आहे.
स्ट्रॉ फक्त फुलाना आधार द्यायला आहे.

हर्षद आनंदी's picture

15 Oct 2009 - 6:48 am | हर्षद आनंदी

गण गण गणपा बोले
पाकृंचा पाऊस पाडे
ओलेचिंब पावसात धुंद आम्ही
गणपाच्या पाकृंना तोड नाही

लगे रहो... अजुन सुध्दा स्वयंपाकघराचा ताबा सोडु नका...
चालु राहु देत...

दिपक's picture

15 Oct 2009 - 12:56 pm | दिपक

___/\___

दिपाली पाटिल's picture

15 Oct 2009 - 1:00 pm | दिपाली पाटिल

वा मस्तच...तुमच्याकडे अनंताचं झाडही आहे?? अजुन मस्त ..

दिपाली :)

मि माझी's picture

15 Oct 2009 - 2:54 pm | मि माझी

मस्त... तुमची कलात्मकता खुप आवडली.

मि माझी's picture

15 Oct 2009 - 2:54 pm | मि माझी

मस्त... तुमची कलात्मकता खुप आवडली.

मि माझी's picture

15 Oct 2009 - 2:54 pm | मि माझी

मस्त... तुमची कलात्मकता खुप आवडली.

चित्रा's picture

16 Oct 2009 - 2:29 am | चित्रा

मस्त आहे प्रकार. एकदम खूशच झाली असेल लेक.

गणपा's picture

16 Oct 2009 - 1:01 pm | गणपा

लेक तर लेक लेकीची आई पण ज्याम खुश :)

मुलीसाठी हरखून टाकणारा आणि बायकोसाठी एकदम रोमँटिक आहे! ;)
तुझ्या कल्पकतेला दाद!! >:D<

चतुरंग

प्राजु's picture

16 Oct 2009 - 8:19 pm | प्राजु

हेच राहिलं होतं बाकी..! शिकवा... लोकांना मातीच खायला शिकवा!!! ;)

काय तुफ्फान आहे हा प्रकार.. मुलाच्या मित्रमंडळींसाठी नक्कि होइल आता.. :) मस्त!!
तुझे आभार नक्की कितीवेळा मानावे हेच कळत नाही..
- प्राजक्ता पटवर्धन
http://praaju.blogspot.com/

प्रभाकर पेठकर's picture

17 Oct 2009 - 2:16 pm | प्रभाकर पेठकर

अतिशय आकर्षक पुष्परचना आणि त्यात लपलेले चविष्ट गुपित.

आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.

मसक्कली's picture

20 Oct 2009 - 10:27 am | मसक्कली

लै झ्याक आस्त्यत बगा तुमच्या पा.क्रु.

आवड्ल बुआ आपल्याला... :D

<:P : O) <:P :O) <:P :O)

<):) >:) <):) >:)
8} 8}
=)) =))

हाल करा लोकाचे गणपा शेट... ;)