शिंपळ ४ स्टेप तंगडी कबाब.

गणपा's picture
गणपा in पाककृती
27 Sep 2009 - 7:45 am

कदाचीत ही पाककृती मिपा वर आधी येउन गेल्याची शक्यता नाकारता येत नाही.

साहित्यः

२ कोंबड्यांच्या ४ तंगड्या.
२ मोठे चमचे ताज दही .
२ लहान चमचे आल-लसणाची पेस्ट.
२ लहान चमचे तंदुर मसाला.
३/४ लहान चमचा हळद.
चवी नुसार मीठ.

१) कोंबडिच्या तंगड्यांना सुरीने चरे पाडुन घ्या.

२) दही , आल-लसणाची पेस्ट, तंदुर मसाला, हळद,मीठ सर्व एकत्र करुन, ते या तंगड्याना लावुन किमान ४-५ तास मुरत ठेवा.

३) तव्यावर मध्यम आचेवर थोड तेल तापवुन तंगड्या ५-१० मिनिट फ्राय करुन घ्या.

४) प्रत्येक तंगडी चिमट्यात पकडुन डायरेक्ट मोठया आचेवर ३०-४० सेकंद भाजुन घ्या.

आपल्या प्रिय व्यक्तीस ही कलाकृती थोडीशी सजवुन आणि पुदीना+दहीच्या चटणी सोबत सर्व्ह करा.
विरघळला/ली च समजा ;)
ऑल दि बेस्ट :)

प्रतिक्रिया

सुबक ठेंगणी's picture

27 Sep 2009 - 7:56 am | सुबक ठेंगणी

मी हा अगदी सेम मसाला वापरते.
पण मी आधी दहा मिनिटं ओव्हनला लावते. आणि मग डायरेक्ट गॅसच्या ऐवजी टोस्टरमधे लावते...की छान खरपूस रंग येतो. शिवाय कुठेही तेल वापरावं लागत नाही.
फोटो कसले tempting आहेत! ;)

गणपा's picture

27 Sep 2009 - 8:04 am | गणपा

मलापण ओव्हन मध्येच कारायच होत.
पण माझ्या कुकिंगरेंजचा ओव्हन विजेवर चालतो आणि माझ्या आळशीपणामुळे अजुन विजेची जोडणी दिली नाही त्यामुळे गॅसवरच केल सगळ. :D

टारझन's picture

27 Sep 2009 - 10:45 am | टारझन

विरघळलो रे गणपा !! कधी तरी आम्हाला पण प्रिय व्यक्ति बणवा =))

-(प्रिय व्यक्ति) टार्‍या तंदुरी

सहज's picture

27 Sep 2009 - 8:38 am | सहज

घरोघरी ओव्हनच्या पाककृती!!

फोटो अप्रतिम, एक सोपी व सुंदर पाककृती!!

प्राजु's picture

27 Sep 2009 - 7:58 am | प्राजु

एकदम टेम्प्टिंग!!!!
फोटो अगदी जीवघेणा आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

27 Sep 2009 - 8:42 am | विसोबा खेचर

पिवळा डांबिस's picture

27 Sep 2009 - 10:11 am | पिवळा डांबिस

ईश्वर आत्म्यास सद्गती देवो....
काय रे मिपाकरांनो तेराव्याच्या जेवणाला कुठे जमायचं?
बाटल्या मी आणीन, पण बाकीची मटणाबिटणाची व्यवस्था तुम्ही कराल काय?:)
पुन्हा, ईश्वर आत्म्यास सद्गती देवो....
:)

मिसळभोक्ता's picture

28 Sep 2009 - 11:17 am | मिसळभोक्ता

चंदनाचा हार मी आणतो !

(किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला...;-))

-- मिसळभोक्ता

Nile's picture

29 Sep 2009 - 2:04 pm | Nile

=)) =)) =))

पोट भरलं च्यामारी! ;)

लवंगी's picture

27 Sep 2009 - 10:28 am | लवंगी

अरे काय चालवलय काय?? तात्याना परत एकदा गचकवलस!!

ते टमेटोच फूल केलय का रे? सहिच आहे

दशानन's picture

27 Sep 2009 - 12:18 pm | दशानन

तात्या सारखा एक फोटो येथे पण चढणार होता पण.... माझा वर्षभराचा कोटा एका दिवसामध्येच संपून जाईल म्हणून फोटो चढवत नाही आहे... >:)

***

जबरा फोटोज् & रेसेपी !

