मिपाकरांच्या कट्ट्याला शुभेच्छा! :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
20 Mar 2008 - 1:15 pm

राम राम मंडळी,

येत्या शनिवारी मिसळपावकरांचा पहिलावहिला कट्टा पुण्यात साजरा होतो आहे, ही मिसळपावच्या दृष्टीने आणि मला वैयक्तिकरित्या खूप खूप आनंद देणारी गोष्ट आहे.

गेल्या वर्षी गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर मिसळपाव डॉट कॉम सुरू झाले आणि आजमितीस मिसळपाव इथपर्यंत वाटचाल करू शकले, याचे सर्व श्रेय केवळ अन् केवळ मिपाच्या सभासदांनाच जाते!

मंडळी, अहो शेवटी तुम्हीआम्ही सर्वजण संगणकाच्या, आंतरजालाच्या या आभासी दुनियेतली माणसं! तरीही या आभासी दुनियेत रोज आपण घटकाभर एकमेकांना भेटतो, भांडतो, रडतो, हसतो-खिदळतो, मजा करतो!

परंतु काही हौशी, तरूण मिपाकरांनी या आभासी दुनियेतून बाहेर पडून प्रत्यक्ष भेटायचे ठरवले आहे, कट्टा करायचे ठरवले आहे, हीच मोठी समाधानाची बाब आहे. अहो शेवटी माणसं जोडणं महत्वाचं आणि तेच हे हौशी मिपाकर कट्टा भरवून करत आहेत!

काही महत्वाच्या घरगुती कारणांमुळे मला या कट्ट्याला उपस्थित राहता येणार नाही याचा खूप खेद वाटतो. जर मला या कट्ट्याला हजर राहता आले असते तर मला निश्चितच खूप आनंद वाटला असता!

कोई बात नही, पुन्हा केव्हातरी!

असो..!

'क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा!'

असं अण्णा माडगुळकरांनी म्हटलं आहे. माणसांचा मेळ हा क्षणिकच आहे परंतु त्या मेळाचे काही क्षणच अत्यंत आनंददायी ठरावेत, स्मरणात राहणारे ठरावेत,हीच माझी मिपाच्या पहिल्यावहिल्या कट्ट्याला मनापासूनची शुभेच्छा!

सोबत खास मिपा कट्टेकरींकरता एक शुभेच्छाकार्ड जोडले आहे तेवढे गोड मानून घ्या!

तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे |
तुझे गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे ! :)

आपला,
(आनंदीत) तात्या अभ्यंकर.

प्रतिक्रिया

तात्या तुम्ही नाही ........निदान अनुष्का वहीनीना तरी पाठवुन द्या रीप्रेझेन्टेटीव्ह म्हणुन....
तुम्ही येणार नाही म्हणून वाईट वाटलेला.......विजुभाऊ

इनोबा म्हणे's picture

20 Mar 2008 - 1:26 pm | इनोबा म्हणे

आमी तर समजत होतो तुम्ही येताय म्हणून.असो.घरच्या अडचणी असतील तर टाळता येण्यासारख्या नाहीत्.छोटा डॉन यांनीही "काही कारणामुळे यायला जमणार नाही" असे कळवलेले आहे.
आपल्या जमणार असेल तेव्हा सांगा,तुमच्यासाठी खास पुन्हा कट्टा भरवू.

आणखी कुणाच्या काही अडचणी असतील तर तत्काळ कळवावे.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

इनोबा म्हणे's picture

20 Mar 2008 - 1:26 pm | इनोबा म्हणे

आमी तर समजत होतो तुम्ही येताय म्हणून.असो.घरच्या अडचणी असतील तर टाळता येण्यासारख्या नाहीत्.छोटा डॉन यांनीही "काही कारणामुळे यायला जमणार नाही" असे कळवलेले आहे.
आपल्या जमणार असेल तेव्हा सांगा,तुमच्यासाठी खास पुन्हा कट्टा भरवू.

आणखी कुणाच्या काही अडचणी असतील तर तत्काळ कळवावे.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

धमाल मुलगा's picture

20 Mar 2008 - 1:59 pm | धमाल मुलगा

तात्याबा,

खर॑ तर आपण येत नाहीत म्हणल्यावर आमचा निम्मा उत्साह ढेपाळलाच.
पण एकदा ठरवल॑ म्हणजे ठरवल॑. शे॑डी तुटो वा पार॑बी...

असो, आपल्या (आणि अनुष्कावहिनीच्या) शुभेच्छा॑बद्दल लय लय आभारी आहे !

आणि भेटीच॑ काय हो, तुम्ही सा॑गा कधी जमायच॑ परत...आपण परत धमाल उडवून देऊ...काय?
तस॑ही छोटा डॉन, आन॑दयात्री, नाना चे॑गट(बहुतेक) ह्या॑ना २९-३० मार्चला जमत॑ आहे. ते॑व्हा आपणास जमेल काय?

