भारतीय उपखंडाच्या बाबतीत साधारणतः १९व्या शतकापासून एक विधान केले गेले आहे की येथे दक्षिणेत द्रवीड नामक समाज होता आणि उत्तरेत युरोप आणि इतर ठिकाणाहून आर्य आले त्यांची वसाहत वाढली आणि बघता बघता त्यांची भाषा आणि संस्कृती यांनी देश व्यापला गेला. मॅक्समुल्लरशी झालेल्या वैचारीक देवाणघेवाणीतून लोकमान्य टिळकांचा आणि त्यानंतर बहुतांशी अनेक विचारवंतांचा असाच समज झाला होता की आर्य आणि पर्यायाने संस्कृत देशाबाहेरून आली आहे वगैरे...
कालांतराने दोन गट पडले एक आर्य-द्रविड असा भेद मानणारा. दक्षिणेत या भेदामुळे एकेकाळी देशातून फुटून जाण्याची भाषा पण होती. अजूनही स्वतःचे वेगळे पण सांगितले जातेच. दुसरा गट हा भेद न मानणारा आणि अनेक भौगोलीक (उ.द. सरस्वती नदी, द्वारका) सत्ये उपग्रहाद्वारे उलगडणारा, तसेच ही कधीकाळची परकीयांची येथील "नेटीव्हां"ना कमी लेखायची आणि भेद घडवून आणायची कॉन्स्पिरसी मानणारा. आजच्या एका बातमीमुळे यातील राजकारणावर जरी उत्तर मिळणार नसेल तरी समाजकारणावर चांगला प्रकाश पडला आहे असे वाटले.
हार्वर्ड विद्यापिठ, एमाआयटी आणि भारतीय शास्त्रज्ञ यांनी एकत्रीत केलेल्या संशोधनात अनेक जनुकांचा (जीन्सचा) अभ्यास केला गेला, त्यातील समानता अथवा विषमता शोधली गेली. आणि असे लक्षात आले की शास्त्रीय अनुमानाप्रमाणे असा भेद अस्तित्वात असू शकत नाही. लाखाच्या संख्येत "जेनेटीक मार्कर्स" पासून ते अगदी जातीनिहाय जीन्सचा यात अभ्यास केला गेला.
काही वाक्ये वेळेअभावी भाषांतरीत न करता तशीच्या तशीच खाली उर्धृत करत आहे:
..."``The initial settlement took place 65,000 years ago in the Andamans and in ancient south India around the same time, which led to population growth in this part,'' said Thangarajan. He added, ``At a later stage, 40,000 years ago, the ancient north Indians emerged which in turn led to rise in numbers here. But at some point of time, the ancient north and the ancient south mixed, giving birth to a different set of population. And that is the population which exists now and there is a genetic relationship between the population within India.'' ...
..."The researchers, who are now keen on exploring whether Eurasians descended from ANI, find in their study that ANIs are related to western Eurasians, while the ASIs do not share any similarity with any other population across the world. However, researchers said there was no scientific proof of whether Indians went to Europe first or the other way round. "...
...
"Between 135,000 and 75,000 years ago, the East-African droughts shrunk the water volume of the lake Malawi by at least 95%, causing migration out of Africa. Which route did they take? Researchers say their study of the tribes of Andaman and Nicobar islands using complete mitochondrial DNA sequences and its comparison those of world populations has led to the theory of a ``southern coastal route'' of migration from East Africa through India.
This finding is against the prevailing view of a northern route of migration via Middle East, Europe, south-east Asia, Australia and then to India. "
प्रतिक्रिया
26 Sep 2009 - 3:02 am | धनंजय
मी आताच "नेचर" मासिकातला लेख भुरभुरत वाचला. त्यावर जॉन्स हॉप्किन्स येथील डॉ. अरविंद चक्रवर्ती यांनी संपादकीय लिहिले आहे, तेशुद्धा भुरभुरत वाचले. पण या शोधातून वेगळेच काही महत्त्वाचे असावे असे वाटते. लेख नीट वाचायला पाहिजे - पण "migration" हा शब्द लेखात कुठेही दिसत नाही.
