२००९ मिपा गौरव "नोबल" पुरस्कार
नामांकनः २००९
हे सदर चर्चाकारांकरता व चर्चाप्रस्तावकांकरता आहे. आपण मराठी माणसं वैचारिक, आणि बुद्धीवादी वगैरे चर्चा करण्यात एकदम पटाईत असतो.
कृपया आपण आपले नामांकन (स्वत: चे नामांकन करता येणार नाहि) सदर नमुन्यात सादर करावे:
नाव :
वर्गिकरण : (उदा. "शांतता","रसायन शास्त्र", "भौतिक शास्त्र", "समाज शास्त्र", इ. इ )
कारणः ( उदा. विशेष कार्य, लेख, इ. इ )
येथे होणार्या चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी इच्छा आहे. नामांकनाची अंतिम तारीख ओक्टोबर १५ ,२००९. परीक्षकांचा निर्णय बंधन कारक व अंतिम राहिल. कृपया माझे नामांकन कोणी हि करु नये ( अवलियास विशेष विनंती).
(टिपः चर्चा आटोपशीर असावी.शुध्दलेखनास हसु नये. शक्यतो मराठित नामांकन सादर करावे. शुध्दलेखनाच्या चुका झाल्या तरी चालतील. संपादन करण्याचे अधिकार राखिव )
प्रतिक्रिया
10 Oct 2009 - 12:48 pm | विष्णुसूत
कृपया नाव,वर्गिकरण आणि कारण हि तिनहि सदर पूर्ण असावित.
कारण हे सदर अतिशय महत्वाचे आहे. पुरस्कार विजेत्यास कळवण्यास हे सदर परीक्षकांच्या व विजेत्यास उपयोगी आहे. आपल्याला हा पुरस्कार का मिळाला हे पुरस्कार विजेत्यास ह्या सदरा मुळे समजु शकेल. ( ओबामा चा झाला तसा घोटाळा होणार नाहि)
धन्यवाद
10 Oct 2009 - 12:55 pm | अवलिया
चांगली चर्चा होईल माझ्यातर्फेची नामांकने
शांतता - बिकाशेट उंटवाले
तीन जणांमधले भांडण कौशल्याने सोडवले. कोण तिघे विचारु नये शांततेचे नोबेल डोक्यात मारले जाईल
रसायनशास्त्र -राजे
विविध रसायनांचा अभ्यास, त्यांचे होणारे परिणाम याचा गाढा अभ्यास
सामाजिक संशोधन - विजुभाउ
यांच्या पोतडीतुन संशोधित होवुन काय बाहेर येईल हे कित्येकवेळा यांनाच माहित नसते.
वाङमय - सखाराम गटणे
एका ओळीचे धागे, दोन शब्दाचे धागे, कौल ईत्यादी माध्यमातुन मायमराठीची सेवा
भौतिक शास्त्र - शशिकांत ओक
मुळात हे बहुतेकशास्त्र असे मुळ विषयाचे नाव होते, ते अपभ्रंश होवुन भौतिक शास्त्र झाले. बहुतेकशास्त्रावर ओकांचे गाढे प्रभुत्व आहे.
खगोलशास्त्र - अदिती व युयुत्सु विभागुन
मुकाट्याने अनुमोदन द्या, विक्षीप्तपणा करु नका
लाईफटाईम - तात्या
आता उरलो डरकाळ्यापुरता. लेखन वगैरेतुन मन उबगले असल्याने आता ते काही लिहिणारच नाहीत ही खात्री आहे. सबब एकदाचा पुरस्कार देवुन टाकावा असे वाटते.
तरी माझ्याप्रस्तावावर गांभीर्याने विचार व्हावा ! :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
10 Oct 2009 - 1:15 pm | विष्णुसूत
अवलिया,
सर्व मंडळी मराठि आहेत हयाची खात्री आहे का?
हा पुरस्कार फक्त मराठि जनां साठिच आहे.
काहि चॅनल /पक्ष /वेबसाइट्स मराठि माणसांना शेअर मार्केट मधे पैसे कमावण्याचे आश्वासन देतात. तसे इथे नाहि.
इथे आपण मराठि माणसाला फक्त पुरस्कार च नाहि तर नोबल पुरस्कार देणार आहोत. (म्हराटि नोबल असे हि ह्या पुरस्कारास काहि जाणकार संबोधतात)
10 Oct 2009 - 1:17 pm | अवलिया
का ? आपल्याला का संशय??