अवा॑तरः आत्ताच बिरुटे सरा॑चा फोन आला होता. आम्ही हे जे काही करतो आहोत त्याबद्दल खास शुभेच्छा देण्याकरता और॑गाबादहून देखील ही आपली माणस॑ स॑पर्क करताहेत, ह्या नाही तर त्या प्रकारे सोबत करताहेत हे बघून खर॑च मन भरुन आल॑.

बिरुटे सर, धन्यवाद...शतशः धन्यवाद.

म्हणूनच मी मिसळपाव.कॉमला माझ॑ दुसर॑ घर म्हणतो.

सद्गदित
- तुमचाच धम्या उर्फ धमाल्या

विसोबा खेचर's picture

20 Mar 2008 - 6:08 pm | विसोबा खेचर

तस॑ही छोटा डॉन, आन॑दयात्री, नाना चे॑गट(बहुतेक) ह्या॑ना २९-३० मार्चला जमत॑ आहे. ते॑व्हा आपणास जमेल काय?

जमवायचा प्रयत्न नक्की करतो रे धमाला..

आधी तुम्ही मंडळी परवा भेटून तर घ्या! मजा करा, धमाल करा आणि सचित्र वृत्तांत इथे टाका. फोटू कोण काढणार आहे रे? कुणी घेतली आहे ती जबाबदारी? फोटू मात्र नक्की काढा बर्र का!

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Mar 2008 - 8:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मंडळी परवा भेटून घ्या! मजा करा, धमाल करा आणि सचित्र वृत्तांत इथे टाका. फोटू कोण काढणार आहे रे? कुणी घेतली आहे ती जबाबदारी? फोटू मात्र नक्की काढा बर्र का!
असेच म्हणतो...!!!!
दोस्तहो,
खरे तर रहाटगाड्यातून वेळ काढून जरा दंगामस्ती करायचे क्षण हातातून सुटू नये असे सतत वाटत राहते,असो....
पण धमाल आणि मंडळी ज्या उत्साहाने कट्टा भरवत आहेत, संपर्क करत आहेत. त्यांच्या प्रयत्नाला दाद देतो आणि कट्ट्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो !!!!

आपल्या सर्वांचा दोस्त
-दिलीप बिरुटे

मनस्वी's picture

20 Mar 2008 - 2:29 pm | मनस्वी

मिसळपाव पुणे कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा.

एक प्रवास मैत्रीचा
जसा हळुवार पावसाच्या सरीचा
ती पावसाची सर अलगद येउन जावी
अन् एक सुंदरशी संध्याकळ हळुच खुलुन यावी..

(कवि - अज्ञात, अग्रप्रेषितातून साभार)

मनस्वी

मनस्वी's picture

26 Mar 2008 - 7:08 pm | मनस्वी

आली होती की नाही पावसाची सर!

आम्ही शुभेच्छा अगदी मनापासून देतो!

विजुभाऊ's picture

26 Mar 2008 - 8:19 pm | विजुभाऊ

पावसाची सर! ? ? ?
तुम्ही त्याला पावसाची सर म्हणता....हे म्हणजे गिरिसप्पाच्या धबधब्याला दारुवाल्या पुलाखालची नागझरी समजणे झाले.....
बाकी तूमच्या मनापासुनच्या शुभेच्छांचा धसका बसला....
खरे सांगु सगळे मिपा कर त्यावेळी असायला हवे होते असे मला मनापासुन वाटत होते....
तुम्ही कधी तशी शुभेच्छा अगदी मनापासून द्या ना एकदा...मिपा चा कट्टा भरुन जाइल्....सतरन्ज्या सुद्धा अपूर्‍या पडतील...
तुमचे मन अगदी जोरदार आहे हो.....माझा तुमच्या मनापासुनच्या शुभेच्छां वर विश्वास आहे.
मिपा कर इतक्या मनापासुन शुभेच्छा देतात .न पाहीलेल्या लोकांवर ही लोभ ठेवतात.....याला काय म्हणायचे उमगत नाही

मनस्वी's picture

27 Mar 2008 - 12:48 pm | मनस्वी

तुम्ही त्याला पावसाची सर म्हणता....हे म्हणजे गिरिसप्पाच्या धबधब्याला दारुवाल्या पुलाखालची नागझरी समजणे झाले.....

हा हा हा

मिपा चा कट्टा भरुन जाइल्....सतरन्ज्या सुद्धा अपूर्‍या पडतील...

मिसळपावरांचा स्नेह, काथ्याकूट, वादावादी, भांडाभांडी, अष्टपैलू चर्चा अशाच खुलत राहिल्या तर नक्कीच हा सुखद क्षण येईल!