वेळेअभावी "नेचर" मासिकातल्या लेखाचा सुरुवातीचा सारंश येथे इंग्रजीतच देत आहे :
India has been underrepresented in genome-wide surveys of human variation. We analyse 25 diverse groups in India to provide strong evidence for two ancient populations, genetically divergent, that are ancestral to most Indians today. One, the 'Ancestral North Indians' (ANI), is genetically close to Middle Easterners, Central Asians, and Europeans, whereas the other, the 'Ancestral South Indians' (ASI), is as distinct from ANI and East Asians as they are from each other. By introducing methods that can estimate ancestry without accurate ancestral populations, we show that ANI ancestry ranges from 39–71% in most Indian groups, and is higher in traditionally upper caste and Indo-European speakers. Groups with only ASI ancestry may no longer exist in mainland India. However, the indigenous Andaman Islanders are unique in being ASI-related groups without ANI ancestry. Allele frequency differences between groups in India are larger than in Europe, reflecting strong founder effects whose signatures have been maintained for thousands of years owing to endogamy. We therefore predict that there will be an excess of recessive diseases in India, which should be possible to screen and map genetically.
(ठळक ठसा माझा - अनुवाद :) "आमचे असे भाकीत आहे, की ज्या रोगांची जनुके आई-वडील दोघांकडून यावी लागतात, एकाकडून आलेली पुरत नाहीत (recessive चा लांबलचक अनुवाद), असे रोग भारतात अधिक प्रमाणात सापडतील. त्यामुळे अशा रोगांचा शोध घेणे आणि त्यांची जनुके शोधणे शक्य असावे."
हा लेख खचितच महत्त्वाचा आहे. पण भारतीय उपखंडातील गेल्या ५००० वर्षांतला आर्य प्रवास कसा होता असा एक प्रश्न आहे. (साधारणपणे "हिंदू-परधार्जिणे", "देशाभिमानी-देशद्वेष्टे" या राजकीय वादात रंगणारा प्रश्न आहे.) या प्रश्नात उपयोगी पडेल असा काही थेट संबंध मला सापडत नाही. (पण तळटिपा अभ्यास करण्यालायक आहेत - त्या अभ्यासून नंतर सांगतो.)
तळटिपांमध्ये म्हटले आहे की उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय वंशांचे मिश्रण साधारणपणे २०० पिढ्यांपूर्वी सुरू झाले - पिढी ही २०-३० वर्षांची असते (बापामुलमधले, किंवा आई-मुलीमधले अंतर पूर्वीच्या काळी किती होते.) म्हणजे ४०००-६००० वर्षांपूर्वी.
डॉ. चक्रवर्ती आपल्या संपादकीयात म्हणतात :
To a cynic, the existence of the ANI or ASI, their unique and remote ancestry within India, or their suggestive identities as Indo-European and Dravidian speakers, are already common knowledge. But the precise definition of their ancestral genomic content, their mixture throughout India and the importance of genetic drift are new and have serious implications for both human biology and medicine — and Indian society as well.
म्हणजे भारतात दोन मिसळलेल्या वंशाबद्दल "सामान्य ज्ञान" होते, ते आहेच. पण अशा संशोधनातून आकडेवारी मिळते, आणि जीवशास्त्र आणि वैद्यकासाठी उपयोगी कार्यशील माहिती मिळते.
(नेचर मासिकाच्या या वेळच्या अंकाकडे माझे लक्ष नव्हते. लक्ष वेधल्याबद्दल विकास यांचे धन्यवाद. मूळ लेख आणि संपादकीय अत्यंत उपयुक्त आहेत. बारकावे नीट लक्षात ठेवायला अधिक वाचने लागतील.)
26 Sep 2009 - 5:46 am | सुनील
खरोखरच रोचक माहिती.