जो मराठी बोलतो तो मराठी. बास. विषय संपला.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
12 Oct 2009 - 8:51 am | दशानन
रसायनशास्त्र -राजे
विविध रसायनांचा अभ्यास, त्यांचे होणारे परिणाम याचा गाढा अभ्यास
परवा शनिवारीच आमच्या सोडण्याला ३ आठवडे झाले व प्रयोग बंद झाले.... त्याच्या दर्दभ-या आठवणीमुळे व वियोगामुळे श्री अवलिया ह्यांना मी विनंती करत आहे की माझे ही नामांकन परत घ्यावे.
:(
मदिरा विना... तळमळत असलेल्या माझ्या ग्लासाला हा प्रतिसाद अर्पित.
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
12 Oct 2009 - 8:55 am | श्रावण मोडक
मदिराविना होय! मी म्हटलं...
10 Oct 2009 - 1:07 pm | टारझन
चालू द्या !! वाचतोय !!
बाकी नान्या ,.,,, निगेटिव्ह पब्लिकशिटीची सुपारी घेतलीये का ?
भाषासास्त्रासाठी सदानंद लिमयांचा समावेष न केल्याबद्दल नान्याचा निषेध !!
निबंधशास्त्रासाठी कोब्या लिमयेंचा समावेश नाही, सबब पुन्ह:श्च निषेध !!!
काव्यशास्त्र ? नको .. थांबतो :)
10 Oct 2009 - 1:13 pm | अवलिया
हॅ हॅ हॅ
लिमये आणि लिमये आणि लिमये आणि..... लिमये यांचे सुचक तुम्ही असतांना आम्ही ते कार्य करणे उचित नाही असे आमच्या मनोदेवतेने सांगितले. तेव्हा आपणच ते शिवधनुष्य उचलावे असे आम्ही प्रांजळपणे नमुद करतो. आपल्या प्रस्तावास आम्ही अनुमोदन तर देवुच देवु पण त्याचबरोबर त्यास विरोध करणारे कुणी नतद्रष्ट इसम या अवनीतलावर असलेच तर त्यांना त्यांच्या मस्तिष्कावर दोन प्रहार आपल्यासाठी करवुन देवु. असो.
अधिक काय लिहिणे? आपण सुज्ञ आहातच.
लेखनसीमा.
हुश्श च्यायला किती अवघड रे हे लिहिणं
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
10 Oct 2009 - 1:22 pm | टारझन
बांचोद बाझवला =)) =)) =))
लेका .. काय जमतंय तुला ? "उपहासात्मक जिवनाच्या उत्तेजनार्थ -२ " लिह्तो का ?
बाकी " जो मराठी बोलतो तो मराठी " हे वाक्य हृदयाला भिडले !!
10 Oct 2009 - 1:29 pm | सुधीर काळे
बांचोद बाझवला?
हर, हर, हर!
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
10 Oct 2009 - 1:31 pm | अवलिया
बाप रे ! तीन तीन एका वेळेस ???
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
10 Oct 2009 - 2:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
यथा राजा तथा प्रजा।
अदिती
10 Oct 2009 - 5:33 pm | सुधीर काळे
या पोस्टवर मला आलेला एक खासगी प्रतिसाद. ( लोक थेट का लिहीत नाहीत बॉ? )
<< हाहाहा गीर्वाणवाणी हाहाहा >>
हर, हर, हर!
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
10 Oct 2009 - 2:57 pm | llपुण्याचे पेशवेll
सुंदर प्रस्ताव. कल्पना देखील सुंदर आहे. आमचे अनुमोदन आहे. मराठी माणसास नोबेल मिळावा अशी आमची पूर्वीपासूनची इच्छा.
आता आमचा लेटेस्ट कवितासंग्रह 'बुधवारच्या कविता' आणि 'पुरुषप्रधान कथा' 'थूंकू' याचा नोबेल साठी विचार व्हावा. पण अर्थात आम्हीच आमचे नाव कसे सुचवणार. चायला आमचा सगळा कंपू कुठे गेला, एक साला उपयोगाचा नाही. कसे हे लोक संकेतस्थळ काढून चालवणार कोणास ठाऊक. आता पर्यंत आमच्यासाठी ५०-६० तरी नॉमिनेशन जायला पाहीजे होती.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
11 Oct 2009 - 9:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पेशवे यांचे नाव मी "मिपाबल" (= मिपावरचे नोबल) पुरस्कारासाठी दोन क्याट्यागर्यांमधे (प्रतिशब्दः आघाडी?) सुचवत आहे, एक साहित्याची आणि दुसरी शांतता.
