लोकप्रभा

mahalkshmi's picture
mahalkshmi in काथ्याकूट
25 Sep 2009 - 7:39 pm
गाभा: 

http://www.loksatta.com/lokprabha/20091002/alke.htm
हे तुम्ही वाचले आहे का?
मला राजु परुळेकरचे लेख आवडतात.

प्रतिक्रिया

दशानन's picture

25 Sep 2009 - 7:45 pm | दशानन

>>राजु परुळेकरचे लेख आवडतात.

:O

तरीच... 8}

***
राज दरबार.....

प्रशु's picture

25 Sep 2009 - 7:50 pm | प्रशु

आजचा लेख वाचला. भयानक खबरी वाचायला मिळाल्या. त्या सत्य आहेत असे गुहित धरले तर राजची भुमीका न्याय्य आहे...

मराट्यांच्या नशिबी काय लिहिलय फक्त देवास माहित.

चिरोटा's picture

25 Sep 2009 - 8:20 pm | चिरोटा

'राज'किय हेतुने प्रेरित होवून लिहिलेला लेख वाटतो. राजु परुळेकरांचे मत स्वातंत्र्य जरी ग्रूहित धरले तरी उद्धव ठाकरे ह्यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर घसरुन परुळेकर काय साधु इच्छितात?उद्धव ठाकरे ह्यांचा मोबाईल कोण उचलतो/ते चिकन खातात का ही माहिती वाचकांना देवून काय फायदा? कुठल्या प्रश्नांची शिवसेनेने तड लावली नाही/मनसेच्या तुलनेत ती कुठे मागे पडली वगैरे मुद्दे परुळेकरांनी लिहायला हवे होते. मुंबई/ठाण्याच्या पलिकडेही महाराष्ट्र आहे जिथे ९ कोटी जनता राहते हे त्यांना माहित असेलच.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

सूहास's picture

25 Sep 2009 - 8:49 pm | सूहास (not verified)

आपल्या भावना मी समजु शकतो..

पण लेखात ९० टक्के सत्य आहे, आम्ही (खर तर मी असे लिहीणार होतो.) उध्दव साहेबांचा ह्या बाबतीला अनुभव घेतला आहे.असो

बालबुध्दीला खरोखरच बाळ्बुध्दी येवो हिच भवानीमातेच्या चरणी प्रार्थना..

सू हा स...

विनायक पाचलग's picture

27 Sep 2009 - 9:32 pm | विनायक पाचलग

पुर्वी आवडायचे राजु परुळेकर
पण आता ते लोकप्रभाचा उपयोग राज च्या प्रसिद्धीसाठी करत आहेत
त्यांचाच हा लेख वाचा
http://rajuparulekar.blogspot.com/2009/08/blog-post_12.html
यात उद्धव बद्दल चांगले लिहिलेले राजु परुळेकर कोण मग?????

अजुन एक गोष्ट
या सदराच्या सुरवातीलाच लेखकाने बरेच लेखांची झलक दाखवली होती
याचा अर्थ सर्व लेख तयार आहेत
तेव्हा हा फक्त पॉलीटीकल गेम...
आता राज ठाकरेंना ते जे पत्र लिहिलय त्याचे उत्तर पण येईल..
असो.......चालायचेच.................

घोडीवाले वैद्य's picture

25 Sep 2009 - 8:38 pm | घोडीवाले वैद्य

पोलिटिकली करेक्ट लेख
म्हंजे राजच्या बाजूचाच हे काही सांगायला नकोच
पण यात बरेच सत्य आहे हेही मान्य करायला हवे
खरंतरं राजू परुळेकर हा काही राजकारणी नाही किंवा शिवसेना किंवा मनसेचा पदाधिकारी नाही
तो जे काम करतोय ते काम सामनाचा संपादक म्हणून संजय रा़ऊतने करायला हवे
परंतु त्याला पैशांची जास्तच निकड दिसतेय
बिचारा
फाटतय तितक फाडून टाकतोय
असो

हे समजेपर्यंत उद्धवची वेळ संपलेली असेल

अमोल केळकर's picture

26 Sep 2009 - 12:43 pm | अमोल केळकर

वरील प्रतिसादाशी सहमत. तसेच् या लेखाची लिंक दिल्याबद्दल लेखकाचे आभार
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