(कदाचित, भारतातील राजकीय समीकरणेही बदलू शकतील!)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
26 Sep 2009 - 7:22 am | सहज
खूप रोचक माहीती.
(कदाचित, भारतातील राजकीय समीकरणेही बदलू शकतील!)
हा हा हा!
यावरुन पिटर रसेल या भारतीय वंशाच्या कॅनेडीयन कॉमेडियनचे भारतीय व चीनी लोक व जगातील इतर माणसे याबद्दलचे वाक्य आठवले. You can run from us now, but sooner or later…we’re gonna hump you!
एक धमाल व्हिडीओ!
26 Sep 2009 - 7:32 am | विकास
धन्यवाद,
रोचक माहीती नक्की आहे पण त्यात धनंजयने आणि कर्कने म्हणल्याप्रमाणे अजून बरेच काही आहे. त्यामुळे मूळ लेख वाचायला हवा असे वाटते.
बाकी त्याच्या अॅब्स्ट्रॅक्टवरून दोन्ही "टोके" जितं मया म्हणू शकतील अशी अवस्था आहे. फक्त एक नक्की झाले आहे की याचा संदर्भ घेतल्यास दाक्षिणात्य किमान जनुकांच्या आधारे तरी पूर्णपणे उत्तरेतील लोकांशी एकरूप झाले आहेत. :-) . त्यातील जातींच्या उदयासंदर्भातील भाग पण नक्कीच इंटरेष्टींग आहे...
कदाचित, भारतातील राजकीय समीकरणेही बदलू शकतील!
मला उत्सुकता आहे, नक्की कोणत्या राजकारणाला हा लेख समजेल (अर्थात त्या आधी तो स्वतः अथवा कोणी दाखवला म्हणून वाचल्यास) आणि त्यावर विवेचन करण्याइतका तो महत्वाचा वाटेल याचे... :? अर्थात त्यामुळेच कसलाच विचार न करता समिकरणे बदलणे पण सोपे जाऊ शकेल.
26 Sep 2009 - 11:16 am | सुधीर काळे
सुमारे एक वर्षापूर्वी "टाईम" या अमेरिकन नियतकालिकात genetic study वर आधारित एक लेख प्रसिद्ध झाला होता. हा माझा विषय नसल्यामुळे मला तो पूर्णपणे समजला नाही व म्हणूनच नीट आठवतही नाही पण त्यात असे लिहिले होते की एकाच मनुष्याच्या वेगेवेगळ्या अवयवांचा अभ्यास केल्यास त्या माणसाचा उगम कुठून झाला या विषयावर परस्परविरोधी निष्कर्ष निघू शकतात.
मी गूगल करून तो लेख मिळविण्याचा प्रयत्न करेन व सापडल्यास इथे त्याची लिंक नक्की देईन. मला इतकेच समजले होते कीं असे अनुमान काढणे ज्या स्तरावर आज हे शास्त्र आहे त्यावरून अवघड आहे. पण 'मिपा'वर या शास्त्रातले प्रवीण लोक असतील तर जरूर सर्वांना समजेल अशा भाषेत सांगावे.
धन्यवाद, सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
26 Sep 2009 - 1:31 pm | मिसळभोक्ता
एकाच मनुष्याच्या वेगेवेगळ्या अवयवांचा अभ्यास केल्यास त्या माणसाचा उगम कुठून झाला या विषयावर परस्परविरोधी निष्कर्ष निघू शकतात.
अगदी बरोबर !!
आजवर माझ्या काही एवंगुणविशिष्ट अवयवांचा मीच अभ्यास केला, तेव्हा माणसाचा उगम आफ्रिकेतून झाला हे लक्षात आले. अधिक माहितीसाठी टार्याला भेटा, त्याला दादा, आणि काका हे व्यक्तिविशेष विशेष आवडतात. आणि आफ्रिकन अवयवांचाही त्याचा अभ्यास आहे.
