होळीच्या आणि धुळवडीच्या शुभेच्छा!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
22 Mar 2008 - 1:24 am

प्रतिक्रिया

प्राजु's picture

22 Mar 2008 - 1:59 am | प्राजु

सर्व मिपाकरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना माझ्यातर्फे होळीच्या शुभेच्छा..

आवांतर : अरे.. !!! मालकिणबाई तर साध्याच दिसताहेत. रंग खेळल्या नाहित वाटतं..! का रंगलेला फोटो पाठवला नाहि ??-

(सर्वव्यापी)प्राजु

चित्रा's picture

22 Mar 2008 - 6:56 am | चित्रा

तात्यांना आणि इतर मिपाकरांना होळीच्या शुभेच्छा!
दोन्ही फोटो छान!

विसोबा खेचर's picture

22 Mar 2008 - 7:36 am | विसोबा खेचर

अहो मी तर एकच फोटू लावलाय! दुसरा कुठला? की डाव्या समासातील रंगांचा आणि पुरणपोळीचा म्हणताय?

तात्या.

चित्रा's picture

22 Mar 2008 - 8:39 am | चित्रा

डाव्या समासातील रंगांचा आणि पुरणपोळीचा + अनुष्काताईंचा!

तात्या..........

व्यवहारात कोनतेही कार्यसिध्दी प्राप्त होण्यासाठी अभ्यासाची आवश्यकता आहे.
अभ्यास नित्यएनियमाने चालुं राहील तरच कार्यसिध्दी होउ शकेल. भंगवताने गीतेत सांगितले आहे.

" अथ चितं समाधतुं न शक्नोषि मय स्थिरम् |
अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय || "
............ गीता .............
अभ्यास नित्यनियमानें करणें हेंच सर्व बाबतींत श्रेयस्कर कार्य होय. अभ्यास नित्यनियमाने चालवित असतां देहाला, इंद्रियांना व मनाला एक प्रकाचे नियमित वळण लागते व त्यायोगे इंद्रिये व मनं कार्यक्षम बनूं शकतात. परमार्थमार्ग हा प्रापंचिकंना फारच अवघड वाटतो, कारण नित्याच्या प्रापंचिक व्यवहारपुढे पारमार्थिक कार्याचा बोजा वाढवून घेणे त्यांना शक्य नसते व सतत प्रापंचिक व्यवहाराच्या मार्या्मुळे इच्छा असूनसुध्दां पारमार्थिक उपासना करणे दुर्लभ घडते. परंतु प्रापंचिक व्यवहाराप्रमाणेंच जर पारमार्थिक उपासनेचा नित्यनियमित अभ्यास सुरु झाला. तर पारमार्थिक उपास हाही भाग प्रापंचिकांना नित्याच्या व्यवहारातील एक विषय होउन बसेल आणि म्हणुनच यासाठी उपासनेचे वळण लावण्यासाठी नियमित अभ्यासाची आवश्यकता आहे.

नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्मकर्मणः |
शरीरयात्राऽपि च ते न प्रसि प्रसिद्धयेदकर्म्णः ||
........... गीता ३,८ ............
यावरुन नियमित उपासनेची आवश्यकता पटेल यांत शंका नाही.
साधुसंतांनी प्रापंचिक लोकांचे इहप कल्याण होण्यासाठी भक्तिमार्गाची अनेक साधने निर्माण केली आहेत. तथापि प्रपंचाचा बोजा चालविण्यार्यांिना साधनाची महती समजुनसुध्दा, ते साधना करु शकत नाहीत. याचे कारण एकच की, त्यांना अभ्यासाचे वळण लागण्यासाठीच नित्यनियमित साधनांचा अभ्यास घडला पाहिजे. अशा प्रकारे साधनांचा नियमित अभ्यास करणें यालाच " नित्यनियम " म्हणावें.

आपल्या उपक्रमासाठी एक || प्रस्तावना || लीहण्यास घेतलि आहे. विषय आहे " गुरु कसा असावा किंवा गुरु कसा निवडावा " कुपया आपण शुद्ध् लेखन तपासुन प्रसारीत करनार का?.........

मिसळ पावच्या वाचकाना होळीच्या शुभेच्छा.................
संजिव

विसोबा खेचर's picture

22 Mar 2008 - 9:22 am | विसोबा खेचर

संजिवगुरुजी,

आपल्या उपक्रमासाठी एक || प्रस्तावना || लीहण्यास घेतलि आहे. विषय आहे " गुरु कसा असावा किंवा गुरु कसा निवडावा " कुपया आपण शुद्ध् लेखन तपासुन प्रसारीत करनार का?.........

व्यक्तिश: माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी लहानपणी शाळेत शिकलेले काही एक ढोबळ लेखननियम अवश्य पाळतो परंतु 'शुद्धलेखन' नावाचा काही प्रकार अस्तित्वात असतो असं मी तरी मानत नाही व मिपावरही शुद्धलेखनाचा फाजील आग्रह नसावा असे मानतो.