सर्वसाक्षी's picture

20 Mar 2008 - 2:56 pm | सर्वसाक्षी

मिपाच्या पहिल्या कट्ट्यास हार्दिक शुभेच्छा!

कट्टा झाल्यावर सविस्तर वृत्तांत देणे ही विनंती

शरुबाबा's picture

20 Mar 2008 - 2:58 pm | शरुबाबा

एक सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..

मनापासुन शुभेच्छा!

प्राजु's picture

20 Mar 2008 - 8:37 pm | प्राजु

माझ्याही शुभेच्छा..
खूप इच्छा होती या कट्ट्याला उपस्थित राहण्याची. पण जमत नाहीये आता तरी. फोटो काढा भरपूर आणि इथे टाका. आणि जे काही हादडाल (मिसळ्पाव, पाव्-भाजी, वगैरे) आमची आठव्ण नक्की काढा.

- (सर्वव्यापी)प्राजु

ब्रिटिश टिंग्या's picture

20 Mar 2008 - 8:41 pm | ब्रिटिश टिंग्या

माझ्याही शुभेच्छा..
खूप इच्छा होती या कट्ट्याला उपस्थित राहण्याची. पण जमत नाहीये आता तरी. फोटो काढा भरपूर आणि इथे टाका. आणि जे काही ढोसाल (बियर, व्होडका वगैरे) आमची आठव्ण नक्की काढा.

स्वाती राजेश's picture

20 Mar 2008 - 8:44 pm | स्वाती राजेश

मिपाच्या पहिल्या कट्ट्यास हार्दिक शुभेच्छा!
फोटो टाकायला विसरू नका. जर व्हीडीओ शुटींग घेतले तर ते पण अपलोड करा...
खाताना आमची आठवण काढा...
HAVE A NICE TIME
:)))))

सचिन's picture

20 Mar 2008 - 8:52 pm | सचिन

मनःपूर्वक शुभेच्छा!

हर्शल's picture

20 Mar 2008 - 8:52 pm | हर्शल


हार्दिक शुभेच्छा!!
मिपाच्या पहिल्या कट्ट्यास हार्दिक शुभेच्छा!
फोटो टाकायला विसरू नका. जर व्हीडीओ शुटींग घेतले तर ते पण अपलोड करा...
खाताना आमची आठवण काढा...
HAVE A NICE TIME

चतुरंग's picture

20 Mar 2008 - 9:22 pm | चतुरंग

धमाल करा! मिसळ चापा, खा, 'प्या' (टांगा पलटी - घोडे फरार होणार नाही इतपतच!).
फोटो नक्की टाका. आम्हालाही आस्वाद घेऊद्या फोटोतून तरी::))!

(तुम्ही सर्व जाणते आहातच, तरीही अनुभवातून आलेली एक सूचना - कोणत्याही प्रकारे कार्यक्रमाला गालबोट लागेल असे वर्तन कोणीही करु नये. मि.पा.कर हे कट्ट्यावर जमणार असले तरी जबाबदार नागरिक प्रथम आहेत हे विसरु नका!!)

थ्री चियर्स!!!

चतुरंग

सर्किट's picture

20 Mar 2008 - 11:30 pm | सर्किट (not verified)

कोणत्याही प्रकारे कार्यक्रमाला गालबोट लागेल असे वर्तन कोणीही करु नये.

मागे एकदा एका कट्ट्यावर येथील एका सभासदाच्या गाण्याच्या वेळी कुणीतरी मोठ्याने जांभया देत होता, आणि कॉमेण्ट्स करत होता असे ऐकले.

असे गालबोट कुणी लावू नये. सर्वांची गाणी, कविता, मन लावून ऐका.

- सर्किट

झंप्या's picture

21 Mar 2008 - 1:14 am | झंप्या

माफ करा!!!!कट्ट्यावर सहसा तात्याच गाणे गातो हे माहित असताना देखिल मुद्दाम ही खरुज खाजवुन काढायचे प्रयोजन कळले नाही.

आम्ही इथे हळहळत बसण्याशिवाय काही करू शकत नाही.
पण तुम्ही जरूर मजा करा...
आणि वर चतुरंगकाकांनी काय म्हटलंय ते ध्यानात ठेवा.
जरूर फोटो इथे टाका आमच्यासाठी!

आपला
पिवळा डांबिस

गोट्या's picture

20 Mar 2008 - 10:00 pm | गोट्या (not verified)

आम्ही इथे हळहळत बसण्याशिवाय काही करू शकत नाही.
पण तुम्ही जरूर मजा करा...
आणि वर चतुरंगकाकांनी काय म्हटलंय ते ध्यानात ठेवा.
जरूर फोटो इथे टाका आमच्यासाठी!