आणि या अशा पुरस्कारांचा वीट येऊन मी आता असे काहीही पुरस्कार स्वीकारणार नाही असं ठरवलं आहे, तेव्हा आमचं नॉमिनेशन कोणीही देऊ नये अशी मी मिपा स्वयंभोचक संघाच्या कार्यकर्त्यांना जाहीर विनंती करते.
अदिती
11 Oct 2009 - 9:18 pm | श्रावण मोडक
अनुमोदन!
12 Oct 2009 - 8:00 am | छोटा डॉन
अदितीच्या उदात्त विचारांना मोडकांच्या अनुमोदन देण्याला सहमत आहे.
असेच म्हणतो.
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
12 Oct 2009 - 9:58 am | विजुभाऊ
अदितीच्या उदात्त विचारांना मोडकांच्या अनुमोदन देण्याला सहमत आहे.
अदितीच्या उदात्त विचारांना मोडकांच्या अनुमोदन देण्याला सहमत असलेल्या छोट्या डॉन्याला सहमत असण्याशी सहमत आहे .
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
12 Oct 2009 - 10:00 am | ब्रिटिश टिंग्या
वरील सग'ळ्यांना!
12 Oct 2009 - 10:04 am | निखिल देशपांडे
आम्हीबी... सहमत
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
12 Oct 2009 - 4:05 pm | प्रसन्न केसकर
अदितीचे विचार अन त्यावरचे प्रतिसाद सार्याशीच सहमत आहे.
10 Oct 2009 - 3:00 pm | विनायक प्रभू
प्रभाग पण विचारात घ्यावेत.
उदा.:......
10 Oct 2009 - 11:26 pm | विष्णुसूत
जरुर ... प्रभाग विचारात घेतले जातील.
12 Oct 2009 - 8:47 am | सुधीर काळे
विभाग, वर्ग व प्रकार हे तीन शब्द मला शब्दकोषात सापडले!
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
10 Oct 2009 - 3:04 pm | सूहास (not verified)
काही सपांदक " रोशनी " टाकतील का ????
मॅटर खतम
१७६० लेख , ६१६२ वाचने , ० प्रतिसाद..
सू हा स...
10 Oct 2009 - 3:59 pm | प्रशांत उदय मनोहर
चालशास्त्रविनोदसाठी देवकाकांचं नामांकन करावं.
तसेच 'चांगल्या' चालीच्या व्यक्तींचा देवपुरस्काराने गौरव करावा.
आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
10 Oct 2009 - 5:16 pm | छोटा डॉन
वा वा, छान कल्पना आहे.
ह्या उपक्रमास आमच्या शुभेच्छा ...
बाकी पुरस्कार ( आम्ही सोडुन ) कोणालाही मिळो त्याला आम्ही पाहुन घेऊ.
आमच्याइथुन प्रकाशित होणार्या "बेंगलोर ट्रिब्युन" मधुन टिका करणारा एक तडाखेबंद लेखच लिहतो, शिवाय मिपावर लेखांचा रतिब आहेच...
चालु द्यात, फक्त विजेत्याचे नाव आम्हाला कळवा म्हणजे झाले ...!!!
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
10 Oct 2009 - 10:02 pm | विष्णुसूत
अनेक चांगली नामांकने येत आहेत. राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरा वरील सन्माननीय असे नामांकित लेखक/लेखिका/सामाजिक कार्यकर्ते तर ह्या यादित आहेतस पण काहि उदयोन्मुख असे कार्यकर्ते हि आहेत.
समिती ने अशा उदयोन्मुख गुणिजनांना उत्तेजन पर हा पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे प्रत्येक वर्गिकर्णात "उत्तेजनार्थ" हे उप-वर्गिकरण असेल ह्याची नोंद घ्यावी.
अजुन काहि वर्गिकरण आहेतः "अशांतता" , "असभ्यता", "अशक्य संपादन" इ. इ
जर कोणास अजुन काहि वर्गिकरण नामांकित करण्याची इच्छा असेल तर जरु करावे. स्वागत आहे.