अमोल खरे's picture

26 Sep 2009 - 1:07 pm | अमोल खरे

आत्ताच तो लेख वाचला. उद्धव ठाकरे व्यक्ति म्हणून कितीही चांगला असला तरी मराठी माणसांचे नेतृत्व करण्यास असमर्थ आहे हेच सत्य आहे. राज ठाकरे सारखा माणुस शिवसेना सोडुन जातो म्हणाल्यावर त्याने स्वत: आपले कार्याध्यक्ष पद सोडुन देउन ते राजला द्यायला हवे होते. मराठी लोकांना त्याचा अभिमानच वाटला असता.... पण "मराठी लोकं म्हणजे फक्त शिवसेनेची जहागिर" असे मानत राहिल्याने त्याने लोकसभेच्या निवडणुकीत मार खाल्ला आणि आता तोच अनुभव विधानसभेच्या निवडणुकीत घ्यायला तो तयार आहे. मागे एकदा एका मुलाखतीत राज ठाकरे म्हणाला होता कि १-२ हजार मते फुटु शकतात........दिड दोन लाख मते फुटत नाहीत. दीड दोन लाख मते "मिळतात". लोकसभा निवडणुकीत मते "मिळवली"........विधानसभेतही मते "मिळतील". लोकसभा निवडणुकीनंतर राजला शिव्या देणं, "मुंबई की जनता राज और उसके गुंडों के साथ नही है" असलं म्हणणे हिंदी मिडियाच्या लोकांनी बंद केले ते चांगले झाले.

अर्थात एवढे होउनही राजने आमची मते फोडली हे शिवसेना म्हणणारचं. पण त्याला काहीच इलाज नाही. मराठी लोकांनी एकगठ्ठा मनसेला मते दिली पाहिजेत. तरच त्या युजलेस कृपाशंकर सिंग सारखी माणसे गप्प होतील.

एवढ्या सुंदर लेखाबद्दल राजु परुळेकरांचे व त्या लेखाची लिंक येथे दिल्याबद्दल महालक्ष्मी ताईंचे आभार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Sep 2009 - 1:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उद्धव ठाकरे व्यक्ति म्हणून कितीही चांगला असला तरी मराठी माणसांचे नेतृत्व करण्यास असमर्थ आहे हेच सत्य आहे.

सहमत आहे. निरागस चेहर्‍याला शिवसेनेची आक्रमता सूट होत नाही. सामाजिक प्रश्नासंदर्भातही उद्धव साहेबांना किती जाण असेल त्या बाबतीतही शंका येते. ज्या सामाजिक प्रश्नाच्या संदर्भात काही एक वैचारिक बैठ़क असावी लागते दुर्दैवाने तीही कधी दिसत नाही. दैनिकातून बातम्या वाचतांनाही उद्धवचे मुद्दे मराठी माणसाला शिवसेनेबद्दल सहानुभूती निर्माण करतील असे वाटत नाही. अर्थात लेखात म्हटल्याप्रमाणे 'उद्धव' च्या नावापूढे 'बाळासाहेब' नावाचं मोठं प्रस्थ आहे, त्यामुळे बळेच का होईना नेतृत्वाची संधी मिळाली आहे. पुढे स्वतःचं अस्तित्वावर शिवसेनेसाठी मराठी माणसाचा विश्वास मिळविता येईल का ? या प्रश्नाचे उत्तर काय असेल कोणास ठाऊक. पण, पुढे उद्धव साहेबांसाठी काळ तर मोठा कठीण असणार आहे. असे वाटते.

परुळेकरांच्या लेखातील व्यक्तीगत संदर्भ सोडले तर शिवसेनेच्या काही नेत्यांचे, पदाधिकार्‍यांचे इतर पक्षातील नेत्यांशी व्यावसायिक संबंध आहेत हेही आता सामान्यांना कळायला लागले आहे, ते नसू नयेत असे म्हणायचे नाही. पण, सार्वजनिक व्यासपीठावर एकमेकांविरुद्ध गरळ ओकतांना असे ढोंग लक्षात येते. त्याचे एक उदाहरण म्हणजे मनोहर जोशी आणि राज ठाकरे यांचे संबंध. अर्थात उद्धवच्या तुलनेत राज ठाकरे उजवाच आहे, हे सांगायला आता कोणत्याही ज्योतिषाची गरज उरली नाही, असे वाटते.

अवांतर : मिपाचा 'फाट्यावर मारणे' हा शब्द लेखात दिसल्यामुळे बरं वाटलं ! :)

-दिलीप बिरुटे

नेहमीसारखाच लेख आहे. परुळेकर अश्याच वैयक्तिक हितसंबधातुन कळालेल्या गोष्टी चव्हाट्यावर आणुन मार्केट खाण्याचा प्रयत्न करत असतात.
असो ..
गंमतीची गोष्ट म्हणजे परुळेकर मिपावर वारंवार येत असावेत हा माझा समज खरा ठरवण्यास आज त्यांच्या खालील वाक्याने पुरावा मिळाला ;)

--->बऱ्याचदा उद्धव व त्याच्या मातोश्रीवरच्या कुटुंबियांना असं वाटतं की, मी त्याच्याबद्दल सारं राज व माझ्या मैत्रीच्या संदर्भात लिहितो. हे शंभर टक्के असत्य आहे. सत्य मी स्वत:लाही फाटय़ावर मारून लिहितो.<---

गंमतीचा भाग वगळला तर "मी मर्द आहे" जेव्हडे पॉलिटिकली इनकरेक्ट तेवढेच परुळेकरांचे वरचे वाक्यही इनकरेक्ट !!
नाही का ?