सहमत!

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

कट्ट्यास हार्दिक शुभेच्छा!

अवांतरः
बाकी तू काय पण म्हण तात्या पण तू ह्या कट्ट्याला जाणार नाहीस असं उगीचच वाटत होतं. सालं ते मनोगत आणि वेलणकर कितीपण खत्रुड असलं तरी ते कट्टे काय शानदार व्हायचे रे? आजकालची ही पोरं नुसतं कुठलं हाटेल आणि काय प्यायचं ह्यातच इतकी रमलेली पाहून पूर्वीचे दिवस आठवले. चतुरंगकाकांनी दिलेला सल्ला अतिशय योग्यच आहे.

सर्किट's picture

21 Mar 2008 - 2:00 am | सर्किट (not verified)

सालं ते मनोगत आणि वेलणकर कितीपण खत्रुड असलं तरी ते कट्टे काय शानदार व्हायचे रे?

ही पण जुनीच खरूज ना झंप्या काका ?

- (बेन्टेक्स लोशन विक्रेता) सर्किट

विसोबा खेचर's picture

21 Mar 2008 - 9:25 am | विसोबा खेचर

बाकी तू काय पण म्हण तात्या पण तू ह्या कट्ट्याला जाणार नाहीस असं उगीचच वाटत होतं.

उगिचंच का बरं? मी उपस्थित न राहण्याचं कारण दिलं आहे. मातोश्रींची तब्येत ठीक असती तर मीही नक्कीच मिपा कट्ट्याला गेलो असतो!

आजकालची ही पोरं नुसतं कुठलं हाटेल आणि काय प्यायचं ह्यातच इतकी रमलेली पाहून पूर्वीचे दिवस आठवले.

उगीच पूर्वीचे वगैरे दिवस आठवून हळहळू नकोस. आणि हळहळायचं काही कारणही नाही. कारण तुम्ही मनोगती अजूनही उत्तमोत्तम कट्टे करू शकता! आम्हा मिपाकरांच्या त्याला मनापासून शुभेच्छाच असतील!

मिपाचं म्हणशील तर मिपाची पोरंदेखील अगदी झक्कासपैकी कट्टा करून दाखवतील याची खात्री आहे मला! तेव्हा उगाच वेलणकराला आणि मनोगताला तोंडदेखलं खत्रूड म्हणून मनोगताचेच कट्टे काय ते झकास व्हायचे हे मला पडद्याआडून सुनवू नकोस! :)

चतुरंगकाकांनी दिलेला सल्ला अतिशय योग्यच आहे.

सहमत आहे...परंतु मिपाची पोरं तेवढी समंजस निश्चितच आहेत! त्यांना जराही कुणी कमी किंवा बेजबाबदार लेखण्याचं कारण नाही!

तेव्हा झंप्या, उगीच आडून काही बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. मिपावर आला आहेस, तेव्हा मिपाकर म्हणून रहा आणि मजा कर, चैन कर, मिपा तुझंच आहे! तुम्हा मनोगतींच्या बारश्याला मला वेलणकरने जेवायला बोलावलं होतं एवढं विसरू नकोस! :)

आपला,
(मुंबईचा रंडीबाजारात उडत्या पक्षाची शष्पं मोजायला शिकलेला!) तात्या.

सर्किट's picture

21 Mar 2008 - 9:39 am | सर्किट (not verified)

उगीच पूर्वीचे वगैरे दिवस आठवून हळहळू नकोस. आणि हळहळायचं काही कारणही नाही. कारण तुम्ही मनोगती अजूनही उत्तमोत्तम कट्टे करू शकता! आम्हा मिपाकरांच्या त्याला मनापासून शुभेच्छाच असतील!

बस हेच म्हणतो !!!

ह्याव्यतिरीक्त पुढे जाऊन म्हणतो, की जेव्हा मनोगती कट्टा करतील, तेव्हा पाणि मी देणार.. त्याखेरीज आणखी काही पिणारही नहीत म्हणा ते..

इतर सगळे वाईट, म्हणजे त्या संस्कृतीतच बसणार नाही ते..

- (पाणक्या) सर्किट

आजानुकर्ण's picture

21 Mar 2008 - 12:04 pm | आजानुकर्ण

अहो पाणि म्हणजे हात. मनोगतींच्या कट्ट्याला तुमच्या मदतीचा हात सदैव पुढे असेल ही कल्पना उत्तम आहे. पण 'त्याखेरीज आणखी काही पिणार नाहीत ते' ह्या वाक्याची संगत लागत नाही.

(साशंक) आजानुकर्ण

सुधीर कांदळकर's picture

21 Mar 2008 - 6:09 am | सुधीर कांदळकर

हार्दिक शुभेच्छा.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.