वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते -२००९

जिवाणू's picture
जिवाणू in काथ्याकूट
7 Oct 2009 - 1:52 pm
गाभा: 

सजीवांची वाढ व विकास हे पेशिविभाजनाने होत असते. पेशींच्या वाढीची विशिष्ट सायकल असते ती चार भागात विभागलेली असते.
१) G - 1 : ह्या फेज़ मधे विविध विकर तयार होतात, जी DNA च्या Replication ( म्हणजे DNA ची जशी संरचना तसाच DNA तयार करणे.)
२) S : ह्या फेज मधे २ सारख्या गुणसूत्रांचे संच तयार होतात.
३) G - 2 : ह्या फेज़ मधे प्रथिने तयार केली जातात, जी माइक्रोट्युब्यूल्स च्या निर्मितीसाठी वापरली जातात. हि माइक्रोट्युब्यूल्स पेशींच्या विभाजनासाठी कार्य करतात. हि प्रकिर्या मिटोसिस (Mitosis) मधे होत असते.
४) M : M म्हणजे Mitosis ,ह्या फेज़ मधे सुरू होते. ह्यात केंद्रकाचे तसेच पेशींचे विभाजन होते. त्याला अनुक्रमे कर्यॉकिणेसिस ( Karyokinesis) व स्यटोकिनेसिस ( Cytokinesis) म्हणतात. त्यासोबतच नवीन पेशीचे आवरण देखील तयार होते. हि फेज़ पाच भागात विभागलेली असते.
अ. Prophase.
ब. Prometaphase.
क. Metaphase,
ड. Anaphase ,
ई. Telophase.
तर अशाप्रकारे १ पेशी सायकल (Cell Cycle) पूर्ण होते. सामान्य सजीवांच्या अर्भकात ह्या सायकलची पुनुरावृत्ती साधारणत: ४० ते ६० वेळा होते. ज्यावेळी पूर्ण गुणसूत्र तयार होते त्यावेळेला , गुणसूत्राच्या शेवटच्या टोकवरील काही DNA ची पुनुरावृत्ती होऊन ते टोपीसारखे घट्ट बसतात की जेणेकरून गुणसूत्रांची जी गुन्ढाळी असते ती सुटू नये व गुणसूत्रांतील DNA चे संरक्षण व्हावे. तर ह्या टोपीला Telomere अस म्हणतात. ज्यावेळेला पेशीवीभाजन आवश्यक असते, तेव्हा ही Telomere नष्ट होतात आणि पेशी विभाजन पूर्ण झाल्यावर पुन्हा टोपीसारखी गुणसूत्राच्या टोकावर स्थानापन्न होतात. ह्या त्यांच्या कार्यासाठी Telomerase reverse transcriptase ह्या विकराची मदत होते. तर ह्या सर्व लेखनाचा प्रपंच असा की एलिझाबेथ ब्लॅकबर्न, कॅरोल ग्राइडर आणि प्रा. जॅक त्झोस्ट्याक या शास्त्रज्ञांचा यंदाचे वैद्यकशास्त्रासाठीचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे. त्यांचा मूळ संशोधनाचा विषय Telomere आणि त्याच्याशी संबंधित विकर हा आहे. ई- सकाळ मधे ह्यावर डॉ. अनिल लचके ह्यांचा सुंदर लेख आलेला आहे. त्यासाठी हा दुवा देत आहे.
http://beta.esakal.com/2009/10/06193124/editorial-hormone-research.html
तसेच हेहि वाचा.
http://timesofindia.indiatimes.com/news/world/us/3-Americans-share-2009-...
मानवी वैद्यकशास्त्राची ही प्रगती मैलाचा दगड ठरावी , कारण ह्या शोधामुळे कर्करोगाच्या अधिक खोलात शिरून त्यावर काही उपाययोजना करता येईल. तसेच जस वय वाढत जात ,तस Telomere ची लांबी कमी होत जाते. म्हणजे ह्यांचा अधिक अभ्यास करून जर Telomere ची लांबी कमी होण थांबविता किंवा लांबविता आल तर काही वर्ष का होईना ,पण आपण उशिराने म्हातारे होऊ अशी आशा करायला काय हरकत आहे.
ह्या नोबेल विजेत्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा.

प्रतिक्रिया

ज्ञानेश...'s picture

7 Oct 2009 - 4:07 pm | ज्ञानेश...

छान बातमी आणि लेख.
नोबेलविजेत्यांचे अभिनंदन.

"Great Power Comes With Great Responsibilities"

सहज's picture

7 Oct 2009 - 4:18 pm | सहज

माहीतीपूर्ण लेख. दुव्याबद्दल धन्यु. वाचतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Oct 2009 - 5:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नोबेल विजेत्यांचे अभिनंदन आणि माहितीपूर्ण लेखाबद्दल आभार..!

वेंकटरमण रामकृष्णन या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञास नोबेल मिळाले त्यांचेही अभिनंदन...! [मटाची बातमी ]

-दिलीप बिरुटे

दीपक साळुंके's picture

7 Oct 2009 - 11:06 pm | दीपक साळुंके

माहितीपूर्ण लेख ! आभार !

नोबेल विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन ! विशेष करुन वेंकटरमण यांचे ! [:)]

धनंजय's picture

8 Oct 2009 - 6:43 pm | धनंजय

छान माहिती दिलीत.

या "टेलोमिअर" टोप्यांचा स्वास्थ्याशी संबंध दोन प्रकारे येतो. १. टोपी कधील न उतरवण्याचा अतिरेक, आणि २. टोपी सहज उतरवून ठेवण्याबाबत अतिरेक.

१. टोपी कधीच उतरवून ठेवली नाही, तर पेशी पुन्हा-पुन्हा विभाजित होऊ शकते, संख्यावाढीला अंतिम ताळतंत्र राहात नाही. कॅन्सरमधील वाढणार्‍या पेशींचा हा प्रकार.
२. टोपी फार लवकर उतरवून ठेवली, तर इंद्रिये दुरुस्त करण्यासाठी सुद्धा पेशी विभाजित होऊ शकणार नाहीत. इंद्रिये पेशी-पेशी करत नादुरुस्त होत जातील, आणि हे इंद्रियांचे वृद्धत्वाने येणारे वैकल्य होय.

या दोन्ही बाजूंनी विचार करणार्‍यांसाठी या वर्षीच्या पुरस्कृत वैज्ञानिकांनी खुराक दिलेला आहे.