'सेने'तिल काटे...

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
22 Mar 2008 - 11:33 am

प्रेरणा कवी 'अनिल'यांचे 'वाटेवर काटे..'हे अप्रतिम गीत. (स्वरबद्ध केलंय आपल्या अजरामर आवाजात पं.वसंतराव देशपांडे यांनी!)

'सेने'तिल काटे बोचून धावलो
वाटले फुला परि कुजून चाललो

जमवुनि 'मन'चेहि कधी, तोच 'हात' फेरूनि कधी
आपुलीच मुंबापुरि म्हणत चाललो

'उत्तरे' प्रमाद होत! 'शिशिराची' घेत साथ
'असीम','अमर', भैय्ये ठोकून चाललो

चुकता ही एक चाल, लागला 'विलासि' बोल
'शरदा'चे चांदणे शोधीत चाललो

खांद्यावर 'बाळ'गिले, ओझे ते 'उद्धरुन'
'नवनिर्माणा'स अता परत चाललो

चतुरंग

प्रतिक्रिया

सर्वसाक्षी's picture

22 Mar 2008 - 12:47 pm | सर्वसाक्षी

राजगीत सुरेख जमलय!

घटनाक्रम मोजक्या शब्दात पण नेमका मांडणे हे वैशिष्ठ्य पुन्हा जाणवले

मदनबाण's picture

22 Mar 2008 - 1:01 pm | मदनबाण

एकदम झकास आहे.

विसोबा खेचर's picture

22 Mar 2008 - 6:04 pm | विसोबा खेचर

कमाल केलीस बुवा! झक्कास विडंबन. कुठल्याही दर्जेदार मराठी वृत्तपत्रात अगदी मुख्य पानावर छापून यावे असे!

अजून काय दाद देऊ?

तात्या.

सुधीर कांदळकर's picture

23 Mar 2008 - 8:48 pm | सुधीर कांदळकर

या विषयावर्हि विडंबनात्मक का होईना कविता होऊ शकते?

आपल्या प्रतिभेस सलाम. (सौ. प्रतिभाताईंस नव्हे.)

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

इनोबा म्हणे's picture

24 Mar 2008 - 12:33 pm | इनोबा म्हणे

झकास...
मनसे आवडले...

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे