'बाटा' रुते..

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
21 Mar 2008 - 1:19 am

कै.शांताबाई शेळक्यांची अप्रतिम रचना 'काटा रुते कुणाला' हे स्फूर्तिस्थान!

'बाटा' रुते कुणाला आक्रंदतात कोणी
'अनवाणि' ही चलावे हा 'पुण्य'योग आहे!

सांगू कसा कुणाला सल 'आतल्या खिळ्याचा'?
चिरकाल 'योजनेचा' मज शाप हाच आहे!

रस्ते करु पहाता रुजतोच 'अर्थ' तेथे
कंत्राटि काम तेही विपरीत होत आहे!

जन मूढ, बेरकी का, 'नेते'च ते कळेना
'कर'भार वाढवोनी मी रिक्तहस्त आहे!

चतुरंग

प्रतिक्रिया

केशवसुमार's picture

21 Mar 2008 - 1:22 am | केशवसुमार

बाटा रुते कुणाला... हा हा हा..
सुंदर विडंबन...आवडले..
केशवसुमार

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Mar 2008 - 11:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाटा रुते कुणाला... !!!
सुंदर विडंबन..!!!!

इनोबा म्हणे's picture

21 Mar 2008 - 1:28 am | इनोबा म्हणे

चतूरंगराव जबरा विडंबन
असेच चौकार मारत रहा.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

ब्रिटिश टिंग्या's picture

21 Mar 2008 - 1:46 am | ब्रिटिश टिंग्या

आवडले....

१ शंका : पहिले २ कडवे आणि शेवटच्या २ कडव्यांमध्ये काही लिंक लागत नाहीये हो.....पहिली २ कडवी बुटांविषयी तर नंतरची २ भ्रष्टाचार वगैरे विषयक.....आमच्या बाल-बुद्धीला झेपले नाही हे......कृपया खुलासा झाला तर बरे होइल....बाकी आगाउपणा केल्याबद्दल राग नसावा....

आपला,
(भलताच शंकेखोर) छोटी टिंगी

चतुरंग's picture

21 Mar 2008 - 2:17 am | चतुरंग

सगळ्याच कडव्यात भ्रष्टाचाराचीच लिंक आहे!
नीट अभ्यासून बघणे.

चतुरंग

ब्रिटिश टिंग्या's picture

21 Mar 2008 - 2:21 am | ब्रिटिश टिंग्या

आम्हाला कळायला वाईच येळ लागतो खरा.....

(मंदबुद्धी) टिंग्या......

बेसनलाडू's picture

21 Mar 2008 - 1:47 am | बेसनलाडू

मस्त विडंबन. आवडले.
(हसरा)बेसनलाडू

प्राजु's picture

21 Mar 2008 - 4:04 am | प्राजु

एकदम जबरा....

- (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर's picture

21 Mar 2008 - 10:47 am | विसोबा खेचर

रस्ते करु पहाता रुजतोच 'अर्थ' तेथे
कंत्राटि काम तेही विपरीत होत आहे!

जन मूढ, बेरकी का, 'नेते'च ते कळेना
'कर'भार वाढवोनी मी रिक्तहस्त आहे!

वा वा! सामाजिक आशय असलेलं अत्यंत दर्जेदार विडंबन...

तात्या.

भोचक's picture

21 Mar 2008 - 10:57 am | भोचक

मजा आला. वा!!!

ॐकार's picture

21 Mar 2008 - 12:32 pm | ॐकार

विडंबन आवडले!

अविनाश ओगले's picture

21 Mar 2008 - 1:05 pm | अविनाश ओगले

'कर'भार वाढवोनी मी रिक्तहस्त आहे!
हे विशेष आवडले.

स्वाती दिनेश's picture

21 Mar 2008 - 1:17 pm | स्वाती दिनेश

विडंबन आवडले.एकदम मस्त!
स्वाती

सुधीर कांदळकर's picture

21 Mar 2008 - 7:38 pm | सुधीर कांदळकर

धन्यवाद. शुभेच्छा.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

प्रा सुरेश खेडकर's picture

21 Mar 2008 - 10:18 pm | प्रा सुरेश खेडकर

आवडले. अभिनंदन.

वरती एका प्रतिसादात काव्याच्या पहिल्या दोन द्विपदींचा संदर्भ लागत नाही असे मत कळले. त्या अनुषंगाने काव्याचे थोडे अर्थ विवेचन द्यावे असे वाटल्याने हा प्रपंच -

पहिली द्विपदी -
वाच्यार्थ - बाटाचे पायताण रुतते आणि आक्रंदन होते, आता अनवाणी चालण्याचीच पाळी या पुण्यनगरीत आली आहे .
गर्भित - भ्रष्टाचाराची सूज अंगावर बाळगणार्‍यांच्या पायांना बाटाचे आरामदायी पायताणही रुतते आणि एकीकडे समान्यलोकांचे आक्रंदन चालू आहे.
त्या भ्रष्ट लोकांनी अनवाणीही चालून बघावे.

दुसरी द्विपदी -
वाच्यार्थ - पायताणातला खिळा सलतो आहे, सतत नवीन पायताण घेणे हीच योजना बनून राहिली आहे.
गर्भित - ह्या संपूर्ण व्यवस्थेमधल्या 'आतल्या गोटातल्या' भ्रष्टाचारी लोकांचा (खिळ्यांचा) मनातला सल/दु:ख कोणाला सांगू? कारण ऐकायलाच कोणी नाही.
सातत्याने चालणार्‍या रस्ते दुरुस्तीच्या योजनांचा शाप पाठीस लागला आहे.

चतुरंग

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Mar 2008 - 1:22 am | llपुण्याचे पेशवेll

चतुरंगराव आपले विडंबन उत्तमच. आपली रुपके तर अप्रतिम आहेत.
पुण्याचे पेशवे

गोट्या's picture

22 Mar 2008 - 8:06 pm | गोट्या (not verified)

सुंदर विडंबन..!

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

नि३'s picture

5 Apr 2008 - 10:41 am | नि३

का बे लेका मस्त लिहल बे.
(नागपुर वासि नितिन)

असेच अजून एक

http://www.davbindu.com/marathi_vidamban.htm

'बाटा' रुते कुणाला,
आक्रंदतो इथे मी,
मज बूट हे रुतावे,
हा दैवयोग आहे!
(आहे वर तान घ्यावी,
नाहीतर बूट चावतो आहे
हे लक्षात कसे येणार?)
रुते कुणाला....!
सांगु कशी कुणाला,
कळ हाय अंगठ्याची,
हे बूट घालता मी,
अस्वस्थ फार आहे!
(आ.व.ता.घ्या.)
रुते कुणाला....!

चांभार हाय वैरी,
असतो कुठे दुपारी,
म्हणूनी जुनीच आता,
पायी वहाण आहे!
रुते कुणाला.....!

अंगठा विभक्त झाला,
तळवा फकस्त राहे,
हे चालणे बघा ना,
भलतेच मस्त आहे!
रुते कुणाला....!

फुटले नशीब आता,
ह्या दोन पावलांचे,
माझ्या जुन्या वहाणा,
ढापून चोर 'जा', 'ये'!
(म्हणजे चोर माझ्या जुन्या
वाहाणा घालुन माझ्यासमोरुनच
'ये-जा' करतोय)
रुते कुणाला..!

हा 'पायगुण' माझा,
आहे असा करंटा,
नुकताच मंदिरी त्या,
बदलुन बूट राहे!
रुते कुणाला..!
-मानस

चतुरंग's picture

5 Apr 2008 - 6:56 pm | चतुरंग

एकाच गाण्याचे किती वेगवेगळ्या प्रकारे विडंबन!
चतुरंग

मदनबाण's picture

5 Apr 2008 - 6:06 pm | मदनबाण

चतुरंगजी आणि मीनलताई..... आपले विडंबन आवडले!!!!!

(विडंबन प्रेमी)
मदनबाण