***
राज दरबार.....

स्वाती२'s picture

27 Sep 2009 - 8:19 pm | स्वाती२

गणपा तुम्ही ताट किती छान सजवता. कोथिंबिरीची पानं, टोमॅटोच फूल एकदम झकास. नेहमीच्या chive आणि टोमॅटोफुला पेक्षा वेगळं.

मराठमोळा's picture

27 Sep 2009 - 9:50 pm | मराठमोळा

गणपा भौ,

तोंडाला पाणी सुटले फोटु पाहुन. पण दिवाळी पर्यंत नॉनवेज घरी करता येणार नाही. :( असो वाचनखुण साठवत आहे..

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

शाहरुख's picture

27 Sep 2009 - 10:05 pm | शाहरुख

गणपाजी, मांसाहारी पाककृती आमच्या कामाच्या नसल्या तरी आपल्या कृतींना दाद देतो..

(आळशी स्वयंपाकी) शाहरुख

मसक्कली's picture

29 Sep 2009 - 1:51 pm | मसक्कली

तोण्डाला पानी सोडल गनप्या भौ.... =P~

१ला कौतुक डेकोरेशन करिता काय सह्ही आलय टम्याटोच फुल्..अगदि सुन्दर..ं त्या बाउल मधल्या चटनीवर पन छानच स्टार कढलात तुमी ....स्पे.कौतुक.... =D>
बाकी पा.क्रु. पहुन @)

जबरा झलीये दिसत आहे...फोटु लै भारी...!!

बर झाल सन्गितल ओवन नाय बुआ गरिबाकड्....सोय झली घरी बनयायची...धन्यवाद...!! :)

संदीप चित्रे's picture

29 Sep 2009 - 5:56 pm | संदीप चित्रे

तुझी प्रिय व्यक्ती सुदैवी आहे की तू असे एक से एक पदार्थ देतोस.

गणपा's picture

29 Sep 2009 - 7:03 pm | गणपा

:D

सर्व वाचकांचे नी प्रतिसाद टंकण्याचे कष्ट उपसणार्‍यांचे आभार.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
मिपाकरांनो सावधान. ’पाककृती’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

सूहास's picture

29 Sep 2009 - 8:54 pm | सूहास (not verified)

सू हा स...

विलास आंबेकर's picture

29 Sep 2009 - 9:11 pm | विलास आंबेकर

च्यामारी, सगळं संपवुन घरी परत जाता जाता कुठुन हे गणप्याचे प्रताप बघितले आणि तसाच माघारी फिरलो मिपा कडे. तोंडातुन नुसति लाळ टपकतेय सारखी!
गणप्या लेका सांभाळ स्वताहाला. पोटात दुखॅल कदाचित तुझ्या.
मला तर चक्क वास पण आला

धनंजय's picture

29 Sep 2009 - 9:18 pm | धनंजय

झकास! +चित्रे आणि सजावट तर छानच!

हरकाम्या's picture

30 Sep 2009 - 1:40 am | हरकाम्या

गणप्या लेका आता तरी तुला नक्की भेटायला पाहिजे.अरे काय रेसिपी टाकतोयस. मी तर तुझा "फ्यान" होण्याच्या मार्गावर आहे.

नरेन's picture

30 Sep 2009 - 4:05 pm | नरेन

तव्यावर गरम करेपर्यन्त तरि चार तन्गड्या होत्या नन्तर तीनच दिसता आहेत. आणखिन एक कुठे गेलि? का आसले जिवघेणे पदार्थ दाखवता ? एकदम सहि पाक्रु!

गणपा's picture

30 Sep 2009 - 4:43 pm | गणपा

नरेनराव तंगडी नीट शिजलीये का ते पाहायला नको का ;)
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
मिपाकरांनो सावधान. ’पाककृती’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

खादाड's picture

1 Oct 2009 - 5:26 pm | खादाड

काल करुन पाहिले (दह्या ऐवजी चक्का वापरला तर marination जास्त छान होत हा माझा अनुभव आहे ) खूप छान झाले ! धन्यवाद ! :H

चटोरी वैशू's picture

5 Oct 2009 - 9:25 am | चटोरी वैशू

ही रेसिपी.... एकदम झक्कास आहे....मी बटर मधे फ्राय केले... चव मस्त होती .... विकांता ला केली होती.... नवरा खुष .... धन्यवाद... रेसिपी सोपी करुन दिल्याबद्दल...