शक्तिमान's picture

27 Sep 2009 - 2:33 am | शक्तिमान

दुव्याबद्दल धन्यवाद!
लेख आवडला...

शेवटी राज मध्ये जी आग आहे ती उद्धव मध्ये नाही..
राजकारणामधे फोटोग्राफरपेक्षा व्यंगचित्रकाराचे गुण जास्त लागतात...!

दिनेश५७'s picture

27 Sep 2009 - 1:12 pm | दिनेश५७

तो तर पीआर लेख

प्रभाकर पेठकर's picture

28 Sep 2009 - 12:51 pm | प्रभाकर पेठकर

उद्धव आणि राज मध्ये मुख्य फरक म्हणजे उद्धव अजून बाळासाहेबांच्या सुरक्षा कवचात सुरक्षित आहे. राज ठाकरे बाहेर फेकला जाऊन त्याला राजकारणातले काही चटके सोसावे लागले. त्या अनुभवातूनच धडा घेतलेला राज आता बोलताना पुरावे देऊन बोलतो. अशाच विविध अनुभवातून तावून सुलाखून बाहेर पडल्यावर (बाळासाहेबांच्या पश्चात) उद्धवला तो समर्थपणे टक्कर देऊ शकेल.
सध्या राजचे राजकिय निर्णय, वक्तव्य, कृती ह्यावर अजून जरा कच्चेपणाचे सावट दिसते. कधी उतावळेपणे बोलतो तर कधी उतावळेपणे वागतो. बाळासाहेबांच्याच तालमीत तयार झालेल्या राजने सुरुवातीला बाळासाहेबांसारखीच आक्रमक भाषा वापरली. पण बाळासाहेबांच्या सुरुवातीच्या काळातील राजकिय परिस्थिती आणि आजची राजकिय परिस्थिती वेगळी आहे. बाळासाहेबांना प्रबोधनकारांचे राजकिय मार्गदर्शन लाभले. कम्युनिस्टांविरुद्ध वापरण्यासाठी काँग्रेसनेच (सत्ताधारी पक्षाने) शिवसेनेला आतून मदत केली असे म्हणतात. राजला सत्ताधारी पक्ष (स्वार्थासाठी) शिवसेनेविरुद्ध भडकवत असला तरी 'मनसे' साठी वातावरण विशेष पोषक नाही. तसेच, बाळासाहेबांच्या अस्तित्वामुळे, त्यांनी केलेल्या उपकारांमुळे, त्यांच्याच हाताखाली राजकारण शिकल्यामुळे 'शिवसेने' विरुद्ध बोलता-वागताना राजच्या वर्तनात तितकासा मोकळेपणा दिसत नाही. बाळासाहेबांचे दडपण त्याच्या बोलण्या-वागण्यात स्पष्ट दिसते. राजकिय नेत्याच्या व्यक्तिमत्वातला मोकळेपणा, परिपक्वता अभ्यासू वृत्ती अजून दिसली पाहिजे. मराठी मतदार त्याच्या मागे जाण्यास उत्सुक आहेत.
जयहिन्द - जय महाराष्ट्र.

आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.

चिरोटा's picture

28 Sep 2009 - 2:57 pm | चिरोटा

सहमत्.शिवाय लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी,देशात्,बाहेर प्रतिमा बनवण्यासाठी थिंक टँक ची गरज असते. काँग्रेस्,भाजप किंवा इतर राजकिय पक्षांकडे असे थिंक टँक्स असतात्.शि़क्षण्,मिडिया,संरक्षण्,अर्थ अशा वेगवेग़ळ्या क्षेत्रातील निवडक लोक एकत्र आणावे लागतात.त्यांच्यातर्फे पक्षाची बाजु लोकांत/समाजात मांडावी लागते.शिवसेना/मनसेचा थिंक टँक्स व विश्वास दिसत नाही. म्हणूनच लोकांच्या मनात ह्या पक्षांबद्दल एकतर्फी मते तयार होतात.शिवसेने नंतर स्थापन झालेल्या अनेक राजकिय पक्षांनी स्वबळावर विविध राज्यात सत्ता मिळवली.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न