-- मिसळभोक्ता
26 Sep 2009 - 6:18 pm | नितिन थत्ते
स्थलांतरित आर्यांनी द्रविडांना पराभूत/डॉमिनेट केले असा समाजशास्त्रीय वर्तुळात कुठेही समज असल्याचे वाटत नाही. आर्यांनी तत्कालीन सिंधुसंस्कृतीचा नाश केला असा समज/दावा असल्याचे वाटते. द्रविड संस्कृतीशी आर्यांचा संबंध बराच नंतर आला असावा.
>>मॅक्समुल्लरशी झालेल्या वैचारीक देवाणघेवाणीतून लोकमान्य टिळकांचा आणि त्यानंतर बहुतांशी अनेक विचारवंतांचा असाच समज झाला होता.....
टिळकांनी तो नुसता समज बाळगला असे नसून त्याच्या समर्थनार्थ अर्क्टिक होम इन वेदाज हे पुस्तक लिहिले आणि आर्य बाहेरून आले असे त्यांच्या मते सिद्ध केले.
धनंजयांच्या प्रतिसादातून असे दिसते की त्या प्रयोगातून प्राचीन उत्तर भारतीय आणि प्राचीन दक्षिण भारतीय असे भेद ठळकपणे दिसतात (जरी आता सरमिसळ झाली असली तरी). "सारे भारतीय माझे..." असे म्हणण्यासारखे नवे यात काही दिसत नाही.
आर्य आणि एतद्देशीय दोन्ही समाजांतील सांस्कृतिक देवाणघेवाणी बद्दल भरपूर मजकूर/लेखन पूर्वीच प्रकाशित झाले आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेतच. ते इथलेच असले काय किंवा पूर्वी केव्हातरी बाहेरून आलेले असले काय...
(विशिष्ट विचारसरणीच्या लोकांना आर्य बाहेरून आले ही थिअरी गैरसोयीची असते कारण मग कुणा दुसर्यांना बाहेरचे म्हणून टारगेट करता येत नाही).
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
26 Sep 2009 - 8:15 pm | चिरोटा
द हिंदुच्या बातमीत द्रविड्/आर्य ह्याचा उल्लेख नाही.!! नेहमी प्रमाणे सनसनाटी छापण्याच्या नादात TOI ने Aryan-Dravidian divide a myth: Study म्हणून टाकले आहे.असो.
म्हणजे ते वेगळे आहेत असा अर्थ निघतो का?
हे महत्वाचे.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
26 Sep 2009 - 8:29 pm | श्रावण मोडक
या विषयात बातम्यांचा आधार घेताच येणार नाही असे या दोन्ही बातम्यांवरून दिसते. संशोधन एकच, त्याचा शोधनिबंध एकच, पण दोन्ही बातम्या टोकाच्या परस्परविरोधी. मूळ शोधनिबंध उपलब्ध झाल्यानंतरच त्यावर बोललेले बरे.
हा पेपर सध्या तरी नेचरच्या वेबसाईटवर ३२ डॉलरला आहे असे दिसते. न परवडणारी गोष्ट!!! :(
26 Sep 2009 - 11:14 pm | विकास
संशोधन एकच, त्याचा शोधनिबंध एकच, पण दोन्ही बातम्या टोकाच्या परस्परविरोधी.
त्याला शोधपत्रकारीता असे म्हणतात ;)
26 Sep 2009 - 11:23 pm | श्रावण मोडक
गंमत पहा शोधनिबंधाची माहिती पत्रकार परिषदेत दिली गेली असं दिसतंय. म्हणजे माहिती जिथं मिळाली ते ठिकाण, तो प्रसंग, ती घटनाही एकच. तरीही असं झालंय.
(जावई)शोध पत्रकारिता किंवा वाचकाचा कुठला तरी सूड घेणारी प्रति-शोध पत्रकारिता म्हणा हिला आता.
26 Sep 2009 - 11:45 pm | अंगद
धन्यवाद विकास. माहिती उत्तम आहे, अजुनही उहापोह वाचायला आवडेल.
29 Sep 2009 - 3:16 pm | सूहास (not verified)
सू हा स...