तरीही आज अनेकजण शुद्धलेखनाचा आग्रह धरतात ही वस्तुस्थितीदेखील मी नाकारत नाही व अश्या मंडळींचा आदर नाही, तरी अनादर नक्कीच करत नाही. तरी आपणास जर आपल्या लेखाचे शुद्धलेखन तपासून हवे असेल तर त्या बाबतीत मी आपणास काहीच मदत करू शकत नाही!

परंतु माझे काही मिपाकर मित्र मात्र आपणास नक्कीच मदत करतील असा विश्वास वाटतो. आपण कृपया चतुरंग, मुक्तसुनित, प्रमोदकाका, धनंजय यापैकी कुणालाही आपला लेख पोष्टकार्डाने पाठवा. त्यातील शुद्धलेखनाच्या चुका सुधारून संबंधित मंडळी आपले लेखन आपल्याला उलट टपाली पाठवतील. कृपया त्यांना पोष्टकार्ड पाठवताना 'तात्याच्या विनंतीवरून आपल्याला हे पोष्टकार्ड पाठवत आहे आणि शुद्धलेखन तपासण्याचं काम सोपवत आहे', असं म्हणा!

आपलं काम नक्की होऊन जाईल अशी खात्री वाटते!

आपल्या लेखाबद्दल उत्सुकता आहे!

शुभेच्छा!

आपलाच,
तात्या.

प्रमोद देव's picture

22 Mar 2008 - 9:14 am | प्रमोद देव

धुळवडी निमित्त माझ्याही समस्त मिपाकरांना मन:पूर्वक शुभेच्छा!
MoreOrkutText.com Holi Greetings

विसोबा खेचर's picture

22 Mar 2008 - 5:58 pm | विसोबा खेचर

देवकाका,

तुमच्या शुभेच्छा बाकी क्लासच आहेत. प्रसन्न वाटलं!

चित्रफितीतील तो डोक्याला टापशी बांधलेला इसम रंग टाकल्यावर जसा प्रसन्नपणे हसतो, आनंदीत होतो, प्रत्येक माणसाने अगदी तसंच आयुष्यभर आनंदी रहावं असं वाटतं!

काय म्हणता? :)

आपला,
(आनंदीत) तात्या.

चतुरंग's picture

22 Mar 2008 - 6:26 pm | चतुरंग

मस्त शुभेच्छापत्र!
'रंगुनी रंगात सार्‍या रंग 'मिपा'चा वेगळा!" असे उस्फूर्तपणे मनात आले.
सर्वांना होलिकोत्सव आणि रंगपंचमीनिमित्त सप्तरंगी शुभेच्छा!!

चतुरंग

देवदत्त's picture

22 Mar 2008 - 5:49 pm | देवदत्त

सर्वांना होळी,रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..

लग्नकार्याच्या विरामानंतर मिसळपाव वर परत आलो तर काय पाहतो...
वेगवेगळ्या विषयांवर लेख, काथ्याकूट, कविता ओसंडून वाहत आहेत. मधे मिसळपावचे मुखपृष्ठही बदललेले पाहिले. भरपूर नवीन सभासद (की कस्टमर? ;) ) आलेत.

विश्लेषण केल्यास नक्कीच ह्या २० २५ दिवसांत जास्त लेख/प्रतिक्रिया लिहिल्या गेल्यात असे दिसेल :)
अशाच भरभराटीची कामना करत मिसळपावला पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा.

स्वाती राजेश's picture

22 Mar 2008 - 7:33 pm | स्वाती राजेश

सर्वांना होळी,रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!!!!!

गोट्या's picture

22 Mar 2008 - 7:49 pm | गोट्या (not verified)

सर्वांना होळी,रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

सृष्टीलावण्या's picture

23 Mar 2008 - 8:51 am | सृष्टीलावण्या

अनेक भारतीय शास्त्रीय संगीतातले राग आठवतात. बिरज मे धूम मचायों श्याम, होरी खेलत
कान्हा इ.इ. शब्द आठवतात. समस्त मिपाकर, भारतीय आणि रंगप्रेमींना होळीच्या लक्षशुभेच्छा.

>
>
मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

विसोबा खेचर's picture

23 Mar 2008 - 9:10 am | विसोबा खेचर

अनेक भारतीय शास्त्रीय संगीतातले राग आठवतात. बिरज मे धूम मचायों श्याम,

'बिरज मे धूम मचावत श्याम' ही भीमपलास रागातली पारंपरिक बंदिश आहे. भीमपलास आणि त्यातली ही बंदिश, दोन्ही अतिशय गोड आणि सुरेख आहेत.

आग्रा घराण्याच्या गायिका शुभ्रा गुहा यांनी गायलेली ही बंदिश इथे ऐका. आमचे अण्णादेखील ही बंदिश फार सुरेख गातात!

आपला,
(भीमपलासप्रेमी) तात्या.